गझल विभागात एक तरही वाचली आणि सहज गंमत म्हणून हे सुचलेलं टाकतोय........
संबंधितांनी कृपया हलके घेणे.
याला काहीच्या काहीच्या काहीच्या काही कविता म्हणण्यासही आक्षेप नाही.
------------------------------------------------------------------------------------
काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
जाणार गावी आनंदून मग बांधेन मी तोरणे
जीन्स घालता सुनेने बोलती कुजके जरी
मुलीने करता फ्याशन तिला मॉडर्न संबोधणे
देखणे ते नाक मुलीचे अन् सुनेचे ते वाकडे
मुलगी आणि सुनेला का वेगवेगळे जोखणे?
सून करता विचारपूस यांना वाटते "फॉर्म्यालिटी"
मुलीचे टोमणेही भासती मायाळू ते बोलणे
दिवसा ढास खोकल्याची अन् घोरणे रात्री तरी
मधुमेही देहाने उघडूनि फ्रीज गुलाबजाम चोरणे
पावसात ते बहु फिरणे सोसेना सर्दी जरी
ओलेत्या देहानेच मग वातानुकूलित विहरणे
सर्दीने हैराण पण तोंडात केळे कोंबती
ढोल्या देहाला त्या किती ते कुपोसणे )
सोडवा देवा असा थकले करुन धावा बघा
गावी जाती आता जेव्हा मेले हजार मी मरणे
काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
टळणार ब्याद एकदाची मग बांधेन मी तोरणे
------------------------------------------------------------------------------------
कुपोसणे = कुपोषण या शब्दाचा अपभ्रंश - पोएटिक लायसन्स का काय म्हणतात ते.
------------------------------------------------------------------------------------
मस्त जमलीये
मस्त जमलीये
हाहाहा!!मस्स्त!
हाहाहा!!मस्स्त!
(No subject)
मंदार, अनेक सुनांच्या आणि
मंदार, अनेक सुनांच्या आणि त्यांच्या माहेरच्या लोकांच्या मनातले विचार शब्दबध्द झालेत.
फक्त दुसर्यांच्या सासवा
फक्त दुसर्यांच्या सासवा नजरेसमोर ठेवून लिहीलय की स्वतःची सुद्धा? गंमत म्हणून थोडे फार टोमणे, ताशेरे चालले असते पण मधुमेही देह, ढोला देह वगैरे म्हणजे खुपच पातळी घसरवलीत.
(No subject)
(No subject)
पण: थोड्याफार ठिकाणी बरोबर
पण:
थोड्याफार ठिकाणी बरोबर नाही वाटली.
उदा. < मधुमेही देहाने उघडूनि फ्रीज गुलाबजाम चोरणे >
वैद्यबुवांना अनुमोदन.
कन्सेप्ट आणि पॉईंट मात्र भारी!
(No subject)
सासवांना लागेल रे तूझे खरे
सासवांना लागेल रे तूझे खरे बोलणे
आवडले गझलेत त्यांना सुळावरी तोलणे
छान
छान
ढोल्या देहाला त्या किती ते
ढोल्या देहाला त्या किती ते कुपोसणे )
म्हणजे ही जाड्या सासवांना सुट होतेय तर.
मदारभौ नाद करायचा नाय बरं,
मदारभौ नाद करायचा नाय बरं, आपली ओळेती ...
आणि हलकं घ्यायला मुळात जड लिहायचं ना?
छान आहे.
छान आहे.
(No subject)
(No subject)
ही कविता तुमच्या सासूवर केलीय
ही कविता तुमच्या सासूवर केलीय की तुमच्या पत्नींच्या सासूवर? मलाही बुवा/ऋयामप्रमाणेच काही भाग आक्षेपार्ह वाटला.
मंदार मस्त जमलिये
मंदार मस्त जमलिये
मंदार अगदी पोटतिडीकीने
मंदार
अगदी पोटतिडीकीने लिहल्यासारखं वाटलं.
सहीये..
सहीये..
वादविवादा चे प्रचण्ड
वादविवादा चे प्रचण्ड पोटेन्शियल असलेली कविता!! नेहमी च्या सासवासुनांच्या सुपरफास्ट ट्रॅक वर जायची फक्त देर आहे
>>फक्त दुसर्यांच्या सासवा
>>फक्त दुसर्यांच्या सासवा नजरेसमोर ठेवून लिहीलय की स्वतःची सुद्धा?
वैद्यबुवा, हे जरा वैयत्तिक होतंय असं नाही का वाटत?
हे कुणालाही उद्देशून नाही लिहीलेलं. एका सुनेच्या दृष्टिकोनातून लिहीलेलं जनरलच आहे.
तेव्हा काहीच्या काही ह्याच स्पिरिटमधे घेणे.
आपल्या संस्कृतीत यापेक्षा जहाल शब्द असलेली काव्ये आहेत. भारुड का काय म्हणतात ते...................
उदाहरणार्थः
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासू माझी जाच करिते
लौकर निर्दाळी तिला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
जाउ माझी फडफड बोलति
बोडकी कर गं तिला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
नणंदेच पोर किर्किर करिते
खरूज होऊ दे त्याला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
दादला मारून आहुति देईन
मोकळी कर गं मला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकलीच राहू दे मला
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
तेव्हा ह्या का.का.क. मधले शब्द फारच सौम्य म्हणायला हवेत
मंदार उदा. जरा जास्तीच ठासून
मंदार उदा. जरा जास्तीच ठासून दिल्यासारखं वाटतंय. असो..
ही कविता एक का.का.क आहे त्यामुळे हलकेच घ्यायला हरकत नाही.
(No subject)
कुपोसणे = कुपोषण या शब्दाचा
कुपोसणे = कुपोषण या शब्दाचा अपभ्रंश - पोएटिक लायसन्स का काय म्हणतात ते.>>>
आसवांना साठी तू सासवांना
आसवांना साठी तू सासवांना केलेस..... नक्की किती सासवा आहेत तुला????
तिथे "सासवेला" म्हणू शकतोस.......
अरे एका सुनेच्या नजरेतून
अरे एका सुनेच्या नजरेतून लिहीलंय हे. माझ्या नव्हे.
हरकत नाही.... पण एका सूनेला
हरकत नाही.... पण एका सूनेला एकच सासू असते "एकावेळी एक" या तत्वाने
बाकी जमलिये कविता.
सासर्याच्या दोन चार बायका
सासर्याच्या दोन चार बायका असतील तर गोष्ट वेगळी म्हणा
मस्त लिहीली आहेस मंदारदादा.
मस्त लिहीली आहेस मंदारदादा.:)
Pages