पोळी

Submitted by सानी on 12 July, 2011 - 10:34

प्रेरणा:
लोणचं
मुरांबा, पापड, चटणी, कोशिंबीर
भाकरी, भाजी, वरण-भात
कढी
शिकरण
अहो, पान वाढलंय.....!!

पोळी
--------------------------
गव्हाच्या पीठासारखा तू
आणि पाण्यासारखी मी
तुला आकार देण्यासाठी
तुझ्यात मिसळलेली

... आणि तुला आकार देता देता
तुझ्यातच सामावलेली
स्वत:चे अस्तित्व विसरुन
तुझ्यात एकजीव झालेली...

चवीपुरत्या मीठासारखं
चवीपुरतं भांडण
नात्यातल्या मऊपणासाठी
मायेचं मोहन

तुझ्यात जिरेन इतकंच
माझं अस्तित्व दाखवून
कधी कमी कधी जास्त
अशी तडजोड करुन

नात्याची कणीक कशी
व्यवस्थित मळून
सामंजस्याच्या क्षणांमध्ये
जरा भीजत ठेवून

जीवनाच्या पोळपाटावर
हळूवार लाटलेली
तव्यावरच्या चटक्यांसारखी
उन्हा-तान्हात भाजलेली

खरपूस पोळी वाढू
संस्कारांच्या ताटात
समाधानाला देऊया
निमंत्रण थाटात

Happy Happy Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच Happy

Pages