कसं विसरणार?

Submitted by मी विडंबनकार on 24 March, 2011 - 03:22

आईच्या हातची न्याहरी,
आईच्या हातचं जेवण.
एवढं प्रेम पुढे कोण देणार?
आईच्या मऊ कुशिलाच काय,
आईने पाठीवर दिलेल्या धपाट्यालासुद्धा , कसं विसरणार?

माझ्यावर कुणी बोट उचललं,
तिला सहन होत नसे,
तिच्या दिलखुलास हास्यालाच काय,
तिच्या डोळ्यातील पाण्यालासुद्धा , कसं विसरणार?

तू बोलायला शिकवलेला एक एक शब्द
तू खाऊ घातलेला एक एक मायेचा घास
तू चालायला शिकवलेलं एक एक पाउलच काय
तर चालताना अडखळून पडताना सावरलेलंसुद्धा , कसं विसरणार ?

आई तूच जगायला शिकवलस
माझं जीवन , माझं विश्व तुझ्याच चरणी आहे.
या विश्वाला, कसं विसरणार?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा, रोहित...
उत्तमच जमलीये...

तिच्या दिलखुलास हास्यालाच काय,
तिच्या डोळ्यातील पाण्यालासुद्धा , कसं विसरणार?

ह्या ओळी मस्तच जमल्यात...

पुलेशु... Happy

आईच्या मऊ कुशिलाच काय,
आईने पाठीवर दिलेल्या धपाट्यालासुद्धा , कसं विसरणार?

ह्या ओळी खुप आवड्ल्या..

व्वा, रोहित... ग्रेट

सुंदर.
जे जे काही आईचे
ते कसे विसरणार?

माझं जीवन , माझं विश्व तुझ्याच चरणी आहे.
या विश्वाला, कसं विसरणार?

या चरणांना, कसं विसरणार?

छान. Happy