एक अत्यंत अभिनव प्रकार. एकदम सोपा, स्वयंपाकघरात सहज सापडणार्या वस्तूंपासून बनवलेला आणि तरीही सर्वस्वी अनोखा. पाहुणे मंडळींना त्यांच्यादेखत डेझर्ट बनवून देऊन खुश करा.
साहित्य : आलं, दूध, साखर
प्रमाण : असं काही खास नाही. अंदाजे.
कृती : आलं किसून एका बारीक गाळणीत घालून पिळून घ्या. हा आल्याचा रस बाजूला ठेवा. आता दुध उकळवा. ते गार करत ठेवा. साधारण उकळत्या दुधाच्या पाऊणपट तपमान झाले की त्यात आवडीप्रमाणे साखर घालून विरघळवा.
आल्याचा रस छोट्या छोट्या काचेच्या अथवा चिनीमातीच्या वाट्या/बोल्स मध्ये घालून त्या वाट्या जरा गोल फिरवा म्हणजे आतून सगळीकडे रस लागेल.
यात आता ते गरम दूध हलकेच ओता. तसंच ठेऊन द्या.
पंधरा-एक मिनिटांत दही लागेल. हे आल्याच्या चवीचं गोड आणि गरम दही केवळ अवर्णनीय लागतं.
मला ही रेसिपी इतकी आवडली की लगेच केली. नशिबाने जुनं आलं घरात होतं. मी चुकून मोठ्या बोलमध्ये लावलं पण तरीही लागलं. अगदी घट्टं लागत नाही.
विशेष टिपा :
१. आलं जुनं असलं पाहिजे. नव्या आल्याच्या रसाचं दही लागत नाही.
२. दही लागलचं नाही तरी ते दूधही उत्तम लागतं. त्यामुळे याबाबतची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
३. दरवेळी दही लागेलच अशी खात्री नाही त्यामुळे आधी घरच्यांवर, मग जवळच्या पाहुण्यांवर प्रयोग करावेत. डायरेक्ट व्हिआयपीजवर शायनिंग मारायला जाऊ नये.
माहितीचा स्त्रोत :
इकोनॉमिक टाईम्स मध्ये श्री. विक्रम डॉक्टर यांचा कॉलम. त्यांची रीतसर परवानगी घेऊन ही रेसिपी मी इथे टाकली आहे.
<<<<दरवेळी दही लागेलच अशी
<<<<दरवेळी दही लागेलच अशी खात्री नाही त्यामुळे आधी घरच्यांवर, मग जवळच्या पाहुण्यांवर प्रयोग करावेत. डायरेक्ट व्हिआयपीजवर शायनिंग मारायला जाऊ नये>>>>
नावीन्यपूर्ण रेसिपी! करून पाहणार!
धन्यवाद!
आधी केले, आणि आता आवडले
आधी केले, आणि आता आवडले म्हणून पावती देतेय!
मामी मस्तच ग. मला पण दही आणि
मामी मस्तच ग. मला पण दही आणि आल हे कॉम्बिनेशन खुप आवडत. मी जेंव्हा दही टाकुन कोशिंबिर करते तेंव्हा त्यात आल किसुन टाकते. दहीभेंडीत पण मी थोड आल किसुन टाकते. खुप छान लागत.
मी पण उद्या करुन बघणार. (आता
मी पण उद्या करुन बघणार. (आता आमच्याकडचा बाजार बंद झाला. आले मिळणार नाही,)
सऽही रेसीपी. तेवढ ताजं आलं
सऽही रेसीपी.
तेवढ ताजं आलं जूनं कसे करायचे ते पटकन सांगा म्हणजे लगेच करून बघता येइल.
फक्त आल्याचा रसच वापरायचा का? किसलेले आलं नंतर दूधात नाही का टाकायचे?
रेसिपी लिहून इतकं चांगलं
रेसिपी लिहून इतकं चांगलं वर्णन केलंय तर करून बघेन (आणि नवर्याला आधी खायला लावेन
) नाहीतर मला आलं जास्त आवडत नाही उग्र लागतं म्हणून. फक्त वासापुरतं घालते मी. आणि दुधात आलं म्हणजे दुध वाया जाईलशी भिती


मला आवडलं तर माझ्याकडून रव्याच्या लाडवांचं ताट!
मी करणार. १ आठवड्यापूर्वीचे
मी करणार. १ आठवड्यापूर्वीचे म्हणजे जुनेच आले आहे.
मी पण नक्की करुन बघणार आधी १
मी पण नक्की करुन बघणार आधी १ का छोट्या वाटीत करुन बघेन आवडल तर कायम होईलच
आमच्याकडे तर बाजार
आमच्याकडे तर बाजार अर्धरात्रीत झोपलाय. आणि आम्ही पण आता झोपू त्यामुळे उद्याच
अनु ३ ++ आलं आणणार ते आधी
अनु ३ ++
आलं आणणार ते आधी जुनं करणार आणि मग हे(दही) करणार
तेवढ ताजं आलं जूनं कसे करायचे
तेवढ ताजं आलं जूनं कसे करायचे ते पटकन सांगा म्हणजे लगेच करून बघता येइल.
फक्त आल्याचा रसच वापरायचा का? किसलेले आलं नंतर दूधात नाही का टाकायचे?
>>>> रूनी, ताजं आलं आणून फ्रीजमध्ये ठेऊन दे. मग आठेक दिवसांनी होईल जुनं.
सध्या भारतात फारच बाळ-आली मिळतायत. त्यातल्या त्यात सुकं आणि जुनं आलं घ्यावं लागेल.
आल्याचा केवळ रसच वापरावा. उरलेलं आलं म्हणजे केवळ चोथा असतो. टाकून द्यावा.
१ आठवड्यापूर्वीचे म्हणजे
१ आठवड्यापूर्वीचे म्हणजे जुनेच आले आहे.
>>> हो. चालेल बहुधा.
ओलं आलं सहज किसता येतं. त्यात फारसे तंतूही नसतात. जुनं आलं किसायला कठीण आणि त्यात अनेक धागे असतात. जाणकारांना हा फरक लगेच लक्षात येतो.
पण जर रसच घ्यायचाय तर नविन,
पण जर रसच घ्यायचाय तर नविन, रसरशीत आल्याचा का नको ..
जुनं, जीर्ण, किसायला कठिण, तंतूमय आलं ज्यात रस कदाचीत कमीच असेल असं का बरं घ्यायचं?
उत्साहाने हा प्रयोग केला
उत्साहाने हा प्रयोग केला (फ्रिजमध्ये एक जूनं आले सापडलच शेवटी त्याचा रस घेतला) पण दह्याऐवजी पोपट झाला. १५ मिनीटांनी दूध का दूधही हो गया. बहुदा आल अजून जुन लागत असावे कारण आल्याचा चांगला रस निघाला.

मग मी त्यात थोडं दही घालून त्याच आता विरजण लावलय
माझे डेझर्ट उद्या तयार होईल. मग सांगते कसे लागते ते
पण जर रसच घ्यायचाय तर नविन,
पण जर रसच घ्यायचाय तर नविन, रसरशीत आल्याचा का नको ..
>>>> ताज्या आल्याच्या रसानं दही लागत नाही. दूधाचं दही होण्याकरता जे एन्झाईम्स लागतात ते जुन्या आल्याच्या रसात असतात.
जुन्या आल्याचाही भरपूर आणि दाट रस निघतो. उलट नविन आल्याचा अगदीच पाणचट असतो.
स्वतः विक्रम डॉक्टरांनी अनेकदा प्रयोग केले. आधी त्यांना वाटलं की दूध कोणत्या प्रकारचं आहे त्यावर दही बनते किंवा नाही हे अवलंबून आहे की काय? त्यांनी सगळ्या प्रकारची दुधं वापरून पाहिली फुल फॅट, लो फॅट, गाईचं, म्हशीचं .... पण दही कधी लागे कधी नाही. मग त्यांनी आल्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यावरून त्यांनी वरील निष्कर्ष काढला.
रूनी, आलं कोवळं असेल मग
रूनी, आलं कोवळं असेल मग नाहीतर एक चमचा रस एका मध्यम बोलकरता पुरेसा होतो.
ज्योती कामत, तुम्ही जरा तुमचा अनुभव विस्तृतपणे लिहाल का?
मामी, माझे लागले होते. म्हणजे
मामी, माझे लागले होते. म्हणजे फार घट्ट नाही पण मोडता येईल असे. मी वापरलेले आले फारसे जुने नव्हते. चव चांगली वाटली पण जरा आंबटपणा असता तर बरं झालं असतं असं वाटलं. म्हणून मीपण त्यात विरजण घातले.
मग दही लागले, पण थोडे कडवट वाटले. पुन्हा साखर न घालता आल्याचा रस आणि विरजण घालून बघेन.
जूनं आले..... दह्याऐवजी पोपट
जूनं आले..... दह्याऐवजी पोपट ..... >>>> LOL ! काय काय प्रकार चालु आहेत इथे !
लालू, कडवट चव आली? एक किंचीत
लालू, कडवट चव आली? एक किंचीत कडसर चव येते आल्यामुळे पण कडवट लागायला नको. विरजण नको घालूस. दिलेल्या पद्धतीने करून बघ. फारच चविष्ट लागतं. हे दही आहे हे विसरून जा की, मग विरजणाबद्दलचा आग्रह मोडीत निघेल.
हे खरंच चीनमध्ये डेझर्ट म्हणून केलं जातं.
मी आज सकाळीच करुन बघितले. मी
मी आज सकाळीच करुन बघितले. मी बोलमधे एक लाल मिरचीचा
१ इंचाचा तूकडा टाकला होता. दही लागले ते आल्यामूळे कि
मिरचीमूळे ते सांगता येणार नाही. (आमच्याकडे आज दाट धुके
पडलेय, त्याचा काय परिणाम झाला असेल ?)
चव छान आली होती मात्र !!!
मामी, सही आहे हा प्रकार
मामी, सही आहे हा प्रकार
कालचं आणलय आलं.. आता ८ दिवस ठेऊन देते आणि मगच करते हे डेझर्ट 
उरलेलं आलं म्हणजे केवळ चोथा असतो. टाकून द्यावा<<< चोथ्याला सुद्धा स्वाद असतो.. उरलेला चोथा चहात घाला... आल्याचं डेझर्ट व्हायच्या आधी आल्याचा चहा पिऊन होईल
याचा ही उरलेला चोथा ... झाडात टाकुन द्या नाहीतर काँपोस्ट बीन मधे....