रा.रा. गटग वृतांत

Submitted by prachibhave on 27 June, 2011 - 13:33

बामुलाहीजा होशियार.......रा.रा. गटग वृतांत

राणिच्या राज्यातला गटग असल्यामुळे Once upon a time, there was a GTG........असे होऊ नये म्हणून, ashig, Milinda आणि आदिती या थोरामोठ्यांकडून प्रेरणा घेऊन, मी माबोवर पहिला प्रयत्न करत आहे. Happy
२५ जुन ला १२:३० ची swindon -london train पकडली. साधारण २:१५ ला त्याच त्या काँच के मकान wagamama ला पोहचलो. आधीच काही माबोकर स्थानापन्न झाले होते.ते जाईजुई, भावना, mrudula, माधुरी१०१ आणि ashig आहेत हे ओळख परेड नंतर कळाले. मी जाईजुई यांना आदिती म्हणून बरोबर ओळखले.... Wink जाईजुई आणि कुटुंब Tower hill tube station ला दिसले होते, पण आपला मोरु होऊ नये म्हणून तो प्रश्न मी तेथेच गिळला होता...(पोट रिकामेच होते...दाबून चापण्यासठी...) Milinda आणि आदिती यांचे आगमन झाले. माबोकर नसलेला माझा नवरा आणि milinda यांच्यात आधीपासून ओळख निघाल्यामुळे नवरोबांनाही आपलाच गटग वाटला.
पोटपुजेसाठी मागवून आम्ही माबोवर बाफ, प्रतीक्रीया यावर बातचित केली.बरयापैकी सगळेजण सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या ठिकाणांहून आहोत, हे कळ्ल्यावर हवापाण्याच्या गप्पांना ऊत आला. एवढ्यातच कोमलऋषभ पाठोपाठ अप्र्यणा यांचे शाही आगमन झाले.(शेवटी आल्यामुळे शाही....)उशिरा येऊनही कोमलऋषभ यांची डिश आधी आली त्याचा Milinda यांनी निषेध केला.
जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी पुरेपुर घेतला.... प्रची फक्त एकाचीच घेण्यात आली. गप्पा रंगात असतानाच शेवटी wagamama यांनी आम्हाला बाहेर काढू नये यासाठी आम्ही Tower Bridge कडे कूच केले...
Tower Hill च्या backdrop ला प्रची घेण्यात आली. कृपया ती प्रसिदध करावी. म्रुदूलाला माझा मुलगा कोणासारखा दिसतो या प्रश्नांवर मी आणि माझा नवराच एकमेकांसारखे दिसतो हे उत्तर सापडल्यावर हशा पिकला. भावना, जाईजुई दोघीना ATM शोधुन सापडले नाही. ते समोरच होते....दिव्याखाली अंधार तो हाच का?? दिवे घ्या.
Thames नदीच्या काठाकाठाने विहार करत करत आम्ही Tower bridge ही सर केला. Tower bridge open झालेलाही आम्हाला पहायला मिळाला. नदीच्या पलीकडे पोहचताच आईस्क्रीमची मेजवानी झाली.
त्यावेळी आमच्या चिरंजीवानी भूक लागल्यामुळे माझ्याशी रणशिंग फुंकले. गप्पांच्या आघाडिवर माघार घेत मी समस्त उपस्थित माबोकरांचा निरोप घेतला...कोमलऋषभ छान गातात... त्यांचे गाणे ऐकण्याचे नक्की........त्यासाठी पुढचे गटग लवकर होउदे....
हा वृतांत वाचल्यावर मला दिवे आणि शालजोडीतले मिळणार हे नक्की.....तरी प्रयत्न केला आहे..नजर चुकीने काही राहून गेल्यास क्षमस्व..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा, काय लिहायचं काय नाही हे ही पंचांग, वर्तमानपत्र, वेदर फोरकास्ट हे सगळं बघून ठरत असेल गं. Proud

मस्त लिहितोय्स मिलिंदा, लवकर पूर्ण कर. Happy
(बघा बघा, अमेरिकेतले लोक कसे प्रोत्साहन देतात! :P)

>>(बघा बघा, अमेरिकेतले लोक कसे प्रोत्साहन देतात! )
म्हणुन च कि काय बा.रा. करांची सारखी आठवण निघत होती. Happy

Pages