Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लांबुळक्या वांग्यांचं काय
लांबुळक्या वांग्यांचं काय करतात? आमच्या घरी वांगी भरली वांगी किंवा भरीत या दोनच प्रकारे केली जातात. परवा दिराला ४ लंबे बँडएड घेवून ये असे फोनवर सांगितल्यावर तो अर्धा किलो लंबे बैंगन घेवून आलाय.
आता त्याचं काय करावं?
वांग्याचे काप करा. मस्त खरपूस
वांग्याचे काप करा. मस्त खरपूस खमंग.
प्रज्ञा, शॅलो फ्राय करायचे की
प्रज्ञा, शॅलो फ्राय करायचे की डिप फ्राय. आणि ते कश्यात घोळवावे लागतिल का? बेसन किंवा रव्यात वैगरे?
अल्पना, Eggplant parmesan कर.
अल्पना, Eggplant parmesan कर. छान होतो हा प्रकार.
वांग्याचे कापः "रुचिरा" तून
वांग्याचे कापः "रुचिरा" तून साभार
वांग्याच्या कापांना चवीप्रमाणे तिखट, मीठ लावून १५-२० मिनिटे ठेवायचे. तांदूळ पिठीत चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग, जिरेपूड घालून, नीट सारखं करून काप त्यात बुडवून, जरा दाबून घेऊन तेलावर शॅलोफ्राय करायचे. मंद आंचेवर करायचे म्हणजे कुरकुरीत होतात. गरम गरम बेस्ट!
व्हेरिएशन हवंतर गरम मसाला वगैरे घालून बघायला हरकत नाही घोळवताना. मी ट्राय नाही केलंय.
वांगी-बटाट्याची भाजीही छान
वांगी-बटाट्याची भाजीही छान होते. इथे सशलने दिलेली एक कृती आहे : http://www.maayboli.com/node/14090
सावनी, सगळं सामान जवळच्या
सावनी, सगळं सामान जवळच्या दुकानात नाही मिळणार. त्यामूळे नंतर कधीतरी.
प्रज्ञा, तांदळाच्या पिठीला काही पर्याय असेल तर सांग ना. इथे मिळत नाही. आईकडून आणलेली संपलिये.
अल्पना, गव्हाची न चाळलेली
अल्पना, गव्हाची न चाळलेली कणीक किंवा बारिक रवाही चालेल.
ओके.
ओके.
अल्पना, उपम्याचा रवा लावून
अल्पना, उपम्याचा रवा लावून सुद्धा काप छान होतात.
किंवा १-१.५ इंच लांब तुकडे कर , प्रत्येक तुकड्याच्या एका बाजूने + आकाराची चीर दे अन त्यात मसाला भरून भरली वांगी कर. इथे इटालियन वांगी मिळतात त्याची करते मी .
ओके , अल्पना
ओके , अल्पना
अल्पना थोडा खटपट करायला वेळ
अल्पना थोडा खटपट करायला वेळ असेल तर ही रेसिपी बघ.
http://kha-re-kha.blogspot.com/2010/12/blog-post_5500.html
अल्पना, हेपण पहा. छान वाटतय.
अल्पना, हेपण पहा. छान वाटतय. कैरी वांग चटणी.
http://www.maayboli.com/node/14733
तसल्या लांब वांग्याचा वापर
तसल्या लांब वांग्याचा वापर इथे सर्व दाक्षिणात्य मैत्रिणी वांगी बाथमध्ये करतात. त्यामुळे आवडत असेल तर तयार मसाला (MTR) वापरुन तेच करा.
अल्पना, वांग्यांचा निकाल
अल्पना, वांग्यांचा निकाल लागला नसेल तर हे पण करुन पहा...
वांगी लांबीला पातळ स्लाईस करुन घ्यायची - रिबीन्स सारखी लांब, गोल चकत्या नव्हेत.
बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रुफ पेपर ठेउन त्यावर हे स्लाइसेस पसरायचे. वरतुन ऑऑ घालायचे आणि हाताने सगळ्या स्लाइसेस ना लावायचे, वरतुन जाडे मिठ भुरभुरवायचे आणि रोस्ट करायचे.
तयार स्लाइसेस लगेच वापरायचे नसतिल तर एका बरणीत ऑऑ घालुन त्यात ठेवायचे. बरणीच झकणं घट्ट पाहिजे.
असे स्लाइसेस नंतर् रोस्ट व्हेजी सॅल्ड मधे, सँडविचेस मधे घालुन मस्त लागतात. यावर रोस्ट करताना इटालियन हर्ब्ज वगैरे पण घालु शकतेस.
मी तर खरपूस भाजी करते या लांब
मी तर खरपूस भाजी करते या लांब वांग्यांची. एक सेंमी च्या फोडी करुन भरपूर लसूण्-कांदा-काळा मसाला-शेंगदाणे कूट-धनेपूड्-जिरेपूड घालून जराश्या जास्त तेलावर मस्त परतून. आमच्या घरी तरी आवडते, फक्त ती वांगी जरा जास्त शिजली तर उगाच लोळागोळा होतात म्हणून लक्ष ठेवावं लागतं. सोपी आहे अन चव भरल्या वांग्यासारखीच पण कोरडी भाजी.
.
.
.
.
रवा आणि खोबर्याचे लाडू
रवा आणि खोबर्याचे लाडू बनवताना मिश्रण पाकात टाकल्यावर निट एकजीव केल्यावर लगेच गॅस बंद करायचा की थोड्यावेळाने. आणि मिश्रण थंड झाल्यावरच लाडू वळायचे ना..
कोणी सांगेल का ?
पाक झाला की भांडं खाली उतरवून
पाक झाला की भांडं खाली उतरवून रवा-खोबरं पाकात एकजीव करायचं आणि मिश्रण थंड झालं की लाडू वळायचे.
थंड झालं तरी मिश्रण सैलसर असेल तर पुन्हा थोडं गरम करायचं आणि जर घट्ट/ कडक झालं असेल तर जरा दुधाचा हात लावून लाडू वळायचे.
पाक पाण्याऐवजी दुधात केले तर
पाक पाण्याऐवजी दुधात केले तर लाडू बिघडत नाही .मी रवा मंद आचेवर भाजते. लाडू पांढरेशुभ्र होतात. समजा बिघडलेच तर, म्हणजे मिश्रण घट्ट वाटलं तर अजून दुध घालायचे, सैल झालं तर परत शिजवायचं
रोटीसेरी चिकन वापरून देसी
रोटीसेरी चिकन वापरून देसी स्टाईलचं ग्रेव्ही वालं चिकन करता येईल का? कुणी करून पाहिलं आहे का? असल्यास काही टिप्स आणी ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी शेअर कराल का ? धन्यवाद !!
काळे चणे आहेत घरात. काय करतात
काळे चणे आहेत घरात. काय करतात याचे ?
वर्षे, काळ्या चण्यांची ओलं
वर्षे, काळ्या चण्यांची ओलं खोबरं+हिरवी मिरची वाटुन वाटणं करुन गोडी ऊसळ, किंवा ओलं खोबरं+ लसुण+आलं+लाल मिरची असं वाटणं करुन झणझनीत उसळ करायची.
वक्के जो.. उद्या डब्यात हिच
वक्के जो.. उद्या डब्यात हिच उसळ
बागेतून टिल्लू बटाटे निघाले
बागेतून टिल्लू बटाटे निघाले आहेत. ६ बटाटे, साधारण लिंबाएव्हढे.
त्यांचे विशेष असे काय करावे?
मृदुला ग्रिल्ड बटाटे आवडतात
मृदुला ग्रिल्ड बटाटे आवडतात का? बटाट्याचे सालासकट चार तुकडे करून त्यावर ऑलिव्ह ऑईल, चिली फ्लेक्स्,रोझमेरी,गार्लिक सॉल्ट, मीठ्,मीरपूड घालून ग्रील करायचं किंवा ओव्हन मधे ठेवून बेक करायचं. छान चव येते.
ग्रिल करून बघते.. सगळे घटक
ग्रिल करून बघते.. सगळे घटक आहेत घरात (कधी नव्हे ते!)
धन्यवाद प्रॅडी.
मला चोकोलेट-चिप्स कूकिस ची
मला चोकोलेट-चिप्स कूकिस ची रेसिपी हविये. वर दिलेल्या लिन्क्स मध्ये दिसली नाही. आणि अजून एक प्रश्न आहे. मी चोको-चिप्स टाक्ल्या होत्या केक मध्ये.. तर सगळ्या तळाला जाऊन बसल्या... कूकिस मध्ये किन्वा केक मध्येही अस होउ नये म्हणून काय करावे?
इथेच विचारला हा प्रश्न तर चालेल न? की अजून कुठे?
गोगो, चॉकलेट चिप्स केक मधे
गोगो, चॉकलेट चिप्स केक मधे घालताना आधी साध्या मैद्यात थोड्या घोळवुन घ्यायच्या. त्याने चिप्स खाली तळाला बसत नाहीत. नीट मिक्सहोतात.
चॉक-चिप कुकीज ची रेसिपी टाकते.
Pages