सध्या माझी बाग छान फुलतेय.
सोनटक्याचा एक सीझन येऊन गेला, दुसरा उंबरठ्यावर उभा आहे.
मधुमालती मस्त फुलून गेली.
लिली बहरून गेली.
अन रातराणीही सुवासून गेली.
सध्या बहरलीय ती मुकी जास्वंद !
लाल गुलाब ४-४, ५-५ फुलांनी लगडलाय.
अन कळ्यांनी वाकलाय कुंद.
रंगबिरंगी पानंही सजलीत.
परवा इंद्रधनुष्यानेही कमान केली माझ्या बागेवर.
अन मग येऊ लागले काही नवखे लोक. फुलपाखरं, छोट्या मधमाशा, किडे, चिमण्या, बुलबुल अन चक्क सनबर्डही
काल दोन-तीनदा एक बुलबुलाचे दांपत्य अन एक सनबर्डचे दांपत्य पाहणी करून गेले.
मग मला कंबर कसायलाच लागली. सकाळी सगळे आवरले अन मग लागले कामाला. अन त्यातून तयार झाला हा वन बीएचके फ्लॅट
इस्त्रीचे एक खोके, जुम्या वह्यांची कव्हरं, काही चिकटपट्या अन वायरीचे तुकडे, अन थोडे कष्ट अन थोड्या आयडिया. बस झाले.
बघा कोण कोण इंट्रेस्टेड आहेत? आताच दोघे बुलबुल प्राथमिक पाहणी करून गेले. कॅमेरा रेडी नव्हता, नाही तर सप्रमाण सिद्ध केलं असतं आता नवे जोडपे राहायला आले तर टाकेनच त्यांचे फोटो
अवले...तुझी 'बाग' बघितलीच
अवले...तुझी 'बाग' बघितलीच होती. मस्त फुलली आहे गं!!
ती जास्वंदीची 'मुकी' कळी काय सुंदर दिस्तेय!
व्वाव! सहीच.
व्वाव! सहीच.
धन्स आर्या, गिरीश
धन्स आर्या, गिरीश
व्वा छान...
व्वा छान...
झकास....
झकास....
सही.....!! एकदम मस्त !
सही.....!! एकदम मस्त !
अगं ते पक्ष्यांसाठीचं घर कसलं
अगं ते पक्ष्यांसाठीचं घर कसलं मस्त आहे! कसं बनवलंस?
काश मै भी पंछी होता ..
काश मै भी पंछी होता ..
मस्त ! बिल्डर बाई अजून बांधा
मस्त ! बिल्डर बाई अजून बांधा फ्लॅट्स. एवढ्या सुंदर फ्लॅट्सना खूप मागणी येईल आणि तुझ्या बाल्कनीचे गोकूळ होईल
धन्यवाद सर्वांना शैलजा, अगं
धन्यवाद सर्वांना
शैलजा, अगं इस्त्रीचे खोके जरा कारागिरी केली इअतकेच
अनिल, आग्रहाचे आमंत्रण रे तुला
अश्विनी डि एस के रागावतील की
अश्विनी डि एस के रागावतील की
मस्त
मस्त
जबरी... सुंदर आहे बाग अन
जबरी... सुंदर आहे बाग अन प्क्षांचं घर पण.
सह्हीच काश मै भी पंछी होता
सह्हीच
काश मै भी पंछी होता ..>>>>>
सुंदर.
सुंदर.
सही !
सही !
खुप सुंदर!
खुप सुंदर!:)
मस्तच... आता भाडेकरु आले की
मस्तच... आता भाडेकरु आले की कळवा.. त्यांची पोरे दंगा करु लागली की तक्रार मात्र करु नका
झकास! फुलांपानांचे फोटो सुरेख
झकास! फुलांपानांचे फोटो सुरेख आहेत. आणि पाखरांचा निवाराही मस्त आहे!
झकास! फुलांपानांचे फोटो सुरेख
झकास! फुलांपानांचे फोटो सुरेख आहेत. आणि पाखरांचा निवाराही मस्त आहे!
झकास! फुलांपानांचे फोटो सुरेख
झकास! फुलांपानांचे फोटो सुरेख आहेत. आणि पाखरांचा निवाराही मस्त आहे!
मस्तच बाग फुलवली आहेस, एक
मस्तच बाग फुलवली आहेस,
एक शंका - पुट्ठ्याच्या खोक्याचा वापर पक्षी करतात का ?? कारण ते पावसाने भिजले तर फाटेल, निवारा शोधताना पक्षी नेहमी मजबुतीची काळजी घेतात असे पाहिले आहे.
धन्स सगळ्यांना ससा, माझ्या
धन्स सगळ्यांना
ससा, माझ्या टेरेसला ओनिंग आहे त्यामुळे ते भिजणार नाही, फाटणार नाही, शिवाय वायरींनी ते पक्के बांधलेय, अन खाली कठड्याचा आधारही आहे. बघूयात येतात का भाडेकरू
सहीच!
सहीच!
अवल, तुझी बाग मस्त, त्यातली
अवल, तुझी बाग मस्त, त्यातली फुलं मस्त, फोटो मस्त आणि तुझी आयडिया आणि kindness तर मस्तच मस्त ! काश मी मनिमाऊच्या ऐवजी चिऊताई असते. लगेच बळकावला असता तो गार्डन फ्लॅट.
मस्तच ग अवल बुलबुल विचारात
मस्तच ग अवल
बुलबुल विचारात पडेलला असतानाच फोटो मस्तच!!!!!
अवल, ____/\____ तुझ्या
अवल, ____/\____ तुझ्या पक्षीप्रेमाला. छानच झालय ग घर. आता नक्की लवकरच भाडेकरू येणार. आणि त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचे फोटो पण आम्हाला पहायला मिळणार.
अग, गेल्या आठवड्यात आमच्या पण गॅलरीत एक जोडप आल होतं. मी वाट पहात बसले. त्यानी घर बांधण्याची. पण ते मनकवडे निघाले. त्याना बहुतेक माझा विचार कळला.(फोटो काढण्याचा) परत आलेच नाहीत.:अओ:
अवल मला सांगता का तुम्हि नेमक
अवल मला सांगता का तुम्हि नेमक कुठ राहता? लोकेशन फार सुंदर, आणि फोटोंबद्द्ल सांगायच तर ते अप्रतिम.....................
खूपच सुंदर आहेस सगळेच फोटो...
खूपच सुंदर आहेस सगळेच फोटो... तुम्हाला लवकर नवे भाडेकरु मिळोत.
अवल.खरच तुला लवकरच भाडेकरू
अवल.खरच तुला लवकरच भाडेकरू मिळु देत
भारीच आयडियाची कल्पना आहे.
Pages