Submitted by gajanan mule on 27 August, 2011 - 13:14
तुझ्या येण्याने
तुझ्या येण्याने...
ऋतू बदलणार नाहीत
...हे मलाही आहे माहित
पण पानगळीतही आतल्या आत
बहरत राहील झाड
तेव्हा गळणाऱ्या पानांचं पिवळं मन
त्याला विचारणार नाही प्रश्न
‘कसं रे सहायचं आता हे जग उष्ण”
तू येऊनही...
ग्रीष्माचा दाह तसाच असेल टिकून,
पण गोड होईल स्वप्न
आतल्या आत पिकून ...
पिवळ्या केशर आंब्यासारखं
काळ्याभोर कोकिळेसारखं
गात राहू उन्हात
कुठेतरी बनात
असेल निवारा
परक्याचा का होईना
राहू एखाद महिना
... पुन्हा नवा ऋतू ...
तुझ्या येण्याने ...
मीही भिजून जाईन पावसात
एकाकी वाटणार नाही
कितीतरी दिवसात
तुझ्या सोबतीनं
घडत जाईल सारं
नेहमीसारखं ...
पण एक पाखरू
...एक लेकरू
वाटणार नाही पारखं
... कुणालाही ..!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तुझ्या येण्याने चराचरी बहरती
तुझ्या येण्याने चराचरी
बहरती तरू वेली,
तुझ्या येण्याने चराचरी
खेळ चाले झुलाझुली!
आवडली
आवडली
सुरेख.
सुरेख.
"तू येऊनही... ग्रीष्माचा दाह
"तू येऊनही...
ग्रीष्माचा दाह तसाच असेल टिकून,
पण गोड होईल स्वप्न
आतल्या आत पिकून ...
पिवळ्या केशर आंब्यासारखं"
..... छान