Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शकून धन्यवाद..
शकून धन्यवाद..
मनिमाऊ थँक्स.
मनिमाऊ थँक्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे मला कोणि सांगा ना कि
अरे मला कोणि सांगा ना कि चायीनीज् भेळ कशि बनवतात? मि याआधि विचारला होत, कोणी उत्तर नाहि दिल..
आरतीच्या मागणीवरुन मी चायनीज
आरतीच्या मागणीवरुन मी चायनीज भेळ लिहिली होती इथे. शोधावी लागेल.
हेल्लो दिनेशदा, नावानि शोधुन
हेल्लो दिनेशदा,
नावानि शोधुन बघु का?
मी तुमचे दुबई चे फोटो बघितले.. खुप सुन्दर आहेत...
उसळ उरली तर मी चक्क शेवपुरी
उसळ उरली तर मी चक्क शेवपुरी मध्ये ढकलते. बटाट्या ऐवजी पुरीवर सरळ उसळ घालायची आणि मग कांदा, टोमॅटो, चाट मसाला, तिखट-गोड चटण्या, शेव, कोथिंबीर घालायची. चवीत फारसा फरक पडत नाही. फक्त उसळ थोडी घट्ट असणे आवश्यक आहे.
राजगिर्याच्या लाह्यांचे काय
राजगिर्याच्या लाह्यांचे काय करता येइल?
दूध + साखर किंवा गूळ घालून
दूध + साखर किंवा गूळ घालून खा. नाही तर चिक्की कर.
लाह्यांचं बारीक पीठ करता येईल
लाह्यांचं बारीक पीठ करता येईल का घरीच ग्राईंडरवर? ते पीठ दुधातून मस्त लागतं. बेस्ट नाश्ता! नाहीतर नुसत्या लाह्या दुधातून सिंडी सांगतेय तशा.
सॉल्टेड बटरच्या सुचनांबद्दल
सॉल्टेड बटरच्या सुचनांबद्दल धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/112201.html?1159292007
इथे आहे चायनीज भेळ !
राजगिर्याच्या लाह्या ताक +
राजगिर्याच्या लाह्या ताक + मीठ + मिरची + किंचित साखर (ऑप्शनल) + कोथिंबीर ह्यांत कालवून खायलाही मस्त लागतात.
खारट झालेल्या भाजीला कसे
खारट झालेल्या भाजीला कसे सुधरवावे?
कसली भाजी आहे???
कसली भाजी आहे???
खारट झालेल्या भाजीचा खारटपणा
खारट झालेल्या भाजीचा खारटपणा शोषून घेण्यासाठी त्यात अनेकदा कच्चा बटाटा चिरून घातला जातो. तो बटाटा कच्चाच राहिला तरी चालतो, नंतर बाहेर काढता येतो/ अन्य पदार्थात वापरता येतो.
पावाचा स्लाईस पण घालतात ...
पावाचा स्लाईस पण घालतात ...
उसळ असेल तर त्यात भरपूर पाणी
उसळ असेल तर त्यात भरपूर पाणी ओतावे. ढवळून मग ती उसळ मोठ्या गाळण्याने गाळून घ्यावी. मग परत खोबरे वगैरे घालून गरम करावी.
साधारण रस्सा भाजी असेल तर अकु ने सांगितल्याप्रमाणे, कच्चे बटाटे सोलून त्यात टाकून ती उकळावी. (आणखी पाणी घालावे लागेल) मग बटाटे काढून घ्यावेत. बटाटे वाया जाणार नाहीत. ते प्रेशरकूकरमधे शिजवून वेगळ्या भाजीसाठी वापरता येतील.
लाजो, तांबड्या भोपळ्याची भाजी
लाजो, तांबड्या भोपळ्याची भाजी आहे. पावाचा स्लाईस एकदम मऊ मऊ होऊन जाईल ना? आज ब्रेड नाहीये पण आणि घरात.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लाजो, अकु, दिनेशदा धन्यवाद झटपट उत्तराबद्दल. बटाटा घालून बघते.
अंजली, बेसन / भाजणी पण पेरता
अंजली, बेसन / भाजणी पण पेरता येईल, भोपळ्याच्या भाजीत. (सुकी असेल तर.)
त्यात दही, साखर घालुन भरीत
त्यात दही, साखर घालुन भरीत करता येइल...
दिनेशदा, नाही भाजी मी थोडी रस
दिनेशदा, नाही भाजी मी थोडी रस ठेवून केलीये पण ही टीप लक्षात ठेवीन.
बटाट्यामुळे बराचसा खारटपणा कमी झाला... खूप खूप धन्यवाद सगळयांना
लाजो, धन्स. आता नेक्स्ट टाईम भरीत
हेल्लो, दिनेश दा, धन्स साईट
हेल्लो, दिनेश दा,
धन्स साईट साठी..मि आता करुन बघेन शनिवारी
रसभाजी खारट झाली तर कणकेचे
रसभाजी खारट झाली तर कणकेचे छोटे छोटे गोळे करून भाजीत घालून उकळावे. मग ते गोळे काढून टाकावेत.
पण मग नंतर त्या कणकेच काय
पण मग नंतर त्या कणकेच काय करायचं ????????
भाजी खारट झाली तर कांदा
भाजी खारट झाली तर कांदा तेलावर परतून तो मिक्सर मधुन काढून भाजित मिक्स करून टाकायचा, त्याने ही खारटपणा कमी होतो म्हणे.
माझा उपमा चवीला होतो चांगला
माझा उपमा चवीला होतो चांगला पण कधि थोडासा ढेकळं टाइप होतो तर कधि मऊ. मध्यंतरी एका काकूंकडे उपमा खाल्ला तो मस्त होता आणि रवापण छान मऊ शिजला होता, काय गुपित आहे कोणि सांगाल का? ( मऊ म्हणजे पातळ नाही)
रवा चान्गला तुपावर भाजायचा
रवा चान्गला तुपावर भाजायचा पाणी दुप्पट गरम करून टाकायचं.
हो मी तसंच
हो मी तसंच करते...................
सांजा करताना नेमक त्यात काय
सांजा करताना नेमक त्यात काय काय घालयच? मी चवी साठी फक्त मिर्ची मीठ,थोडी जिर्याची पूड, लिंबु घालते. नेहमी तीच तीच चव वाटते. आणी काही लोकांचा खूपच टेस्टी होतो. नक्की काय काय त्यात असत देव जाणे>
निराली, फोडणीला जिरं, मोहरी,
निराली, फोडणीला जिरं, मोहरी, उडीद दाळ, चण्याची दाळ, खोबर्याचे तुकडे, आलं, कडिपत्ता, लाल मिरची, दाणे टाकावे, सुंदर चव येते. कांदा व्यवस्थित परतल्यावर त्यात भाजलेला रवा टाकावा, मग गरम पाणी. साक्षी१, ह्याने ढेकळं टाइप होत नाही. एक वाफ आल्यावर तुप सोडुन परत एक वाफ आणावी. तयार झाल्यावर, खोबरं, कोथिंबीर पेरुन गरम गरम खावा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages