कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
गेल्या वर्षी लहान मुलांच्या
गेल्या वर्षी लहान मुलांच्या टीशर्टाचे माप काय पद्धतीने घ्यायचे हे दिले होते. ते प्लीज इकडे चिकटवता येईल का हेडरमध्ये?
शर्ट कुरुयर/ पोस्टाने
शर्ट कुरुयर/ पोस्टाने पाठवायचीव सोय आहे का?
मलाही लहान मुलींसाठी घ्यायचे
मलाही लहान मुलींसाठी घ्यायचे आहेत. कृपया मागच्या वर्षीची मापे डकवता येतील का इथे??
लहान मुलांच्या वयामधे २०
लहान मुलांच्या वयामधे २० मिळवायचे. उदा. ४ वर्षे वय असेल तर साईज २४
नोंदणी केली आहे.
नोंदणी केली आहे.
२ वर्षाच्या मुलाकरीता कोणता
२ वर्षाच्या मुलाकरीता कोणता साईज बरोबर होईल???
ओके भ्रमरची पोस्ट मी उशीरा
ओके भ्रमरची पोस्ट मी उशीरा पाहिली.
आम्ही कराड(जि.सातारा) येथे
आम्ही कराड(जि.सातारा) येथे राहतो. Online पेमेंट करु शकत नाही तर आम्ही पेमेंट कसे करायचे? व टि-शर्ट कसे मिळेल ?
पुढच्या वर्षापासून कॉलर
पुढच्या वर्षापासून कॉलर असलेले शर्ट ठेवा.. सगळीकडे वापरता येतात..
नोंदणी केलेल्या सर्व
नोंदणी केलेल्या सर्व माबोकरांना धन्यवाद
>>>>शर्ट कुरुयर/ पोस्टाने पाठवायचीव सोय आहे का?>>>> जा.मो.प्या...कुरीयर/ पोस्टाने पाठवणे
सध्या तरी शक्य नाही.
पुढच्या वर्षापासून कॉलर असलेले शर्ट ठेवा>>>> या प्रकारची सुचना यापुर्वी ही आलेली आहे. यापुर्वीही एकदा कॉलर असलेले शर्ट आपण केले होते. पण कॉलर टी-शर्ट केल्यास सुलेखन करता येणे तांत्रिकद्रुष्ट्या कठीण आहे त्यामुळे आकर्षकता थोडी कमी होते तसच थोडी किंमतही वाढ्ते.
नोंदणी केली आहे.
नोंदणी केली आहे.
विकासत्रिमिती>>> सध्या तरी
विकासत्रिमिती>>> सध्या तरी सातारला टीशर्ट पाठवणे शक्य नाही. पण आपले मुंबै/पुणे येथील नातेवाइक/मित्र अथवा कोणी माबोकर संपर्कात असतील तर त्याम्च्यामर्फत तुम्ही संयोजकांपर्यंत पोहोचु शकता.
मी जर ऑनलाईन नोंदणी केली तर
मी जर ऑनलाईन नोंदणी केली तर माझे आणि इथल्या मायबोलीकरांचे टिशर्ट्स कोणी घेऊन ठेवेल का स्वतःकडे? मला ठाण्याहून वगैरे पिकप सोप्पं पडेल.
सायो असं नक्की करता येइल पण
सायो असं नक्की करता येइल पण नोंदवलेल्या टीशर्ट्सचे पैसे ठरल्यातारखेपर्यंत संयोजकांकडे/किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करता येतील. तसच ही टीशर्ट ठाण्यातील कॊणाकडे द्यायचे याचाही तपशील दिलात तर उत्तम
ज्यांचे टिशर्ट मला आणायचे
ज्यांचे टिशर्ट मला आणायचे आहेत त्यांना ऑनलाईन पेमेंटनेच भरायलाच सांगेन. मग तर काही हरकत नाही. ठाण्यातल्या कुणाला तरी विचारेन.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. ठाण्यात आनंदमैत्रि/घारुआण्णांकडे संपर्क करता येइल
मला गेल्या वर्षीचे टीशर्टं
मला गेल्या वर्षीचे टीशर्टं अजून मिळालेले नाहीत. त्यावेळच्या संयोजक मंडळातल्या एका आयडीला(आता नाव आठवत नाही) संपर्क केला होता. पण दोनदा विचारपुशीत लिहून देखिल त्यांनी दखल घेतली नाही. फचिन साक्षी आहे. असो,
यंदाच्या टीशर्टासाठी कोणाला संपर्क साधावा? कृपया कोणी माझ्या वतीनं पैसे भरेल का? मी लागलीच इथून किंवा बंगलोरातून चेक पाठवण्याची व्यवस्था करते.
सायो, कृपया माझे टीशर्टं पण आणशील का?
सायो, मृण हम है ना
सायो, मृण हम है ना
हो मृ, नक्की आणेन. ऑनलाईन
हो मृ, नक्की आणेन. ऑनलाईन पैसे भरायचा ऑप्शन सिलेक्ट कर, ऑर्डर टाक आणि साईज मला मेल कर.
मंजूडी, थांकु.
मला गेल्या वर्षीचे टीशर्टं
मला गेल्या वर्षीचे टीशर्टं अजून मिळालेले नाहीत. अरेरे त्यावेळच्या संयोजक मंडळातल्या एका आयडीला(आता नाव आठवत नाही) संपर्क केला होता. पण दोनदा विचारपुशीत लिहून देखिल त्यांनी दखल घेतली नाही. फचिन साक्षी आहे. असो, >>> शिरीयस मॅटर!
मृण्मयी बहुदा परेश लिमये
मृण्मयी
बहुदा परेश लिमये यांना विचारले असावेस असे वाटतेय पण नक्की आठवत नाही. उसगावातल्या बर्याच जनांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. नंतर टीशर्ट समिती >> विवेक देसाई >> परदेसाई असे काही टीशर्ट आले होते
टी-शर्ट ग्रीन आणि टोपी मात्र
टी-शर्ट ग्रीन आणि टोपी मात्र ब्ल्यू ये फंडा कुछ जम्या नही.
मागणी नोंदवलेय!
मागणी नोंदवलेय!
मृण्मयी, आपण नोंदणी
मृण्मयी,
आपण नोंदणी केल्याप्रमाणे, लेडिज-४०साइझ-२नग, माझ्याकडे तुमच्या नावे अजुनही ठेवलेले आहेत. आपल्या प्रमाणेच आणखीही २-४ जणांचेही शिल्लक आहेत.
माझ्याकडील नोंदीप्रमाणे श्री सचिन बादरायणी मला भेटुन तुमचे टीशर्ट घेउन जाणार होते. पण पुढे त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही. पुण्यात ज्यांना समक्ष येउन टीशर्ट घेउन जाणे जमले नाही अशांना , मला जेव्हडे शक्य होते त्यांना मी स्वतः जाउन पुढचा महिनाभर जाउन टीशर्ट देउन आलो. नंतर पुन्हा पुन्हा पाठपुरावा करणे कामाच्या व्यापात जमले नाही.असो.
अजुनही कोणाकडे आपले टीशर्ट द्यावयाचे आहेत ते कळवा. मी समक्ष देउन येइन.
धन्यवाद, गैरसोयीबद्दल क्षमस्व.
माझा भ्रमणध्वनी: ९८९०४३०१२३.
email: limayeparesh@gmail.com
विकासत्रिमिती>>> मी पुढच्या
विकासत्रिमिती>>> मी पुढच्या आठवड्यात कराडला येणार आहे (कराडचाच आहे) माझ्याकडे पैसे दिले तरी चालतील.
वा! टीशर्ट मस्त दिसतोय.
वा! टीशर्ट मस्त दिसतोय. भ्रमा, धन्यवाद लहान मुलांच्या मापाबद्दल. करते नोंदणी आता.
टि आणि कैप शर्ट त्वरीत सशुल्क
टि आणि कैप शर्ट त्वरीत सशुल्क नोंदवा>> कैप शर्ट म्हणजे काय? आणि सशुल्क नोंदवा म्हणजे नोंदणी करतानाच पैसे भरायचेत का? कसे, कुठे भरायचे ते पैसे?
मंजूडी, फक्त दुसर्यांच्या
मंजूडी,
फक्त दुसर्यांच्या चुकाच काढायच्या का?
हो, मी डुप्लिकेट आहे.
अहो पण संयोजक काय ते मला
अहो पण संयोजक काय ते मला उत्तर देतील किंवा वरच्या तपशीलात बदल करतील की... तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय डुआय/ ट्रिआय/ क्वाआय किंवा जे कोण असाल ते
संयोजक, ऑर्डर नोंदवताना या बाफमधील मसुद्याची शेवटची ओळ कॉपी-पेस्ट केली गेली आणि साहजिकच माझा गोंधळ उडाला. तसाच गोंधळ इतरांचाही होण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
धन्यवाद मंजुडी. बदल केला आहे.
धन्यवाद मंजुडी. बदल केला आहे.
Pages