Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धाग्यात पुन्हा सुरुसुरी
धाग्यात पुन्हा सुरुसुरी आणल्याबद्दल आभार.
सगळ्यात भीतीदायक प्रसंग कोणता? तर प्रिझनर ऑफ अझ्काबान मध्ये डिमेंटर्स हॅरीला किस ऑफ डेथ द्यायला येतात तो. इतकी भीती शेवटच्या भागात हॅरीला नागिनी आणि डार्क लॉर्ड पकडतात तेव्हा नाही वाटत. मुळात डार्क लॉर्डची भीती वाटतच नाही.
डिमेंटर्सची भीती का वाटते तर ते तुमच्या सगळ्या आशा , जीवनेच्छा शोषून घेतात. आणि त्यांना थोपवायचं कसं तर आयुष्यातल्या सगळ्यात आनंददायी क्षणाच्या सहाय्याने. यापेक्षा सोप्या शब्दात तत्त्वज्ञान कोणी सांगू शकेल का? रैना म्हणतात तसं रोलिंगबाईंसमोर लोटांगण.
खूप आधी पहिला भाग वाचायला
खूप आधी पहिला भाग वाचायला काढला होता. ठीक होता, पण पुर्ण नव्हता केला. तीन आठवड्यांपुर्वी पुन्हा वाचणे सुरु केले. तीन दिवसांपुर्वी सातवा भाग वाचुन संपवला (पोराकडे सगळे भाग, आणि काही भागांच्या बर्याच कॉप्या आहेत). मस्त जग निर्माण केले आहे हे सांगणे न लागे. काही गोष्टी (किंचीत) खटकतात, पण तसे व्हायचेच. बहुतांश धागे दोरे दूर पसरवून एकत्र गुंफण्याची हातोटी विलक्षण आहे (पहिला अनुभव चॉकलेट फ्रॉग्सवरील कार्डांवरुन येतो). ऑली-वाँड-रच्या मुलाबद्दल सांगायला मात्र ती विसरली.
इतकी चांगली भाषा असलेली पुस्तके वाचण्याचा एक तोटा मात्र आहे. परवा दिल्लीच्या भव्य विमानतळावर पुस्तकांच्या दुकानात शिरलो तर तिथे अनेक प्रकारे लावुन ठेवलेली पुस्तके. एक प्रकार होता भारतातील बेस्ट सेलर्स लिस्ट. शिवा त्रिवेणीतील दूसरा भाग आला होता. पहिला भाग नंबर एक वर होता म्हणे. हा भाग चाळला तर अक्षरशः लगेच ठेवावासा वाटला - केवळ भाषेत जादु न जाणवल्यामुळे. किंवा तो तोटा नसावाच.
हरमॉयनी त्या ग्रिन्डेन्वॉल्टचा शाळेत हेडमास्तरीण बनते ...
रच्याकने, माझा वाँड चंदनाचा आहे.
विमानतळांवरचे बेस्ट सेलर्स
विमानतळांवरचे बेस्ट सेलर्स नक्की काय निकषांवर ठरवतात देव जाणे. बर्याच वेळा महाबोर पुस्तके निघतात.
चंदनाचा वांड
<<मी हॅपॉचं एकही पुस्तक
<<मी हॅपॉचं एकही पुस्तक वाचलेलं नाही.. एकही चित्रपट पाहिलेला नाही.. फॉर दॅट मॅटर मला हॅपॉबद्दल काही म्हणजे काहीच माहित नाही.. .. शून्य डोमेन नॉलेज... !
इथले आणि आजूबाजूचे पंखे, एसी, कुलर पाहून वाचेन/पाहीन म्हणतो..>>....अनुमोदन
<<पराग, आधी पुस्तकं वाचावी<<>> ...........ओके
हाफ ब्लड पाहिला.. प्रोफेसर
हाफ ब्लड पाहिला.. प्रोफेसर स्नेप हाफ ब्लड प्रिन्स असतो.
डंबल्डॉर आणि हॅरीला हूक्रक्स मिळतच नाहीत. मग हॅरीला कळते कसे? डंबल्डोर तर मरतो. आणि त्या लॉकेटमधील आर ए बी कोण ज्याच्याकडे खरे हूक्रक्स असतात? हिंदीत हूक्रक्स हाच शब्द आहे. हूक्रक्स म्हणजे जसे मायबोलीवर एकेका॑ंचे डु आय डी असतात तसे..
आता शेवटचे दोन्ही भाग राहिलेत. पैकी पहिला मी पाहिला होता.. पण आठवत नाही आहे... डी वीडी वर हाच भाग नेट दिसत नाही... आणि शेवटचा भाग तर या डे वी डी त नाही आहे.... मी काय करु आता..? मला पुढची स्टोरी कशी कळणार? आता बाजारात जाऊन परत सी डी शोधावी लागेल...
मौत के तोहफे मध्ये डंबल्डोरच्या कॉफीनमधून वॉल्डेमॉर्ट छडी घेतो असे दाखवले आहे, तिथे तो भाग संपला एवढे आठवते.. .... पण हाफ ब्लड मध्ये तर शेवटी डंबल्डोरच्या टेबलवर तीच ( का दुसरी?) छडी आहे.. ( का त्यानंतर फ्युनरल करतात आणि छडी कॉफीनमध्ये ठेवतात? ) डंबल्डोरची छदी म्हणजे थ्री ब्रदर्स कहाणीमधली मौत की छडी का? दोघांचा आकार तर सारखाच वाटत होता.....
टॉम रिडलाचा वॉल्डेमॉर्ट कसा होतो?? हॅरी पॉटर मराठीत आले नाही का?
चला, आता मौत के तोहफे १ बघूया.. जितका दिसेल तेवढा तरी बघू या..
डिमेंटर्सची भीती का वाटते तर
डिमेंटर्सची भीती का वाटते तर ते तुमच्या सगळ्या आशा , जीवनेच्छा शोषून घेतात. आणि त्यांना थोपवायचं कसं तर आयुष्यातल्या सगळ्यात आनंददायी क्षणाच्या सहाय्याने. यापेक्षा सोप्या शब्दात तत्त्वज्ञान कोणी सांगू शकेल का? रैना म्हणतात तसं रोलिंगबाईंसमोर लोटांगण.
हो. मलाही असेच वाटले होते. 'अझकाबान' मध्ये प्रोफेसर ( लुपिन?) त्याला तसे शिकवतात.
Have you ever noticed that
Have you ever noticed that Alan Rickman, while playing a character that never smiles, never messes up in a scene?
He always seems to keep a straight face.
Well, at least until now...
THIS WILL MAKE U SMILE http://www.youtube.com/watch?v=e-yA_HZrKUg
(No subject)
@ अस्चिग <<ऑली-वाँड-रच्या
@ अस्चिग
<<ऑली-वाँड-रच्या मुलाबद्दल सांगायला मात्र ती विसरली.
कोण?? ऑलिव्हॅडरच्या मुलाचा उल्लेखच नाहीये-कुठेही.
<<हरमॉयनी त्या ग्रिन्डेन्वॉल्टचा शाळेत हेडमास्तरीण बनते
हे पुस्तकात कुठेच नाहीये.
आधी पंखा असल्याची नोंद
आधी पंखा असल्याची नोंद करतो,
आता धागा वाचायला घेतो.
@मणिकर्णिका - पण हव्या होत्या
@मणिकर्णिका - पण हव्या होत्या ना!
नेव्हिलला ती ग्रिफीन्डोरची तलवार कशी मिळते?
ग्रिंगॉट्सचे पुढे काय होते?
किती मगल्सना टंबोलीनामधे जावे लागते?
सील्ड फायरप्लेस असेत त काय होते ते दिसले, पण तीच जर ईलेक्ट्रीक असेल तर?
असे काही प्रश्न आहेत. आठव्या भागात बहुदा उत्तरे सापडतील.
अस्चिग, जो खरोखर ग्रिफिन्डोर
अस्चिग, जो खरोखर ग्रिफिन्डोर आहे त्याला ही तलवार संकटाच्या काळात आपणहून मिळत असते (भाग पहिला)
ग्रिंगॉट्सचे पुढे काय व्हायला हवे होते? ती बँक आहे आणि त्याचे कामकाज नंतर पुन्हा चालू होइलच की.
किती मगल्सना टंबोलीनामधे जावे लागते?
>> हे नाही समजलं,,,,
सील्ड फायरप्लेस असेत त काय होते ते दिसले, पण तीच जर ईलेक्ट्रीक असेल तर?
>>> डेस्टीनेशन जर इलेक्ट्रिक फायरप्लेस असेल तर विझार्ड तिथे जातच नाही. आहे तिथेच स्टक होतो (रॉनचे वडिल याचा कुठेतरी उल्लेख करतात)
डंबल्डॉर आणि हॅरीला हूक्रक्स मिळतच नाहीत. मग हॅरीला कळते कसे? डंबल्डोर तर मरतो. आणि त्या लॉकेटमधील आर ए बी कोण ज्याच्याकडे खरे हूक्रक्स असतात?>>>>
स्पॉयलर अॅलर्ट
हॉरक्रक्स म्हणजे आत्म्याचे स्वतःहून केलेले भाग. जोवर हे भाग व्यवस्थित आहे तोवर व्होल्डमार्टला मारणे शक्य नसते.
व्होल्डमार्ट एकंदर सात हॉर्क्रक्स बनवतो
१. टोम रिडलची डायरी. २. हफलपफचा कप ३. रॉवेनक्लॉचा टियारा ४. नागिनी ५. ग्रीन लॉकेट ६. मार्वोलोची अंगठी.
सातवा आत्य्माच्या तुकडा व्होल्डमार्ट स्वत:. मात्र, जेव्हा हॅरीला व्होल्डमार्ट मारायला जातोतेव्हा तो स्वतःची पूर्ण शक्ती गमावून बसतो मात्र या हॉरक्रक्समुळेच तो "मरत" नाही. याच्यात्याच्या शरीराचा आश्रय घेत तो जिवन्त राहतो (उदा. क्विरेल). हॅरीला मारताना व्होल्डमार्ट जेव्हा शक्तीहीन होतो तेव्हा या आत्म्याच्या तुकड्याचा एक भाग तिथे आसपास असलेल्या एकाजिवंत व्यक्तीमधे आश्रय घेतो. परिणामी, हॅरी हादेखील एक हॉरक्रक्स बनतो. त्यामुळेच हॅरी सर्पभाषी असतो आणि व्होल्डमार्ट आणि त्याच्यामधे टेलीपथीसारखाच एक प्रकार असतो. (सातवा भाग पूर्ण वाचणे)
व्होल्डमार्टने हे हॉरक्रक्स बनवलेले कुणालाही सांगितलेले नसते, तरी डम्बलडोरला व्होल्डमार्टने असे हॉरक्रक्स बनवले आहेत असा संशय असतो. त्यामुळे जरी व्होल्डमार्टचा नाश झाला असे सर्व मानत असले तरी त्याची खात्री नसते. त्यामुळे जेव्हा व्होल्डमार्ट (शरीररूपाने) परत आलाय याची त्याला खात्री पटते तेव्हा तो या हॉरक्रक्सचा शोध घेणे चालू करतो. (स्लगहॉर्अन्ची मेमरीवाला पार्ट वाचणे)
आर ए बीच्या पूर्ण माहितीसाठी सातवा भाग पुन्हा एकदा वाचणे.
मौत के तोहफे मध्ये डंबल्डोरच्या कॉफीनमधून वॉल्डेमॉर्ट छडी घेतो असे दाखवले आहे, तिथे तो भाग संपला एवढे आठवते.. .... पण हाफ ब्लड मध्ये तर शेवटी डंबल्डोरच्या टेबलवर तीच ( का दुसरी?) छडी आहे.. ( का त्यानंतर फ्युनरल करतात आणि छडी कॉफीनमध्ये ठेवतात? ) डंबल्डोरची छदी म्हणजे थ्री ब्रदर्स कहाणीमधली मौत की छडी का? दोघांचा आकार तर सारखाच वाटत होता.....
हा प्रश्न काहीच समजला नाही. एक तर तुम्ही पुस्तक पूर्ण वाचा. चित्रपट बघून स्टोरी पूर्ण लक्षात येत नाही.
हॅरी पॉटर सीरीज मराठी अनुवादात उपलब्ध आहे.
टॉम रिडलाचा वॉल्डेमॉर्ट कसा
टॉम रिडलाचा वॉल्डेमॉर्ट कसा होतो?? >>> हॅरी पॉटर अँड चेम्बर ऑफ सीक्रेट्स वाचणे.
जागोमोहनप्यारे, हॅरी पॉटर
जागोमोहनप्यारे,
हॅरी पॉटर मराठी संच खरेदीमध्ये उपलब्ध आहे.
>> का त्यानंतर फ्युनरल करतात
>> का त्यानंतर फ्युनरल करतात आणि छडी कॉफीनमध्ये ठेवतात?
बरोबर.
त्यानंतर फ्युनरल करतात.
देवा त्यांना माफ कर! त्यांनी
देवा त्यांना माफ कर!
त्यांनी हॅरी पॉटर 'वाचला' नाहीये.
पिक्चर पाहून ज्यांनी या पुस्तकांच्या वाटेला जाऊ नये असे ठरवले आहे त्यांची मला अक्षरशः कणव येते हो. अन सिनेमा पाहून असल्या शंका विचारणर्यांची दुप्पट कणव येते.
ही पुस्तकं प्रचण्ड लोकप्रिय झालीत. अनेक भाषांत भाषांतरे झालीत
का??
why?
केवळ करमणूक प्रधान होती म्हणून? असं काय आहे या पुस्तकांत की ज्याने टीव्ही अन PS23 मधे आकंठ बुडालेल्या एका अख्या पीढीला वाचनाची आवड लावली? स्वतः वाचल्याशिवाय हे कळत नाही.
कुणी सांगू शकेल का समजाऊन?
आतापर्यंत हॅपॉ चे नुसते २-३
आतापर्यंत हॅपॉ चे नुसते २-३ सिनेमे पाहिले होते नि ते ही नीट सिक्वेंसमध्ये नाही. पुस्तकं (२ आणि ४) अर्धवट वाचली होती (मागचे संदर्भ नसल्याने फार काही मजा येत नव्हती, म्हणून मध्येच बंद केली). त्यामुळे कळलंच नव्हतं की हॅपॉ खरंच किती सुरेख आहे ते. हा धागा बघून हॅरी पॉटरचा १ आणि २ रा भाग वाचून काढले. आता ३रा वाचेन. मज्जा येतेय वाचायला.
हा धागा सुरु करणार्या चिमुरीला आणि इतर सर्व इथे लिहिणार्यांना धन्यवाद.
अस्चिग, कशाला हव्या होत्या
अस्चिग,
कशाला हव्या होत्या असं म्हणते मी. ऑलिव्हँडर हे एक आणि एकच पात्र आहे. त्याच्याशी रिलेटेड किंवा फॅमिलीशी संबंधित काही नाहीचेय स्टोरीमध्ये.
हॅरी, रॉन, ह्र्मायनी पुढे जाऊन काय बनले असतील याचा अंदाज रोलिंग आज्जींनी वाचकांवर सोडलाय. हां, फोर्थ पार्ट मध्ये ते स्वतः काय बनू इच्छीतात याचा उल्लेख झालाय पण उपसंहारात आणि शेवटच्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख कुठेच नाही
ग्रिंडेलवाल्ड हा मनुष्य आहे. शाळा नाही. एच.पी मध्ये उल्लेख झालेली विझार्डींग स्कूल्स फक्त तीनच-
१. होगवर्ट्स
२. बॉक्सबीटन
३ डर्मस्ट्रँग
टंबोलीना हा शब्दच मुळी एच.पी मध्ये नाही.
मला दाट शंका येतेय की तुम्ही इंटरनेट वरचं फेक वर्जन वाचलंय. नक्कीच.
मणिकर्णिका, किती सिरिअसली
मणिकर्णिका, किती सिरिअसली घ्यायच्या या गोष्टी?
ग्रिंडनवॉल्डची शाळा डर्मस्ट्रँग.
तिने वाचकांवर सोडले आहे म्हणुन तर मी ती मते मांडली.
मला काळजी आहे की पुढील विद्यार्थ्यांचे वाँड्स कोण बनवेल.
टंबोलीआ (टंबोलीन चुकुन लिहिले होते) हे माझ्या दूसर्या एका आवडत्या पुस्तकातुन आहे. एकप्रकारे विझार्ड्स च्या दृष्टीकोनातुन मगल्स बहुतांशवेळा तिथेच असतात.
या दुव्यावर एक उल्लेख सापडेलः
http://philosophy.thecastsite.com/readings/geb/hofstadter2.html
नंदिनी, आधी डंबलडोर कडे तलवार होती तेंव्हा ठीक होते. पण गॉब्लीन्स कडे परत गेल्यावर पण?
मी पंखा असलो तरी शेवटी ७ भाग
मी पंखा असलो तरी शेवटी ७ भाग खूप वाटतात. जी उत्कंठता पहिल्या चारमधे निर्मआण झाली होती ती फक्त सातव्यामधे येते. पाच सहा नुसत्या fan demand साठी असाव्या असे वाटत राहते. पहिल्या चारांमधली सुसूत्रता नंतर हरवलेली वाटत. ... And I stood in line early in the morning for last 3 books
वर कोणी तरी LOTR बद्दल म्हटलेय. ते जास्त नीटनेटके वाटते पॉटरपेक्षा वाचताना.
होय. माझे बरोबर आहे. थ्री
होय. माझे बरोबर आहे. थ्री ब्रदर्स स्टोरीमधील एल्डर छडी म्हणजे डंबल्डोरची छडी.. शेवटी ती हॅरीला मिळते आणि हॅरी ती मोडून टाकतो.
जागोमोहन, शक्य असेल तर
जागोमोहन, शक्य असेल तर पुस्तकं वाचा.. मूव्ही मधे बरेच बदल केलेले असतात.. पुस्तकात हॅरी तो वॉन्ड मोडतो असा उल्लेख नाहिये...
मला काळजी आहे की पुढील विद्यार्थ्यांचे वाँड्स कोण बनवेल.>>>>>>>>>> ऑलिवन्डर मेलेला दाखवला नाहिये... आणि अजुनही बरेच असतिलच की वॅन्ड मेकर...
देवा त्यांना माफ कर!
त्यांनी हॅरी पॉटर 'वाचला' नाहीये. >>>>>>>>>>> काय हा इब्लिसपणा
सगळ्यात भीतीदायक प्रसंग कोणता?>>>>>>>> मला दुसर्या भागातल्या बॅसिलिकची भयंकर भिती वाटते...
नेव्हिलला ती ग्रिफीन्डोरची
नेव्हिलला ती ग्रिफीन्डोरची तलवार कशी मिळते?
नेविलला बोलती टोपी मिळते. तो सच्चा आणि लायक गरुडद्वारी असल्याने त्या टोपीतली गरुडद्वार ( ग्रिफेंडर) तलवार त्याला दिसते आणि तो नगिनीला मारुन टाकतो. नगिनी हाच शेवटचा हाक्रक्स असतो. मग वॉल्डेमॉर्ट मरतो.
( स्पॉयलर अॅलर्टची गरज नाही.. हॅरी पॉटरमध्ये इतकी रहस्ये आहेत की इथले सगळे वाचले तरी अजून काही शिल्लकच रहातात.. )
स्पॉयलर अॅलर्टची गरज नाही..
स्पॉयलर अॅलर्टची गरज नाही.. हॅरी पॉटरमध्ये इतकी रहस्ये आहेत की इथले सगळे वाचले तरी अजून काही शिल्लकच रहातात..
एल्डर छडी... पुस्तकात हॅरी
एल्डर छडी...
पुस्तकात हॅरी छडी मोडतो असा उल्लेख नाही.. त्याऐवजी तो ती छडी डंबल्डोरच्या थडग्यात परत ठेवायचा निर्णय घेतो.. म्हणजे हॅरीचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास ती छडी निकामी होणार.. ( छडी अॅक्टिव तेंव्हाच रहाते जेंव्हा तिच्या मालकाला जिवंतपणी हरवून्/मारुन ती छडी नवा माणूस घेतो. मालक नैसर्ग्क मृत्युने मेला की छडी निकामी/नष्ट होणार.)
एल्डर छडीचा खरा मालक हॅरीच असतो... डंबल्डोर-->ड्रॅको मॅल्फॉय--> हॅरी या सिक्वेन्सने. पण वॉल्डेमॉर्ट मात्र स्नेपला त्याचा मालक समजत असतो म्हणून तो त्याला मारुन छडीचा मालक व्हायला बघतो. ( कारण स्नेपने डंबल्डोरला मारले म्हणून, पण त्याच्याआधीच ड्रॅकोने डंबल्डोरला निशस्त्र केलेले असते..) तो हॅरीला एल्डर छडीने कर्स देतो.. पण छडी आपल्या खर्या मालकाला कधी मारत नाही. त्यामुळे छडी हॅरीच्या आत्म्याला/ हॅरीला मारत नाही. पण हॅरीच्या शरीरतील वॉल्डेमॉर्टचा आत्मा मात्र मरतो.. तो मेलेला आत्मा म्हणजे रेल्वे स्टेशनवरचे रक्ताळलेले बाळ...
कालपासून पुन्हा एकदा हॅरी
कालपासून पुन्हा एकदा हॅरी पॉटर वाचायला सुरुवात केली.
मँडम अंब्रीजला सेंटॉर्स
मँडम अंब्रीजला सेंटॉर्स -अश्वनर पकडून नेतात.. मग ती परत कशी येते?
सिरियस ब्लॅक बकबीकला घेऊन उडून जातो. त्यानंतर ब्लॅक मरतो. मग त्या बकबईकचे पुढे काय होते?
जामोप्या, सातही पुस्तके वाचा.
जामोप्या, सातही पुस्तके वाचा. त्यामधे या प्रश्नाची उत्तरे आहेत.
हा धागा "वाचू आनंदे" मधे आहे, चित्रपट विभागात नाही.
(No subject)
नंदिनी डोलोरस अंब्रिज बाई
नंदिनी
डोलोरस अंब्रिज बाई कसली #$%@^@#$#%@#ञृफ्व्फ्@ट्ङ्फ्डॅ॓# आहे. कसली कुत्सित हसते. आपल्या सिरीअल वॅम्प बायांना म्हणावं बघा तिच्याकडं. घ्या काहीतरी तिच्याकडनं...
डम्बलडोर साहेब 'सर' वगैरे आहेत म्हणे !
आल्बस डम्बल्डोर
आल्बस डम्बल्डोर
Pages