Submitted by आनंदयात्री on 5 August, 2011 - 06:11
माणसे गावातली होती
वाटले, ती आपली होती
गवगवा नुसताच दानाचा
मूठ त्यांनी झाकली होती
वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती
मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती
उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती
मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)
मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती
वादळे नशिबातही होती
छप्परे भेगाळली होती
श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती
सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छोट्या बहरमधली गझल! मस्त
छोट्या बहरमधली गझल!
मस्त जमलेय.
आनंद, मस्त ! मला माबोवर
आनंद, मस्त ! मला माबोवर नुसत्या उनाडक्या करण्यापेक्षा काही ३-४ लोकांच्या गझल्स वाचण्याचा सल्ला होता. त्यातला तु एक. आज कळलं का?
आख्खीच्या आख्खी आवडली.
मी जगावर प्रेम केले
मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती
नि:शब्द!!
कणखर, दक्षे, किरू, मिल्या,
कणखर, दक्षे, किरू, मिल्या, क्रांतिताई, प्राजु, मनिमाऊ, दगडू, अनिलजी, देवकाका, सुप्रिया - thanks दोस्तहो!
मनिमाऊ - a big compliment it is!
Pages