रा . रा. मायबोलीकरांची भेट.. २५ जून २०११

Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता: 
लंडन

सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्‍याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...

कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज

Wagamama

http://www.wagamama.com/locations/showlocation/549

2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897

transport information : nearest tube: tower hill

कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर

अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृदुला,

टॉवर हिलला ला डिस्ट्रिक्ट आणि सर्कल लाईन्स येतात.

सर्कल लाईन व्हिक्टोरिया पासून पुर्वेला जाणारी चालेल
डिस्ट्रिक्ट लाईन पुर्वेला जाणारी इलिंग ब्रॉडवे / हॅमरस्मिथ / अर्ल'स कोर्ट पासून चालेल

अधिक माहिती इथे... http://www.tfl.gov.uk/tfl/livetravelnews/realtime/track.aspx?offset=weekend

अदिती,
मी, मिलिंद (+ २ मोठे, २ छोटे ) = ६ >>>> तुमचे ४ चे एकदम ६ कसे आणी कधी झाले.. :))

पाऊस असेल असे गृहित धरुन wagamama चे बुकिंग करते.>>>>>त्या दिवशी बहुतेक पाउस नहिये..... शुभ शुभ बोल...

पाऊस नसेल तर आपल्याला बाहेर बरीच जागा आहे तेथे
असेल आणि नसेल तरी तर मामा आहेतच.

माधुरी, माझे आई बाबा आले आहेत.

शनिवारीच भेटत आहात तर विंबल्डनच्या हिरवळीवर तरी भेटायचत की... मस्त टेनिस बघताबघता स्ट्रॉबेरी विथ क्रीम खात खात गटग केला असतात.... Happy

आज संध्याकाळपासून रांगेत झोपावे लागले असते रे बाबा Happy

आणि शनिवारी वगैरे (गर्दीच्या दिवशी) दुपारपासून क्रीम नाही , फक्त दूध मिळते, ते पण लो फॅट Sad

टुमदार हा निकष ठेवला तर लंडन पेक्षा बाहेरच्या गावांत जायला लागेल, मग केम्ब्रिज, ऑक्सफर्ड इ. काही वाईट नाही Happy

अरे वा, आई बाबा पण आहेत का?

मग आम्ही ३ मोठे + १ लहान...

पण ३ला नक्की भेटा बरे.. नाही तर पोटातले कावळे आम्हाला उडवून नेतील.. Proud

नशीब गटगची जागा ठरली २५ तारखेच्या आत, हे ही नसे थोडके. आता २५ ला भेटा मात्र नक्की Proud
गटगला शुभेच्छा!! भरपूर धमाल करा. वृत्तांत लिहा.

बघितलत ना.. आमच कित्त्ती शिश्टिम्याटिक असते ते.... पोस्टांचा भडिमार नाही.. कुठे गोंधळ - गडबड नाही ... कनफ्युजन नाही.... आता तुम्ही शिका आमच्या कडुन... Happy

१०० झाल्या की नाही ? >>>> झाल्या झाल्या बहुतेक Happy

रुनी, तु बघ च आता कसा मस्त व्रुत्तांत लिहितो आम्ही ते.. Happy
सिण्डी, रुनी, धन्स शुभेच्छा बद्दल...
मिलिंदा, तुझ्या आइ-बाबां ना भेटुन छान वाटेल...

काय जमतंय का? Biggrin
(ही कमेंट खास मिलिंदाच्या आग्रहावरुन. नाहीतर उगाच काड्या लावायला मला आवडतच नाहीत) Proud

अरे हो, जाताजाता- गटगला भरपूर शुभेच्छा Happy

शुभेच्छा!!
खा, प्या, गप्पा मारा. गॉसिप करा ('जिथे गॉसिप नाही, त्याले जीटीजी म्हणू नये' असं कोणीतरी म्हणून गेलंय..)
वृत्तांत लिहा.
पुढच्या वेळी मी येणार!

Pages