युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओगले आज्जी म्हणतात, आप्प्यांच्या पिठात अंडे घालायचे. म्हणजे आप्पे फुगतात आणि आप्पेपात्राला चिकटत नाही. अनुभव नाही (त्यांना आणि मलाही )

डोश्याच्या पिठाचे केलेत म्हणून ते चपटे झालेत कारण पीठ पातळ आहे/असते. इडलीचे पीठ्/अप्प्याचे पीठ दोन्हीची कंसिस्टंसी सारखीच असते.

पीठ नीट आंबले असेल आणि साधारण इडलीच्या पिठासारखे असेल तर सोडा, अंडे या कशाचीही गरज नाही.

दोन्ही बाजुंनी सारखेच गोलाकार आप्पे माझे तरी होत नाहीत. पीठ अगदी व्यवस्थित आंबले असेल आणि छान फुलून आले आप्पे तरी.

भरत मयेकर आणि अश्विनीमामी...धन्यवाद.
सोडा घातला नव्हता, आता घालुन बघेन.
>>>>> सोनेरी-> किरमिजी-> ब्राउन मग टर्न.
परफेक्ट !!

तवा, उलथण्याला लागलेला अंड्याचा वास कसा घालवता येईल? ही अंड्याचे पदार्थ केलेली भांडी नेहेमीच्या साबणाने घासली तरी त्याचा वास पूर्णपणे जात नाहीये.

अंजली अंड्याचे पदार्थ केलेली भांडी थोडावेळ गरम पाणी आणी मीठ घालून भिजवून ठेवायची. आणी मग साबणाने स्वच्छ धूउन घ्यावी.

मी फक्त अंड्याच्या पदार्थांसाठी म्हणून वेगळा तवा वापरते.
तसंच चिकन वगैरे साठी सुद्धा वेगळं भांडं .
गोड पदार्थांसाठी वेगळं. हे असं वेगवेगळं अर्थातच नॉनस्टिक भांड्यांसाठी. त्याला कोटींग असल्यामुळे शिजवलेल्या पदार्थांचा वास राहतोच. ही भांडी जास्त वेळा आणि जोरात घासू नयेत.
स्टेनलेस स्टील च्या बाबतीत हा प्रश्नच नाही.

हो मी पण वेगळाच तवा ठेवलाय ऑम्लेटसाठी वगैरे पण तरीही वास राहतोच तुम्ही म्हणताय तसं कोटींग मुळे. त्यामुळे असं वाटतं स्वच्छ झालं की नाही Happy

पपई किसुन गोड वडया,तिखट वड्या-मुठीये.किसुन लिम्बु,दाणेकुट घालुन वर तुप-जिर्याची फोडणी देवुन अप्रतिम कोशिंबीर्,थालीपीठ करता येईल

मुठिये मधे धणे जिरे पूड, हळद, आले मिरचीचे वाटण, मीठ, हिंग घालून थोडीशी कणीक घालून बेसन किंवा भाजणी घालता येईल. थोडेसे तेल व पाणी घालून हे मळायचे.
आणि मुठीये वळून वाफवायचे. मग फोडणीत परतायचे.
कच्ची पपई कधी कधी कडवट लागते. त्यामूळे साल आणि आतला पांढरा पापुद्रा काढूनच किसायची.

ह्म्म्म..
धन्यु दिनेशदा..
याच्या पाक्रु शोधाव्या लागतील मला.. Proud

काल चिकन दम बिर्यानी साठी १ किलो बासमती अर्धवट शिजवला ( यावेळी पौष्टीक हवा म्हणून कमी पाण्यात शिजवला. पण त्यामुळे बिर्याणी थोडी गिजगा झाली Sad )
तर तांदुळ जास्त होइल असे वाटल्याने त्यातला साधारण २५० ग्रॅमचा भात फ्रिजमधे कोंबला. आता आज संध्याकाळी त्याची विल्हेवाट लावावी लागेल. तर हा भात मावे मधे शिजवता येइल का? असल्यास त्यात पाणी किती टाकावे आणि किती वेळ ठेवावा मावे Uhoh

मावेपेक्षा बाहेरच चांगला होईल तो भात. तुपात जिरं, थोड्या खड्या मसाल्याची फोडणी कर आणि त्यात तो भात परतून घे. मीठ घालून मग लागेल तसं तसं पाणी शिंपडत वाफेवरच पण मोकळा, मऊ शिजलेला भात होईल.

वर्षा, मोठ्या खोल तव्यावर तुपात खडा मसाला तळुन काढुन ठेव, त्याच तुपात बारीक चिरलेला कांदा लाल होईतो परतुन घे. मग हवं तर त्याट टॉम पेस्ट/प्युरी/बारीक फोडी घालुन परत. हव तर आलं-लसुण पेस्ट घाल. त्यात चिरलेल्या मिक्स भाज्या घाल आनि थोड्या शिजेपर्यंत परत.

तळलेला खडामसाला भातात मिक्स कर. हा भात शिजलेल्या भाज्यांवर घाल - लेयर कर. भाताच्या लेयरला मधे ५-६ भोक पाडुन तव्यावर झाकण घालं आणि मंद आचेवर थोडावेळ वाफ येऊ देत.

वरतुन तळलेला कांदा घालुन तवा व्हेज बिर्याणी म्हनुन दे खायला Happy

गोडा/काळा मसाला कोणकोणत्या भाज्यात/ उसळीत वापरता येतो? मी सध्या मटकी/मुगाची मोड आलेल्या उसळीत आणि तुरडाळीच्या चिंच-गुळ-तिखट घालुन केलेल्या आमटीत घालतेय.

फ्लावर बटाटा, वांगी, भरली वांगी, वालाच्या शेंगा + वांगी, दुधी+ मुगाची डाळ भिजवलेली अशा भाज्यांना पण गोडा मसाला वापरता येईल. अळूचं फदफदं, पालकाची ताक+ बेसन घालून पातळ भाजी, डाळ वांगं यात पण चालेल मसाला.

घट्ट वरणात (म्हणजे शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात) चिरलेला कांदा+ तिखट + मीठ + गोडा मसाला+ कोथिंबीर घालून मस्त तोंडीलावणे तयार होते. पोळी/ भाकरीबरोबर झक्कास व झटपट!!

उरलेल्या भातात कांदा, कोथिंबीर , हि.मि, बारीक चिरून घालायची. मीठ नसेल आधी घातलं तर ते, चाट मसाला , १ चमचा धण्या-जीर्‍याची पूड, अणि २ चमचे तांदळाचं पीठ घालून त्याचे वडे तळायचे. ते नको असेल तर मस्तपैकी थालिपीठं लावायची.

Pages