पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्ल ओनियन म्हणजेच पांढरा कांदा का? भारतात जनरली उन्हाळ्यात मिळतो तो? नेटवर त्याच्या रस्सम, सांबार आणि करीच्या बर्‍याच रेसिपीज आहेत. पण रस्सा असा वेगळा मला तरी दिसला नाही.

तिरुपतीला मिळतात ते लाडु कसे बनवतात कोणाला माहित आहे का? दिनेश तुम्हाला नक्कीच माहिती असतील. कृती टाका ना....

अकु, सांबार कांदा गं पर्ल अनियन म्हणजे. मी नेटवर पाहिल्या रेसिपीज पण मला मराठमोळी एखादी असेल तर हवी होती रेसिपी. शेवटी ते कांदे, बटाटे आणी टोमॅटोचा एकत्र गोडा मसाला घालूनच केला रस्सा.

अगं मी ते कांदे फोडणी (हळद, हिंग, कडीपत्ता) टाकून तेलावर परतून झाकण ठेवून मग अर्धे शिजले की थोडा दाण्याचा कूट, काळा मसाला, आमचूर पावडर, धने-जिरे पूड अन किंचित पाणी घालून परत एक वाफ आणते. थोडा रस्सा होतो.

अमेरिकेत मिळणार्या पालेभाज्यांची english नावे कोणी सांगेल का? इथेच कुणितरी मागे मोठी list दिली होती. शोधायचा खुप प्रयत्न केला पण सापडल नाही.

धन्यवाद दिनेशदा,
चीज केकचे तयार मिक्स इथे पुण्यात पण मिळेल का?

घरी करता येण्यासारखी रेसिपी पण असेल ना??

दिनेशदा तुमच्या आमटीच्या/वरणाच्या रेसिपीज हव्या आहेत.

चिऊ,
एक बेसिक कृति इथे देतो.
आवडत्या बिस्किटांचा चुरा करुन त्यात ओले होईस्तो बटर घालायचे. मग ते मिश्रण एका खोलगट डीशच्या तळाशी आणि कडेला दाबून बसवायचे. चक्का आणून तो फेटून त्यात साखर घालायची. आवडत्या स्वादाचे जेलीचे पाकिट आणून त्यात दिलेल्या प्रमाणाच्या अर्ध्यापेक्षा कमी पाणी वापरून जेलीचे मिश्रण करायचे. त्यात श्रीखंड घालून ते सगळे नीट एकत्र करायचे. मग ते तयार केलेल्या डिशमधे ओतून फ्रिजमधे सेट करायचे. भारतात सहज मिळणारे पदार्थ वापरुन हे करता येते. मूळ कृतित अर्थातच चीज, अंडे वगैरे वापरतात.

सुचरिता

वरणाचे प्रकार असा लेख होता तो. फार जूना नाही. नव्या मायबोलीवरच आहे.

चिऊ, मी नेहमी करते चीझकेक.. क्रीम चीझ, सोअर क्रीम, अंडे, साखर, हवा तो फ्लेवर (मी केसर वेलची, पंप्कीन स्पाईस, दालचीनी असे वापरते, सगळे एकदम नाही Happy ) एकत्र फेटुन घ्यायचे आणी ग्राहम क्रॅकरच्या बेसवर ३५० फ ला तास्भर बेक करायचे. अगदी मस्त होतो माझा चीझकेक. तुला नेटवर खुप रेसीपी/टिप्स पण मिळतील. मला पोला डीनची रेसीपी सगळ्यात चांगली वाटली.

मी जर्मनी मध्ये आहे. इथे मला श्रीखंड कसे करता येइल घरी? मला उद्याच करायचे आहे तर प्लीज लवकर मदत करा. इकडे कुठल्या ब्रॅंडचं दही वापरू... आणि सावर क्रीम पण वापरतात नं? (असं वाचल्याचं आठवतं) ते कुठलं वापरू? कोणि डिटेल रेसिपी टाकू शकेल का? प्लीज सांगा, इज्जत का सवाल आहे!!!! Happy

गोडगोजिरी, मी पण जर्मनी मध्ये आहे. आणी मी श्रीखंड असे करते: कुठल्याहि brand चे क्वार्क घे. 40-45% fat वाले. आणी hand mixer खुप फेट. मग सा़खर , muskat nuss powder, वेलचि पुड घाल.

अरुंधती, अनानी, थँक्यू सो मच! मी १ किलो दह्याचा चक्का टांगून केलं श्रीखंड! आणि आईने हापूस पावडर पाठवली होती, ती घालून मस्त आम्रखंड केलं. वेलची पूड, केशर वैगरे घालून मस्त झालं. सा.बा.न्चा बर्थ्डे आहे... त्या खुश! आणि साबुंना पण खूप आवडलं.

रमणी, मलाही आंतरजालावर त्याचे घटक पदार्थ काय आहेत एवढेच कळाले. त्यांचे प्रमाण नव्हते दिले कुठेच.

Pages