READY!!!
काल काही मित्रांसोबत READY!!! पाहिला.
प्रमुख भुमिका: सलमान खान. असिन थोट्टुमकल.
गाणी: ढिंक चिका. कॅरेक्टर ढिला. हमको प्यार हुवा है.
* म्युझिक : प्रितम.
टारगेट ऑडियन्स : कॉलेजकुमार/कुमारींसाठी (ज्यु. कॉलेज) किंवा दुसरी-तिसरीतली पोरं.
- हा चित्रपट बहुधा एका रात्रीत शुट झाला आहे. सलमान सतत झोपलेल्या डोळ्यांनी वावरतो.
अतीच झाल्यावर अधेमधे चष्मा घातला आहे.
- असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.
-त्या ट्रेनीला समीरा रेडी आवडत असावी. असिनला तसाच लुक दिला आहे. (कॉस्च्युम डिजायनरही मिळालेला दिसतो त्याला. तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत आणि हिला घालावेत.
<संपादन> * आणि असिनचे आधीचे तिला घालावेत. )
- "चित्रपट कसा वाटला" ह्या प्रश्नाचे उत्तर HITCH मधे सॅरा मिलास, 'हीच' ला सांगताना म्हणते त्याप्रमाणे, 'Well, There was a beginning, I remember an interval and yes, there was THE END!'
--------------------------------------------------------------------------------
एकूण काय तर "READY!!!" मधेही कंगना राणावतच सुंदर दिसते.
* आपला पैसा वसुल.
मला रेडी अतिशय आवडला. सलमान
मला रेडी अतिशय आवडला. सलमान तर फारच आवडला कातील दिसतो यार या वयात पण. "कोई तो रोकलो" हा ड्वायलॉक आवडला. आवरा चं हिंदीकरण परफेक्ट. असीनचा मेकप गंडलाय पण मला तीचाही अभिनय आवडला. एकंदरीत पैसा वसूल सिनूमा हे बॉस.
आता हे वाचून कुणाला माझी आभिरुची ढासळली आहे वगैरे वाटेल but I dont care
मीन्वा मला तुझ्या बद्द्ल
मीन्वा मला तुझ्या बद्द्ल साहानूभुति वाटते
मास्तर मला असिन आवडते हो फार
रेडी ठीक ठीक.
रेडी ठीक ठीक.
तिच्या कुठल्याही सिनेमातले
तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत आणि हिला घालावेत<<< ऋयामा, आपले रंगीबेरंगी पान असले तरी हे वाक्य जरा जस्तच बोल्ड वाटते नै का ???
बाकी सिनेमा वगैरे मे आपुन नॉट मच इंटरेस्टेड.
ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच
ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते. >>
एकूण काय तर "READY!!!" मधेही
एकूण काय तर "READY!!!" मधेही कंगना राणावतच सुंदर दिसते.
>>>
हो कंगना सुंदरच दिसते.
बाकी असिनपण चांगलीच दिसते. आता तिचा मेकअपमन ट्रेनी असला म्हणुन काय झाल?
गाणी ऐकुनच कळ्ळा की पैसा वसुल
(No subject)
रेडी पहायची अजून मानसिक तयारी
रेडी पहायची अजून मानसिक तयारी झाली नाही.......
तिच्या कुठल्याही सिनेमातले
तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत
>>>>
चला पुढच्या लेखात आता ऋयामाला "समीरा रेड्डी" खूप म्हणजे खूपच सुंदर दिसणार तर
ऋयामा, लेखाचं शीर्षक "रेडी..
ऋयामा,
लेखाचं शीर्षक "रेडी.. स्टेडी..... डोंट गो" असं करायला हरकत नाही मग.
रेडीमध्ये असिन ही {ट्युलिप
रेडीमध्ये असिन ही {ट्युलिप जोशी, माँ, बडी चाची, छोटी चाची, बडी मामी, छोटी मामी, अमर चौधरीची आई/अमर चौधरीची सून, नौकरानी १, नौकरानी २} यांच्यापेक्षा सुंदर दिसते.
रेडीमध्ये कंगना राणावत असिनपेक्षा सुंदर दिसते.
रेडी!!!मध्ये कंगना राणावतच सुंदर दिसते.
असिनचा मेकअप नक्कीच कोणी
असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.
>>>>>>>
ऋयामा,
त्याचं उत्तर त्यातल्या एका गाण्यात दडलेलं आहे...
"बारा महिने मे बारा तरिकों से तुझको मेक-अप कराऊंगा मै....... "
एकंदर चित्रपट १२ महिन्यात पूर्ण केला असणार आणि कंट्युनिटीची बोंब असणार (जी आपल्या सिनेमात असतेच )
धिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ..... ए ए ए ए
@ सगळे @लाजोजी योग्य ते बदल
@ सगळे
@लाजोजी
योग्य ते बदल करतो.
सर, _/\_
भुंगेश पुढचा एक सुनेमा हेरला आहे, डबल धमाल का काहीतरी. त्यातही करांजी आहे
एएएएएएएएएएएएए धिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ....ए ए ए ए डोळा मारा
कंगना आहे का रेडि मध्ये????
कंगना आहे का रेडि मध्ये???? पिक्चर पाहताना मध्येच झोप लागली मला म्हणून दिसली नाही बहुतेक.
त्या रेडीत म्हणे सलमान म्हणे
त्या रेडीत म्हणे सलमान म्हणे जमीनीला रागावतो ना, ''धरती माई, बॅड मॉमा...'' का असं काहीतरी.... ते माझ्या बहिणीला फार्फार आवडलं मी अजून शिणुमा पाहिला नाहीए. पाहिला तर शेजारची खुर्ची डोके उतरवून ठेवायला रिकामी असेल हे बघूनच जाणार!
कंगना आहे का रेडि मध्ये????
कंगना आहे का रेडि मध्ये???? पिक्चर पाहताना मध्येच झोप लागली मला म्हणून दिसली नाही बहुतेक.
>> ती सुरूवातीच्या काही मिनिटांतच अरबाज खानसह पडद्यावर दिसते. मग तुम्हांला या सिनेमात अजय देवगण, संजय दत्त, झरीन खान ही दिसले नसणार...!
मी अमि सेम पिंच.. मला पण
मी अमि सेम पिंच.. मला पण दिसलीच नाहीये. आज आता पुन्हा जाऊन पहायला लागेल.
मला बंगळूरू पुणे प्रवासात हा
मला बंगळूरू पुणे प्रवासात हा सिनुमा बळेच दाखविण्यात आला व्होल्वोमधे.
ती असीन मला आधी सोनाली कुलकर्णीच वाटत होती. पण ती जी कोणी आहे ती छान दिसते.
बाकी परेश रावल बद्दल कोणीच कसे लिहिले नाही ? त्याचा आक्ख्या पिक्चरभर मोरू केला आहे. त्याला हा चित्रपट स्विकारून असेच झाले असेल.
क्या मै सचमुच इस फिल्म मे काम कर रहा हूँ ? (क्या मै मोदी को जानता हूँ च्या चालीवर)
बिचार्याचे खरच "बलिदान" आहे या चित्रपटामधे
पाहिला तर शेजारची खुर्ची डोके
पाहिला तर शेजारची खुर्ची डोके उतरवून ठेवायला रिकामी असेल हे बघूनच जाणार!
ऋयामला कंगना फारच आवडते
ऋयामला कंगना फारच आवडते वाटते.........मागच्या लेखात कंगना फारच सुंदर दिसते असे कुठेतरी वाचल्या सारखे आठवते...
म्हणजे, सलमान ने या चित्रपटात
म्हणजे, सलमान ने या चित्रपटात कपडे घातलेत ?!!
ती असीन मला आधी सोनाली
ती असीन मला आधी सोनाली कुलकर्णीच वाटत होती.>>> अरेरे!
असो. ते धिंगचिका गाणं ऐकायला चांगलंय. अमिताभचं 'तू मैके मत जईयो' स्टाईल.
काही मित्र माझ्यासमोरच 'आपण जाऊया येत्या काही दिवसात ह्या सिनेमाला' अशी चर्चा करत होते, पण त्यांनी मला विचारलंही नाही येण्याबद्दल त्यामुळे ह्या सिनेमाला पासच! :प
सिनेमातलं फारसं काही माहीत
सिनेमातलं फारसं काही माहीत नसतं त्यामुळे हा सिनेमा मला reddy असा वाटला होता!
धन्स ऋयाम! तुझ्यामुळे या सिनेमाचे नांव ready असल्याचे आणि कंगना राणावत सुंदर दिसते हे (पुन्हा) समजले.
थेटरवर, स्वखर्चाने पाहिला हा
थेटरवर, स्वखर्चाने पाहिला हा मूव्ही. जाम बोअर वाटला. सल्लू, करिश्माचा असाच कोणता तरी एक जुना मूव्ही आहे, मामा लोकांना पटवण्याचा.
म्हणजे, सलमान ने या चित्रपटात
म्हणजे, सलमान ने या चित्रपटात कपडे घातलेत ?!!
>> तरीही शेवटाच्या हाणामारीच्या प्रसंगात सलमानने काही क्षणापुरती का होईना शर्ट काढण्याची हौस पुरवून घेतलीय.
माझे पैसे कोण परत
माझे पैसे कोण परत करणार.......................???????????????????????????????????
मी माझ्या (हेरम्ब) मुलाला
मी माझ्या (हेरम्ब) मुलाला घेउन गेले...कारण ढिंक चिका गाण जरा जरी वाजल तरी हा नाचायला तयार्......सव्वा दोन वर्षाचा आहे....मला वाटल झोपेल पण नाही....सगळा सेनेमा त्याने...एन्जॉय केला...शेवटी रो मधेही नाचत होता....आजुबाजुचे सगळे बघत होते नी हा आपला नाचतोय......
सावरी
हा घ्या वरीजीनल रेडी शिणुमा:
हा घ्या वरीजीनल रेडी शिणुमा: http://www.youtube.com/watch?v=zxvOuB0nAEY
आणि हे http://www.youtube.com/watch?v=WLAY-mTjp-w, ज्यावरून ढिंक चिका आलंयं.
चिन्नू , धन्यवाद.
चिन्नू , धन्यवाद.
मीनु, तो सुरवातीचा सीन आहे,
मीनु,
तो सुरवातीचा सीन आहे, रजिस्टर मॅरेज चा, त्यात अरबाझ शी जी कन्या लग्न करते ती कंगना !
असीन भयानक दिसते.. टिपिकल साउथ इंडियन अम्मा !
Pages