बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो. पण पृथ्वीला एखादा नवीन उपग्रह मिळतो की काय अशी शंका आपल्याला यायच्या आत सिंघम त्यांच्या अंगावर उडी मारून तिसर्यालाच तो सुमारे ५०-६० फूट लांब फेकला जाईल व while he is going there वाटेतील दोन चार जीप ची हुडे, सळया, काचा तोडत जाईल एवढी फाईट मारतो.
एवढ्या पावर्फुल माणसाला सर्व व्हिलन्स ना संपवायला तीन तास लागतात हेच आश्चर्य आहे. पण लगे हाथो पोलिस फोर्स चे डोळे उघडणे (झोपेतून नव्हे) ई. समाजोपयोगी कामे व "काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.
हा पिक्चर इतका अ. आणि अ. आहे हे आत्ता कळते. पण खरे सांगायचे तर बघताना फुल टाईमपास झाला. काही पिक्चर बघताना आपण एन्जॉय करतो पण आवडला हे नंतर सांगायला जरा अवघड वाटते असे काही असेल तर हा त्यातलाच.
थिएटर मधे मित्रांबरोबर जाऊन तेथील माहौल मधे हा बघणे आणि घरी व्हिडीओ वर बघणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हा बहुतेकांना प्रचंड आवडेल किंवा एकदम प्रचंड अतर्क्य वाटेल.
सुरूवातीपासून एवढा वेग आहे की आपण पूर्ण एंगेज होतो. त्या एन्ट्री-ढोलांचा ताल एकदम मस्त आहे. पब्लिक जाम रिस्पॉन्स देते. अनेक शॉट्सला टाळ्या पडत होत्या. शेवटी एकदा मंत्री (अनंत जोग) च्या "खुर्चीवर बसताना आठवण यावी" म्हणून मारलेल्या लाथांना जो पब्लिक रिस्पॉन्स मिळतो तो सर्वांनी पाहावा.
बाकी सगळे सरधोपट आहे. मंत्री भ्रष्टाचारी म्हणजे सरळ खुर्चीवर बसून उघडपणे सर्व बोलणारा. राजकारणात मुरलेली व्यक्ती कशी वागेल/बोलेल यात खोल जाण्याचे कारणच नाही. भ्रष्ट पोलिस, नियमाने वागणारे पोलिस हे एकाच शॉट मधे क्लिअर होता. नो ग्रे एरिया. व्हिलन भाषणात बोबडी वळून सुद्धा निवडून येतो हे सध्या अशक्य वाटणार नाही पण तो आमदार की खासदार याचा पत्ता नसताना आपण मंत्री होणार हे त्याला नक्की माहीत असते.
बरेच सहकलाकार मराठी आहेत, जे प्रत्यक्षात मराठी नाहीत त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे मराठी आहेत आणि संवादांत ही मराठीचा भरपूर वापर आहे. गोव्यात शूटिंग खरोखर झाले असावे. गाणे एकही नीट कळत नाही पण प्रभाव सर्व दाक्षिणात्य आहे. अशोक सराफ हिंदीत त्याच्या दहा टक्के कुवत नसलेल्या हीरोंपुढे दुय्यम रोल का करतो याचा मला नेहमी राग येतो, पण येथे निदान त्याला काही चांगले शॉट्स आहेत, थोडेफार त्याचे अस्सल विनोदी कौशल्य दाखवणारेही.
तर रेकमेण्ड करावा का नाही? बघा, हरकत नाही, शक्यतो ग्रूप मधे. दबंग, सनीचे ढाई किलो का हाथ वाले पिक्चर्स या पठतीतील कलाकृती आपण बघत आहोत याची कल्पना ठेवून जा.
(No subject)
इथला प्रतिसाद सिंघमच्या यशाचं
इथला प्रतिसाद सिंघमच्या यशाचं रहस्य काय ? या धाग्यावर हलवला आहे.
पोस्ट डिलिट केली.
पोस्ट डिलिट केली.
तसा देवगण हा सेन्सिबल अभिनेता
तसा देवगण हा सेन्सिबल अभिनेता आहे. सुसह्य आहे. अगदीच फ्यान बिन व्हावे असे नाही. अन्डर प्ले करतो. कधी कधी एकदम झम्पक दिसतो व वैयक्तिक जीवनातही सुसंस्कृत आहे असे दिसते....
अजय अतुलचे संगीत कसे आहे?
अजय अतुलचे संगीत कसे आहे? त्याच्याबद्दल फार उल्लेख ऐकला नाही....
श्री त्या लिंकची चौकशी चालू
श्री
त्या लिंकची चौकशी चालू आहे असं कळालं..
याचे फक्त ट्रेलर बघितले होते
याचे फक्त ट्रेलर बघितले होते मी. हिंदित डब केलेला दाक्षिणात्य सिनेमाच वाटला. दणादण गाड्या आपटून, कुणाची करमणूक होते ?
आणि माझ्यातरी परिचयात कुठल्याही मराठी मूलाचे नाव बाजीराव नाही !
दिनेशदा ऑर्कूटवर ९६ कुळी
दिनेशदा ऑर्कूटवर ९६ कुळी मराठा या नावाची कम्युनिटी आहे. शे पाचशे बाजीराव सहजच सापडतील तिथं.
बाजीराव हे कॉमन नाव आहे.
बाजीराव हे कॉमन नाव आहे. तुम्हाला माहीत नाही हा तुबुदो समजा::फिदी:
तसा देवगण हा सेन्सिबल अभिनेता
तसा देवगण हा सेन्सिबल अभिनेता आहे. सुसह्य आहे. अगदीच फ्यान बिन व्हावे असे नाही >>> तुम्हि काडी टाकताय का काय हळुच ?
अनिल मी नाही बा त्याचा मेंबर.
अनिल मी नाही बा त्याचा मेंबर. पण आहे मात्र !! माझ्या पिढीपर्यंत तर बाजीराव हे नाव उपहासाने
घेतले जात असे. (काय बाजीरावाचा बेटा समजतोस कि काय स्वत:ला वगैरे )
बाजो, समजलाही असता, पण जी गोष्ट (म्हणजे बुद्धी हो) अस्तित्वातच नाही तिला दोष तरी कसा द्यायचा ?
भारी
भारी
अरे लोकमत वर सोनाली कुलकर्णी
अरे लोकमत वर सोनाली कुलकर्णी ची मुलाखत झालेली तेव्हा असे सांगण्यात आले होते की या सिनेमात तिचा मोठा आणि महत्वाचा रोल आहे. पण परीक्षणात तर तिचा उल्लेखही दिसत नाहीये. म्हणजे तिला फारसा रोल नाहीचे का?
डेलिया, आहे रोल, तिने केलायही
डेलिया, आहे रोल, तिने केलायही चांगला पण आवर्जून उल्लेख करण्यासारखे काही वाटले नाही मला. मात्र तिचा चित्रपटभर न हसणारा मुलगा जेव्हा शेवटी हसतो तेव्हा आपल्यालाही बरे वाटते.
अनंत जोगचे ही तसेच. अगदी पूर्वीच्या जब्बार पटेल स्टाईल राजकारणातील कॅरेक्टर साकारण्याची क्षमता असलेल्या या अभिनेत्याला घेउन इतका "डम्ब" रोल दिलाय, टोटल वाया.
संगीत कसे आहे? अजय अतुल
संगीत कसे आहे? अजय अतुल बद्द्ल काहीच ऐकले नाही ह्या चित्रपटासाठी त्यांचे संगीत आहे ना.
पार्श्वसंगीत पिक्चरच्या एकूण
पार्श्वसंगीत पिक्चरच्या एकूण लाउड टोनला साजेसे आहे. त्या ढोलांचा ठेका मस्त आहे. बाकी लक्षात राहण्यासारखे काही नाही.
दिनेशदा बरोबर आहे. बाजी हे
दिनेशदा
बरोबर आहे. बाजी हे नाव असतं. बाजीराव असा उल्लेख माणूस मोठा झाल्यावर होतो. रच्याकने, आपले पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पिताश्री... माजी खासदार यांचं पूर्ण नाव शंकरराव बाजीराव पाटील असं आहे. एकेका प्रदेशात काही काही नावं रूढ असतात. मला माफ करा त्या कम्युनिटीचा उल्लेख केल्याबद्दल.. बाजी हे नाव तसं सर्वत्र असतं. मराठवाडा किंवा विदर्भाची मला कल्पना नाही.
हा विषय इथेच थांबवूयात
सोनाली कुलकर्णीचा रोल मुद्दाम
सोनाली कुलकर्णीचा रोल मुद्दाम उल्लेख करण्या सारखा नाहीये, चित्रपटाची सुरवात बघून वाटलं कि सोनाली चा लहान मुलगा मोठा होउन बाजीराव बनणार आणि वडिलांच्या अपमानाचा बदला घेणार :).
अजय अतुल च म्युझिक पण खास नाही.. सिंघम टायटल साँग वर दबंग टायटल साँग चा इफेक्ट वाटला.
Pages