आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
************aishwarya aahe..
************aishwarya aahe.. aai (sadhana ) nahi...
आमचि शाला shift zali tevmha khup gosti (bhutachya) chalaychya...
planchet me swataha 3 da try kela pan tasa kai zala nai.. kadachit tya bhootala mich bhoot vatli asen karan asle prayog amhi ratri 1-2 la uthun karaycho..
pan mazya eka maitrinine tyacha asa anubhav getlaay ki ti amha konalach karu dyaychi nahi...
zala kaay ki ti, tichi class mate n tyanchi family manali la gele hote.. suttit.. tar eka ratri ya nalayakanni planchet karayche tharvale. te sagle milun 5 jana hoti (sagle bahin-bhau no parents).. girls n boys... karayala ghetla ani itkyat roomchi lite geli.. mazi maitrin jaam chidli. tp mhanun bhaher aali ani tila shockach basla.. bakichya lites on hotya .. "aso aplya room cha fuse udala asel.." asa mhanun te zople .. arthat mazi maitrin zashi chi rani ch hoti naghabarnaari.. pan.. sakali jevha kall ki fuse la kahich zala nai temva tich bhitine galanch udali hoti...
tya nantar tine kadhich amhala PC karu dila nai..
akher 10vichya sanskrut (sainyukta..)chya paper chya adhi (to 23la hota ani tya adhi 3 divas suttya hotya..) me aani doghinni tila patvla ani ti raaji zala... punha sagli tayari keli ani mhatla 1 la uthaych..!! pan (asa tine sangitla) me uthatach naute ani mala thodi far jaag aale tenva me "nahi-nahi "asa ordat hote.. sakali uthlya uthlya mi khup chidle ki yanni mala na uthavta golmaal kela.. mala ratrich kahich athve na so mi shakya tevdhi chid-chid keli.. but nahi-prakar kallya var jara gapp basle may be zop control hot nauti mhanun mhatla asel.. nantar kalla ki amcya doginshivay ji 3rd hoti na tila swapnat ek mulgi disli jine tila "nahi" sangitle... tymule tyani mala tasach zopu dile... arthat yaat ti swapna vali ti hoti jine 11th nantar geli ani ti adhi tya=amcya dorm made hoti, jast gadbad nako ani last paperla ghondhal nako mhanun tya tighinni ha nirnay ghetla.. pan khara sangte... mala ektya sanskrut madhe apekshepeksha jara jastach padle..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
tya purvi 6th vat mala planchetch bhari ved hota karan amchya shalet te only seniors kayaychya.. ani amhi tyanchi copy.. tar tyatlya eka story paiki chi link ithe taktey..( ji saglyanna khoti vataychi pan ti konachya tari bavane sangitli hoti..)
http://forum.santabanta.com/showthread.htmt=27848
http://forum.santabanta.com/showthread.htm?t=27848
- aishwarya...
गुगु तू कल्याण मध्ये कोठे
गुगु तू कल्याण मध्ये कोठे राह्तोस?
कसला भिकारडा धागा काढलाय
कसला भिकारडा धागा काढलाय ....अंधश्रधेला प्रोत्स्हान देणारा![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
<<<कसला भिकारडा धागा काढलाय
<<<कसला भिकारडा धागा काढलाय ....अंधश्रधेला प्रोत्स्हान देणारा>> वाचु नये!
प्रगो आपणच आपले हसू करून घेऊ
प्रगो आपणच आपले हसू करून घेऊ नये ही नम्र विनंती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी माझ्या विपूत सगळ्या
बाकी माझ्या विपूत सगळ्या लेखांच्या लिंक्स आहेत..कृपया त्यावर कृपाकटाक्ष टाकून ते वरती काढावेत ही देखील अतिनम्र विनंती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्यापैकी किती जणांचा
आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
इथे आल्यानंतर कुणीही भुते नाहीत,असे म्हणू शकत नाही !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
svalekar | 25 July, 2011 -
svalekar | 25 July, 2011 - 17:00 नवीन
<<<कसला भिकारडा धागा काढलाय ....अंधश्रधेला प्रोत्स्हान देणारा>> वाचु नये!
>>> नीट वाच रे आशीष
शिक जरा काही तरी ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हाहाहाहा, अरे आवर प्रगो... ते
हाहाहाहा, अरे आवर प्रगो...
ते तुला उद्देशून आहे...किमान काहीतरी मेंदूला ताण देत जा
तुला खरेच शिकण्याची खूप खूप गरज आहे...
वरच्या ५-६ प्रतिक्रिया प्रचंड
वरच्या ५-६ प्रतिक्रिया प्रचंड अमानवीय आहेत. इथे फक्त किस्से येउदे. बाकीच्यांनी दिवे घ्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा धागा भुत आहे की नाही ह्यावर नसून भूताच्या गोष्टी असा आहे. भुत आहे की नाही, श्रद्धा - अंधश्रद्धा यासाठी वेगळा धागा सुरू करा हवंतर..
भुतांपेक्षा त्यांच्या गोष्टी
भुतांपेक्षा त्यांच्या गोष्टी जास्त वाचनीय असतात. मायबोलीवर ज्यांना जे आवडते ते करायचे स्वातंत्र्य आहे. इतरांना त्यांच्यावर इग्नोरास्त्र वापरायचेही स्वातंत्र्य आहे. आपापल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करावा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते तुला उद्देशून
ते तुला उद्देशून आहे..
मायबोलीवर ज्यांना जे आवडते ते करायचे स्वातंत्र्य आहे. इतरांना त्यांच्यावर इग्नोरास्त्र वापरायचेही स्वातंत्र्य आहे. आपापल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करावा
>>>
हेच मी या धाग्याच्या लेखकाला समजावुन सांगतोय...तर ते मला आवडलं नाही तिथं मी राडा करणारच या हट्टाला पेटुन बसलेत .![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
.
.
अजुनही त्यांन्ना कळत नाहीये की जे इथे मला उद्देशुन सांगताहेत हे त्याला किमान इतरांन्नी सांगितल्यावर तरी समजावं म्हणुन मी असा प्रतिक्रिया देतोय .
.
.
..
.
हे तरी समजेल की नाय देव जाणे
तो पर्यंत
धटासी व्हाव्हे धट | उध्दटासी उध्द्ट ||
वरच्या ५-६ प्रतिक्रिया प्रचंड
वरच्या ५-६ प्रतिक्रिया प्रचंड अमानवीय आहेत. इथे फक्त किस्से येउदे. बाकीच्यांनी दिवे घ्या
>>> पक्क्या , आपल्यात काही वाद नाहीत ...पण दोघात बोललास म्हणुन केवळ कॅरीफीकेशन देतोय .
.
सदर लेखकाने माझा एक दीड वर्ष जुन्या एका धाग्यावर जावुन राडा घातला ( आवडलं नव्हतं तर इग्नोरास्त्र मारायचं होतं साधनाताईनी सांगितल्या प्रमाणे ).
राड्याला उत्तर म्हणुन मी इथे बोलायला सुरु झालोय .....
.
.
बाकी मला काही हौस नाही वाद घालायची पण उगाच कोणी खोड्या काढत असेल तर मात्र
|| भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी काठी हाणु ||
ह्या लॉजिक मधे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बोला .
.
.
टिंबरावांना स्वतःच्या नावाने
टिंबरावांना स्वतःच्या नावाने राडा घालायची लाज वाटत असावी बहुदा
असो,
|| भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी काठी हाणु ||
अहो, तुम्ही काठीच हाणा बुवा, तुमचे काय द्याल पुटदिशी लंगोटी काढून आणि फिराल तसेच, आम्हाला बघवलं पाहीजे ना?
बाकी सदर लेखकाने अन्यही काही लिखाण केले आहे, त्यावरही आपल्या हास्यास्पद प्रतिक्रीया (चुकलो, राडा घालावा). द्याव्यात.
आणि हा धागा उतरणीला लागला होता, तो पुन्हा वर आणल्याबद्द्ल धन्यवाद. आपल्या अशाच प्रतिक्रीया (राडा) चालूच ठेवाव्यात ही देखील नम्र विनंती.
माझाही भुताखेतांवर विश्वास
माझाही भुताखेतांवर विश्वास नाही पण अतींद्रीय जाणीवांचा [ Extra-Sensory Perceptions ] मात्र अनेक वेळां अनुभव आला/ऐकला आहे; अर्थात, या जाणीवाही योगायोगाच्या सीमारेषेवर तळ्यात- मळ्यात खेळत असतातच. एकच अनुभव सांगतो-
एका रविवारी दादरला माझ्या भावाकडे जात असताना तोच आपल्या छोट्या मुलीला घेऊन सायकल चालवणं शिकवायला जाताना वाटेतच भेटला. माझ्या चिमुरड्या पुतणीनं गेल्या रविवारीं सायकल शिकताना आपल्या पायाला कसं खरचटलं होतं तेंही कौतुकानं मला दाखवलं. भाऊ व पुतणी वाटेतच भेटली म्हणून त्याच्या घरीं न जातां मी सरळ बोरिवलीला माझ्या मित्राकडे गेलो. शेजारीच आमचा दूसरा मित्र रहायचा त्यालाही माझा मित्र बोलावून आला. तो दूसरा मित्र येताना दारातूनच मला म्हणतो " भाऊ, तां चिमुरडां पोर तुकां पायाक लागलेलां दाखवताहा ,तर त्येका जरा उचलून तरी घेवचां !''. मी म्हटलं " अरे, तूं होतास तिकडे तर हांक मारायची ना मला; एकत्रच आलो असतो इथं ". माझा पहिला मित्र कांहिशा आश्चर्यानेच ओरडला " भाऊ, हा साला तर दुपारभर गाढ झोपला होता. मी आत्ता उठवून आणलाय त्याला". " खरंय. ह्याने उठवलं तेंव्हा पडत असलेलं स्वप्न आठवलं, तेंच मस्करीत सांगत होतो तुला " दुसर्या मित्रानं दुजोरा दिला !
योगायोग ? असेलही, नसेलही !!
भाउ, जबरी किस्सा आहे हा...
भाउ, जबरी किस्सा आहे हा...
आयला, कसला किस्सा आहे हा
आयला, कसला किस्सा आहे हा जबरी....
टिंबरावांना स्वतःच्या नावाने
टिंबरावांना स्वतःच्या नावाने राडा घालायची लाज वाटत असावी बहुदा
>>> हो मला राडा घालावा लागतोय तेही एका पत्रकारामुळे
याची लाज वाटत आहे .
आणि हा धागा उतरणीला लागला होता, तो पुन्हा वर आणल्याबद्द्ल धन्यवाद.
>>> तर
आपण काय शिकलात ?
१)जुन्या धाग्यांवर प्रतिक्रिया दिल्या की उतरणीला लागलेले धागे वर येतात
२)जे आवडलं नाही तिथं जावुन राडा करणं हे बर्याच जणांना(उदा . पक्का भटक्या , साधना, मी...) आवडत नाही .
हे जर शिकला असशील तर "राडा" घालण्याचा उद्देश सफल झाला असे मी मानतो .
|| इति श्रीकृष्णार्पणमस्तु ||
सुभाषित महाराज शोभत नाही हे
सुभाषित महाराज शोभत नाही हे आपल्याला. हा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा धागा नाहीच आहे. जे अनुभव आलेत ते इथे मांडतायेत. बाकी ते अंधश्रद्धावर आधारीत जादु-टोणा बंदी विधायक यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आणणार आहेत. तेव्हा तिकडे राडा घालण्याची नित्तांत गरज आहे. ह्या सर्व सुभाषितांचा तिकडे जास्तीत जास्त फायदा होईल असे मला वाटते. नाहीतर भुताच्या वाडीला अंधारी वढ्यामागच्या चिंचोळी बेचकी मधल्या उलट्या वटवाघळाला तुमची रितसर कंम्प्लेट करण्यासाठी इथले बरेचजण टपून असतात.
झाला संपला राडा.????..सफल
झाला संपला राडा.????..सफल सुद्धा झाला...?????
श्या अगदीच पुळचट...
मला वाटत होतं राडा म्हणजे जिथे तिथे टिंबराव माझ्या मागे हात धुऊन लागतील...चर्चा होईल हे काय सुरू आहे वगैरे...
च्यायला हे तर ना फेस ना पाणी तशातला प्रकार झाला...:)
काहीतरी मनावर घ्या, राडा शब्दाला जागा जरा..
जे आवडलं नाही तिथं जावुन राडा
जे आवडलं नाही तिथं जावुन राडा करणं हे बर्याच जणांना(उदा . पक्का भटक्या , साधना, मी...) आवडत नाही .
हे अर्धसत्य आहे. तुम्ही जे आवडलं नाही तिथं जाऊन राडा केला नाहीय तर तुमच्या जुन्या पानावर आता नविन राडा करणा-याच्या जुन्या पानावर जाऊन तुम्ही नविन राडा करताहात
हे म्हणजे लहान मुलांसारखे झाले, तो मला चिमटा काढुन पळाला, आता मी त्याला धपाटा घालुन पळणार. अहो पण तुम्हा दोघांच्या धावपळीत अडकलेल्या इतर लोकांना तुम्ही चिमटे नी धपाटे का घालताय ते कळत नाही त्याचे काय?? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्यापेक्षा तुमच्या पानावर जिथे राडा केला गेला तिथेच राडा करणा-याला गाठून धोपटा की...... तुम्हालाही समाधान नी आम्हालाही कळेल का धोपटले ते.
साधना...
साधना...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
साधना अगदी मनातले बोललात...पण
साधना अगदी मनातले बोललात...पण झालेय काय लेखकाने तत्परतेने तो धागाच उडवून टाकलाय. त्यामुळे नक्की काय झाले ते कुणालाच कळू नये..वर पुन्हा विपू देखील बंद करून टाकली.
त्यामुळे मीच सांगतो हे तथाकथित राडा प्रकरण काय आहे ते...
झाले असे की माबोच्या पहिल्या पानावर मी टींबराव उर्फ प्रसाद गोडबोल यांची ऑफीस डायरी ही कादंबरी पाहिली. अर्थातच कुणीतरी प्रतिसाद दिल्यामुळे वर आली असावी हे आत्ता कळतेय. तेव्हा मी काय तारीख पाहिली नाही आणि प्रसाद गोडबोल यांना वैयक्तिकरित्या ओळखत असल्याने उत्सुकतेपोटी जाऊन वाचली. त्यात त्यांनी स्वतचेच नाव नायकाला देऊन प्रेमप्रकरणावर आधारित कादंबरी रचली होती.
त्याबद्दलही माझे काही म्हणणे नव्हते आणि त्यावर कसलीही टिका मी केली नाही. पण प्रतिसाद वाचताना दोन तिन मुद्दे खटकले. एक म्हणजे जुई या सदस्याने राम आणि कृष्ण पटत नसल्याचे सांगत काही मुद्दे मांडले होते. मी त्याच खाली त्या मुद्द्यांचे खंडन केले.
(टिंबराव प्लीज नोट, तुमच्याच नाही इतरांच्याही म्हणण्याला विरोध करतो)
त्याच प्रतिसादात टिंबरावांनी कृष्णाच्या रासलीला तुम्हाला चालतात पण प्रसादची प्रकरणे चालत नाहीत, हा किती दुटप्पीपणा आहे असा प्रचंड हास्यास्पद प्रश्न विचारला होता. भले आम्हाला कृष्णाबद्दल काही फारशी माहीती नसो पण आमच्या देवाबद्दल कुणीही काहीही बोलायला लागल्यावर का ऐकावे. म्हणून मी असे उत्तर दिले की,
कृष्णाच्या दैवी लीला सोडून द्या, पण त्याने द्वारिका वसवली, युद्धात नानाविध योजना आखून पांडवांना विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली, मुख्य म्हणजे भगवद्गगीता सांगितली. ते सर्व सोडून फक्त त्याची रासलीला लक्षात घेऊन त्याने केली तर चालते आणि मी केलेली नाही असा लहान मुलासारखा प्रश्न विचारणे किती बालिशपणाचे आहे.
झाले त्यावरून टिंबरावांचे सटकले. त्याने एकदम थयथयाट करत हरामखोरा तुला माझ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे, माझ्या एक वर्ष पूर्वीच्या धाग्यावर जाऊन माझ्यावर टीका करतोस, मागे आरक्षणाच्या धाग्यावरपण मला बोललास, पत्रकारांना मनोविकार असतो अशी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली.
इच्छुकांनी माझ्या विपूत जाऊन त्यांचे सुविचार वाचावेत.
माझे म्हणणे अगदी साधे सोपे होते की जेव्हा तुम्ही पब्लिक फोरमवर काहीही टाकता तेव्हा त्यावर चांगल्या वाईट प्रतिसाद येणारच. ज्यांना आवडले नाही त्यांनी प्रतिसाद द्यायचा नाही ही काय जबरदस्ती..मला वाटले हे फालतू आहे तर मी तसे लिहीणार, चांगले वाटले त्याचे कौतुक करणार..यापैकी काहीच करण्याच्या लायकीचे नसेल तर दुर्लक्ष करणार...हा माझा हक्क आहे, त्यावर एवढा गदारोळ कशाकरता.
परंतु, टिंबराव काय समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी मला फोन करून तुझ्या आता प्रत्येक लिखाणावर जाऊन राडा करतो का नाही ते बघ असा दम भरला.
माझे उत्तर, तुला जर माझे लिखाण इतके टाकाऊ वाटत असेल तर कर बिनधास्त...चांगल्या, वाईट, कसल्याही प्रतिसादाला मी घाबरत नाही. त्यामुळे मी अजूनही टिंबरावांना माझ्या धाग्यावर राडा करण्याचे आवाहन करत आहे.
असो, माझे स्पष्टीकरण संपले..यावरही टिंबराव त्यांचेच कसे बरोबर याची टिमकी वाजवतीलच..पण मी त्यासाठीही तयार आहे.
धन्यवाद इतक्या संयमाने वाचल्याबद्दल
मानवीय प्रकार संपले असतील तर
मानवीय प्रकार संपले असतील तर अमानवीय किस्से टाका मंडळी.
चला आता किस्से टाका.........
चला आता किस्से टाका.........
मला सुद्धा एकदा कराडला
मला सुद्धा एकदा कराडला असताना अनुभव आला आहे ................
मी त्यावेळी प्रायवेट होस्टेलवर राहायचो . मी आणि माझे दोन रूम मेट्स एका रात्री आठच्या सुमारास काहीतरी गप्पा मारत रूम मध्ये बसलो होतो . खिडकी थोडीशी उघडी होती . अचानक एक कुत्राचे छोटे पिल्लू आणि त्या पिल्लाला धरलेला हात खिडकीतून बाहेर आला . माझी जाम टरकली .ते कुत्रे कुई कुई करत होते .खिडकी तून पुन्हा मागे हात गेला आणि नाहीसा झाला . आम्ही तिघेजण घाबरलो . आम्हाला वाटले कोनितरी होस्टेल मधले मजा करत असेल म्हणून आम्ही मेन गेट मधून बाहेर आलो आणि आमच्या खिडकी पाशी आम्हाला घाबरावायाचा प्रयत्न करणाऱ्याला शोधू लागलो पण तिथे तर कोणीच नव्हते . इकडे तीकडे बघितले तर ते पिल्लू सुद्धा कुठे दिसेना .पंधरा वीस मिनिटे इकडे तीकडे शोधले पण काहीच नाही . होस्टेल मध्ये आठ रुम्स होत्या सगळ्यांना विचारले ,कोणीही तसा प्रकार केला नवता . दुसऱ्या दिवशी आणखी काही मित्रांना विचारले तर तेही म्हणाले आम्ही काही केलेच नाही . दोन तीन दिवस झाले , आता कोणीतरी मजा केली असेल तर आतापर्यंत सांगितले असते . पण तसे काहीच झाले नाही .बर ते कुत्रे कोणाचे होते म्हणून मी आजूबाजूच्या एरीयात जाऊन भागीतले कुठेही कुत्राचे पांढरे पिल्लू सापडले नाही . तो हात आणि ते कुत्राचे पिल्लू शेवटपर्यंत रहस्याच बनले होते .
एका वेळी एकच स्वप्न दोन
एका वेळी एकच स्वप्न दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पडण्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय..
त्यावेळी आम्ही साधारण ७ ८ वी ला असु. मी, माझे भाऊ, आमचे शेजारी असे आम्ही ५-६ जण मिळुन खेळत असु. कधी चोर पोलिस कधी डोंगर का पाणी वैगैरे.. तर एका रात्री मला आणि माझ्या शेजारच्या मुलीला एकच स्वप्न पडलं आणि तेही अगदी तंतोतत जुळणारं.. आम्ही अजुनही तो किस्सा आठवला की थक्क होतो...
मला स्वतःला कधीच भुत दिसलं नाहिए पण भास मात्र नेहमी होतात म्हणजे कुणी पाठलाग करणं, कुणीतरी आहे असं वाटणं, वैगरे.. पण त्या त्या वेळी मी गणपती चा धावा केल्यामुळे कधी त्रास नाही झाला.. (बाप्पांचे अनुभव मधे सविस्तर लिहिले आहे)
आता हल्लीच नवर्याच्या बाबतीत झालेले दोन किस्से..
१) रात्री २ च्या सुमारास मला असे वाटले की कुणीतरी काळी सावली माझ्या नवर्याला चाकुने मारण्याचा प्रयत्न करतंय.. मी खाडकन डोळे उघडुन बघते तर ती सावली खरचं माझ्या नवर्याच्या बाजुला होती पण जशी मी जागी झाली तशी ती सावली जमिनीत गायब झाली.. हे सर्व काही सेकंदात झाल्यामुळे त्याना उठ्वायची बुद्धी झाली नाही..
२) पुन्हा काही दिवसांच्या अंतराने मला ती सावली पुन्हा दिसली पण यावेळेला माझा नवरा चक्क खुर्चीत बसुन कोणाबरोबर तरी फोनवर बोलत असल्याचे दिसले आणि मी विचारणार एवढ्यात ती सावली त्यांच्यावर झेप घेतेय असं दिसलं.. तेव्हा मात्र मी जोरात किंचाळली.. ह्यांनी मला उठवुन शांत केलं..
हे मला फक्त दोनदाच दिसलय त्यामुळे काही संर्दभ लागत नाहीए.. पण प्रचंड घाबरलेले..
२६१०२०११ स्पर्श०५.१६ मोक्ष
२६१०२०११
स्पर्श०५.१६ मोक्ष ०१.२६
चातका.. तुझ्या या प्रतिसादाचा
चातका.. तुझ्या या प्रतिसादाचा मानवीय अर्थ मज अजाणाला(फेमिनाईन जेंडर माहित नाही याचं
) समजावून सांग बरं..
वर्षे... चातक बहुधा
वर्षे...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चातक बहुधा दुबैतल्या ग्रहणाबाबत सांगत असावा!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
Pages