पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुधीचे कोफ्ते करुन ठेवलेले आहेत काल. आज झटपट होणारी एखादी ग्रेव्ही सुचवू शकाल का त्यासाठी? काजूपेस्ट, खोबर्‍याचं वाटण टाळून. नुसता कांदा, टोमॅटोची पेस्ट वापरुन केलेली ग्रेव्ही उग्र वाटते जरा.

शर्मिला, इथे वर 'आहारशास्त्र आणि पाककृती' वर क्लिक केलेस की यादी उघडेल. त्या पानावर उजवीकडे वर 'विषयवार यादी' बटणावर क्लिक करून 'पाककृती प्रकार' निवड. तिथे यादीत 'करी' तसेच 'अंड्याचे प्रकार' इ. वर क्लिक केलेस की ग्रेव्हिच्या विविध कृती सापडतील.

मी इतके दिवस काय वेडेपणा माहीत नाही पण तो विषयवार यादी प्रकार क्लिकच केला नव्हता. पाककृतीविषयाची एकामागून एक पानं उलटत शोधायचा इतका कंटाळा यायचा. सर्च बटण दाबून जी मिळेल ती पाककृती असं करायला लागायचं. तुला किती धन्यवाद देऊ मंजू इतका छान, नीट मांडणी केलेला पाककृती शोधायचा मार्ग दाखवलास.

ये ये. मी कोफ्ते तळून करत नाही. उकडून करते. तेव्हढं चालणार असेल तर लगेच ये पाहू.

कोणालाच माहिती नाहीये का ?
>>
कोंबडी वडे मधला कोंबडीचा रस्सा कसा करतात त्याची मला एकदम स्टेप बाय स्टेप कृती हवीय. कांदा, खोबरं किती लागेल, ते कसं भाजायचं, चिकनच्या तुकड्यांना काही मॅरिनेशन करायचं असतं का, इत्यादी अगदी तपशीलवार कोणी सांगेल का >>

कॅम्पींग्/बार्बेक्यु पार्टीसाठी डेझर्ट सुचवा..साधारण ३०/३२ जण जमतील..आईस्क्रीम नी ग्रील्ड फ्रुट्स आहेतच. मला अजुन एखादा गोडाचा प्रकार हवाय. स्मोर्सना काही देशी ट्विस्ट देता येईल का??

कोंबडीचा रस्सा आम्ही कसा करतो ते सान्गते.. ४ जणा ना.. सान्गते.

वाटणासाथि : ३ कादे चिरुन ,अर्धी वाटी ओल खोबर, अर्धी वाटी सुख खोबर किसुन,५-६ लसुन पाकळ्या, थोड आल्याचा तुकडा, १-२ मिरचि, ७-८ काळिमिरि चे दाणे

थोड्या तेलावर कादे गुलाबी होई पर्यत परतावे(तेल परतण्या साथि) मग ओल खोबर, सुख खोबर घालुन भाजुन घ्यावे त्यात लसुन आल्, मिरचि ,काळिमिरि घालुन वाटुन घ्यावे

कोथिबीर ४-६ पाकळ्या लसुन आल्, १ मिरचि ह्याची पण पेस्ट करावी,

चिकनच्या तुकड्यांना धुवुन मीठ, लिम्बाचा रस , थोडि हळद, थोडा तिखट मसाला, व वरची कोथिबीरी ची पेस्ट लावुन थेव.. अर्धातास..

मग.. तेलावर .. (थोडा ) बारिक चिरुन कादा,परतावे मग (१ मोठ )टोमेटो चि पेस्ट घालुन परतावे मग त्यात.. हळद तिखट मसाला (अदाजाने वरती पण चिकन ला लावलय) घालुन तेल सुटे पर्यत परतावे मग वाटले ला मसाला घालुन परत तेल सुटे पर्यत परतावे

मग चिकन चे तुकडे घालावे... मीठ(अदाजाने वरती पण चिकन ला लावलय),पाणी घालुन.. शीजु द्यावे.. मग चिकन मसाला.. घालावे.. आणी कोथिबीरी वरुन .. गरम गरम कोंबडी वडे बरोबर वाधावे

नोट : वाट्ण आणी पाणी किती रस्सा हव तस घालवे...

आमचा मालवणी मसाला असतो .. त्या मुळे त्याला वेगळि टेस्ट येते..चिकन मसाला मी घालत नाही..

धन्यवाद दीपा.
कांदा परतला की त्यातच सुकं + ओलं खोबरं एकत्रच घालायचं ना ? ते अगदी ब्राउन होईपर्यंत परतायचं का ?

हो नलिनी, लोणचे आपला लोणच्याचा मसाला वापरुनच करायचे.
पण मी कधी जास्त टिकवून बघितले नाही. जास्त टिकाऊ करायचे
असेल तर, व्हीनिगर वगैरे वापरुन, थोडे शिजवून करता येईल.
साखर, आवडता सुका मेवा, गरम मसाला वगैरे घालून.

नलिनी सफरचंद जर आंबट असेल तर कांदा कैरी च्या रेसिपीने लोणचं करायचं. फक्त कैरी ऐवजी सफरचंद घालायचं. नुकतंच असं लोणचं मैत्रिणीकडे खाल्लं. अप्रतीम लागतं.

एक सुपरमॉमची रेसिपी पण होती ना? लिंक शोधली पण मिळत नाहीये मला. त्या रेसिपीत गूळ नव्हता. तिखट मीठ आणी गार केलेली फोडणी. पण ह्या पराग कडच्या रेसिपीने पण बघितलं पाहिजे करून.

मेधा,
आई कांदे ब्राउन झाल्यावर ओले खोबरे त्यातच भाजते. एखादा आल्याचा तुकडा सुद्धा टाकते.
मी कांदा आणि ओल खोबर वेगवेगळ भाजते. त्यामुळे ते निट भाजल जात असं मला वाटत.
माझ्याकडे प्रमाण नाही म्हणून मी कृती लिहीली नाही.
मिसळपाव साइट वर (बहूतेक) 'ललीता' या आयडी ने चिकन शाकूती ही रेसेपी दिली आहे. (साईट ब्लॉक असल्यामुळे मला लिंक देता येत नाहीये) ती एकदम परफेक्ट आहे कोंबडी वडे मधल्या रस्यासाठी.

२५ मोठे आणि १२ लहान मुलांसाठी पावभाजी करायची आहे.मला बटाटा , ढबू मिरची , मटार घालून करायची आहे.साधारण या सगळ्या भाज्या किती लागतील?गुलाबजाम किती दिवस आधी करुन ठेवता येतील?

पावभाजी बद्दल मला मैत्रीणीने सांगितले होते.. मानशी २००ग्रॅम असा अंदाज घ्यायचा. म्हणजे बटाटे, कांदा, टोमॅटो, ढोबळि मिळुन १ किलो असेल तर ५ मानसे. जाणकार प्रकाश टाकतीलच Happy
गुलाबजाम रेडीमिक्सचे करणार असलात तर आधल्या दिवशी केलेले चांगले.

श्रावणी, वरचा अंदाज बरोबरच आहे पण मूले जर लहान असतील तर त्यांच्यासाठी वेगळी भाजी करावी असा सल्ला मी देईन. जास्त तिखट भाजी मूले खाऊ शकत नाहीत. त्यांच्या भाजीत लाल भोपळा उकडून किंवा पिकलेले केळे मॅश करुन घालायचे आणि शिजवायचे. हवा तर त्यात खाण्याचा लाल रंग घालायचा, पण मसाला कमी घालायचा.
त्यांच्यासाठी इडली चटणी सारखी एखादी सौम्य डिश पण ठेवली तर चांगले. तेही आधी करुन ठेवता येते. चटणी वाटताना उडदाची परतलेली डाळ किंवा शेंगदाणे घातले तर चटणी खराब होत नाही. नूसत्या खोबर्‍यामिरचीची मिक्सरवर वाटलेली चटणी, फ्रिजमधेही टिकत नाही.

गुलाबजाम एक दिवस आधी करुन ठेवले तरी चालतील.

मी लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला ५५-६० माणसांसाठी केली होती पावभाजी. सगळे अंदाजेच घेतले होते. काय ,कीती घेतले होते? आठवू पहातेय पण नाही आठवत आता.

http://www.maayboli.com/node/2602?page=10
इकडे साधारण 35 माणसांच्या पावभाजीचा अंदाज लिहिलाय. अश्विनी केची पण एक पोस्ट होती कुठेतरी, ती शोधतेय, मिळाली तर लिंक देईन.

Pages