तशी माझी मीच रिक्षा फ़िरवतच असतो म्हणा. मी गेली अनेक वर्षे टिव्हीवरच्या मालिकाच काय, टिव्हीच बघणं सोडून दिलय. त्यामूळे वाचनाला, मित्रांच्या संपर्कात रहायला, इतर छंदांना भरपूर वेळ मिळतो.
श्रीयुत गंगाधर टिपरे हि मन लावून बघितलेली शेवटची मालिका. त्या आधी, तू तू मै मै पण बघितली होती. भारत एक खोज ची तर वाट बघत असायचो.
यावेळच्या भारतवारीत, पावसामूळे कधी कधी घरी बसावे लागायचे. आई कुठलीतरी मालिका बघत बसलेली असायची. त्यावेळी जाणवलेले हे काही.
अर्थात मला हे माहित आहे, कि माझ्या या लेखनाने इतर कोण, माझी आईदेखील मालिका बघणे सोडणार नाहि. त्यमूळे हे स्वगतच समजायचे.
१) विषय
मालिकांचे विषय हे एका ठराविक वर्तूळातच फ़िरताना दिसताहेत. कौटुंबिक ताणतणाव याचे नुसते गुर्हाळ चाललेले असते. आताशा अभावानेच दिसणारे एकत्रित कुटुंब या मालिकांत असते. आणि ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना क्वचितच दिसते. ताणतणावात काही खास कारणे दिसली नाहीत, तरी कुठल्यातरी सूनेला घराबाहेर नक्की काढलेले असते आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कुणाकडून सह्या नक्कीच हव्या असतात. नुसत्या पेपर्सवर सह्या करुन, तेसुद्धा घरातल्या घरात असे कायदेशीर दस्ताऐवज तयार करता येतात का ? घटस्फोटाचे कागद पण असेच तयारच असतात, त्यावर नुसती सही करायची असते. तीसुद्धा घरच्या घरी. धन्य रे बाबांनो. तमाम गृहिणींना उत्तम जी.के. मिळतय म्हणायचे.
२) बिझिनेस
प्रत्येकाचा काहितरी बिझिनेस नक्कीच असतो, पण तो कसला ते मात्र शेवटपर्यंत कळत नाही. ऑफ़िसेसमधले वातावरण तर काय वर्णावे ? या दिग्दर्शकांना स्वत:ची ऑफ़िसेस पण नसतात का ? एका टिपिकल दिवसात ख-याखु-या ऑफ़िसात जे काही घडू शकते, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे, पण या लोकांना ते माहितच नसते.
३) घरातला वावर
पुर्वी आशा काळे कशी स्वत:च्या पदराने नवरोबाचे बूट पुसून द्यायची, तसे आता होत नाही. (त्याच पदराने चहाचा कप पण पुसायची ती !) पण मालिकांतल्या बायकांना घरात काही काम असते, असे कधी जाणवतच नाही. अगदी घरात नोकर चाकर असले तरी, घरातील माणसांना अनेक कामे स्वत:च करावी लागतात. दोघे नवराबायको नोकरी करणारे असले तरी, दोघांनाही घरातली कामे उरकावीच लागतात. पण मालिकातल्या माणसांना मात्र तसे काहिही काम नसते. म्हणून तर कटकारस्थाने करत असतात.
मला आवर्जून नातीगोती नाटकातल्या आईच्या घरातील वावराचा उल्लेख करावासा वाटतो.
त्यात ती आई, घरातील इतक्या वस्तू हाताळते, त्यांची ने आण करते कि ते घर आणि ती आई अगदी खरीखुरी वाटते. पण मालिकेतल्या बायका मात्र कचकड्याच्या बाहुल्याच वाटतात.
४) अभिनय
समजा दोन बायका बोलत असतील, तर एकीच्या तोंडावर, बये तूला भाजून खाऊ की तळून खाऊ असे भाव, तर दुसरीच्या तोंडावर, धरणीमाय पोटात घेईल तर बरं, असे भाव. यापेक्षा वेगळे काही दिसते का कधी ? कायम चढ्या आवाजात बोलणे, (लाऊड) सदैव डोळे रोखून वा वटारून बोलणे म्हणजे यांचा अभिनय. रडायचे म्हणजे गळा काढूनच रडायचे. कधी कधी तर ते रडणे मला बघायलाच काय, ऐकायला सुद्धा असह्य होते. पापण्यांनी रोखून धरलेले पाणी, डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू... असे उत्तम
क्लोज अप्स आठवताहेत मालिकांमधले ?
अभिनयाची उस्फुर्तताच जाणवत नाही. सुप्रिया चा अभिनय म्हणजे उस्फ़ुर्तता, असे समजले तरी चालेल. एरवी असा नैसर्गिक अभिनय करणारे कलाकारही, मालिकांचा अतिरेक झाल्याने यांत्रिक अभिनय करताहेत, असे वाटायला लागलेय.
५) आवाजाची फ़ेक
एकच एक ठराविक पट्टीतला आवाज, म्हणजे सीमा. परवा भरतच्या, निलम प्रभुंच्या बीबीवर मी, त्यांच्या महानंदा या नभोनाट्याची आठवण काढली होती. कधीचे आहे ते नभोनाट्य, काही कल्पना ? ते किमान १९७२/७३ सालातले असणार. आज जवळ जवळ ४० वर्षे झाली (ते परत कधी ऐकलेच नाही) तरी त्यातले संवाद विसरलेलो नाही. ते चार भागात प्रसारित झाले होते. त्यातल्या दुस-या भागातील संवांदाची उत्कटता तर गुंतता ह्रुदय हे, या नाटकात पण जाणवलेली नव्हती.
मराठीत एके काळी उत्तम आवाज कमावलेल्या कलाकार होत्या. आशा पोतदार, फ़ैयाज, भक्ती बर्वे, लालन सारंग, रिमा, सुधा करमरकर, आशालता, सुमन धर्माधिकारी, विजयाबाई..
नुसत्या आवाजावरुन त्या एखादी व्यक्ती उभी करू शकत असत. (आठवा जाणता राजामधली, जिजाबाई)
या थोर कलाकारांचे मार्गदर्शन आजच्या मालिका कलाकारांना लाभायला हवे होते.
बहुतेक मालिका घरातल्या घरातच असतात. आपण एकमेकांशी बोलायला, फ़ोनवर बोलायला, स्वत:शी बोलताना एकाच पट्टीत बोलतो का ?
६) कपडे
कपड्यांच्या बाबतीत पण ठराविक भडक रंगाचेच कपडे दिसतात. सेटच्या रंगसंगतीशी ते जूळतीलच असे काही नसतेच. आणि असा विचारही केलेला नसतो. शिवाय ते कपडे, नुकतेच इस्त्री केलेले, पदर पण व्यवस्थित पिन अप केलेला !
त्या कपड्यात बहुतेक कलाकार अवघडलेलेच वाटतात. मला आठवतय, बॅरिष्टर नाटकाच्या वेळी सुहास जोशींनी, असे सांगितले होते, कि विजयाबाईंनी त्यांना नाटकातल्या साड्या, घरी नेसायला लावल्या होत्या. वापरुन जुन्या झालेल्या साड्याच नाटकात वापरल्या होत्या. असा विचार कुणी करतं या मालिकांसाठी ?
७) प्रकाशयोजना
भगभगीत प्रकाश हाच कायम. सकाळची, संध्याकाळची वेळ, घरात कधी जाणवतच नाही. कायम टळटळीत दुपार. अनेक मराठी नाटकांत, प्रकाशयोजनेचा उत्तम विचार केलेला दिसतो. पण मालिकेत रात्रीच्या अंधारात सुद्धा, प्रत्येक झाडामागे प्रखर पांढरा दिवा लावलेला दिसतो. अपु-या प्रकाशात उत्तम चित्रीकरण करणारे कॅमेरे आता नक्कीच उपलब्ध आहेत.
८) चित्रीकरण
तेच ते ठराविक अँगल्स. त्याबद्दल काहीही विचार नाही. दर दोन मिनिटांनी झूम इन करत तीन वेळा घेतलेला क्लोज अप. वर्षानुवर्षे यात काही म्हणुन बदल झालेला नाही. एखादया दृष्याचा, रचनात्मक नजरेतून विचार केलाय असे जाणवतच नाही.
दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या कॅमेरामन्सच्या तूलनेत आज काही फ़ार पुढे आलो आहोत असे वाटतच नाही.
९) मेकप
याचा तरी काही विचार केलेला असेल, अशी अपेक्षाच करता येत नाही. चेहर्यावर थापलेले रोंगण, रंगवलेले केस, लावलेला विग सगळे सगळे कळून येते. टिकल्यांच्या जागी गोंदण, एकावर एक चढवलेल्या टिकल्या, दंडावरचे गोंदण, कोरलेले डोळे... यक.
१०) शरीर ठेवण
बहुतेक हिरो हे ठराविक साच्यातून काढलेल्या शरिराचेच नव्हे तर चेहरेपट्टीचे पण. अगदी नगाला नग. एकाला काढावा आणि दुस-याला झाकावा. म्हणून तर मालिकेत बदलत असावेत.
सिनियर कलाकारांनी, कामाचा अतिरेक करुन चेहर्याची, शरीराची लावलेली वाट पण बघवत नाही. अशा शरीराने व चेहर्याने, ते बरा अभिनय करतील, अशी अपेक्षा तरी कशी बाळगायची ?
आधी मला वाटायचे कि आपण हिंदीचे अनुकरण करतोय. (एक उदाहरण देतो, आपल्याकडे एखाद्याला हाक मारायला म्हणजे सांत्वनाला जाताना, पांढरेशुभ्र कपडे घालायची रित होती का, कधी ?) पण आता कळले कि इंग्रजी मालिकांत पण फारसे काही वेगळे नसते.
चला मन मोकळे करुन टाकले. काहि ओझरती दृष्ये बघून जर मला इतका ताप होत असेल, तर नियमित मालिका बघणार्यांच्या सहनशीलतेचा, हेवाच करायला हवा मी.
लोक्स आज इथून स्फूर्ती घेउन
लोक्स
आज इथून स्फूर्ती घेउन मी दोन्ही टीवी बंद करून मुलीला एक गणित सोडवून दिले व कामाचे १५ फोन कॉल केले. मला एक स्टार द्या बरे. आता छोलार दाल बनविणार.
नुसतीच तूतिमी नाही तर ई
नुसतीच तूतिमी नाही तर ई टिव्हीवरच्या ४ मालिका आमच्याकडे आलटुन पालटुन बघीतल्या जातात्.:अरेरे:
माझे साबु झीवर जाहीरात असेल तर ई वर डोकावतात. आणी त्यात सासु सुनेचे भांडण असेल किंवा एखादी कुंकुतल्या जानकी सारखी आदर्श अलका कुबल/ आशा काळे टाईप सुन असेल तर नवीन जुन्या सासु सुनांची तुलना करत बसतात. लय वात येतो ऐकुन.:राग:
इकडे सत्या अन तिकडे भैरव, इकडे सौरभ तिकडे सागर, इकडे आरव अन तिकडे तो श्री, इकडे शेखर तिकडे मसाहची टीम. देवा! वाचव. आणी हे सगळे असे अर्धवट पाहीले जाते म्हणून परत रात्री १०:३० ते १२: ३० परत त्यांची उजळणी.
माझी मुले कार्टुन लावुन हैराण करतात ते वेगळे. माझी जाऊ जेव्हा पवित्र रिश्ता बघत असते तेव्हा मध्येच माझा दीर येऊन तिला त्या पात्रांविषयी विचारुन पकवतो. तिचा सगळा संदर्भ आणी पेशन्स गायब झालेले असतात. मग सुरु होते नवीन महाभारत्.:फिदी:
केबल काढून टाका.
केबल काढून टाका.
>>तिचा सगळा संदर्भ आणी पेशन्स
>>तिचा सगळा संदर्भ आणी पेशन्स गायब झालेले असतात
हाच प्रॉब्लेम पवित्र रिश्ताच्या लेखक आणि दिग्दर्शकाचाही आहे. चिंता नसावी
एखाद्या मालिकेच्या वेळात
एखाद्या मालिकेच्या वेळात चुकून दुस-या वाहीनीवरच्या मालिकेचा भाग पाहिला तरी आपल्याला काही फरक पडत नाही.
Pages