Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोगो घे तुझ्यासाठी लिहीलिये
गोगो घे तुझ्यासाठी लिहीलिये रेसिपी
लाजो, दुवा बरोबर
लाजो, दुवा बरोबर नाहीये
http://www.maayboli.com/node/26982 इथे आहे कृती
थॅन्क्यू सो मच लाजो ताई...
थॅन्क्यू सो मच लाजो ताई...
धन्स मिलिंदा
धन्स मिलिंदा
मध्ये मी एका दिल्ली बेस्ड
मध्ये मी एका दिल्ली बेस्ड जॉईंट ला पाणीपुरी खाल्ली, त्यातल्या पाण्याला जिर्याची किंचित फोडणी घातली होती. मी बनवते तेव्हा फोडणी घालत नाही. म्हणून म्हणले इथे विचारावे.
शिवाय इथे दहीवड्याच्या दह्यालाही हिंग्-मोहरीची फोडणी घालतात.
मवा, दहीवड्याच्या दह्यावर
मवा, दहीवड्याच्या दह्यावर फोड्णी माझी आई पण घालायची.. हिंग, मोहरी आणि सुकी लाल मिरची, कढीपत्ता,,, छान लागतं
पण पापु च्या पाण्यात फोडणी पहिल्याम्दाच ऐकत्येय
बुर्जी, ऑम्लेट, बॉईल, अंडा
बुर्जी, ऑम्लेट, बॉईल, अंडा करी/मसाला सोडून अंड्याचे पदार्थांमधे आणखी काही प्रकार आहेत का?
ह बा तु इकडे अंड्याचे फ्रेंच
ह बा तु इकडे

अंड्याचे फ्रेंच टोस्ट , अंडा बिर्याणी करता येइल
माझा आवडता प्रकार राहिलाच की "हाफ फ्राय"
हबा, फ्रेंच टोस्ट, बेक्ड
हबा, फ्रेंच टोस्ट, बेक्ड एग्ज, डेव्हिल्ड एग्ज, उकडलेलं अंड घालुन सॅलड, स्पॅनीश ऑमलेट... उद्या एखादी रेसिपी टाकेन हवं तर
ह बा तु इकडे >>> रविवारी
ह बा तु इकडे >>> रविवारी बायको कोमात असते माझी. कामवाली फक्त सकाळी येते. रात्री मलाच गॅसवर अत्याचार करावे लागतात.
पुर्ण रेसिपी द्या आणि
पुर्ण रेसिपी द्या आणि साहित्याची नावं लिहीताना ते साहित्य जगाच्या पाठिवर कुठेतरी उप्लब्ध असावं याची काळजी घ्या.
हबा
हबा http://www.cooks.com/rec/search/0,1-0,spanish_omelet,FF.html इथे स्पॅनीश ऑमलेटच्या भरपुर रेसिप्या आहेत.
'सॅटरडे संडे रोज देइ अंडे'....कविता आठव्ली तुझी
धन्यवाद लाजो! "हाफ फ्राय">>>
धन्यवाद लाजो!
"हाफ फ्राय">>> हे आहे काय?
"हाफ फ्राय">>> हे आहे काय?
"हाफ फ्राय">>> हे आहे काय? >> तव्यावर तेल/ बटर टाकुन डायरेक्ट अंडे फोडायचे. मी पिवळा भाग चमच्याने थोडा दाबुन पसरवते. अर्धवट शिजल्यासारखे झाले की प्लेटमधे घेउन मीठ, मीरपुड टाकुन बटर लावुन गरम केलेल्या ब्रेडबरोबर खायचे. आठवुनच तोंडाला पाणी सुटले. अता उद्याचा नाष्टा हाच

साधारण असे दिसते
हाफ फ्राय म्हणजे अंड गरम
हाफ फ्राय म्हणजे अंड गरम तव्यातचं फोडायचं आनि फक्त एकाच बाजुने फ्राय करायचं. वरतुम मीठ मिरेपुड भुरभुरायची. यात अंड्याचं पिवळं लिबलीबीत, पातळं रहात< आणि बाजुच< पांढर एका बाजुने छान ब्राऊनीश होतं. हेच जर तुम्ही पलटुन तव्यावर दुसर्या बाजुने पण भाजलत तर ते ड्बल फ्राय
मी आज संध्याकाळीच एका
मी आज संध्याकाळीच एका अंड्याचा बळी घेतो...
हबा मीठ-मीरपुड विसरु नको.
हबा मीठ-मीरपुड विसरु नको. घरात नसेल तर १-२ मीरी बत्त्याने कुटुन टाकु शकतोस.
येस्स... मिरपुड नसेल तर लाल
येस्स... मिरपुड नसेल तर लाल तिखट पण चालेल. इन्फॅक्ट गोडा/काळा मसाला पण छान लागतो. गोडा मसाला घातला तर अगदी चिमुटभर साखर पण पेरायची. हवच तर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालु शकता
हे डबल फ्राय मधे जास्त छान लागते.
ह.बा., इथे ब्रिटाटाची कृती
ह.बा., इथे ब्रिटाटाची कृती आहे - http://www.maayboli.com/node/13853
जुन्या मायबोलीतही काही आहेत http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93015.html?1206392472
येस सगळे सांगितल्याप्रमाणे
येस सगळे सांगितल्याप्रमाणे करतो. फक्त ब्रेडच्या जागी भाकरीच्या मधे घालणार याला.
अरे नको रे हबा.. नाही चांगले
अरे नको रे हबा.. नाही चांगले लागणार भाकरी बरोबर
हबा... नको.. त्या हाफ फ्राय
हबा... नको.. त्या हाफ फ्राय वर असा अत्याचार नको आणि त्या भाकरीला बाटवु नकोस... ब्रेड नसेल तर पोळी चालेल पण भाकरी नको....
मंजूडी, ते पान पाहण्याची
मंजूडी,
ते पान पाहण्याची परवानगी नाही.
सकाळी पोळी रात्री भाकरी असा
सकाळी पोळी रात्री भाकरी असा रूलच आहे घरी. पण फोन केलेला आहे, आज माझी भाकरी रद्द करायला सांगितली आहे. जाताना ब्रेड नेणार आहे.
हबा तुम्ही आहारशास्त्र गृपचे
हबा तुम्ही आहारशास्त्र गृपचे सदस्य व्हा.. सग्ळ्या पाकृ दिसतील.
हबा तुम्ही आहारशास्त्र गृपचे
हबा तुम्ही आहारशास्त्र गृपचे सदस्य व्हा... > नको. असच विचारलं की व्यवस्थीत रेसिप्या मिळतात. आणि फक्त रविवारचाच तर प्रश्न असतो. तोही बर्याच वेळा मी मसालेभात-दूध-पापड असा मारून नेतो.
ह.बा., मग इथे
ह.बा., मग इथे अंड्याशिवायच्याही भरपूर पाकृ सापडतील
अंड्याशिवायच्याही भरपूर पाकृ
अंड्याशिवायच्याही भरपूर पाकृ >>> साहित्य किचकट असलं की मला पदार्थ बिघडण्याचं टेन्शन येतं. अंड्यांचं तसं नसतं खूप कमी साहित्यात पदार्थ उरकतात.
त्या ग्रूपचं सदस्यत्व घेतो.
हो ना लाजो, मी पण पहील्यांदाच
हो ना लाजो, मी पण पहील्यांदाच बघितले, म्हणून तर इथे विचारले. 'दिल्ली वाले' नाव असलेली चाट पदार्थांची चेन आहे, तिथे खाल्ली मी. अगदी कमी प्रमाणात होती, पण होती खरी.
मला लहान मुलांसाठी mac n
मला लहान मुलांसाठी mac n cheese बनवायचे आहे. मला असा प्रश्न पड्ला आहे की ते तासभर आधी करून ठेवले तर खूप आळेल का? मी अगोदर हे कधी केलेले नाही. पा. क्रु. मधे चुकण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. तरी पार्टी मध्ये ते मऊ लागेल यासाठी काय दक्षता घेऊ ?
Pages