Submitted by सानी on 12 July, 2011 - 10:34
प्रेरणा:
लोणचं
मुरांबा, पापड, चटणी, कोशिंबीर
भाकरी, भाजी, वरण-भात
कढी
शिकरण
अहो, पान वाढलंय.....!!
पोळी
--------------------------
गव्हाच्या पीठासारखा तू
आणि पाण्यासारखी मी
तुला आकार देण्यासाठी
तुझ्यात मिसळलेली
... आणि तुला आकार देता देता
तुझ्यातच सामावलेली
स्वत:चे अस्तित्व विसरुन
तुझ्यात एकजीव झालेली...
चवीपुरत्या मीठासारखं
चवीपुरतं भांडण
नात्यातल्या मऊपणासाठी
मायेचं मोहन
तुझ्यात जिरेन इतकंच
माझं अस्तित्व दाखवून
कधी कमी कधी जास्त
अशी तडजोड करुन
नात्याची कणीक कशी
व्यवस्थित मळून
सामंजस्याच्या क्षणांमध्ये
जरा भीजत ठेवून
जीवनाच्या पोळपाटावर
हळूवार लाटलेली
तव्यावरच्या चटक्यांसारखी
उन्हा-तान्हात भाजलेली
खरपूस पोळी वाढू
संस्कारांच्या ताटात
समाधानाला देऊया
निमंत्रण थाटात
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच झालीये पोळी.. पण साधी
मस्तच झालीये पोळी..
पण साधी पोळी दिसतेय, पुरण नाही घातलं काय?
भाज्या येवू द्यात आता - मेथी, शेपू, चुका, पालक, अंबाडा, आणि काय काय..
हो निवडुंग.... मुरलेल्या
हो निवडुंग.... मुरलेल्या लोणच्यासारखी अनुभवाची म्हणूनच साधी पोळी आहे.... पुरण घातलेल्या गोग्गोड पोळीचे कॉन्ट्रॅक्ट नुकतेच लग्न झालेल्या जोडगोळ्यांना देऊयात...
धन्यवाद!
स्वयंपाक येत नाही, या
स्वयंपाक येत नाही, या गोष्टीचं फक्त आज थोडंसं (क्षणिक) दु:ख झालं.. झब्बू देता येणार नाही ना म्हणून..
संधर्भ छान जुळवलाय.....
संधर्भ छान जुळवलाय.....
धन्यवाद बंडुपंत निवडुंग,
धन्यवाद बंडुपंत
निवडुंग, तुम्ही डायरेक्ट पुरणपोळीचाच झब्बू द्या... वेळ लागला तरी हरकत नाही...अनुभवाने सगळं शिकतो माणूस!
ही खरे छान कविता आहे. कैच्या
ही खरे छान कविता आहे. कैच्या कैत का बरे टाकली आहे? प्रामाणिक शब्द, खर्या भावना. अजून बाकीच्या वाचल्याच नाहीयेत.
धन्यवाद अश्विनीमामी कविता
धन्यवाद अश्विनीमामी कविता विभागात हलवते आहे... समान प्रेरणेने लिहिलेल्या बाकीच्या सगळ्या कविता कैच्याकैतच असल्याने मी ही टाकली होती.
सानी ह्या असल्या कवितांच्या
सानी ह्या असल्या कवितांच्या लाटेत तू पण आपली "पोळी" भाजून घेतलीस. हे झ्याक झालं.
संसारास वाहीलेली कविता आवडली.
___/\__ मस्त
___/\__ मस्त
रुपक मेन्टेन करण्यातले स्किल
रुपक मेन्टेन करण्यातले स्किल फार फार आवडले.
सानी अतिशय मऊसूत आणि अप्रतिम
सानी अतिशय मऊसूत आणि अप्रतिम पोळी.
विरघळली अगदी.
सानी, अप्रतिम पोळी.... अजून
सानी, अप्रतिम पोळी.... अजून वाढ दोन चार...
बाकी बागेश्रीची शैली जमली हो आता ती वाचेल तर आपल्याला "डुप्लिकेट" म्हणेल.
रच्याक, तुझी पोळी माझ्या मुरलेल्या लोणच्याबरोबर खायला चांगली आहे
व्वा१११ पोळी एकदम लुसलुशीत
व्वा१११ पोळी एकदम लुसलुशीत
आता त्याबरोबर शिकरण हादडावे का? की लोणच्या बरोबर खावी? नाहीतर डाव्या बाजुला बरेच काही वाढलच आहे वर्षामायनी तेच खावे
छान जमली !
छान जमली !
जमली गं बाई जमली तुला पोळी!!
जमली गं बाई जमली तुला पोळी!!
आता ताट भरण्यासाठी अजुन काय काय बाकी आहे???
भले शाब्बास! इथं तर मेजवानीच
भले शाब्बास! इथं तर मेजवानीच सुरू आहे!
हा घ्या नैवेद्य!
पोळी कौतुकाने खाल्ल्याबद्दल
पोळी कौतुकाने खाल्ल्याबद्दल सर्वांना खुप खुप धन्यवाद!!!!
सानुले, मस्तच गो... हे
सानुले,
मस्तच गो...
हे तर,
<चवीपुरत्या मीठासारखं
चवीपुरतं भांडण
नात्यातल्या मऊपणासाठी
मायेचं मोहन> वा वा
इथे आख्खं पानच वाढलय गो
http://www.maayboli.com/node/27288
सानी, पोळी मस्तच पण एकच का?
सानी, पोळी मस्तच
पण एकच का? पोळ्या येऊ दे.
धन्स गो बागेश पानातल्या
धन्स गो बागेश पानातल्या पदार्थांसोबतच आख्खं पानच खाऊन आलेय... चविष्ट आहे एकदम
राजे, तवा गरम आहे, तुम्ही पण आपली पोळी भाजून घ्याच आता धन्स तुम्हालाही
आवडली पोळी..
आवडली पोळी..
सानी, पोळी अगदी दमदार्,कसदार
सानी,
पोळी अगदी दमदार्,कसदार वाटली.
शेवटचं कडवं तर खास !
धन्यवाद मेधा, अनिल
धन्यवाद मेधा, अनिल
"खरपूस पोळी
"खरपूस पोळी वाढू
संस्कारांच्या ताटात
समाधानाला देऊयात
निमंत्रण थाटात"
....छान …. हे अधिक आवडलं.
-------------------------------------------------------------------------------------------------------
फक्त ’देऊयात’ हा शब्द ’देऊया’ असा बदलायला हवा असं वाटतं
काही लोक बोली भाषेत करुयात, बोलूयात, देउयात असं बोलत असले तरी
शुद्धतेचा विचार करू पाहता हे शब्द बरोबर नाहीत असं सांगावसं वाटतं.
करूया, बोलूया, देउया हे शुद्ध आहेत.
धन्यवाद उकाका! मला हे अजिबातच
धन्यवाद उकाका! मला हे अजिबातच माहिती नव्हतं... तुमच्यामुळेच समजलं. बदल केलेला आहे.
Very good one!
Very good one!
आवडेश पोळी
आवडेश पोळी
रान्चो, स्मितू.. मनापासून
रान्चो, स्मितू.. मनापासून धन्यवाद! आमची पोळी धन्य जाहली...
अरे व्वा! ही पोळी मी पाहीली
अरे व्वा! ही पोळी मी पाहीली नव्हती.
खर्पुस आहे
धन्स रे चातका
धन्स रे चातका
Pages