अनंत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 July, 2011 - 05:28

सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्‍यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे. हे फुल ठेवले टेबलवर की दिवसभर सुगंध दरवळतो.

१)संध्याकाळी एक एक पाकळी उमलतेय.

२) अर्धवट फुललेल फुल

३)

४) आमचा पण फोटो काढा.

५) फुलत आलेल फुल

६) पुर्ण फुललेल फुल

७) हे आमच झाड.

८)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, जागू जागू ! आता तर आलच पाहिजे मला तुझ्याकडे . अनंत, कवठीचाफा म्हणजे माझे जीव की प्राण ! आता कशी राहू इथे .....
धन्स गं बायो, धन्स Happy

आता कशी राहू इथे .....

लग्गेच निघुन ये. नाहीतर ३-४ दिवसांत बहर संपेल.

ताशि बदल केला. धन्स.

जागुडे, खरच 'श्रीमंत' आहेस बै तु!! Happy
माझ्याकडे, २-३ महिन्यातुन एकेक छोटीशी कळी येते. आणि तिचे फुल होईस्तोवरच्या झाडाच्या कळा मी ऑब्झर्व करत बसते.

अंधेरी इस्ट वेस्ट जोड्णारा पुल आहे, तिथेही असाच फुललाय अनंत,

काही वास कसे तना मनात भरुन राहतात ना?

सोनट्क्क्याच वास आणि दर्शन असच वेड लावतं.

आणि रविवारी दुपारी पापलेट तळल्याचा वास... अ हा हा Happy

कुणाच काय तर कुणाच काय Wink

काही वास कसे तना मनात भरुन राहतात ना?

सोनट्क्क्याच वास आणि दर्शन असच वेड लावतं.

आणि रविवारी दुपारी पापलेट तळल्याचा वास... अ हा हा

निकिता हसण्यावर कंट्रोल नाही राहीला ऑफिसमध्ये. Lol

ओके जागू, पाहते, नाहीतर तू देशीलच? Happy
पुण्यात राहणार्‍या कोणाकडे आहे का फांदी? मला सोनटक्क्याचा कंदही हवा आहे.