सध्या माझी बाग छान फुलतेय.
सोनटक्याचा एक सीझन येऊन गेला, दुसरा उंबरठ्यावर उभा आहे.
मधुमालती मस्त फुलून गेली.
लिली बहरून गेली.
अन रातराणीही सुवासून गेली.
सध्या बहरलीय ती मुकी जास्वंद !
लाल गुलाब ४-४, ५-५ फुलांनी लगडलाय.
अन कळ्यांनी वाकलाय कुंद.
रंगबिरंगी पानंही सजलीत.
परवा इंद्रधनुष्यानेही कमान केली माझ्या बागेवर.
अन मग येऊ लागले काही नवखे लोक. फुलपाखरं, छोट्या मधमाशा, किडे, चिमण्या, बुलबुल अन चक्क सनबर्डही
काल दोन-तीनदा एक बुलबुलाचे दांपत्य अन एक सनबर्डचे दांपत्य पाहणी करून गेले.
मग मला कंबर कसायलाच लागली. सकाळी सगळे आवरले अन मग लागले कामाला. अन त्यातून तयार झाला हा वन बीएचके फ्लॅट
इस्त्रीचे एक खोके, जुम्या वह्यांची कव्हरं, काही चिकटपट्या अन वायरीचे तुकडे, अन थोडे कष्ट अन थोड्या आयडिया. बस झाले.
बघा कोण कोण इंट्रेस्टेड आहेत? आताच दोघे बुलबुल प्राथमिक पाहणी करून गेले. कॅमेरा रेडी नव्हता, नाही तर सप्रमाण सिद्ध केलं असतं आता नवे जोडपे राहायला आले तर टाकेनच त्यांचे फोटो
मस्त फोटो आणि भाड्याने
मस्त फोटो आणि भाड्याने द्यायचा फ्लॅट देखील.
पर्यावरणाशी छान नातं जोडताय.
--------------------------------------------------------------------------------
काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या एका माणसाने त्याच्या बंगल्यात
असे अनेक खोके, प्लॅस्टिकचे डबे इ. पासून घरटी बनवली आहेत
याबद्दल 'लोकसत्ता' मध्ये माहिती आली होती.
व्वा.. छानच.. मुकी जास्वंद..
व्वा.. छानच.. मुकी जास्वंद.. अप्रतिम !!
'द्रुपल' महाराजांच्या
'द्रुपल' महाराजांच्या दुष्कृपेमुळे वरचाच पोस्ट चुकून रिपीट झाला.
डिलीट करता येत नाही म्हणून संपादित केला आहे.
सही
सही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत फोटो. हिरवे जांभळे
मस्त आहेत फोटो. हिरवे जांभळे पान आवडले आणी पक्ष्यासाठीच घर सूध्दा.
अवल बाग छानच फुललीये!
अवल बाग छानच फुललीये!
वा, पक्षी व्हावेसे वाटते आहे
वा, पक्षी व्हावेसे वाटते आहे अगदी.
उन्हाळ्यात पाणी ठेवले तर पाणी प्यायलाही अनेक पक्षी येतील.
मस्तं. मस्तं. भाडेकरुंना घर
मस्तं. मस्तं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाडेकरुंना घर लाभू दे.
अवल, एकदम जबरी आहे बाग..
अवल, एकदम जबरी आहे बाग.. मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल खुपच सुंदर तुझी बाग आणि
अवल खुपच सुंदर तुझी बाग आणि तुझ निसर्गप्रेम. त्या घराला लवकरच मालक मिळो.
अवल, मस्तच आहे तुझी बाग
अवल, मस्तच आहे तुझी बाग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाSSव, तुमच्या बागेत रातराणी
वाSSव, तुमच्या बागेत रातराणी आहे..मला खुप आवडते रातराणी.
जास्वंद, पानाचा जवळुन फोटो,
जास्वंद, पानाचा जवळुन फोटो, घरकुल खुप आवडले. शेवटच्या ओळी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच. अवल आता छान लाकडाचं
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल आता छान लाकडाचं करुन घे एक घर. मग कायमचे होईल आणि भाडेकरुही कायमचे रहातील. फक्त दरवाजा छोटाच ठेव नाहीतर कबुतर यायचे.
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता तर तिचा वेल मी टेरेस मधून स्वयंपाक घराच्या बाहेरून बेडरूमपर्यंत नेलाय ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, हो ठेवेन पाण्याचा छोटा रांजण
जागू धन्स
विनार्च, काहींनी मला वेड्यात काढलं होतं, रातराणी घरात काय ? पण मी हट्टाने लावली, अन आता काय सुख अनुभवतेय सांगू
सावली हो बाई त्या कबुतरांनी उच्छाद आणलाय, सुरुवातीला सगळी रोपं कुंडीतून उपटून काढायची, आता ओनिंगमुळे जरा कमी झालीत. पण नवीन रोप लावताना लक्ष द्यावच लागतं.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
दाद द्यायला हवी तुमच्या
दाद द्यायला हवी तुमच्या प्रयत्नांना...
अवल बाग मस्त्त्त.मी सध्या
अवल बाग मस्त्त्त.मी सध्या नानबाकडे आले आहे. वाईला आमची बाग पण मस्त बहरलीय.तिकडे गेले की फोटो टाकेन.
सह्ही है बॉस!
सह्ही है बॉस!
वा अवलजी, मान गये.. बाग मस्त
वा अवलजी, मान गये.. बाग मस्त फुललीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जमलं तर या घरट्याला काळपट
जमलं तर या घरट्याला काळपट हिरवा कागद चिकटवा, म्हणजे झाडांमध्ये ते वेगळे उठून दिसणार नाही व पक्ष्यांना घरट्यासाठी जास्त सुरक्षित वाटेल.
अवल, तुझ्या बागेचे,
अवल, तुझ्या बागेचे, पानाफुलांचे, बागेतल्या गोड पाहुण्यांचे सुंदर फोटो खूप आवडले !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
Pages