Submitted by अश्विनीमामी on 21 July, 2011 - 06:06
माझी भाची डरहॅम युनिवर्सिटी, न्यू कॅसल जवळ आहे, तिथे शिकायला जात आहे. पहिल्यांदाच घरापासोन दूर देशी जाणार आहे. तरी खालील माहिती हवी आहे.
न्यू कॅसल परेन्त फ्लाइट आहे तिथून पुढे डरहॅम परेन्त कसे जायचे बस कि ट्रेन कि अजून काही?
तिला रूम मिळणार आहे पण स्वयंपाक स्वतःचा स्वतःच करायचा आहे त्यानुसार ग्रोसरी स्टोअर त्या भागातील स्वस्त भारतीय खानावळ किंवा इतर जेवणाची सोय या बद्दल माहिती हवी आहे. तसेच यू.के. मधील विद्यार्थी जीवनासाठी उपयुक्त काही माहिती असल्यास जरूर द्या.
या भागात कोणी मायबोली कर आहेत का? घरून तिला काय काय सामान बरोबर द्यावे लागेल?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डरहॅम फार सुंदर शहर आहे. या
डरहॅम फार सुंदर शहर आहे. या साईट वर तुला न्यूकॅसल एअरपोर्ट ते डरहॅम अशी बस शोधता येईल आणि बुकिंग पण करता येईल. अंतर २५ मैलापेक्षा जास्त नाही.
http://www.nationalexpress.com/home.aspx
न्यूकॅसल एअरपोर्ट वर ट्रेन
न्यूकॅसल एअरपोर्ट वर ट्रेन स्टेशन नाही त्यामुळे बसच बरी पडेल. नाहीतरी यूके मधे बस ट्रेन पेक्षा स्वस्त पडते.
एक भाप्र. न्यू कॅसल
एक भाप्र. न्यू कॅसल विमानतळावरून बस स्टँड किती दूर असेल? तुम्ही आधी प्रवास केल्याने कदाचित माहित असेल. मी तिला तिच्या टायमिन्ग प्रमाणे बस वरील साइट वरून शोधण्यास सांगते. ती इथून छोटा प्रेशर कुकर घेओन जाणारच आहे शिवाय इतर स्वयंपाकाचे सामान नेणार आहे. साधी भारतीय औषधे द्यावीत का बरोबर जसे डिस्पिरीन, व्हिक्सची बाटली वगैरे?
मी न्यूकॅसल एअरपोर्ट वर कधीच
मी न्यूकॅसल एअरपोर्ट वर कधीच गेलेलो नाही. मी देतोय ती माहिती गुगलून काढलेली आहे. न्यूकॅसल एअरपोर्ट ची साईट भंगार आहे त्यात बस स्टॉप बद्दल माहिती सापडत नाहीये. पण बसच्या साईट वर (नॅशनल एक्सप्रेस वर) असं लिहीलेलं आहे...
Find us at the terminal door
Most of our coaches that depart the airports leave from the terminal door, so it's not hard to find your coach. Where we don't leave from right outside the airport door, you'll find your coach waiting for you in the coach parking bays, just follow the Coach Station signs through the airport.
>> डिस्पिरीन, व्हिक्सची बाटली वगैरे?
याची काहीही जरूरी नाही. असली औषधं इथे दुकानात सहज मिळतात. बाकीच्या औषधासाठी डॉ प्रिस्क्रिप्शन देतो. इथे तपासणी फुकट आहे. त्या साठी जवळच्या एनएचएस क्लिनिकमधे रजिस्टर करावं लागतं. असली माहीती स्टुडंट युनियनच्या ऑफिसमधे मिळेल.
>> ती इथून छोटा प्रेशर कुकर घेओन जाणारच आहे शिवाय इतर स्वयंपाकाचे सामान नेणार आहे.
बाप रे! किती ते वजन! याची मला तरी जरूर वाटत नाही. शिवाय सोडून चाललेल्या विद्यार्थ्यांच्याकडे असल्या गोष्टी स्वस्तात विकाऊ असतात. त्यातल्या त्यात छोटा प्रेशर कुकर आणायला हरकत नाही. तो इकडे फारसं कुणी वापरत नाही त्यामुळे विकत मिळणार नाही.
अमा माझा एक मित्र न्यूकॅसल
अमा माझा एक मित्र न्यूकॅसल विद्यापीठात शिकला आहे. भाचीला मला इमेल करायला सांगा म्हणजे कनेक्शन जोडून देईन.