Submitted by मी विडंबनकार on 24 March, 2011 - 03:22
आईच्या हातची न्याहरी,
आईच्या हातचं जेवण.
एवढं प्रेम पुढे कोण देणार?
आईच्या मऊ कुशिलाच काय,
आईने पाठीवर दिलेल्या धपाट्यालासुद्धा , कसं विसरणार?
माझ्यावर कुणी बोट उचललं,
तिला सहन होत नसे,
तिच्या दिलखुलास हास्यालाच काय,
तिच्या डोळ्यातील पाण्यालासुद्धा , कसं विसरणार?
तू बोलायला शिकवलेला एक एक शब्द
तू खाऊ घातलेला एक एक मायेचा घास
तू चालायला शिकवलेलं एक एक पाउलच काय
तर चालताना अडखळून पडताना सावरलेलंसुद्धा , कसं विसरणार ?
आई तूच जगायला शिकवलस
माझं जीवन , माझं विश्व तुझ्याच चरणी आहे.
या विश्वाला, कसं विसरणार?
गुलमोहर:
शेअर करा
व्वा, रोहित... उत्तमच
व्वा, रोहित...
उत्तमच जमलीये...
तिच्या दिलखुलास हास्यालाच काय,
तिच्या डोळ्यातील पाण्यालासुद्धा , कसं विसरणार?
ह्या ओळी मस्तच जमल्यात...
पुलेशु...
धन्यवाद !!
धन्यवाद !!
आईच्या मऊ कुशिलाच काय, आईने
आईच्या मऊ कुशिलाच काय,
आईने पाठीवर दिलेल्या धपाट्यालासुद्धा , कसं विसरणार?
ह्या ओळी खुप आवड्ल्या..
व्वा, रोहित... ग्रेट
मनोगत वर पण का?
मनोगत वर पण का?
ही कविता.....कशी विसरणार?
ही कविता.....कशी विसरणार?
आवडली रोहित.
सुंदर. जे जे काही आईचे ते कसे
सुंदर.
जे जे काही आईचे
ते कसे विसरणार?
माझं जीवन , माझं विश्व तुझ्याच चरणी आहे.
या विश्वाला, कसं विसरणार?
या चरणांना, कसं विसरणार?
सुंदर.शेवटची ओळ ''तुला कस
सुंदर.शेवटची ओळ ''तुला कस विसरणार''अस वाचल.
छान.
छान.
खुप सुंदर!
खुप सुंदर!:)