READY!!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काल काही मित्रांसोबत READY!!! पाहिला.

प्रमुख भुमिका: सलमान खान. असिन थोट्टुमकल.

गाणी: ढिंक चिका. कॅरेक्टर ढिला. हमको प्यार हुवा है.
* म्युझिक : प्रितम.

टारगेट ऑडियन्स : कॉलेजकुमार/कुमारींसाठी (ज्यु. कॉलेज) किंवा दुसरी-तिसरीतली पोरं.

- हा चित्रपट बहुधा एका रात्रीत शुट झाला आहे. सलमान सतत झोपलेल्या डोळ्यांनी वावरतो.
अतीच झाल्यावर अधेमधे चष्मा घातला आहे.

- असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.
-त्या ट्रेनीला समीरा रेडी आवडत असावी. असिनला तसाच लुक दिला आहे. (कॉस्च्युम डिजायनरही मिळालेला दिसतो त्याला. तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत आणि हिला घालावेत.
<संपादन> * आणि असिनचे आधीचे तिला घालावेत. )

- "चित्रपट कसा वाटला" ह्या प्रश्नाचे उत्तर HITCH मधे सॅरा मिलास, 'हीच' ला सांगताना म्हणते त्याप्रमाणे, 'Well, There was a beginning, I remember an interval and yes, there was THE END!'

--------------------------------------------------------------------------------

एकूण काय तर "READY!!!" मधेही कंगना राणावतच सुंदर दिसते.
* आपला पैसा वसुल.

प्रकार: 

सव्वा दोन वर्षाचा आहे....मला वाटल झोपेल पण नाही....सगळा सेनेमा त्याने...एन्जॉय केला << म्हणजे टारगेट ऑडीयन्स बरोबर...
मी बघायला गेलो ती लिंक तर एकदम सगळी गोल गोल अक्षरं.. मग लक्षात आलं वरिजनल तेलगू आहे म्हणून..
तसा हिंदी पण टाकलाय तिकडे..

काय सिनेमा आहे ! भयानक डोके दुखले ...
असीन चा मेकप असा काय केला आहे कुणास ठाऊक ?कारण गजनी मध्ये छान दिसली होती तशी ...परत कधी सिनेमा मिळू नये अशी व्यवस्था करायची होती कि काय असे वाटत होते...."तोतापुरी आम और केले जैसी शकल " असे सल्लू कौतुकाने म्हणायचं तिला ते पण खरे वाटायला लागले होते...
आणि घरचा पिक्चर म्हणून वाटेल ते संवाद ...अरेरे !कोणीतरी बाहेर काढा मला असे वाटत होते ...बिच्चारी असीन असे काय सीन केले होते म्हणून मेकपमन पण चांगला मिळू नये ! आणि अनुराधा पटेल कोणत्या तरी angle ने सल्लू ची आई वाटत नाही ...
आणि खुबसुरत असा संजय दत्त चा सिनेमा आला होता त्यात "वो " "वो " करणारा होताच कि त्यामुळे ती कल्पना पण चोरलेली !
खरच का असे सिनेमे काढतात कुणास ठावूक !

फक्त सलमान आहे म्हणुन बघीतला. पण रेडीपेक्षा दबंग चांगला होता. बाकी सलमानचे सिनेमे डोक्याला विश्रांती देवुन बघायचे असतात. फुल २ टाईम पास. यात त्याची बॉडी जबरदस्त वाटली.

"हमको प्यार हुआ" या गाण्यात असिन सलमानच्या बघून actions करते असं वाटतयं.....
खास करून ती "पूरी हुई दुवा" वाली action......... Sad

जास्त विचार न करता बघितला तर Full To time pass आहे. farcical आणि screwball comedy च्या मधे कुठे तरी बसेल. सढळपणे चिमटे काढलेत बर्‍याच जणांना .... मजा आली.

रेडीमध्ये सलमान {राम कपूर, भरत कपूर, लक्ष्मण कपूर, दादा चौधरी, अमर चौधरी, अमर चौधरी, सूरज चौधरी, वीर, लहरी, गुरूजी, छोटे गुरूजी} यांच्यापेक्षा चांगला दिसतो.
रेडीमध्ये कंगना सलमानपेक्षा चांगली दिसते.

ती असीन मला आधी सोनाली कुलकर्णीच वाटत होती.>>> तशी मला सोनाली सुद्धा आवडत नाही पण आसीन का फासिन पेक्षा परवडली.. ओव्हर अ‍ॅक्टींग करते ही बया.. बॉडी लँग्वेज सुद्धा अतिशय उद्धट आहे.

बाकी रेडी पाहिला नाही, पाहिन असं वाटत ही नाही.

पिक्चरमध्ये आसिनपेक्षा अनुराधा पटेल खुपच बघणेबल होती. आसिनचा मेकअप, कपडे, सर्वच गचाळ. अ‍ॅक्टिंग स्ट्रेट आउट ऑफ गजनी. तसंहि सल्लुपुढे छान दिसायला ती अ‍ॅश थोडिच आहे.

तशी मला सोनाली सुद्धा आवडत नाही पण आसीन का फासिन पेक्षा परवडली.. ओव्हर अ‍ॅक्टींग करते ही बया.. बॉडी लँग्वेज सुद्धा अतिशय उद्धट आहे.
>>>>>

एकाच सिनेमात लोक काय काय आणि किती किती बघतात....... Proud

> अनुराधा पटेल
तिने आईसदृश कपडे घालावेत अशी सुचना आमच्यापैकी कोणीतरी केल्याचे स्मरते.

> तसंहि सल्लुपुढे छान दिसायला ती अ‍ॅश थोडिच आहे.
अ‍ॅश असती तर पाहिलाच नसता सिनेमा

>यात त्याची बॉडी जबरदस्त वाटली.
हा! १० सेकंद्द असेल पण भारी वाटली!!

>एकाच सिनेमात लोक काय काय आणि किती किती बघतात....... फिदीफिदी
Happy

Pages