सकाळचे सव्वा सात ते साडे सात वाजले असतील, मी दात घासून, तोंड धुवून दुध वाल्याची वाट
पाहत टीव्ही समोर बसले होते. आता टीव्ही वर कुठल्या तरी बाबाची योगासने चालू होती.
त्यातील एखादे आपण हि करून बघावे म्हटले पण बसल्या जागचे उठ्नेच अवघड होवू लागले.का कुणास ठावूक शरीरात संचयनी सारखा चरबीचा साठा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. वजन जेम तेम ऐंशी किलोच होते पण पोटाचा घेर मात्र अठेचाळीस तो पन्नास इंच पेक्षा कमी व्हायचे नावच घेत नव्हता.
.एके काळी सौंदर्य स्पर्ध्येत भाग घेवून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस घेणारी ब्युटीक्वीन मी आता मात्र डब्लू डब्लू एक्स ची योद्धा वाटत होते.पूर्वी कशी नखरेल, तोऱ्यात आणि ठुमकत चालत असे पण आता जिन्याच्या सात पायऱ्या चढायाच्या किंवा उतरायच्या म्हटले तरी तीन पायऱ्या नंतर दोन मिनिटे बसून विश्रांती घ्यावी लागे. कुठे ती भाग्यश्री आणि कुठे आज भागू बाई ! माझं मलाच हसू आलं. टीव्ही मधल्या मुली रबरी बाहुली सारख्या अंग वाकवत होत्या. मी टीव्हीतील त्या मुलींकडे तर कधी स्वत: कडे पाहत होते.
" ट्रिन- ट्रिन-" फोन ची बेल वाजली
' अगं बाई एवढ्या सकाळी कोण हे' म्हणून मी फोन उचलायचे टाळले.
" ट्रिन- ट्रिन-" पुन्हा बेल. मी एक हात खाली जमिनीवर टेकत कशी बशी उठले पण तोवर बेल वाजणं बंद झालं होतं.परत परत पाय पीट नको म्हणून मी जागच्या जागी तशीच उभी राहिले. दहा मिनिटे झाली तरी फोन काही येईना. उभी राहून माझ्या पायाला मुंग्या आल्या. खुर्ची घ्यावी म्हटले तर ती डायनिंग टेबला जवळ होती. न राहवून मी माघारी जाणार तोच -
" ट्रिन- ट्रिन-" पुन्हा बेल वाजली..आता मात्र तेवढ्याच लगबगीने मी मागे फिरले. आता हि संधी सोडूच नये असा निर्धार करून फोन घ्यायचाच असं ठरवलं. एक वेळ ह्यांचाच फोन असेल असं वाटलं. म्हटलं, यांना आज विचारावं, 'काय हो एक दिवस निट झोपू शकत नाहीत का..?..घरी आठ वाजले तरी उठवत नाही..आणि आज...? बरे कधी काळी उठलेच तर साधी टीव्हीची काच हि पुसत नाहीत.मी आहे म्हणून बरे!
ट्रिन- ट्रिन-ट्रिन- ट्रिन' फोन वाजतच होता. माझ्या पायाची गती आता वाढली होती. पटकन रिसीवर उचलून कानाला लावत मी म्हणाले, "हेलो..."
" हे-हेल्लो.." तिकडून कुणी तरी जोराने ओरडले.
" हे पहा, मी काही बहिरी नाहीय...जरा हळू बोला..." मी दरडावले.
"म्याडम , म्या सखाराम..."
पण अस्पष्ट उच्चार मला काही समजला नाही...
"अरे, कोण आसाराम..?"
" हे-हेल्लो, म्याडम, म्या बोलतो..म्या.."
"अरे बाबा इकडून पण म्या बोलत्ये ना..." मी त्याची उडवत म्हणाले..
" म्या सखाराम...सखाराम बोंबले..."
" अरे मुडद्या, बोम्बल, जरा कमी प्यायची....साहेब कुठे आहेत...फोन दे त्यांना..." हा आमचा ड्रायवर सखाराम बोंबले..नावा प्रमाणेच बोंबलायची सवय त्याची मला चांगली माहित होती. रात्रीची नश्या अजून उतरली नव्हती म्हणून अडखळत होता. तो पुढे बोलू लागला,
"सायब, इमानान बंगळूरला पहाट साडे पाचलाच गेलेत..."
" काय..?...कधी येणार आहेत..?"
" सांच्या सात वाजेला इथ पुण्यात एत्याल...पण त्यांनी आज मला सुट्टी दिली..बोलले घ्यायला बी येवू नगस.."
"हो का..?..सोबत कोण आहे..?"
"संग का,मालक हायत.."
" मालक- अच्छा म्हणजे डायरेक्टर साहेब आहेत तर.."
"व्हय-व्हय तेच...मला त्यांनी सकाळीच फोन कर म्हणले पर..तुमची झोप मोड नको म्हणून म्या आता केला.."
" छान केलंस..."
"म्याडम, इथ वडगावला माही साली राह्यते...भेटून याव म्हणलं.."
"सखाराम, साहेबांनी तुला सुट्टी दिलीय ना..मग जा खुशाल.."
"बरं ठिवतो " म्हणून त्याने रिसीवर जोरात आदळला...असा कुणी पण रिसीवर आदळला तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते पण त्याचा काय उपयोग होता..आलेला राग गिळून घेतला. मी हॉल मध्ये टीव्ही कडे जावू लागले तोच..
"चिक- चिक, चिक-चिक" दारावरची बेल वाजली...आता कुठे मला हायसे वाटले..टेबलावरचे दुधाचे पातेले घेतले आणि दारा कडे निघाले. गानिमात म्हणा..दार उघडण्या आधीच मी ऐकले, "मेमसाब, दरवाज्या खोलो..फटाफट.."
मी क्षण भर थांबले...हा आवाज आमच्या दुध वाल्याचा नक्कीच नव्हता..पण माझ्या जीवाचा थरकाप वगैरे काही झालं नाही..कारण अश्या भाषेची आता सवय झाली होती.
मी पुढे केलेला हात मागे घेत विचारले, " ऐ- कोण आहेस तू..?"
"वो बादमें पता चलेन्गा ...पयले दरवाजा खोल्ने का..."
" ऐ भाड्या- हुकुम किसको देता है...जा मी नाही खोलत..."
" ऐ मेमसाब, आपुन बोला ना...दरवाज्या खोलो तो खोल्ने का...जास्ती टर- टर करणे का नही.."
"आरे व्वा..पण आहेस तरी कोण तू..?.." तो रागान किंचाळत ओरडला,
" ओय, जास्ती शान पट्टी नाय.. नै तो कान फाट्टी में ए-क खींच के दुंगा..सम्झी..खोलती है क्या तोड दु ..?"
" अरे, हराम खोरा, हे घर आणि दरवाज्या काय तुझ्या बापाचा आहे..म्हणे तोड दु..जाना बाबा कायकू मेरे नाद कु लागता है..कश्याला उगीच स्वता:ची फजिती करून घेतोस..?" मी समजावण्याच्या सुरात म्हटले. पण तो न घाबरता आणखीनच चिडून दात विच्कवत म्हणाला,
" ऐ बाई..." म्याडम वरून तो आता बाई वर आला होता..
"आपुन भौत डेंजर आदमी है..खोपडी सरक गया ना तो सीधा उठाके पटक दुंगा..तू नही जाणती...आदमी दवाखाने के बदले शमश्यान पहुंच जाता है.." मला याच हसू आलं..
'नालायका, मला उचलण्याची भाषा करतोस काय..?.. आम्ही सगळ्या खात्या पित्या घरच्या !. मला आठवत माझी आत्या तिच्या लग्नातच किती तरी जाड होती. परंपरे नुसार तिच्या मामाने तिला खांद्यावर घेतले पण काय विचित्र घडले सांगू..? मामा पहिलवान असून हि दोनदा खाली बसाव लागलं होतं..
' पण हे सगळं मनात..म्हणजे याने मला कधीच पाहिले नव्हते हे उघडंच..मी हि ताकदीने म्हणाले,
"आरे, गधड्या, मला उचलण्याची भाषा करतोस काय..?, तुझ्या येम राज्याला हि दोन रेडे घेवून यावं लागेल.आलाय मोठा मला उचलणारा..जरा तुझ थोबाड दाखवशील का..?"
असे म्हणत मोठ्या हिमतीने मी दार उघडले आणि थंडच पडले! पाहते तर काय..एक पंचेवीस ते सविस वर्षाचा तरुण..अंगात निळी जीन्स... काळा टी शर्ट हातात पोलादी कडे, डोके भादरून टक्कल केलेले...दाढीची बगदाद कट.. मिश्या वाढलेल्या..एका कानात बाळी..आणि हातात चक्क पिस्तुल..मला भोवळ येवून पडते कि काय असे झाले...एक तर मी एकटीच..आणि हा शस्त्र घेवून..मी जाम घाबरले आणि माझे पाय आपसूकच मागे सरकू लागले. मी विनाव्निच्या सुरात म्हणाले,
"क्या चाहिये..कोण हो तुम...इथ का आलास..?" पण तो काही न बोलता घरात शिरला.. हे पाहून मी म्हणाले,
खबरदार जर पुढे येशील तर...तुला काय वाटते..? मी एकटी म्हणून घाबरेण..?" मी उसने बळ अंगात आणत काही तरी बोलावे म्हणून बोलले..
तो म्हणाला, "देखो मेमसाब, आपुन कि तुम्हारे से कोई दुष्मनी नही..और आपुन कोई चोर उचक्का नही है...आपुन यहा चंदा मांगने के लिये आया है.."
मला आशर्य वाटले, मी खिजवत म्हणाले,
"चंदा मांगने आयांना, ओ भी पिस्तुल घेवून..व्वा- किती रे छान!.... "
गणपती उत्सव आठ दिवसांवर येवून ठेपला होता..रोज एक ना दोन अश्या किती तरी मंडळाचे कार्यकरते लोक येतच होते. त्यांच्या हातात पावती बुक, रजिस्टर, नोंद वही पॅड असे काहीना काही तरी असेच. पैसे देणा-याचे नाव निदान त्याच्या समोर तरी टिपत असत.घराच्या भिंती, अंगातील कपडे, कुठे -कुठे उठणे बसने, हॉटेलात खाणे - पिणे या नुसार देणगी ठरलेली असे. बेनर वर नाव आणि फोटो येण्यासाठी पाच हजार, गल्लीतल्या बोर्ड वर नाव लिहिण्यासाठी दोन हजार, रजिस्टर मध्ये सभासद होण्यासाठी तीन हजार, तुम्ही फार धार्मिक आहात, प्रतिष्ठित आहात, तुमचे नाव आरतीच्या वेळी पुकारले जाईल म्हणून दोन हजार रुपये, कार्यकर्ते म्हणून मिरवण्यासाठी दीड ते एक हजार....सर्व सामान्य आणि अनोळखी व्यक्तीस भर रस्त्यात अडवून पाचशे रुपये, हुज्जत घातली तर दोनशे रुपये गरिबी दाखविली तर मात्र शंभर रुपये ठरलेले !
पण याच्या सोबत तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सभासद कार्यकर्ते असे कुणीच नाही...न राहवून मी विचारले,
" चंदा मागायला आला ना ... मग पावती बुक कुठाय..?" यावर तो फिदीफिदी हसला आणि म्हणाला
"लो इनको पावती चाहिये...तुमको क्या गणपती पावती देता है.."
" नही...गणपती पावती नाही देत..पण ते लोक तर देतात ना.."
"क्या करोगी पावतिका.इन्कम टेक्स में जोडणे का है..? शिर्डी और तिरुपती के पेटी में लाखो - करोडो पैसा डल्ता है तो क्या पावती मिलती है..?"
"आरे, तिथे जे केले जाते ते दान...आणि हे जे लोक घरोघरी फिरून सर्वा समक्ष नेतात ते चंदा.." मी त्याला समजावू लागले. खरे तर हे त्याला माहित असावे.
" दान पेटीत किती पैसे टाकले ते कोणी कोणाला सांगते का?..पण इथे तर अकरा रुपये दिले तरी दिवसातून दहा वेळेस त्याचा उल्लेख होतो.." यावर त्याचा संयम सुटला आणि तो ओरडला..
"बस..बस..एक लफज नही बोलणे का..आज अपुन बोलेगा .फकत उस्कोच सूननेका.."
"जा रे मोठा दादा लागून गेलास..."
"ऐ...आपुन को नही जाणती तू...मालूम ..? आपुन कोण है...."
"कोण आहेस? तीस्माल खान..!"
" ऐ...खान का नाम नही लेनेका...सालोने आपुन का नाम मिट्टी में मिला दिया है..."
" कैसा क्या मिट्टीमे...? हॉलीवूड बॉलीवूड बघ...कितने खान है...कितने खान तो हमारी देश कि शान है..." मी फिल्मी डायलॉग मारला..
“आज कोई भी अखबार देखो, बम धमाका हुआ फलाना खान पकडा गया, चोरी डकैती हुई फिर कोई खान पकडा गया...इस्की भी कोई हद नाही.. आपनी गाडीसे गरीबोन्को कुचाल्ने वाले खान, मासूम लडकीयो कि इज्जत लुटणे वाले खान, बाजार मी घुमती फिरती ओरतोंके गले से मंगल सूत्र छीन लेने वाले खान... ऐसे नापाक लोग खान नही हो सकते. मुसलमान तो बिलकुल नही ! ए साले सब हर्राम है..इन्होने कभी कुराण पढा नाही है...”
" ऐ, अरे पुरे तुझ खान पुरण "
" क्यो उब गई क्या..सचाई कडवी होती है..मगर हमको तो मीठे कि आदत पडी है....उसमे भी अगर बिना मेहनत का मिले तो जहर भी छोडेंगे नाही..क्यो बराबर बोलाना..?"
" हं बाबा, तू बराबर बोला है...पण ये सब मेरेकू क्यो बता रहा है... इसमे मेरा क्या फायदा ?"
" सच बोली, आज सब आपना-आपना फायदा देखता है... अपना काम बनता तो भाड में जाय जनता.."
" आरे, बस कर..तेरा बकवास सूनने को किसको टायम है.."
" बराबर, सबकी हलत ऐसी हि है..उपर जाने का टायम होने तक किसके पास टायम नही है.."
"आरे बाबा , वो किसके हाथ में है..वो तो सब पांडुरंग देखता है...मतलब खुदा जाने...क्यो कि बाकी सब हमको देखना पडता है.."
" खुद तो कुछ करते नही .इस में खुदा को बदनाम करते है.."
“ कायकू खुदा को बदनाम...आज देख कितने संत महात्मा आये है..सब भगवान को याद करणे को बोलते है...कोई भी चानेल देख सत्संग होता है...परमात्मा कितना खुश होता होगा...तेरे कु काय मालूम..?
" सब बकवास...ये जीन्को तू साधू संत कह रही है....सब संधी साधू है....सब कि हॉट न्यूज होती है....किसीके आश्रम में खुनी, तो कहां डकैत, कितने सारे आतंकी पाल रखे है..साले खुद को हि भगवान समझ ते है..क्या ये इन्सान है..?..मंदिर और आश्रम काला धन और हथियार का भांडार है... भोली भाली जनता को लुट कर ऐश कर रहे है...."
" आरे बाबा, जरा हळू बोल...कोई सुने गा तो हंगामा हो जायेगा..."
" येईच तो चाहते है.ये बाबा लोग..पब्लिक हंगामा करे..और इनका मक्सद सफल हो जाये..."
"मतलब ?" मी विचारले..
" बोले तो..येडी पब्लिक रस्तेपर उतरती है....लाठ्या खाती है...मरती है...बाबा लोक प्लेन से घुमते है...ओ क्या बोलते है..न गायब "
"नाही रे, त्याला अदृश्य म्हणतात.."
" आरे अंधे को दृश्य और अदृश्य क्या पता चलेगा...अंध विश्वास मे आदमी पागल हो जाता है.. "
"आडाणी लोग होते होंगे...लेकीन बाबा को मानणे वालोमे पढे लिखे लोग होते है..मालूम..?" मी सफाई देत म्हटले.."
"हं जाणता हू ...सब के सब धंदे वाले लोग होते है...कोई बिमा एजंट होता है तो कोई डॉक्टर या तो फिर वकील..लोगोको जोड के अछा फोलोवप करणा आसान होता है ना इस लिये..लोगोंको लागता है..पढे लिखे लोग बाबा को मानते है मतलब बाबा सही है.."
" पर ऐसा नाही है....आयुर्वेद और योग से कितने सारे रोग ठीक होते है... " मी म्हटले
" रोग नही..लोग ठीक होते है...रोग तो मनुष्य के पैदा होणे से पयले से है..या बाबा लोग भी पैदा नही हुये थे तबसे रोग दुनिया मे है....फिर क्यो कोई भी रोग जड से नष्ट नही हुआ..? बोलते है..मुन्नी रोग ठीक करती थी"
“ ए वेड्या मुन्नी नही..ऋषी मुनी...अन जळली मेली तुझी मुन्नी तर कधीच बदनाम हो गई “
"आपुन को बस इतना पता है...भगवान भगवान है..इन्सान को अपनी औकात मे रहना चाहिय.. "
" कायकू..कायकू मै बोलती जिसके पास विद्या है वोहीच भगवान है...किती बाबा तर नुसत्या मंत्राने रोग बरे करतात....तुला ठावूक आहे का..." मी त्याची फिरकी घेत म्हटले...
" कितने बाबा को तो मंत्र पढ ने से पहिले ही मौत आगई...टीवी पर देखा नही..? भगवान मर रहा था और सायन्स उसको बचाने कि कौशिष कर रहा था..."
" म्हणून काय झाले..? सायन्स पण तेच शिकवतात.."
“ येहीच तो गडबड है..साला अन्गुठे बहाद्दर को शिक्षा मशीन कहते है..”
" ये बोलता येत नसलं तर चूप बस...उगाच काही तरी बरळू नको..शिक्षण महर्षी म्हणतात त्यांना...म्हणे शिक्षा मशीन !"
यावर तो थोडा शरमला आणि म्हणाला " सोरी..ए साले कठीण अल्फाज...इस से आपुन का भेजा खराब होता है. “
´” त्यांना शिक्षण घेता आले नाही म्हणून त्यांनी शाळा काढल्या आहेत..त्यात आमची पोर शिकत आहेत..किती पुण्याच काम करतात ते बिचारे.." मी त्यला समजावत म्हणाले,
" कायका पुण्या...धंदा करते है...धंदा..सरकारी अनुदान तो लेते नही..अपनी मर्जी से फिस वसूल ते है....आज कल तो ज्यो जितनी ज्यादा फिस लेगा वह इस्कुल अच्छा.."
" आरे बाबा, क्वालिटी होती है..तभी तो पैसा लेते है...बता भला तू कहां पढा..?" मी विचारले..
" आपुन..मुन्शिपाल्टी के इस्कुल मे.." तो दिमाखाने म्हणाला..
"हा..म्हणून तर तू असा आहेस..." मी त्याला खिजवत म्हणाले
"क्या बोली.." तो रागाने अधिकच लाल झाला..मी सावरत म्हणाले,
"म्हणजे बघ न ..तेरे को नोकरी नही.."
" आपुन नोकरी के लिये पढा ही नही..सेठ बनिये नोकरी करते है क्या.."
" नही,उनका अपना बिजनेस होता है..वही सांभाळते है.."
" आपुन भी धंदा करता है..ओ भी कोलीटी वाला...बिना झंझट का..
" लेकीन नोकरी में कैसा राहता है नुकसानी का टेन्शन नाही राहता.." मी त्याच्याच भाष्येत त्याला सांगितले...
" बराबर बोली..सब को बिना टेन्शन के पैसा चाहिये लेकीन अपुन नाम कमाना चाहता है...पैसा नही..पैसा तो...साली...सोरी कुच्च गल्लत होरेला था.. ." तो काही तरी अभद्र बोलणार होता पण त्याने समोर मी म्हणून स्वताला आवर घातली नाही तर आमच्या सभ्य समाजात वाटेल ते बोलणारे आहेत. पण ह्याला नक्कीच तेवढी आहे..
" आरे नाम तो तेरा जरुर होगा..मई बोल्ती... तेरा नाम क्या बताया..था..?"
यावर तो जोरात हसला आणि म्हणाला, " नाम... नाम तो आपुन ने बताया ही नही.. कोई है जो कहता है..नाम मे क्या रखा है..."
" हा उसका नाम शेक्सपिअर है.." मी उचलली जीभ आणि लावली टाळूला..चुकले तरी त्याला कुठे माहित होते.
"ये अंग्रेज है.." तो चिडून म्हणाला.
“आरे बाबा, इथे जे काही आहे ना सगळी इन्ग्रजांचिच मेहेरबानी..दवाखाने, रेलवे, शाळा त्यांनीच तर सुरुवात केली..नाही तर आपल्याला बैल गाडीची नोंदणी करावी लागली असती .."
"भौत अच्छा होता..कम से कम पेट्रोल के लिये मारामारी तो नही होती थी...एक बात समझ मी नही आती..साला दाल चावल कितनी भी महंगी होगी तो चलती पर पेट्रोल सस्ता होना चाहिये..."
" आरे क्यो नही..गाडी से काम फास्ट होता है .."
" हं क्यो नही..मरना भी तो गाडी से हि..भगवान भी खुश होगा..ओ क्या तुम बोली थी- इम्रान "
“ ऐ , इम्रान नही - यमराज..जो आदमी को स्वर्ग और नरक मे लेकर जाता है.. हेला लेकर..आता है” ..
“ जैसे पुलिस वाला वारंट लेकर आता है..”
ऐ, पुलिसवालो का नाम नाही लेनेका..बिचारे थंडी पावसात ड्युटी करतात.."
" खाक ड्युटी करते है...आम आदमी चोर और आतंकी से ज्यादा तो पुलिस से डरता है..रस्ते मी कोई तडफ के मर रहा है तब भी कोई मदद नही करता क्यो..."
" हां.. पहले डरायचे..पण आता तुमची इच्छा असेल नाव गाव सांगा नाही तर मदत करून निघा ...काही प्रोब्लेम नाही.. आरे नावा वरून आठवले...नाव नाही सांगीतलास..."
" मा बाप ने आपुन का नाम गनी खान रखा था...पर मेरे कु ये पसंद नही.. "
" कायकू...कितना अच्छा नाम है..."
" आपुन ने थोडा सा चेंज किया..गनी से गन लिया और खान का मतलब भारी स्टोक जैसे सोने कि खान, लोहे कि खान, कोय्ले कि खान बोले तो पती.. "
मी टाळी वाजवीत म्हणाले, " म्हणजे गणपती..!"
" गणपती नै.. गन- पती"
" काय...?"
" एस.. आपुन है..गन-पती..पयले बार तुमने देखा होगा.."
मला जरा हसूच आले..करोडपती, लखपती, अपना खुद का पती..पडोसन का पती..सहेली का पती आणि आपला पती घरी नसला तरी ज्याची सगळ्यात जास्त गरज पडते ती चाहाची पती ! हे मला ठावूक होते पण हा जरा हटके गन-पती!!
" आरे पण असे पती तुझ्या सारखी गन घेवून लुटत नाहीत.."
" मेम्साहाब , लुटते तो है..पर छुटते भी है.. हम साला थोडासा डसते है तो बुरी तऱ्ह फसते है.. ये सब पैसे वाले हमारा खून चुस्ते है और हम आपने भाग्य को कोस्ते है.." मला त्याच्या बोलण्यात दम दिसू लागला.
"कैसे क्या.."
“ जरा आपनी खिडकी का परदा हटाके देखो, एक तराफ किमती खाना गंदी नाली मे बहाया जाता है..तो दुसरी तराफ कोई माज्लूम , मजबूर , भुखा बचा भूखी मा के गोद मे भूख से मरता है..एक बिल्डींग खडी होती है हजारो के कबर पर..किसी एक को बचाने कि खातीर लाखो लोगो को कत्ल करते है.. बंबई मे बम नही आम आदमी का कलेजा फाटता है..ये साला नेता , अभिनेता और बेपारी ने हमारा सबका धन अपनी मुठी मे लिया है.." त्याची ही समजा बद्दल ची जागरूकता पाहून मी चकित झाले..हे सर्व त्याने बोलत रहाव असे वाटू लागले..
"आम आदमी साला केरोसीन से परेश्यान है..ये साले उतना परफ्युम उडाते है...इधर तडके मे तेल कि बुंद नही है..इनकी दिवारे घी से पोती जाती है....मै भी कितना पागल हु,,ये सब मै तुमको क्यो बता रहा हू.." त्याने मोठा श्वास घेवून मला विचारले, मला काय बोलावे ते सुचेना..म्हणून गप्प राहिले.. तो पुढे बोलू लागला.." मेमसाब, देखो ऐसी फालतू बकवास मे मेरा और तुमारा टायम खराब हो रहा है..बोल..चंदा देरी क्या नै.."
"आरे पण, चंदा घेवून तू काय या गरीबात नेवून वाटणार आहेस..?"
" नै..बिलकुल नै..ये साले कभी नै सुदरेंगे...पैसा मिला ना तो सीदे जायेंगे शराब के ठेकेपर, जुए पर या फिर मटके और लोटरी पर...
हर गये न तो दारू पिके बीबी और बचोको पिटेंगे..घर होणे पर भी किसी गल्ली कि गंदी नाली मे पडे रहेंगे नश्या उतरने तक.. "
"मग तू काय करणार आहेस..?" मी हलकेच म्हणाले..यावर तो खळबळून हसला आणि म्हणाला,
"आपुन शादी करेगा...! शादी.." आणि पुन्हा हसला..
" चंदा मागून शादी..शरम नाही वाटत..लोकांच्या पैश्यावर म्हणे शादी करेगा.." यावर तो चिडला आणि म्हणाला,
"ऐ शानी..जास्ती शांपट्टी नै करनेका...सम्झी...घोडा दबाया न तो गोली अंदर और खून बाहर.." मला माझी चूक कळली..मी स्वताला सावरत म्हणाले,
"आरे पण..चंदा मागून शादी..कोणी करते का ..?"
" ए सवाल आपुन को नही, तमिळ मंत्री को करणे का..सुपर हिरो से करणे का..आमदार और खासदार से करणे का...उनकी सबकी शादिया तो जनता कि पैसो से ही होती है.." त्याचे हे ज्ञान पाहून मी चकित झाले.
" वो कैसे क्या..?" मी म्हणाले,
" आपुन के भाई लोग मेहनत मजदुरी करता है.. पैर मे चप्पल भी नही मिल्ती..ये बाबू लोग पलेन से बाहर के कंट्री मे जाकर वाईन पिता है..अपुन को कंट्री भी ठीक से नही मिल्ती. "
"आरे पण त्यात, त्यांचा काय दोष..? त्यांचे बाहेरच्या देश्यात बिजनेस आहेत. " यावर तो दात ओठ खात म्हणाला,
"धंदे बोलो धंदे..काले धन को सफेद करणे कि चाल है...साला एक बार गोली का जुगाड होणे दो..सबको उदा दुंगा..बारी बारी से.."
" म्हणजे याच्या गन मध्ये बुलेट नाही तर.." मी मनाशीच म्हणत स्वताला सावरले. कारण आता मला भ्यायचे काहीच कारण नव्हते..! मला त्याची कीव आली..मी त्याला म्हणाले,
" आरे, जरासा पुढे ये..तिथे खुर्ची आहे..सोफा ही आहे..तुला जे आवडेल त्यवर बैस.."
" मेमसाब, चुनाव छोडके आपुन काही भी खंडाच राहता है...ए साली कुर्सी अच्छी चीज नही होती...जो जिता वो भी परेशान और जो हारा वो भी."
"काय कु ? ये तो लोकशाही है...सब को बराबर अधिकार है...."
" सच बोली.. पर आम आदमी चुनाव से दूर भागता है..और फिर क्रिमिनल लोग अपनी जमाते है..."
" इतना तो तो तेरेकू मालूम है..फिर कायकू नै बोलता.."
" कुर्सी पर बैठा आदमी तीन कि जोरू के जैसा होता है.." त्याचे राज करणातील ज्ञान हि तेवढेच तिखट होते..
"कैसे क्या..?" मी विचारले...
"एक तराफ जनता ...दुसरा ओपोझीट तिसरा पक्ष का सुप्रीमो..आदमी खाली नाम का मंत्री होता है..."
" गब्बर का नाम सुना है.." मी म्हणाले नही तो..
" ये येडी , अभी तो मै बोला, भैरी है क्या..." आणि तो दात विचकून हसला..मला हि हसू आवरता आले नाही..त्यावर तो पुढे बोलू लागला..
" वो बोलता था ना- किसमे गोली है और कोनसा खाली है हमको कूच नही पता..वैसे हि आज मंत्री पद से हटने के बाद सीबीआय आयेगी या कोई आयोग आयेगा कुच्ह नही पता..बाप आपुन कुर्सी से तौबा करता है..ट्रेन से भी जनरल मे खडा होकर जाता है..."
" आरे पण हा तर घरचा सोफा आहे ना.." मी त्याला समजावत म्हणाले.
" तुम बैठ बोली..आपुन नीचे जमीन पर बैठेगा...जमीन पर...कभी जमीन के अंदर जायेंगे तो पहचान तो रखेगी.." असे म्हणून तो फतकल मारून बसला...मी त्याच्या कडे पहातच राहिले... काही वेळ आमच्या पैकी कुणी काही हि बोलले नाही..माझे लक्ष नाही हे पाहून तो हात पाय ताणू लागला...पण माझ्याशी नजर नजर होताच सावरून बसला. या अश्या प्रसंगात किती वेळ गेला ते कळलं सुद्धा नाही..शांततेचा भंग करीत मीच म्हणाले, " आरे गन-पती-बरं झालं तू आलास..नाही तरी कुणा कडे जाण्यास कुणाला वेळ आहे...आम्ही कुणाकडे पाहुणे म्हणून जात नाही आणि आमच्या कडे पाहुणे म्हणून येत नाही..आज ना तू आमचा पाहुणा...थोडा वेळ बैस, रात्रीचं थोडसं दुध आहे मी गरमा गरम चहा बनविते.." त्यावर तो म्हणाला,
" बाई, सच मुच तुम भौत अच्छा है..पयले बैठ्ने को बोला..अब चाय पिलाने कि बात करती है...आपुन कि खोपडी मे मुंग्या आयेला है..कूच समझ मे नही आरेला.."
" आरे तो तू , लगन का निमंत्रण देणे को आया ना..हमारी संस्कृतीका रिवाज है..दुश्मन को भी गले लगाने का...जिसने बम से कितने लोगो कि जाने ली , कोई कायमचा लुला लंगडा आंधळा होगया ना उस पर हम करोडो रुपये खर्च करते है.."
" आपुन पता नै...क्या क्या बकता गया...सोरी...साला मुह मे जबान दिया उलटा सिधा घुमाते फिरता हू..मगर आज से कभी गलत बोली ना तो साली को सुई से छेद लगावून्गा"
" आरे मै सच बोलती..मेरे कु जरा सा भी वाईट नही लगा..तू जो भी बोला मेरे तो काय म्हणतात ते..हं डोळे उघडले.." आणि माझ्या या विनोदावर तो तो हसला..मी किचन मध्ये गेले आणि चाहा साठी आधान ठेवले..तो म्हणाला,
" जिंदगीमे पयली बार आपुन पुरा फंस गया है....मा कसम..बाकी औरत लोग साला पाणी भी पिलाते नही...तुम तो च्याय पिलाती है...
" आरे, म्हणून काय झालं...हे बघ..तुझं लग्न आहे ना..?..लोक जेव्हा पत्रिका घेवून येतात ना..त्यांच तोंड गोड करावच लागतं..त्यातल्या त्यात नवरदेव म्हणजे दुल्हा आला कि मग विचारूच नको..एखादा चांदीचा किंवा सोन्याचा दागिना..करदोडा, एकशेएक रुपये, थोडा दूरचा असेल तर एक्कावन रुपये नाहीतर नारळ, टॉवेल, लुंगी..शेला, काहीना काही द्यावेच लागतं.."
" सोना चांदी कौन देता है बाई..."
" पूर्वी द्यायचे.. आज काळ एवढा बदललाय कि सोन्याच नावच घेत नाही कुणी..सोन्या साठी बायका नव-याला इतक टुमण लावतात कि..-“.,
" उसका सोना मुश्कील होता है.." माझ्या तोंडच वाक्य तोडत तो म्हणाला
"एकदम बराबर...आणि हे चंदा म्हणजे वर्गणी जमा करणारे चहा घेतल्या शिवाय जात नाहीत..." मी माझा अनुभव सांगितला..
" बाई...मगर आपुन को एक गिलास पाणी पिलाती तो भी चलता..."
मी पाण्याचा ग्लास देत म्हणाले, " हे घे..चहा उकळ गया..नही तो उता जायेगा.."
" च्याय कि बात करती हो..यहा तो सरकार का भरोसा नही..साली टायम से पयलेच उता जाती है.." यावर आम्ही दोघ हि हसलो..
मी स्वयंपाक घरात गेले नि कपात चहा ओतू लागले..तेवढ्यात हॉल मध्ये काही तरी पडल्याचा आवाज आला..मी तर जाम घाबरले..मनात आले...हा आमचा टीव्ही तर उचलून घेवून जात नसेल..? अलीकडे अश्या बातम्या रोजच वर्तमान पत्रात झळकतात..मी हातात चाहाने भरलेले कप घेवून लगबगीने आले...आणि पाहते तर काय?..टीव्ही जागच्या जागी होता..योगाच्या ठिकाणी आता कोणत्या तरी महा पुरुश्याचे प्रवचन चालू होते..तो टीव्ही च्या बाजूला उभा राहून टीव्ही वर ठेवलेली माझ्या मुलाची फ्रेम त्याच्या हातात घेवून न्याहाळू लागला..अचानक मला त्याच्या जवळ पाहून तो चपापला..फ्रेम टीव्ही वर ठेवत तो म्हणाला, " ये फोटू ..?"
मी चाहाचा ट्रे टी-पायवर ठेवत म्हणाले..माझा मुलगा यश..सध्या केलीफोर्नियात एम.बी.ए.करतोय.यावर तो जाम खुश झाला आणि म्हणाला
" क्या बात है बाप...विदेस मे..ऐसा भिडू होना...ओ इंड्या आयेगा ना, सबसे पयले आपुन को बताना...आपुन के पास गाडी तो नही है..मगर आपुन कांधेपर बिठायेगा..ढोल ताश्या के साथ घरकु छोडेगा..." असे म्हणून त्याने सेल्यूट घातला..मला हसू आवरले नाही..मी म्हणाले, " हो..नक्कीच...आजून सात महिन्यांनी परत येणार आहे तो.."
मी चाहाचा कप त्याला देत म्हणाले.." हा घे..चहा, साखर बरोबर आहेना..?" आम्हा बायकांना फक्त स्तुतीची सवय झालेली असते..'आज भाजी छान झालीय..शिरा खूप मस्त आहे..वा! कधी काय झक्कास झालीय..तुझ्या हातचे पराठे फारच छान लागतात.
तू केलेल्या लाडूचे नाव हि घेतले कि तोंडाला पाणी सुटते..तू केलेली कारली म्हणजे भूक वाढवण्याचे इंजेक्शनच.! वगैरे..वगैरे..' त्याने फुर्रर असा आवाज करत एक घोट घेतला आणि म्हणाला , " एकदम फस्क्लास!..न कम ना ज्यादा..शक्कर- पत्ती - दुध और पाणी का मिक्ष्चर सही सही..एक बात बोलू..? ऐसी चाय किस्मत वालोंको मिल्ती है..आज अपुन कि तकदीर मे थी.."
हि वेगळी स्तुती हि मला आवडली..चहाचा घोट घेत मी हि विचारले, " आरे, चंदा किती द्यायचा..?"
यावर तो लाजला आणि म्हणाला, " बाई..एक फुटी कवडी भी नही." .
" कायकू..कायकू.."
"सच्ची मे आपुन भौत शरमिंदा है.." तो चहा पीत पीत खाली पाहूनच म्हणाला.
" ऐ, इकडे बघ..नाही काय..मी द्यायला तयार आहे ना...तू सांग मी देते.." त्याने कपात राहिलेला चहा एका घोटात पिला..आणि रिकामा कप ठेवून हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला," आपुन, भौत थर्डक्लास है..एकदम कमीना...इन्सान कि भी पयचान नही.." त्याच्याच थोबाडीत मारीत तो म्हणाला, " कैसा उलटा सिदा बात किया..माफी करदो..आपुन से भौत बडी गल्ती हुई..माफी करदो..साला, थू ऐसी जिंदगी पर.." आणि बघता बघता रडतच त्याने माझे पाय धरले..मला कसे तरी झाले..माझ्या हि डोळ्यात अश्रू तरळले..बायका पुरुश्यांपेक्षा हळव्या असतात पण हे न दाखवता मी हलकेच म्हणाले, "आरे, वेड्या, असे काय करतोस..?..उठ उठ, माझ्या मनात काही नाही..हे बघ मी माफ केले..आणि तुला पश्चाताप झालाय ना.." मी किंचित मागे सरले आणि पटकन डोळे पुसले..तो खाली सरकून कपाळाला हात लावून बसला..मी खाली वाकून त्याचा हात धरून उठवत म्हणाले, " खरच सांग...किती चंदा देवू..मी देते ना.." तो उठून म्हणाला, " बाई, चंदा मांगने आया था..जरूर लुंगा पर आज नही..ये उधार रहा.."
" मग केव्हा.." मी उत्सुकतेने म्हणाले.
" आपुन कि शादी के दिन.."
" वो कैसे "मला प्रश्न पडला..
"लेकीन तुम को एक वादा करणा पडेगा.."
" वादा.. ?"
"हं..वादा.."
"चल कबूल....ले मी वादा करते.."
"मंजूर...?"
"हं बाबा..मंजूर..बोल क्या करना है..?"
"एक दम पक्का..वादा..तोडने का नै..नै तो आपुन कभी किसी को मुह नै दिखायेगा.." मला कसे तरीच झाले..हा करणार तरी काय? माझे काळीज हळू लागले. तरी पण धीर देत म्हणाले.."एकदम पक्का.."
" तो सुनो..आपुन कि मा..बहेन तो कोई नही है..तुम बस आपुन कि शादी मे आनेका...ओ भी खाली हाथ..ओ हाथ जो अल्लाह ने आशीर्वाद के लिये दिये है..आपुन के सर्पे सेहरा सजा होगा..उसपर तुम एक बार आपणा हाथ रखना..तुम को मेरी कसम.." मला तर काय बोलावे काही सुचेनासे झाले..धाय मोकलून रडावे असे झाले..तोच पुढे म्हणाला, " आणे के वास्ते आपुन गाडी भेजेगा..आणे- जाणे का टेन्शन नै लेनेका.."
म्हटले चला निदान याच्या तरी लग्नाला जावूया..एव्हाना रेल्वेची तिकिटे मिळेनाशी झालीयत, बेकायदा वाहतूक फार आहे पण सुरक्षा नाही..एस. टी. महामंडळाच्या लाल प-या फुगून
फुटायची वेळ आलीय. पेट्रोल आणि डीझेल च्या वाढत्या किमती मुळे स्वताची गाडी असली तरी भाड्यावरच जास्त चालते..त्यातच आहेराचा प्रश आहेच..महाग घेवत नाही आणि स्वस्ताच द्याव तर शोभत नाही..या मुळे मागील चार पाच वर्ष्यात एका हि लग्नाला गेले नव्हते. पण आता तर वादा करून बसले होते..जाणे भागच..!
" बाई, " त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आले..आणि म्हणाले "बोल.."
"क्या सोचरेली है.." तो म्हणाला.
" काही नाही..मी नक्की येणार..फक्त मेले तरच गेले.."
"जाब तक आपुन जिंदा है..तुम को कूच नही हो सकता..आज तुमने आपुन कि आंखे खोली है..आपुन तुम्हारे वास्ते दुआ करेगा.." आसे म्हणून तो उठला आणि दोन्ही हात जोडून "नमस्ते" म्हणून दरवाज्या कडे वळला..मी काही हि न बोलता त्याच्या मागे गेले. तो मागे न पाहता सरळ झपाझप पावले टाकत चालू लागला..तो थोडासा पुढे गेला आणि मी हळूच दरवाज्या बंद केला .. आता टीव्ही वर गणेश स्तवन चालू होते..मी हि गुणगुणत हातात रिमोट घेवून सोफ्यावर बसले..आता पर्यंत तो ज्या ठिकाणी बसला होता ते सगळे प्रसंग माझ्या स्मृती पटलावर गर्दी करत होते. अचानक माझे लक्ष त्या चाहाच्या कपाकडे गेले आणि पाहते तर काय..? त्याची गन. ! ' आरे देवा ...तो गन इथेच विसरला..कि काय' मी लगबगीने उठले गन हातात घेवून दरवाज्या जवळ गेले..दार उघडले आणि पाहते तर काय तो उड्या मारून रोड क्रॉस करू लागला..वाटले एक वेळ मोठ्याने ओरडून त्याला बोलवावे..पण त्याचा काय उपयोग...त्याला ऐकू तरी जाईल का ? आणि आमची उच्चभ्रू वसाहत...शेजारी- पाजारी काय म्हणतील..? तो दिसे पर्यंत मी तिथेच उभीराहून पाहू लागले...आता तो बराच पुढे जावून एका गल्लीत वळला.त्याच्या पाठ मो-या होणा-या आकृतीकडे पाहत किती तरी वेळ तशीच उभी राहिले..मनात मात्र प्रश्नांची जणू जत्रा भरली होती. हि गन तो खरच विसरला कि मुद्दाम मी विसरू नये म्हणून ठेवून गेला असेल..? तशी ती खेळण्यातली एक साधी गन आहे..पण माझ्या साठी मात्र बहु मोल किमती गूढ! म्हणूनच मी जीवा जतन जपते आहे..आणि वाट पाहत आहे त्याच्या आमंत्रणाची....माझा विचार आणि आचाराने भरलेला, प्रेमळ, सच्चा बोलका गन पती..! तुम्ही याल का..? त्याच्या लग्नाला..! तयार राहा तो नक्कीच येईल..गाडी घेवून!!.. टेन्शन नै लेणे का..बोले तो अभी आपुन भी गन पती है..!!!
साहेबराव इंगोले
औरंगाबाद
९१५८५००२१४
दिनांक: १९/०८/२०११
"
लेख ठिक आहे... पण विनोदी लेखन
लेख ठिक आहे... पण विनोदी लेखन म्हणून पचल नाही... क्षमस्व...
माफ करा पण "विनोदी लेखन"
माफ करा पण "विनोदी लेखन" म्हणून साफ गंडलय..
तुमचा तो राशीभविष्याचा लेख मस्त होता.