Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओगले आज्जी म्हणतात,
ओगले आज्जी म्हणतात, आप्प्यांच्या पिठात अंडे घालायचे. म्हणजे आप्पे फुगतात आणि आप्पेपात्राला चिकटत नाही. अनुभव नाही (त्यांना आणि मलाही )
डोश्याच्या पिठाचे केलेत
डोश्याच्या पिठाचे केलेत म्हणून ते चपटे झालेत कारण पीठ पातळ आहे/असते. इडलीचे पीठ्/अप्प्याचे पीठ दोन्हीची कंसिस्टंसी सारखीच असते.
पीठ नीट आंबले असेल आणि साधारण इडलीच्या पिठासारखे असेल तर सोडा, अंडे या कशाचीही गरज नाही.
दोन्ही बाजुंनी सारखेच गोलाकार
दोन्ही बाजुंनी सारखेच गोलाकार आप्पे माझे तरी होत नाहीत. पीठ अगदी व्यवस्थित आंबले असेल आणि छान फुलून आले आप्पे तरी.
भरत मयेकर आणि
भरत मयेकर आणि अश्विनीमामी...धन्यवाद.
सोडा घातला नव्हता, आता घालुन बघेन.
>>>>> सोनेरी-> किरमिजी-> ब्राउन मग टर्न.
परफेक्ट !!
तवा, उलथण्याला लागलेला
तवा, उलथण्याला लागलेला अंड्याचा वास कसा घालवता येईल? ही अंड्याचे पदार्थ केलेली भांडी नेहेमीच्या साबणाने घासली तरी त्याचा वास पूर्णपणे जात नाहीये.
अंजली अंड्याचे पदार्थ केलेली
अंजली अंड्याचे पदार्थ केलेली भांडी थोडावेळ गरम पाणी आणी मीठ घालून भिजवून ठेवायची. आणी मग साबणाने स्वच्छ धूउन घ्यावी.
हो का करून बघते मग थँक्स
हो का करून बघते मग थँक्स प्रॅडी
मी फक्त अंड्याच्या
मी फक्त अंड्याच्या पदार्थांसाठी म्हणून वेगळा तवा वापरते.
तसंच चिकन वगैरे साठी सुद्धा वेगळं भांडं .
गोड पदार्थांसाठी वेगळं. हे असं वेगवेगळं अर्थातच नॉनस्टिक भांड्यांसाठी. त्याला कोटींग असल्यामुळे शिजवलेल्या पदार्थांचा वास राहतोच. ही भांडी जास्त वेळा आणि जोरात घासू नयेत.
स्टेनलेस स्टील च्या बाबतीत हा प्रश्नच नाही.
हो मी पण वेगळाच तवा ठेवलाय
हो मी पण वेगळाच तवा ठेवलाय ऑम्लेटसाठी वगैरे पण तरीही वास राहतोच तुम्ही म्हणताय तसं कोटींग मुळे. त्यामुळे असं वाटतं स्वच्छ झालं की नाही
आज सकाळी पपई कापली ती अर्धि
आज सकाळी पपई कापली ती अर्धि कच्ची अर्धि पिकलेली आहे काय करता येईल?
पपई किसुन गोड वडया,तिखट
पपई किसुन गोड वडया,तिखट वड्या-मुठीये.किसुन लिम्बु,दाणेकुट घालुन वर तुप-जिर्याची फोडणी देवुन अप्रतिम कोशिंबीर्,थालीपीठ करता येईल
सुलेखा धन्स, मुठीये मध्ये काय
सुलेखा धन्स, मुठीये मध्ये काय घालु?
मुठिये मधे धणे जिरे पूड, हळद,
मुठिये मधे धणे जिरे पूड, हळद, आले मिरचीचे वाटण, मीठ, हिंग घालून थोडीशी कणीक घालून बेसन किंवा भाजणी घालता येईल. थोडेसे तेल व पाणी घालून हे मळायचे.
आणि मुठीये वळून वाफवायचे. मग फोडणीत परतायचे.
कच्ची पपई कधी कधी कडवट लागते. त्यामूळे साल आणि आतला पांढरा पापुद्रा काढूनच किसायची.
दिनेशदा धन्स
दिनेशदा धन्स
खुप tomatoes घरात उरले आहेत..
खुप tomatoes घरात उरले आहेत.. त्याच काय करता येईल?
केचप, टिकाऊ चटणी, प्यूरी,
केचप, टिकाऊ चटणी, प्यूरी, मोरंबा... !
ह्म्म्म.. धन्यु
ह्म्म्म..
धन्यु दिनेशदा..
याच्या पाक्रु शोधाव्या लागतील मला..
अवनी टोमॅटो सार, सूप कायतरी
अवनी टोमॅटो सार, सूप कायतरी कर.. मस्त होईल पावसाळ्यात.. गरम गरम
टमाटोच्या रसात कणीक भिजवून
टमाटोच्या रसात कणीक भिजवून पराठे, रसम, वड्या.
काल चिकन दम बिर्यानी साठी १
काल चिकन दम बिर्यानी साठी १ किलो बासमती अर्धवट शिजवला ( यावेळी पौष्टीक हवा म्हणून कमी पाण्यात शिजवला. पण त्यामुळे बिर्याणी थोडी गिजगा झाली )
तर तांदुळ जास्त होइल असे वाटल्याने त्यातला साधारण २५० ग्रॅमचा भात फ्रिजमधे कोंबला. आता आज संध्याकाळी त्याची विल्हेवाट लावावी लागेल. तर हा भात मावे मधे शिजवता येइल का? असल्यास त्यात पाणी किती टाकावे आणि किती वेळ ठेवावा मावे
वर्षे बिर्यानीला सुद्धा दम
वर्षे बिर्यानीला सुद्धा दम देऊन शिजवतेस?
मावेपेक्षा बाहेरच चांगला होईल
मावेपेक्षा बाहेरच चांगला होईल तो भात. तुपात जिरं, थोड्या खड्या मसाल्याची फोडणी कर आणि त्यात तो भात परतून घे. मीठ घालून मग लागेल तसं तसं पाणी शिंपडत वाफेवरच पण मोकळा, मऊ शिजलेला भात होईल.
वर्षा, मोठ्या खोल तव्यावर
वर्षा, मोठ्या खोल तव्यावर तुपात खडा मसाला तळुन काढुन ठेव, त्याच तुपात बारीक चिरलेला कांदा लाल होईतो परतुन घे. मग हवं तर त्याट टॉम पेस्ट/प्युरी/बारीक फोडी घालुन परत. हव तर आलं-लसुण पेस्ट घाल. त्यात चिरलेल्या मिक्स भाज्या घाल आनि थोड्या शिजेपर्यंत परत.
तळलेला खडामसाला भातात मिक्स कर. हा भात शिजलेल्या भाज्यांवर घाल - लेयर कर. भाताच्या लेयरला मधे ५-६ भोक पाडुन तव्यावर झाकण घालं आणि मंद आचेवर थोडावेळ वाफ येऊ देत.
वरतुन तळलेला कांदा घालुन तवा व्हेज बिर्याणी म्हनुन दे खायला
गोडा/काळा मसाला कोणकोणत्या
गोडा/काळा मसाला कोणकोणत्या भाज्यात/ उसळीत वापरता येतो? मी सध्या मटकी/मुगाची मोड आलेल्या उसळीत आणि तुरडाळीच्या चिंच-गुळ-तिखट घालुन केलेल्या आमटीत घालतेय.
गोडा मसाला मी सगळिकदे
गोडा मसाला मी सगळिकदे वापरते... बहुतेक सगळ्या भाज्या आणि तुरिच्या आमटीत पण...
फ्लावर बटाटा, वांगी, भरली
फ्लावर बटाटा, वांगी, भरली वांगी, वालाच्या शेंगा + वांगी, दुधी+ मुगाची डाळ भिजवलेली अशा भाज्यांना पण गोडा मसाला वापरता येईल. अळूचं फदफदं, पालकाची ताक+ बेसन घालून पातळ भाजी, डाळ वांगं यात पण चालेल मसाला.
गवारीची भाजी, भोपळी मिरचीची
गवारीची भाजी, भोपळी मिरचीची भाजी, आंबट वरण, पंचामृत, पोहे आदी प्रकारात गोडा मसाला वापरता येतो.
घट्ट वरणात (म्हणजे शिजलेल्या
घट्ट वरणात (म्हणजे शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात) चिरलेला कांदा+ तिखट + मीठ + गोडा मसाला+ कोथिंबीर घालून मस्त तोंडीलावणे तयार होते. पोळी/ भाकरीबरोबर झक्कास व झटपट!!
आमच्या कडे याला गोळा-वरण
आमच्या कडे याला गोळा-वरण म्हणतात..
जाम भारी लागत..
उरलेल्या भातात कांदा,
उरलेल्या भातात कांदा, कोथिंबीर , हि.मि, बारीक चिरून घालायची. मीठ नसेल आधी घातलं तर ते, चाट मसाला , १ चमचा धण्या-जीर्याची पूड, अणि २ चमचे तांदळाचं पीठ घालून त्याचे वडे तळायचे. ते नको असेल तर मस्तपैकी थालिपीठं लावायची.
Pages