रा . रा. मायबोलीकरांची भेट.. २५ जून २०११

Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता: 
लंडन

सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्‍याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...

कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज

Wagamama

http://www.wagamama.com/locations/showlocation/549

2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897

transport information : nearest tube: tower hill

कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर

अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गटगसाठी शुभेच्छा.. ह्यावेळी जमणार नाही पण सप्टेंबर नंतर पुन्हा काही ठरले तर सांगा.. मी तेंव्हा काही दिवस तिथे असणार आहे... Happy

पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही. >>> Lol

चिमण बहुधा येऊ शकणार नाहीये.
स्वाती येणे सुध्दा अवघड आहे

केपी, म्हणून तर तुला बोलवत होतो Wink

मला यायला आवडलं असतं पण बेल्जियम मधून राणीच्या राज्याचा विसा होत नाही हल्ली..

मजा करा..

का बरं होत नाही व्हिसा ? >>
राणीनं बेनेलक्स देशातली व्हिसा प्रोसेसिंग सेंटर्स बंद केलीत. व्हिसा घ्यायला आता पॅरिसला जावं लागतं

आरती... (तो प्रश्न माझ्यासाठी आहे असं समजून उत्तर देतो )मी नोव्हेंबर २०१० पासून आहे इथं

मुंबईमध्ये भाषांतर सुविधा (Certified translation Service) कुठे आहे. व्हिसा चा प्रॉब्लेम झालाय, जन्म तारखे च्या दाखल्याचे भाषांतर Certified translator कडुन केले नाहीये ह्या सबबीवर मुलीचा व्हिसा नाकारलाय.

कोणाला माहीत आहे का एखादा Certified translator, ज्याचे भाषांतर यु.के. एंबसी मध्ये स्विकारले जाते?

अरे ठिकाण ठरवा पटकन.... मिलिंद ने तिकडे ऑप्शनस दिले होते (ते आता वाहुन गेलेत Sad ) त्या पैकी तरी एक फायनल करुया.. (रीजंट पार्कला, लंडन आय, हाईड पार्क,.......)

परत इकडे लिहिते. माझे मत रीजंट पार्कला. पण इतर दोन पर्यायही चालतील.

किती वाजता भेटायचे ते ठरवूया म्हणजे तिकीट काढता येईल.

साधारण १४.३० - १५.०० ला भेटायचे ठरवुया असे वाटते.

ठिकाण बर्‍यापैकी हवामानावर अवलंबून आहे त्यामुळे अजून निश्चित केले नाहीये.

>>हवामानावर अवलंबून
खरंय.
सध्याचा कल बघता रिमझिम पाऊस असेल असे गृहित धरून चालू.
त्या दृष्टीने कुठे जमता येईल?

त्यांना आपल्याकडून शिकायची गरज आहे. इतक्या वेळात एन्जेत दोन तीन गटग आणि बीबीवर ५०० पोस्टींचा पाऊस पडून जातो. Proud

Pages