Submitted by पुरंदरे शशांक on 30 August, 2011 - 01:08
श्रावण दारी....
श्रावण दारी मना हुरहुरी....थांब ना सख्या जरा क्षणभरी
श्रावण वैरी साजण दूरी.....गळा हुंदका नजर भिरभिरी
श्रावण रानी लखलख पानी....दिठी विस्फारे लक्षदर्पणी
श्रावण झारी रेशीमधारी....सरसर येता फिर माघारी
श्रावण किरणे जादूभरली.....सप्तरंग लेऊन ये खाली
श्रावण ताजा गंधित हिरवा...... चहुबाजूंनी बरवा बरवा
श्रावण गाणे मधुर तराणे.....अंतरी आलापींचे लेणे
श्रावण कान्हा राधा अवनी....टिपरी वाजे थेंब होऊनी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
श्रावण मासी कवी
श्रावण मासी कवी उदराती...साजीरी गोजीरी काव्ये जन्मती.
सुंदर.
छान. श्रावणाची विविध रूपं
छान. श्रावणाची विविध रूपं आवडली.
“श्रावण कान्हा राधा अवनी....टिपरी वाजे थेंब होऊनी”
हे विशेष उल्लेखनीय.
छान कविता.
छान कविता.
मस्त.
मस्त.
छान!
छान!:)
शशांकजी, मस्त ताजी ताजी कवित.
शशांकजी,
मस्त ताजी ताजी कवित. श्रावणाचं यथार्थ दर्शन घडवलत आपण. पुलेशु
(No subject)
अतिशय छान काव्य आहे. विविध
अतिशय छान काव्य आहे. विविध रुपे श्रावणाची दिसली.
मस्त
मस्त
सुंदर श्रावण बरसला.
सुंदर श्रावण बरसला.
सर्वांचे मनापासून आभार....
सर्वांचे मनापासून आभार....
फार सुंदर. शशांक दिसतो यातून.
फार सुंदर. शशांक दिसतो यातून.
किंचितसा बदल केलाय......
किंचितसा बदल केलाय......