Submitted by विदेश on 16 May, 2011 - 01:24
( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)
गातेस घरी तू जेव्हां
जीव सुटका-सुटका म्हणतो
शांतीचे विणता धागे
संसार नेटका होतो !
छत भंगुन वीट पडावी
हल्लाच तसा ओढवतो
ही पाठ कणाहिन होते
अन् चेहरा बारका होतो !
ये घरमालक दाराशी
हळु गाण्या , तो खडसावे
खिडकीच्या उघडुन दारा
तो बोंबा मारून जातो !
वळ पाठी उमटवणाऱ्या
मज स्मरती मास्तर शाळा
वेताने मज बडवावे
मी तसाच बघ थरथरतो !
तू सांग बये मज , काय
मी सांगू घरमालकाला ?
गाण्याचा तव जल्लोष
माझ्यासह किरकिर ठरतो !
ना अजून झाला तंटा
ना ताळतंत्रही सुटले
तुज ' गाऊ नको ' म्हणताना
गाण्यातच सामील होतो !!
गुलमोहर:
शेअर करा
खुप छान लिहिली आहे.मला आवडली.
खुप छान लिहिली आहे.मला आवडली.
(No subject)
प्रचंड हसलो...!
प्रचंड हसलो...!
मस्त जमलीये
मस्त जमलीये
(No subject)
मस्त जमलीये
मस्त जमलीये
अरे देवा रे!! बिच्चारीला गाऊ
अरे देवा रे!!
बिच्चारीला गाऊ पण नाही देत कुणी!
पण कविता आवडली हो! खासच!
ओ ति बिचारी तुमचा विचार करुन
ओ ति बिचारी तुमचा विचार करुन बाहेर गात नाय तर तुमी तिला घरातही गाउ देत नाय? .. हा अन्याव हाय :
खुप हसलो.....हसतोय अजुन...!
खुप हसलो.....हसतोय अजुन...!
माझा पायगुण किती छान आहे.मी
माझा पायगुण किती छान आहे.मी पहिला प्रतिसाद दिला आणी नंतर लगेचच किती प्रतिसाद आले.(:खोखो: :हाहा:)
वाह
वाह
:) :)
लै भारी.....
लै भारी.....
(No subject)
(No subject)