नमस्कार ! मागील वर्षी विही येथील वॉटरफॉल रॅपलिंगमध्ये बर्याच मायबोलीकरांनी सहभाग घेतला होता.. खूप धमाल केली होती शिवाय क्षणभर थरारक वाटणारे पण सोप्पे असणार्या या रॅपलिंगचा आस्वाद घेतला होता..
तर बर्याच जणांचे मिस झाले होते.. तेव्हा ज्यांनी मिसले वा पुन्हा अनुभव घेण्यास उत्सुक असाल तर येत्या विकेंडसाठी तयार व्हा...
'ऑफबिट सह्याद्रीज' ह्या ग्रुपने येत्या विकेंडला (९ जुलै व १० जुलै) विही धबधब्यावर रॅपलिंगचा कार्यक्रम ठेवला आहे.. इकडे नुसते रॅपलिंगच काय तर पाण्यात डुंबण्यासाठी एक छोटा नि एक भला मोठा असे दोन धबधबे आहेत.. म्हणजे फक्त चिंब चिंब धमाल असेल
मागच्या वेळी केलेल्या रॅपलिंगचे काही फोटो (सौजन्यः यो रॉक्स)
-------
-------
------
डुंबण्यासाठी असलेला छोटा धबधबा..
------------------------
अंदाजे १२० फूटावरुन पडणार्या धबधब्याच्या पाण्यातून खाली उतरणे हे जितके धाडसी तितकेच सोप्पे नि आगळावेगळा अनुभव देणारे..उतरताना थोडीफार भंबेरी उडेल.. पण काळजी करण्याचे कारण नसते.. उतरताना तुम्ही पुर्णपणे सुरक्षित असतात !!. बस्स.. फक्त फेसाळणार्या पाण्याचे तुषार झेलत त्या धबधब्यातून एकेक पाउल बिनधास्तपणे खाली टाकत उतरायचे हेच तुमचे काम.... आणि एकदा का खाली पोचलात की एका थरारक अनुभवाचे साक्षीदार झाल्याचा आनंद जो काय असतो तो शब्दांकन करणे कठीण आहे.. त्यासाठी रॅपलिंगला यायलाच हवे !
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी वा नोंदणीसाठी या लिंकवर पहावे..
http://offbeatsahyadri.blogspot.com/2011/06/waterfall-rappelling-at-vihi...
अथवा मला संपर्क करावा.. (अंतिम तारीख :शक्य तितक्या लवकर.. गुरवार दि.७ जुलै)
सुन्या आंबोलकर - ९७६४००६२८२
धन्यवाद
सुन्या (ऑफबीट सह्याद्री)
मस्त... येतोय रे
मस्त... येतोय रे
मौजाही मौज्जा !
मौजाही मौज्जा !
मस्त मस्त मस्त मस्त मी पण
मस्त मस्त मस्त मस्त
मी पण येतोय रे
Signups closed for this कार्यक्रम>>>> हे का दिसतंय पोस्टमध्ये?
मस्त, मस्त. इथेच शहारे आले !
मस्त, मस्त. इथेच शहारे आले !
मी नाहीये!
मी नाहीये!
मागच्या वर्षीचा अनुभव मस्त
मागच्या वर्षीचा अनुभव मस्त होता. यावेळी शक्य नाही. इतर जागा बोलवत आहेत.
देवा, फक्त येत्या ९-१०
देवा, फक्त येत्या ९-१० तारखेचा एक दिवस मला २५ वर्षानी लहान करशील का ? प्लीज !!
जमणे कठीण दिसतंय पण आवडेल
जमणे कठीण दिसतंय पण आवडेल यायला... ३-४ वर्ष झाली आता हे करून.. ७ पर्यंत कळवतो..