बामुलाहीजा होशियार.......रा.रा. गटग वृतांत
राणिच्या राज्यातला गटग असल्यामुळे Once upon a time, there was a GTG........असे होऊ नये म्हणून, ashig, Milinda आणि आदिती या थोरामोठ्यांकडून प्रेरणा घेऊन, मी माबोवर पहिला प्रयत्न करत आहे.
२५ जुन ला १२:३० ची swindon -london train पकडली. साधारण २:१५ ला त्याच त्या काँच के मकान wagamama ला पोहचलो. आधीच काही माबोकर स्थानापन्न झाले होते.ते जाईजुई, भावना, mrudula, माधुरी१०१ आणि ashig आहेत हे ओळख परेड नंतर कळाले. मी जाईजुई यांना आदिती म्हणून बरोबर ओळखले.... जाईजुई आणि कुटुंब Tower hill tube station ला दिसले होते, पण आपला मोरु होऊ नये म्हणून तो प्रश्न मी तेथेच गिळला होता...(पोट रिकामेच होते...दाबून चापण्यासठी...) Milinda आणि आदिती यांचे आगमन झाले. माबोकर नसलेला माझा नवरा आणि milinda यांच्यात आधीपासून ओळख निघाल्यामुळे नवरोबांनाही आपलाच गटग वाटला.
पोटपुजेसाठी मागवून आम्ही माबोवर बाफ, प्रतीक्रीया यावर बातचित केली.बरयापैकी सगळेजण सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या ठिकाणांहून आहोत, हे कळ्ल्यावर हवापाण्याच्या गप्पांना ऊत आला. एवढ्यातच कोमलऋषभ पाठोपाठ अप्र्यणा यांचे शाही आगमन झाले.(शेवटी आल्यामुळे शाही....)उशिरा येऊनही कोमलऋषभ यांची डिश आधी आली त्याचा Milinda यांनी निषेध केला.
जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी पुरेपुर घेतला.... प्रची फक्त एकाचीच घेण्यात आली. गप्पा रंगात असतानाच शेवटी wagamama यांनी आम्हाला बाहेर काढू नये यासाठी आम्ही Tower Bridge कडे कूच केले...
Tower Hill च्या backdrop ला प्रची घेण्यात आली. कृपया ती प्रसिदध करावी. म्रुदूलाला माझा मुलगा कोणासारखा दिसतो या प्रश्नांवर मी आणि माझा नवराच एकमेकांसारखे दिसतो हे उत्तर सापडल्यावर हशा पिकला. भावना, जाईजुई दोघीना ATM शोधुन सापडले नाही. ते समोरच होते....दिव्याखाली अंधार तो हाच का?? दिवे घ्या.
Thames नदीच्या काठाकाठाने विहार करत करत आम्ही Tower bridge ही सर केला. Tower bridge open झालेलाही आम्हाला पहायला मिळाला. नदीच्या पलीकडे पोहचताच आईस्क्रीमची मेजवानी झाली.
त्यावेळी आमच्या चिरंजीवानी भूक लागल्यामुळे माझ्याशी रणशिंग फुंकले. गप्पांच्या आघाडिवर माघार घेत मी समस्त उपस्थित माबोकरांचा निरोप घेतला...कोमलऋषभ छान गातात... त्यांचे गाणे ऐकण्याचे नक्की........त्यासाठी पुढचे गटग लवकर होउदे....
हा वृतांत वाचल्यावर मला दिवे आणि शालजोडीतले मिळणार हे नक्की.....तरी प्रयत्न केला आहे..नजर चुकीने काही राहून गेल्यास क्षमस्व..
आला ग बाई! मी पैली (?).. आता
आला ग बाई!
मी पैली (?).. आता वाचते
!
अरे वा वा... प्राची, छान छान.
अरे वा वा... प्राची, छान छान. आता अजून जसे आठवेल तसे यात वाढवत राहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>भावना, जाईजुई दोघीना ATM
>>भावना, जाईजुई दोघीना ATM शोधुन सापडले नाही. ते समोरच होते....दिव्याखाली अंधार तो हाच का?? दिवे घ्या.
मी तर पलीकडचा तुरुंग बघत होते ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अर्पणा च्या ओळख परेडला जास्त मजा आली :).
हा धागा सार्वजनिक करता येतो
हा धागा सार्वजनिक करता येतो का?
ही चित्रे बघ, कसे करायचे ते
ही चित्रे बघ, कसे करायचे ते कळेल
झाला म्हणायचा एकदाचा..
झाला म्हणायचा एकदाचा..
छान..
अरे वा प्राची मस्त वॄत्तांत..
अरे वा प्राची मस्त वॄत्तांत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता माझी थोडीशी त्यात भर..
लोकहो.. होणार होणार म्हणुन गाजलेल, कमीत कमी पोस्ट्स मधे घडवुन आणलेलं, आमच्या इतकेच(किंवा त्या पेक्षा जास्त) उत्सुक असलेले इतर जण ज्या गटग ची वाट पहात होते ते शनीवारी २६-जुन-२०११ ला दणक्यात पार पडल..:)
ज्या प्रकारे इतरांना आम्ही कधी (एकदाचे) भेटतो अस वाटत होत, ज्या प्रकारे तुम्ही सगळे जण आम्हाला प्रोस्साहन देत होता, आमचा उत्साह वाढवत होतात, हे बघुन आम्हाला अगदी भरभरुन येत होत
"हे गटग झालच पाहिजे" ही फक्त आमचीच नाही तर तुमची ही तेवढीच विच्छा होती हे पाहुन (वाचुन) आम्हाला खुप बर वाटल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग म्रुदुलाचा फोन आला की ती पण 'tower hill' ला पोहोचलीये.. म्हटल ये मग लवकर.. तेवढ्यात भावना चा फोन आला ती म्हणे मी वाघामामा च्या खाली च आहे.. म्हटल ये मग वरती आम्ही आतच आहोत.. ती, मिस्टर.भावना आणि आशिश सोबत होते. ओळख झाली.. मग म्रुदुला मामा ला शोधत शोधत पोहोचली.. ओळख झाली .. जा-जु चा फोन आला ..ती पण तोपर्यत 'tower hill' ला आली होती.. ५-१० मिनिटात ती मामा ला हजर झाली ... विथ मि. जा-जु, तिची गोड चुणचुणीत पिल्लु आणि काकु (तिची आई). पर्यत नेहा ने (माझ्या मुली ने) विचारुन विचारुन बेजार केल होत की "किड्स कधी येणार, मी कुणा सोबत खेळु, अजुन किड्स कसे नाही आले" ..मग जा-जु च्या मुली ला बघुन तिची कळी खुलली, दोघींची छान मैत्री झाली आणि दोघी coloring आणि त्यांचा बडबडी मधे बि़झी झाल्या (हुश श श). तो पर्यत जा-जु च्या पोटातल्या कावळ्यांनी ओरडायला सुरुवात केलीच होती.. लगेच प्राची विथ मि. प्राची आणि गोडु-गोडु बाळ सोहम सोबत आली...
शेवटी कसबस इलीमेशन करुन करुन तो ओ.प मधे यशस्वी झाला
तोपर्यत आमच्या खाण्याचे items येत होतेच आम्ही खात होतो.. मिलींद उशिरा आल्यामुळे, त्याची डिश उशीरा आली आणि त्या आधीच आम्ही ताव मारायला सुरुवात केली म्हणुन त्याने माझ्या वर पंगती-प्रपंच चा आरोप केला :):) असो..समजु शकते भुक लागल्यावर होत अस ..:)
--
आम्ही लंडन च्या जवळ राहात असल्याने वाघामामा ला पोहोचन्या मधे आम्ही पहिला नंबर पटकवला.. घरुन निघण्याआधीच जा-जु, अदिती कुठे आहेत हे विचारुन घेतल..वाघामामा ला पोहोचल्या नंतर म्रुदुला ला फोन केला पण तो तिच्या आवाजपत्रा वर गेला.
आणि आम्ही हळू हळू ऑर्ड्स द्यायला सुरुवात केली.. मग आगमन झाल ते मिलींद-अदिती चे.. त्याची ओळखपरेड मधे खुप खुप खेचली.. म्रुदुला ने आधी सांगितले होते की तिच्या भाची ला घेउन येणार म्हणुन (पण भाची आलीच नाही, हे मिलींद ला महित नव्हते त्या मुळे सगळ्याजणी मी भाची, मी भाची असे जाणवुन त्याच्या ओप मधे व्यत्यय आणत होता
मग आली अर्पणा.... हा.. आता ओप ची अजुन मज्जा.... तिने कुणाबरोबर कोण येणार हे बरोबर लक्शात ठेवल होत.. त्या मुळे तीला सोबत कोण आलय (म्हणजे आई-बाबा, आई) हे पटकन ओळखता आल.. पण कुणाबरोबर आलेत हे ओळखायला जर्ररा वेळ लागला...
..ती हळु हळु यशस्वी होत होती पण तिच्या समोर माझा नवरा बसला होता ..त्याने विचारले मी कोण, माझा माबो आयडी काय ??? झालं परत ती गडबडली.. पण थोड्यावेळ्याने तिने नेहा (माझी मुलगी) आणी माझ्या नवर्या चा संवाद (?) ऐकला आणि तिला कळुन चुकल की आपण चुकलो.
असो..
..
नंतर प्राची ने सांगितल्या प्रमाणे कोमलऋषभ च आगमण झाल.. गटग ची रंगत वाढतच होती.. (मोस्टली) सगळ्याच खाण झाल्या जे टेबल च्या 'या' साईड ला होते ते 'त्या' साईड ला जावुन मिलींद च्या सिट च्या जवळ गर्दी केली (जेणे करुन तो त्याच पटापट पटापट आवरेल ) पण कमी बोलता लवकर जेवण संपवेल तो मिलींद कसला .. (तरी पुर्ण गटग मधे तो हेच म्हणत होता की मी खुप कमी बोलतो, मी खुप कमी बोलतो, मी खुप कमी बोलतो ..ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी जरुर ठेवावा..
प्राची ने सांगितल्या प्रमाणे मग आम्ही Tower Bridge कडे कूच केले.. गप्पा सतत चालुच होत्या.. खुप मजा आली ..
फोटो सेशन अर्थातच आशिष ने केल... आशिष आमचे प्रमुख पाहुणे होते.. त्या ची भेट झाल्यामुळे खुप छान वाटले...
jr. माबो (नेहा, ईरा, राधा, निर्मयी) यांनी पण खुप एंजॉय केला... नेहा आणि इरा ने एकमेकींचा गटग पण ठरवला..
सगळ्यात jr. माबो सोहम ने पण खुप मस्ती केली...
शेवटी आम्ही पण घरी नाईलाजाने जायला निघालो..
नजर चुकीने काही राहून गेल्यास क्षमस्व>>>>> प्राची तुम्ही टेबलच्या 'त्या' साईड ला होता ना टेबलच्या 'ह्या' साईड च्या हालचाली आता जा-जु च्या व्रुत्तांता येतील...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी तुम्हा सगळ्या माबो करांची आठवण काढतच होतो (मधुन्-मधुन) .. कुणा-कुणाची तिव्र आठवण काढली ते जा-जु आणि मिलींद सांगतिलच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या आधिच गटग ४ वर्षा पुर्वी झालेलं (बरोबर का अदिती-मिलींद?). पण आता आम्ही ठरवलय की एवढा कालावधी जाऊ द्यायचा नाही आणि लवकरात लवकर भेटायचय.. येवढच काय तर आगामी गटग चा पुढाकार ही काही लोकांनी घेतलायं..फक्त लंडन का कन्ट्री साईड हे ठरवायचय.. (बरोबर ना प्राची-म्रुदुला)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबो करांना सोईस्कर आग्रहाचं आमंत्रण येईलच ..येताय ना मग तुम्ही सगळेजण राणीच्या राज्यात????
मागच्या माबो च्या गटग ला केपी प्र.पा होता.. ह्या वेळेस आशिष.. आता आगामी गटग कोण?????ठरवा पाहु...:)
----
अजून जसे आठवेल तसे यात वाढवत राहा >>>> मिलींदा आता तु लिही...
आला ग बाई!>> आता तुझा पण येऊ दे ..
माझ्या ही नजर चुकीने काही राहून गेल्यास क्षमस्व.... भावना, जा-जु, मिलींद-अदिती, अशिष, भर घाला आता...
धन्स सगळ्यांना!!!!!!!!
भेटीची काही
भेटीची काही क्षणचित्रे
उपस्थित असलेले मायबोलीकर :
अ = ?
ब = ?
क = ?
ड = ?
इ = ?
फ = ?
ग = ?
ह = ?
म = ?
ज = ?
कोण कोण आहे हे (हजर नसलेल्या) लोकांना ओळखता आले तर उत्तम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
1. सर्वात जास्त हजर लोक, प्रत्येक मायबोलीकरा मागे (number of people per maaybolikar) : ब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
2. फ ची एक मैत्रीण म ची पण मैत्रीण आहे. तिच्याकडून फ ला म बद्दल माहिती होते, पण भेट पहिल्यांदाच झाली.
3. ब ची एक मैत्रीण ड ची पण मैत्रीण आहे. ते कळल्यावर ड चा अर्धा हिस्सा म्हणाला की ब आणि ब ची मैत्रीण सारखेच दिसतात (त्यांना हे आधी कळले नव्हते बरं का)
4. ह चा अर्धा हिस्सा जेवताना शांत होता. नंतर पण फक्त मागणीप्रमाणे पुरवठा याच तत्वावर बोलत होता
5. ब चा अर्धा हिस्सा पूर्ण वेळ शांत होता आणि मुलीला सांभाळत होता
6. फ आणि म ची मैत्रीण ग ला पण माहिती आहे. म आणि ग ची पण ओळख याच वेळी झाली.
7. क पुणेकर असणार ( हे विधान आहे, कुत्सित शेरा नाही) हा फ चा अंदाज साफ चुकला. ती व्यक्ती सातार्याची निघाली.
8. ब फक्त जेवताना शांत होती.
9. म आणि क वर्ग मैत्रीणी निघाल्या.
10. ड चा अर्धा हिस्सा मायबोलीकर आहे, पण आयडी (सुध्दा) आठवत नाही
11. इ ने पैसे भरले. ते नंतर वाटून घ्यायचे की इ ची भेट मानायची यावर चर्चा झाली
12. म सर्वात शेवटी आली, तिचे जेवण शेवटी आले. पण ग (उशीरा येऊनही ति) ची जेवणाची डिश खूप आधी आली. तिची मामांशी ओळख असावी असा संशय आहे.
13. इ ने कोणता तरी नसलेला पदार्थ मागून मामींना गार केलं
14. अ ची मुलगी आणि ड ची मुलगी जेवण झाल्यापासून आईस क्रीम च्या मागावर होत्या
15. ब ची मुलगी तिच्या आईच्या एकदम विरुध्द आहे ( अर्थातच शांत)
16. मध्यंतरी एक मायबोलीकर इकडे येऊन ग ला भेटून गेला असे कळले
17. म लंडन पासून सर्वात दूर राहते
18. ग आणि फ अगदी जवळ राहतात.
19. ह पुणेकर असली तरी चुकुनही वाटत नाही
20. ज आणि अर्धा हिस्सा खूप बोलके आहेत पण त्यांच्याकडे बघून प्रथम दर्शनी तसे वाटत नाही
21. ड चा अर्धा हिस्सा भारतात फ च्या गावाजवळ नोकरी करत असे हे कळले
22. फ , म, ग ची मैत्रीण ज च्या अर्ध्या हिश्श्याला पण माहिती आहे. पण ती मायबोलीकरीण नाही..
23. ज आणि ब लवकर पळाले. ज ला सोडायला ह चा अर्धा हिस्सा गेला, तेवढ्यात ह चा जीव घाबरा घुबरा झाला
२४. इ कोणत्याही गावाचा आहे आणि कोणत्याच गावाचा नाहीये
25. ड व्यक्ती खूप बोलकी आहे, पण तिला असं वाटत नाही
यात स्त्रीलिंगी वर्णन, हे व्यक्ती अया अर्थी केले आहे. ती व्यक्ती पुरुष ही असू शकते
क्रमशः
.
.
मस्त आहेत वृ मिलिंदाचा फारसा
मस्त आहेत वृ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिलिंदाचा फारसा झेपला नाही, पण असूदेत.
एवढं निरीक्षण करण्यासाठी
एवढं निरीक्षण करण्यासाठी मिलिंद शांत होता का?
मी क्ल्यु देउ का?
नको देऊस. वरचे २ वृतांत वाचून
नको देऊस. वरचे २ वृतांत वाचून बर्यापैकी कळावे असा अंदाज आहे. २ दिवस वाट बघुया.
प्राची , बाफ सार्वजनिक कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लै भारी वृ. समद्या लोकांचा
लै भारी वृ.
समद्या लोकांचा एक तरी फोटू डकवा की रं
पण कमी बोलता लवकर जेवण संपवेल
पण कमी बोलता लवकर जेवण संपवेल तो मिलींद कसला >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हादडायला काय काय मागवलेलं..
मिलिंदा, मस्त!
मिलिंदा, मस्त!
काहीजणांना ओळखलेले आहे.
काहीजणांना ओळखलेले आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईग्ग!!! काय फोटो आहे..
आईग्ग!!! काय फोटो आहे..
lol...जाम हसले...
बापरे मिलींदा हे तु जे काही लिहिल आहेस ना ते ओळखतांना आणि तपासुन बघतांना खुप हसु येतय...
:)) अगदी तंतोतंत जुळतय बरका...
अरे वा वृत्तांत आले का. धमाल
अरे वा वृत्तांत आले का. धमाल केलेली दिसतेय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वर शीर्षकात रा.रा. आल्याने मी भलताच अर्थ घेतला होता गटगचा.
मिलिंदा तू सगळ्यांच्या तोंडाला काळे फासलेस, शो.ना.हो.
अरे व्वा बरीच मोठे गँग आहे
अरे व्वा
बरीच मोठे गँग आहे की ही तर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वृ. ही येउद्यात की सगळ्यांचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुनी, तुझा चष्मा काढ आधी...
रुनी, तुझा चष्मा काढ आधी... आम्हांला सगळे नीट दिसताहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिलिंदा काय हे? अब हम लोग
मिलिंदा काय हे? अब हम लोग "मुह दिखाने के काबील ना रहे"![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझा मिलिंदाला झब्बू -
म ब पासून तेवढ्याच अंतरावर रहाते की जेवढी ड.. पण गाड्या बदलाव्या लागतात.
ब चा अर्धा हिस्सा गच्या अर्ध्या हिश्शाला त्यांच्या सामायिक मैत्रिणीच्या अर्ध्या हिश्श्यामुळे ओळखतो.
जबरी वृत्तांत आणि जबरी फोटो..
जबरी वृत्तांत आणि जबरी फोटो..
मिलिंदा एकदम GREचे प्रश्न सोडवायला घेतल्यासारखे वाटते आहे..
सगळे जीआरई प्रश्ण सुटले की
सगळे जीआरई प्रश्ण सुटले की मगच इतरांचे वृ येतील.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आले का वृत्तांत? वा वा! मला
आले का वृत्तांत? वा वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला फोटोत एक मिलिंदाच ओळखता आला.
प्रश्न पहिला- खांद्याजवळ लाल
प्रश्न पहिला- खांद्याजवळ लाल पट्टा असलेला टी शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या मागे एक झॉम्बी सारखे कपडे घातलेली व्यक्ती आहे तिच्या मागे जीन्स घालून जाणारी व्यक्ती आहे जिचा चेहरा काळा केलेला नाही, तर तो लाल पट्टा असलेला टी शर्ट घातलेली व्यक्ती कोण !!?
पुढची तारीख ठरवायला लागा आत्ताच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा धमाल केलेली दिसतेय
अरे वा धमाल केलेली दिसतेय
मला पण मिलिंदा ओळखु आला कारण बाकीच्यांना कधी बघितलेच नाहीये ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>क पुणेकर असणार एकंदरित
>>क पुणेकर असणार
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एकंदरित सगळ्यांवर पुणेकर असणार असा शेरा मारून पाहण्यात आला. पण कोणीच मनावर न घेतल्याने सगळे प्रयत्न वाया गेले.
सगळ्या लोकांची कुठली न कुठली कनेक्शने सापडली. मी इतक्यांदा "माझी एक अमकी मैत्रिण / मित्र तमकीकडे असते/तो, माहितेय का" असे वाक्य बोलले की शेवटी माझी मलाच शंका येऊ लागली.
इराला मराठी किती व्यवस्थित येते हे बघून मी थक्क झाले. (मराठीत बोलणारी कुठलीच छोटी मुले इकडे पाहिली नसल्याने मी मात्र सवयीने सारखी इंग्रजीवर घसरत होते.) इंग्रजीत गणिते आणि मराठीत इतर गप्पा मारून आम्हाला दोघींना खूप मजा आली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास.. अगदी gtg च्या तोडीचा
झकास.. अगदी gtg च्या तोडीचा वृत्तांत ... तसबीर तर झळकलीय, Consent मिळाला कि मग चेहेरे दिसतील ! कोडं मस्त आहे ... gtg ला हजर असलेल्यांना सुद्धा उत्तर शोधण्यासाठी डोकं खाजवावं लागेल ... माझ्या ज्ञानात भर पडली त्यामुळे आता mobile वर मराठी वाचता येतंय ..
भेटू परत लवकरच ...
एका भेटीची कहाणी... ...तर
एका भेटीची कहाणी...
...तर मायबोलीकरांची भेट ठरली आणि तारीख ठरवण्याचे अवघड काम चालू झाले. अमेरिका, आशियायी देश, शेजारी युरोपीअन राष्ट्रे आणि झालंच तर अंतर्गत विरोधक (जसे की स्कॉटलंड, वेल्स इ.) इत्यादी सगळ्यांचे काही कार्यक्रम ठरलेले नाहीत हे पाहून गटग ची तारीख ठरली. खगोलशास्त्रज्ञ आशिष यांनी ग्रहतारे या भेटीसाठी अनुकूल असल्याचा निर्वाळा दिला आणि तयारीला सुरुवात झाली. गटग लंडन मध्येच करायचे की एखाद्या टुमदार शहरात यापासून ते लंडन मध्येच केले तरी कोठे भेटायचे या मुद्द्यांवर बराच अंतर्गत उहापोह झाला.. अर्थातच यातली सगळी पोस्ट्स प्रकाशित करण्यात आलेली नाहीत... (पहिल्यापासून प्रसिध्दीची हौस तशी कमीच बरं का आम्हांला.)
मग लंडन च्या विविध पर्यायांची वेगवेगळ्या निकषांवर पुन्हा पाहणी करण्यात आली. कोणत्या जागी बसायची चांगली सोय आहे, कोणत्या जागी खाण्याचे चांगले पर्याय आहेत, पाऊस असेल तर कोणत्या ठिकाणी असणे सोयीस्कर आहे, कोणत्या ठिकाणी बाजार भरल्यासारखी गर्दी नसेल इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन ही पाहणी झाली. या पाहणीमध्ये राज्यातले जुने मायबोलीकर अमित आणि मिलिंदा सहभागी झाले होते. संयोजन समितीच्या प्रवक्त्यानुसार या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे आखुडशिंगी बहुदुधी गाय मिळण्याइतके किंवा नम्र, मृदुभाषी, अगत्याने बोलावणारे पुणेकर सापडण्याइतके अवघड होते. ***
तेव्हा सारासार विचार करुन असा निर्णय घेण्यात आला की अंतिम निर्णय २-३ दिवस आधी घ्यायचा.
या वरुन मायबोलीवर अनेक टोमणे ऐकायला मिळाले, परंतु काहीही केले तरी बोलणीच खायची याची इथल्या सरकारला (आणि पर्यायाने आम्हांला ही) सवय असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
हवामान खात्याने सुध्दा कोणतीही ठाम भूमिका घ्यायचे नाकारुन थोडा पाऊस , नंतर ढगाळ आकाश आणि मध्ये मध्ये ऊन असेल असे सांगितले. हे एक बरं असतं.. काहीही झालं तरी आम्ही सांगितलं होतं म्हणायला मोकळे. त्यातच जाईजुई ने सांगितले की तिला लंडन दर्शन पण करायचे आहे. त्यामुळे तिला खूप अडचणीचे होणार नाही हे सुध्दा पाहून टॉवर ब्रिज (ज्याला चुकीने लंडन ब्रिज असे काही जण म्हणतात) हे ठिकाण निश्चित करण्यात आले. काही जण लवकर लंडन मध्ये येणार आणि ठरलेल्या वेळेच्या आधी भेटणार असे ठरले. मिलिंदा आणि अदिती मात्र काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आधी जाणार नव्हते. माधुरी आधी जाणार असे तिने जाहीर केले.
शनिवारी सकाळी तयार होत असताना फोन खणखणला. प्रसाद (प्राची चा अर्धा हिस्सा) ने भेट होणार आहे ना याची खात्री करण्यासाठी फोन केला होता. त्याला कल्पना नसणार की आमचं एकदा ठरलं म्हणजे ठरलं.. मग पाऊस पडो वा ऊन पडो.. (इथे शेंडी आणि पारंबी दोन्ही नसल्याने वापरता आले नाहीत याबद्दल लेखक दिलगिर आहेत). तर मिलिंदा तरी नक्की जाणार अशी त्याची खात्री पटवून जाण्याची तयारी करायला सुरुवात झाली. तसे ते लांबून येणार असल्याने खात्री केलेली बरी हा सुज्ञ विचार त्यांनी केला याचा उल्लेख करणे या ठिकाणी आवश्यक ठरेल.
अमित यांचा घसा अचानक धरल्याने ( वयोपरत्वे थंड हवेचा त्रास कधीही होऊ शकतो) त्यांनी सहकुटुंब नकार कळवला. अशा रितीने एक घसा आणि ३ मोहरे निघायच्या आधीच गळले.
तर मिलिंदा, अदिती, त्यांच्या कन्यका आणि मिलिंदाचे आई बाबा, सगळं आवरुन स्टेशन वर पोहोचले आणि कळलं की लंडन मध्ये पाऊस झाल्याने जिथे उतरायचे आहे त्या स्टेशनात पूर आला आहे. सबब ते स्टेशन बंद आहे...झालं..सुरुवातच अशी.. पण आपले लंडनस्थित मायबोलीकर डगमगले नाहीत. तसंही रोज कोणत्या ना कोणत्या मार्गाची सिग्नल यंत्रणा बंद आहे, काम करणारे (चालक , अभियंते, व्यवस्थापन कर्मचारी) संपावर आहेत, रुळ खराब आहेत, गाडी तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त आहे, आणि काहीच नसेल तर रुळावर झाडाचे एक पान पडले आहे अशा कोणत्याही कारणाने इथली गाडी बंद होऊ शकते. असो, तो वेगळा विषय आहे... त्यावर पुन्हा कधी तरी.
तर प्रवासाला सुरुवात झाली आणि फारसे उत्कंठावर्धक काहीही न होता प्रवास पार पडला. मध्येच कळले की माधुरी अजून पोचली नव्हती (तिचे १२ अजून वाजायचे होते :P)
टॉवर हिल स्टेशन ला जागोजागी सकाळच्या पुराच्या खुणा दिसत होत्या... (खरं तर फलाट थोडासा ओला होता, पण तसे म्हटलेले भारदस्त वाटत नाही.) त्यांना चुकवत मायबोलीकरांनी वागामामा कडे प्रस्थान केले.
*** ( माफ़ करा. रा. रा. मायबोलीकरांच्या भेटीला असे (नम्र, मृदुभाषी, अगत्याने बोलावणारे पुणेकर ) मायबोलीकर आले होते..त्यामुळे आता वरील फक्त आखुडशिंगी हाच मुद्दा वैध असणार आहे. लेखकाला कोणत्याच बाजुने असे काहीच म्हणायचे नसल्याने या छपाईतील चुकीबद्दल छापखानाच दिलगिर आहे.)
क्रमशः
वृमध्येही क्रमशः ? छ्या!!
वृमध्येही क्रमशः ? छ्या!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages