पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा, आपण घावन घालतो त्या पीठात एक अंडं फोडून घालायचं आणि पीठ व्यवस्थित मिसळून घेऊन घावन घालायचे. खरंतर ही घावन तव्याला चिकटू नयेत यासाठीची अंडं चालणाऱ्‍यांसाठी हमखास युक्ती आहे. पण आहारात अंडं घेण्यासाठी तुला बहुतेक उपयोगी पडेल असं वाटतंय.

ब्रेड पुडिंग मध्येही अंडं वापरता येतं पण दिसत नाही. ब्रेडच्या कडा काढलेले स्लाईस, अंड्याचा पांढरा व पिवळा बलक वेगवेगळे फेटून, दूध, साखर आणि वेलची पूड घालून एकत्र शिजवून मस्त पुडिंग होतं. हवं तर साखर कॅरॅमलाइझ करून त्याला जरा आणखी वेगळा फ्लेवर देता येतो.
अंडं घालून मंजूडीने सांगितल्याप्रमाणे पॅनकेक्सही करता येतात.
फ्रेंच टोस्ट करता येतात.
उकडलेल्या अंड्यातला पिवळा बलक उकडलेला बटाटा / पनीर/ चीझ + मिरपूड + मीठ + हव्या असल्यास मिक्स हर्ब्ज कुस्करून व व्यवस्थित मिसळून सँडविच मध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये फीलिंग म्हणून वापरता येतो.

नमस्कार,
रताळ्याच्या गोड पुर्‍या कश्या करतात? क्रुपया कोणी सांगणार का? आज करणार आहे.

रताळ्याच्या पुर्‍या उपवासासाठी करायच्या आहेत का?
रताळ्याच्या पुर्‍या मला तरी वाटते, रताळी शिजवून त्यात गोडीला गुळ किंवा साखर घालून त्यात कणिक किंवा उपवास असल्यास राजगिर्‍याच्या पिठात मिसळल्यास होत असतील बहूतेक , जाणकार सांगतिलच.
पण मी एकदा पुरणपोळी करतो त्याप्रमाणे पोळ्या केल्या होत्या, मस्त लागतात.
रताळी उकडून त्यात गोडीला गुळ घालून चांगले एकजीव करून , कणकेमध्ये त्याचे सारण भरून पुरणपोळीप्रमाने केलेल्या , असदेखील छान लागतात.

कैरीची आमटी कशी करतात? आम्ही तूर डाळीच्या आमटीलाच कैरीच्या फोडी मेथ्या हिंग कढीलिंब सुकी मिरची याची फोडणी देऊन वर भरपूर ओलं खोबरं घालतो. आणि थोडा गूळही घालतो.
पण तूर डाळ आजिबात न वापरता कशी करतात ? एखादी ऑथेंटिक रेसिपी आहे का? नुसता ओला नारळ वापरून?

झी, मी नेहमी करते खोबर्याच्या वड्या डेसिकेटेड कोकोनट वापरुन. मी खोबरे, दुध, क्रीम, साखर ब्लेन्डर्मधुन हलकेच फिरवुन घेते ( मिश्रण रवाळ राहिले पाहीजे) आणी नेहमीसरख्या आटवुन वड्या करायच्या. मस्त होतात वड्या..

ओह अकू ... बरं बादवे........मुलींनो कैरीची आमटी झाली. धन्यवाद!

ओह अकू ... बरं बादवे........मुलींनो कैरीची आमटी झाली. धन्यवाद!

मध्ये एकदा टिव्ही वर मोदकांची (मोदक बेसनाचे असावेत कदाचीत) आमटी दाखवली होती. खूप छान दिसत होती. तिखट पण बर्‍यापैकी असते अस ती करणारी बाई सांगत होती. कोणाला माहित आहे का?

अनु,
ते मोदक बेसनाचेच असतात, बेसन, गव्हाचे पिठ, तिखट, मीठ आणि तेल घालून पिठ मळायचे.
सारणासाठी तळलेला कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ वगैरे घ्यायचे. मग बेसनाची पारी करुन त्यात हा मसाला भरायचा आणि साधारण गोळ्यांची आमटी करतो तशी करुन, ती उकळताना हे मोदक सोडायचे. शिजून वर आले कि आमटी तयार. डिटेलमधे हवी असेल तर विकेंडला लिहिन, पण एवढ्या वर्णनावरुन सहज जमेल.

धन्यवाद दिनेशदा Happy
वरील वर्णनावरुन करुन बघता येईल. तरीसुध्दा तुम्ही पाककृती लिहिलीत तर चालेल.
रचक्याने ही आमटी फार छान लागते का?

अनु,दिनेशदांनी लिहिलेलंय साधारण तशीच करतात.अतिशय भारी लागते आमटी.फक्त आमटी असली तरी कुठली डाळ वापरत नाहीत.माझ्या साबा अतिशय सुरेख करतात.त्यांना विचारुन सांगेन.

मी बुकनु नावाच्या एका उत्तरभारतीय मसाल्याबद्दल ऐकले. जालावर शोधले असता त्याचे घटकपदार्थ तेवढे दिलेले दिसतात. पण खरा मसाला कसा बनवावा, याबद्दल कोणतेही मार्गदर्शन नाही. इथे कुणी सुगरण/ सुगरणोबा (सुगरणीचे पुल्लिंग काय असते?) काही मदत करु शकेल का?

टोमॅटो साठवणुकीसाठी प्युरी तयार करण्याची ट्राईड कृती हवी आहे.
नेट वर माहिती आहे, त्यात काही ठिकाणी विनेगर वापरायला सांगितलं आहे.
ते न वापरता पण टिकाऊ होईल अशी कोणती क्रुती माहिती आहे का?

टोमॅटो सॉस/केचप ची कृती हवी आहे. मदत प्लीज..
ईथे शोधली, दिसली नाही. मी याआधी कधी घरी केला नाहिये टोमॅटो सॉस, म्हणून ट्राईड रेसीपी हवी आहे प्रमाणासकट.
साधारण १०,१२ पाऊंड टोमॅटो घरी पडून आहेत..

Pages