Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तराना, तुमची विपू बघा.
तराना, तुमची विपू बघा.
धन्यवाद सावनी .
धन्यवाद सावनी .
@तराना, mac n cheese आधी करुन
@तराना,
mac n cheese आधी करुन ठेवले तरी हरकत नाही. चीज सॉस करताना त्यात थोडं जास्त दुध घाल म्हणजे आळले तरी फार गच्च गच्च होणार नाही. त्यातुन तासाभराने फार घट्ट झालय असं वाटलचं तर रीहिट करताना त्यात थोडं सिंगल क्रिम घालुन सारखं करं
डाळीचं पीठ जुनं असेल तर कडवट
डाळीचं पीठ जुनं असेल तर कडवट होतं का? १-२ महिन्यापूर्वी जवळच्या इंग्रोमधून आणलेलं पीठ कडवट लागत आहे.काय करावं??
कोणाला kfc चिकन कसे बनवतात
कोणाला kfc चिकन कसे बनवतात माहित आहे का???
पुर्वा,मी पण ईग्रो तुन दोनदा
पुर्वा,मी पण ईग्रो तुन दोनदा [एकदा कडु निघाले म्हणुन दुसर्या महिन्यात पुन्हा,पटेल शी बोलले होते तसे]स्वाद चे डाळीचे पीठ आणले होते कडु लागत होते..टाकुन दिले..
मला कोणी काजुकरीची रेसिपी
मला कोणी काजुकरीची रेसिपी सा॑गेल का?
मुगाची उसळ जशी ऐनवेळी करता
मुगाची उसळ जशी ऐनवेळी करता येते( मुग आदल्या दिवशी न भिजवता, मोड न आणताही) तसे अजुन कुठल्या कड्धान्याची करता येते का ?
मसुरची
मसुरची
उडदाचि डाळ पण करता
उडदाचि डाळ पण करता येते....त्यात थोडि चिंच आनि गुळ घालावे.....
चवळीची पण
चवळीची पण
सुलेखा, माझ्याकडे पण स्वादचंच
सुलेखा, माझ्याकडे पण स्वादचंच आहे.दुसरं कुठलं चांगलं माहित आहे का?
पूर्वा, जनरली लक्ष्मीचे
पूर्वा, जनरली लक्ष्मीचे प्रॉडक्ट्स चांगले असतात असा माझा अनुभव आहे.
टाकळाची भाजी कशी करायची? चव
टाकळाची भाजी कशी करायची? चव कशी असते?
मी रोजच्या पालकासारखी केली तर ठिक लागेल? आंबट असते का?
पुर्वा,लक्ष्मी चे चांगले
पुर्वा,लक्ष्मी चे चांगले असावे..गुजरात मधला बहुतेक हाच ब्रान्ड आहे. मी नाव विसरले आहे...त्यांची तुरडाळ [बिनतेलाची] चांगली आहे..कारण मी स्वाद ची तुरडाळ आणली .ती कुकर मधे सगळ्या प्रकारांनी शिजवुन पाहिली..शिजली नाही व बेचव लागत होती.. त्यामुळे डाळी,बेसन लक्ष्मी चे,गहुपिठ आशिर्वाद चे चांगले..फुलके/पोळी/पुरी छान मऊ होतात थंड झाल्यावर चिवट होत नाही..
थँक्यू आर्च आणि सुलेखा
थँक्यू आर्च आणि सुलेखा
ह्यावेळेस लक्ष्मीचेच आणून बघेन.
रताळ्याचे काचरे गुळातले कसे
रताळ्याचे काचरे गुळातले कसे करतात ...
किट्टु,तुपात रताळ्याचे काप
किट्टु,तुपात रताळ्याचे काप परतुन्,झाकण ठेवुन मंद आचेवर वाफवुन घ्यायचे ..एका बाउल मधे काढुन ठेवायचे..त्याच कढई मधे चमचाभर तुपात गुळ व अगदी थोडेसे पाणी घालुन गुळ विरघळवुन घ्यावा..त्यात वेलचीपुड व वाफवलेले काप टाकुन परतायचे लगेच गॅस बंद करायचा..काप मुरले पाहिजेत..
परवा सायोची मलई बर्फी केली.
परवा सायोची मलई बर्फी केली. मस्तच झाली होती.
आमच्याकडे ती मिठाईच्या दुकानात मिळते ना तशी जरा कलाकंद सारखी दिसणारी ( पण आंबट्सर चव नसणारी ) थोडी ओलसर आवडते. कुणाला रेसिपी माहित असेल तर सांगा ना
धन्स सुलेखा बघते करुन
धन्स सुलेखा बघते करुन
कलिंगडाच्या सालाची भाजी कशी
कलिंगडाच्या सालाची भाजी कशी करायची कोणाला माहितीये कां? माहीत असेल तर कृपया सांगा.
आडो कलिंगडाच्या सालाची भाजी
आडो कलिंगडाच्या सालाची भाजी माझी आई भिजवलेली चनाडाळ घालून करते. सालीच्या फोडी चिरून घ्यायच्या, डाळ थोड्यावेळ भिजवायची आणि मग दोन्ही एकत्र फोडणीला टाकायचे, गरज असेल तर किंचीत पाणी घालून वाफवायचे. आवडीचे मसाले घालायचे. जरा झणझणीत करायची भाजी.
इथे रेसिपि आहे तशी पण करता
इथे रेसिपि आहे तशी पण करता येईल कलिंगडाच्या सालीची भाजी
http://www.maayboli.com/node/24325
रुनी, मेधा धन्यवाद. बघते लिंक
रुनी, मेधा धन्यवाद. बघते लिंक
आडो, माझी आजी करायची नेहमी
आडो, माझी आजी करायची नेहमी सालींची भाजी.पण ती अगदी साधीशी तेलावर परतून करायची. चव मात्र अफलातून. बटाट्याच्या फोडी करतो त्याप्रमाणे चिरून घ्यायच्या फोडी. तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून , कढीपत्ता घालायचा. हळद , तिखट घातल्यावर फोडी घालून चांगल्या परतून घ्यायच्या. त्यात काळा/गोडा मसाला, मीठ घालून पाण्याचं झाकण कढईवर ठेवून शिजवायची. नुसत्या वाफेवरच शिजली पाहिजे.
आडो, दुधीभोपळ्याची करतात तशी
आडो, दुधीभोपळ्याची करतात तशी करता येइल. मोहरी, लाल सुकी मिरची, कढीपत्ता, हळद आणि हिंगाची फोडणी करायची. यात भिजवलेली मुगडाळं घालायची. कलिंगडाच्या सालीचे चौकोनी तुकडे घालुन भाजी शिजवायची. शेवटी शेवटी खवलेले ताजे खोबरे घालायचे. हवी तर कोथिंबीर. दुधीची अशी भाजी मस्त लागते.
खरवस बनवण्याचि परफेक्ट रेसिपी
खरवस बनवण्याचि परफेक्ट रेसिपी कुणाला माहीत आहे का? या आठवडयात चिक मिळण्याची शक्यता आहे.
आम्हाला सगळयांना खुप आवडतो खरवस.
खरवस बनवण्याचि परफेक्ट रेसिपी
खरवस बनवण्याचि परफेक्ट रेसिपी कुणाला माहीत आहे का? >> मला मला
पहिल्या दिवसाचा चिक असल्यास ४:३ प्रमाणात साधे दुध घालावे. चवीप्रमाणे साखर घालावी ( साखर विरघळल्यावर चव घेउन पहावे. खरवस हवा त्यापेक्षा गोड हवी. ) केशर्,वेलची पुड टाकुन भांड्यावर झाकन ठेउन कुकरला ३ शिट्या काढाव्यात. थंड झाले की गार करुन ताव मारावा.
विचारायला आले की पहिल्या
विचारायला आले की पहिल्या दुधाचा की दुसर्या, पण वर्षाने आधीच लिहिली आहे रेसिपी.
वर्षा धन्स, पव पहिल्या
वर्षा धन्स, पव पहिल्या दिवसाचा नसेल तर प्रमाण सांगा ना? घरी आल्याशिवाय कळणार नाही.
Pages