Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>म्हातारे मूल दिसते त्याचा
>>म्हातारे मूल दिसते त्याचा संदर्भ
> वोल्डमॉर्टचा हॅरीच्या शरीरात असलेला आत्म्याचा तुकडा
चिमुरीशी सहमत.
मृत्यूचा शाप कोणाच्या आत्म्याला लागणार, याचा निर्णय घेतात त्या प्लॅटफॉर्मवर.
हॅरी हॉरक्रक्स आहे हे समजल्यावर यूनोहू त्याला कैद करून जिवंत ठेवेल की काय अशी मला शंका होती. पण त्याला ते बहुतेक समजले नसावे.
रैना, हर्मीच्या करियर बद्दल एकदम सहमत. पण मी अशी समजूत करून घेतली आहे की ती पुढे स्कॉलर झाली आहे. पुस्तके वगैरे लिहिणारी.
नेविल बद्दल नंदिनीशी सहमत. आणि फ्रेड आणि जॉर्ज शाळा सोडून सोनेरी पश्चिमेकडे उडून जातात तो भाग माझ्या विशेष आवडीचा आहे.
मेघनाशी असहमत. एकदा यूनोहू गेला की हॅरीला सामान्य आयुष्य जगायला मिळते, हे त्या शेवटच्या प्रकरणात येते. मुलगा झाला तर त्याचे नाव जेम्स सिरियस ठेवणे अगदी साहजिक वाटते. (इथल्या अनेक सहकार्यांच्या मुलांची नावे त्यांच्या विशेष प्रेमाच्या नातेवाईकांवरून ठेवलेली आहेत.) मुलगा जेम्स, हॅरीच्या वडिलांसारखा (आणि थोडा फ्रेड आणि जॉर्ज मामांसारखा :फिदी:) उचापतीखोर असणेही सहजशक्य वाटते.
एकंदरित आत्तापर्यंत न मिळालेले चाकोरीबद्ध निवांत जीवन हॅरीला आता जगायला मिळते आहे हे दिसते.
हॅरी हॉरक्रक्स आहे हे
हॅरी हॉरक्रक्स आहे हे समजल्यावर यूनोहू त्याला कैद करून जिवंत ठेवेल की काय अशी मला शंका होती. पण त्याला ते बहुतेक समजले नसावे.>>>>>>>>>> वोल्डीला ते समजलेच नाही...
सही ना! केवढे मराठी फॅन्स
सही ना! केवढे मराठी फॅन्स लाभलेत हॅरीला... मस्त धागा आहे एकदम! काही प्रतिसाद प्रचंड आवडलेत... काश रोलिंगबाईंना मराठी येते... किती खुश झाल्या असत्या त्या हे सगळं वाचून...
मी हॅपॉ भाग एक वाचला अनेक वर्षांपूर्वी. तेंव्हा प्लॅटफॉर्म नं. पावणेनऊ ह्या संकल्पनेनेच भारावून गेले होते! नंतर बर्याच गॅपने भाग २ ही वाचला आणि भाग १ आणि २ हे सिनेमेही बघितले. पण तेवढेच... नंतर हॅरी आणि माझा संबंध संपला... ७.२ वा भाग रीलीज झाल्यावर मात्र ठरवलं, आधीचे सगळे भाग आता पहायचेच... वाचण्याइतका वेळ नव्हताच... त्याप्रमाणे भाग १ ते ७.१ सलग बघितले. पहिले दोन भाग लिंक तुटल्याने पुन्हा पाहिले. कादंबरी वाचलेली नसल्याने प्रत्येक पात्राचे तुम्हा लोकांइतके डिटेलिंग मला जमणार नाही, पण डॉबीचा मृत्यू, डंबलडोरचा विश्वासघातकी शेवट चांगलेच लक्षात राहिले.
सगळ्यात पहिला भाग सगळ्यात जास्त भावला. छोटुकला हॅरी आणि त्याची हुशार मैत्रीण हार्मायनी, निरागस रॉन फार आवडले. ती हिरवळीतून वाट काढणारी ट्रेन सहीच...
क्विडिच मॅच, शाळेतले राजकारण, डंबलडोरची आर्मी यांनी वास्तव जगातल्या तुलना करता आल्या. शाळेतल्या जादुई वनस्पती मुळापासून बाहेर काढल्यावरचे त्यांचे चीत्कार, प्रयोगशाळेतील गंमतीजमती खुप भावल्या. मेंदूतून आठवणीचा धागा बाहेर काढून तो स्टोअर करुन नंतर हवे तेंव्हा त्यात डोकावता येण्याची शक्यता, ही कल्पना भन्नाटच! एक विशाल व्यक्तिमत्त्व- तनाने आणि मनानेही-हॅग्रिड- खुप्प्प्प लळा लागला त्याचा... तो टेलिफोनबुथ, जो नंतर लिफ्ट मध्ये कन्व्हर्ट होतो आणि ती लिफ्ट आडवी मागे जाणारी, कमोडमधून डायरेक्ट डेस्टिनेशनला पोहचणारे हॅरी आणि दोस्तलोक... खुप सही....
त्या मोठ्या पक्ष्याला वश करुन त्यावर सवारी करण्याची कल्पना मुळ हॅपॉ सिरिज मधून आलीये ना? 'अवतार' मध्येही हिच कल्पना होती आणि मला ती फारच अभिनव वाटली होती. किती लिहू आणि किती नको! कित्येक प्रसंग लिहावेसे वाटत आहेत... पण राहून राहून मनात एक प्रश्न पडला, त्या हॅरीच्या काकू की मावशी... ज्यांना हॅरी फुग्यासारखं फुगवून आकाशात उडायला (की मरायला?)सोडून देतो, त्यांचे पुढे काय होते? तो भागभर मी त्यांच्यातली हवा सरून त्या जमीनीवर परततील, ही आशा करत होते, पण तसे शेवटपर्यंत झालेच नाही म्हणून तो भाग फार अस्वस्थ मनाने पाहिला....
मनाचा ठाव घेणारे सादरीकरण आहे हॅपॉ सिरीज चे चित्रपट म्हणजे... जादुई जगताची अत्यंत वेगळी आणि लक्षात राहिल अशी ओळख रोलिंग बाईंनी करुन दिली आहे. उरलेल्या सगळ्या कादंबर्याही जमेल तशा वाचणार आहेच, शिवाय उद्याच शेवटचा भाग ३डी मध्ये पाहणार आहे! कान्ट वेट अन्टिल टुमॉरो!
इथल्या सगळ्या हॅरी फॅन्सची
इथल्या सगळ्या हॅरी फॅन्सची चर्चा वाचून मी कित्येक दिवस करु करु म्हणून लांबणीवर टाकलेले हॅरी पॉटर पुस्तकांचे वाचन आता करणार आहे. मी फक्त सगळे सिनेमे बघीतले आहेत खूप वेळा. वाचन केले की नव्या दमाने इथे लिहायला येईन.
ज्यांना हॅरी फुग्यासारखं
ज्यांना हॅरी फुग्यासारखं फुगवून आकाशात उडायला (की मरायला?)सोडून देतो, त्यांचे पुढे काय होते? तो भागभर मी त्यांच्यातली हवा सरून त्या जमीनीवर परततील, ही आशा करत होते, पण तसे शेवटपर्यंत झालेच नाही म्हणून तो भाग फार अस्वस्थ मनाने पाहिला.>>>>>>>>> मूव्ही मधे दाखवलं नाहिये, पण पुस्तकात उल्लेख आहे की त्यांना मिनिस्ट्रीचे लोक नॉर्मलला आणुन त्यांची मेमरी मॉडिफाय करतात जेणेकरुन त्यांच्या काही लक्षात राहणार नाही...
मला हर्मायनी वोल्डीच्या मृत्युनंतर तिच्या आई-वडिलांना शोधुन त्यांची मेमरी पुर्ववत कशी आणते याचं कुतुहुल आहे... आणि तिचं करीअर काय दाखवलं आहे हे सांगा कुणीतरी...
सानी, सगळे भाग पाहिलेस मला अजुन बघायचे आहेत असे बॅक टू बॅक सगळे मूव्हीज... माझ्याकडे नाहियेत अजुन जमवायचे आहेत...
इथले प्रतिसाद वाचुन पुस्तकं वाचायला घेणार्यांच अभिनंदन
<इथले प्रतिसाद वाचुन पुस्तकं
<इथले प्रतिसाद वाचुन पुस्तकं वाचायला घेणार्यांच अभिनंदन>
----
रोलिंगबाईंकडून कमिशन घ्यायचे का?
रोलिंगबाईंकडून कमिशन घ्यायचे
रोलिंगबाईंकडून कमिशन घ्यायचे का?>>>>>>> भरत, ती देणार नाही कमिशन... उलट सॉफ्ट कॉपिज सर्कुलेट होतायेत म्हणुन आपल्याला स्यु करेल...
हॅपॉच्या राख्या आल्यात... मी
हॅपॉच्या राख्या आल्यात... मी घेतली एक भाच्यासाठी
>>हॅपॉच्या राख्या आल्यात...
>>हॅपॉच्या राख्या आल्यात... मी घेतली एक भाच्यासाठी स्मित>>
बहिणाबाईंना ह्यापो आवडत नसल्याने आमच्या नशिबात ही राखी नाही.
राज, स्वतःच खरेदी करा आणि
राज, स्वतःच खरेदी करा आणि बहिणाबाईंना सांगा की हे अॅडिशनल गिफ्ट म्हणुन
>>राज, स्वतःच खरेदी करा आणि
>>राज, स्वतःच खरेदी करा आणि बहिणाबाईंना सांगा की हे अॅडिशनल गिफ्ट म्हणुन :स्मित:>>
आयडिया चांगली आहे पण आमच्या टेस्टवर त्यांचा फारसा विश्वास नाहीये.
आयडिया चांगली आहे पण आमच्या
आयडिया चांगली आहे पण आमच्या टेस्टवर त्यांचा फारसा विश्वास नाहीये.>>>>>>>> सो सॅड.... पण हॅरी पॉटरवर विश्वास ठेवायला हरकत नाहिये...
मला हर्मायनी वोल्डीच्या
मला हर्मायनी वोल्डीच्या मृत्युनंतर तिच्या आई-वडिलांना शोधुन त्यांची मेमरी पुर्ववत कशी आणते याचं कुतुहुल आहे... आणि तिचं करीअर काय दाखवलं आहे हे सांगा कुणीतरी... <<<< ती ऑरर झाली असणार.
मला नाही वाटत.. मला वाटतं की
मला नाही वाटत.. मला वाटतं की ती एल्फकरता काहितरी काम करत असेल...
हर्मायनी म्याजिकल लॉ
हर्मायनी म्याजिकल लॉ एन्फोर्स्मेंट या सर्कारी खात्यात लागली आणि तिला बरीच प्रमोशनं मिळाली असं रोलिंगबाईं म्हणतात.
http://today.msnbc.msn.com/id/19959323/ns/today-wild_about_harry/t/finis...
ए अरे... ह्या धाग्यावर सर्वात
ए अरे... ह्या धाग्यावर सर्वात वर 'स्पॉयलर अलर्ट' टाकायला हवा.
मी हल्लीच शेवटचा पार्ट बगितला . नेमका त्या दिवशी इथे आलो. आणि हॉरक्रॉक्स बद्द्दल वर लिहीलेलं ओझरतं बघितलं. मी पुस्तक वाचलेलं नसल्याने ते वाचून धक्का बसला. लगेच हे बंद केल्यानं पुढचं काही वाचलं नाही. पिक्चर एन्जॉय केला. पण मेबी वर 'अलर्ट' बघून पिक्चर न बघितलेले हे वाचणार नाहीत.
आज रात्री घरी येताना एका
आज रात्री घरी येताना एका 'सुमो' गाडीच्या रेअर विंडोवर मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेलं दिसलं..
.........LORD ............
.VENKATESHWARA.
त्या लॉर्ड आणि वेंकटेश्वरा मधे इतकं अंतर होतं, की मी लॉर्ड वाचल्यावर आधीच मनात म्हटलं :- वॉल्डमॉर्ट
मग वेंकटेश्वरा दिसलं..
ऋयान टाकते आता 'स्पॉयलर
ऋयान
टाकते आता 'स्पॉयलर अलर्ट'
काल परत एकदा पहिला भाग
काल परत एकदा पहिला भाग वाचायला घेतला आणि बर्याच दिवसांपासुन मनात असलेल्या एका शंकेच उत्तर मिळालं....
अन्डरएज विच किंवा विझार्ड च्या आसपास काही मॅजिक झालं तर ते लगेच नोट होतं.. जे मॅजिकल फॅमिलीतील आहेत त्यांना फरक पडत नाही पण जे मगल्स असतात त्यांना पडतो.. म्हणुनच डॉबीने केलेलं मॅजिक हॅरीला गोत्यात आणतं.. मला कळत नव्हतं की हॅग्रिड जेव्हा हॅरीला पहिल्यांदा पत्र द्यायला जातो त्यावेळेस तो बरचंसं मॅजिक करतो मग त्यावेळेस काहीच कसं नोट होत नाही... तर त्यावेळेस डम्बलडोरला माहित असतं की कदाचीत हॅरीला त्याचे मावशी-काका सहजा सहजी सोडणार नाहित म्हणुन ते हॅग्रिडला थोडंसं मॅजिक वापरायला परमिशन देतात...
मला वाटतं तोवर हॅरीची
मला वाटतं तोवर हॅरीची हॉगवर्ट्स मधे अॅडमिशन झालेली नसल्याने त्याला हा नियम माहित नसल्याने अशा मॅजिकवर अॅक्शन घेतली जात नाही. हॅरी झूमधल्या त्या सापाला सोडून देतो, किंवा त्याचे अगदी बारीक कापलेले केस पटकन वाढतात, नावडता ड्रेस त्याला फिट होत नाही, अशी काही काही मॅजिक त्याच्याकडून आधीच होत असतात.
हॅग्रिड हॅरीला डोळा मारून सांगतो की मी केलेल्या मॅजिकबद्दल कुणाला सांगू नकोस.
मला वाटतं तोवर हॅरीची
मला वाटतं तोवर हॅरीची हॉगवर्ट्स मधे अॅडमिशन झालेली नसल्याने त्याला हा नियम माहित नसल्याने अशा मॅजिकवर अॅक्शन घेतली जात नाही.>>>> ओके.. असं आहे होय ते... हो बरोबर..
काल मी ५वा भाग परत वाचायला
काल मी ५वा भाग परत वाचायला घेतला.. ऑर्डर ऑफ फिनीक्स.
त्यात हॅरीचे काका त्याला घराबाहेर काढायला निघतात वैतागुन तर पिट्युनियाला कोणीतरी हॉलर पाठवतं 'रीमेंबर माय लास्ट' असं, ते ऐकुन ती त्याला काहीतरी दुसरंच कारण देउन घरातच राहायला लावते.. ते कोणाकडुन येतं ते कळतंच नाही नंतरच्या भागातही.
लिली, म्हणजे हॅरीची आई पाठवत नसेल ना.. मेल्यावर कसं पाठवणार पण??
पिट्युनियाला कोणीतरी हॉलर
पिट्युनियाला कोणीतरी हॉलर पाठवतं 'रीमेंबर माय लास्ट' असं, ते ऐकुन ती त्याला काहीतरी दुसरंच कारण देउन घरातच राहायला लावते.. ते कोणाकडुन येतं ते कळतंच नाही नंतरच्या भागातही.>>>>>>> ड्म्बलडोर पाठवतात... लास्ट म्हणजे त्यांनी जे पत्रात लिहिलेलं असतं ते..
पहिल्या भागात, हॅग्रिड ७१३
पहिल्या भागात, हॅग्रिड ७१३ मधुन तो फिलॉसॉफर्स स्टोन घेतो... तो ७१३ वॉल्ट कोणाच्या मालकीचा असतो??
७१३ मला वाटते डंबलडोरांचा
७१३ मला वाटते डंबलडोरांचा असतो. स्टोन डिपॉझिट करणार ते निकोलस फ्लॅमेल आजोबा आणि हॅग्रिड तो तिकड्न उचलून हॉगवर्टसला आणून ठेवणार असा बेत असणार अशी मी कल्पना करून घेतली आहे.
nice
nice
आजच लायब्ररीतून हॅरी पॉटर भाग
आजच लायब्ररीतून हॅरी पॉटर भाग १ आणि २ आणलेत. आता वाचून झाले की मगच येईन
हॅरी पॉटर आणि अझकाबान परत
हॅरी पॉटर आणि अझकाबान परत पाहिला. आवडला.. मला आता हाफ ब्लड प्रिन्स पाहायचा आहे.. त्याचा अर्थ काय?
फिलोसोफर स्टोन अणि थ्री
फिलोसोफर स्टोन अणि थ्री ब्रदर्स स्टोरी मधील पुनर्जीवन दगड एकच का? हॉरक्रक्स ( हिंदीत काय आहे? ) नष्ट करतात ते कितव्या भागात ? सातव्या भागात मौत के तोहफे-१ मध्ये हॉरक्रक्स मिळतात का? मला आठवत नाही..
जामोप्या डायरेक्ट बारावीची की
जामोप्या डायरेक्ट बारावीची की हो परीक्षा दिलीत. आधी केजीत अॅडमिशन घ्या. मग कळेल हाफ ब्लड . मी सांगण्याने त्यातली आग जाणवणार नाही.
Pages