१. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्या केलेली
२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका
३. शेंगदाणेकूट पाव वाटी
४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)
५. २ आमसुले.
६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)
७. फोडणीचे सामान, तेल.
८. लाल तिखट १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टीस्पून, गोडा मसाला १ टीस्पून. मीठ, साखर चवीप्रमाणे.
१. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२. फोडणीतच आमसूल, लसूण तुकडे, कांदा घाला.
३. कांदा परतून गुलाबी होत आला की त्यात दाण्याचंकूट घाला. चमचाभर कूट बाजूला ठेवा.
४. कूट नीट परतून घ्या. बाजूने थोडं तेल सुटायला लागलं की भेंडी घाला.
५. मोठ्या आंचेवर भेंडी हळूहळू परता, आणि उरलेलं कूट घाला.
६. भेंडी थोडी परतून झाली की मग तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला आणि साखर घाला. चाट मसाला/ आमचूर पावडर घाला.
७. सर्वांत शेवटी मीठ घालून, झाकण न ठेवता भाजी खरपूस परतून शिजवून घ्या.
आणि सोबत फेटलेलं दही आणि लिंबू लोणच्याचा खार!
खरं तर भेंडीच्या भाजीची पाकृ ती काय द्यायची असा विचार करत होते. पण भारतात जशी छान भेंडी मिळते तशी इथे प्रत्येकच वेळी मिळेल असं नाही. पूर्वी ३-४ वेळा मी केली ती फारच गोळा भाजी झाली होती.
एकदा पटेलमधून भाजी घेताना इंटरनॅशनल हॉटेलमधे असलेला एक देसी शेफ भेटला आणि त्याने मला एक रेसिपी सांगितली भेंडीची. त्यात मी माझी भर घालून हा प्रयोग केला. इतर वेळी भेंडी खमंग व्हायला फोडाणीत तेल जरा जास्त घालावं लागतं, पण या भाजीत नेहेमीसारखं तेल पुरतं. दाण्याचं कूट फोडणीत घातल्यामुळे कमी तेल + खमंगपणा हे दोन्ही होऊन जातं. हा माझा शोध.
यात तिखटाच्या आवडीनुसार धने-जिरे/ तिखट कमी-जास्त करता येईल.
(No subject)
छान रेसिपी, प्रज्ञा.
छान रेसिपी, प्रज्ञा. भेंडीच्या भाजीत मी कांदा कधी घालत नाही, भाजी मऊ पडेल असं वाटतं म्हणून. तुझ्या रेसिपीने करून बघेन एकदा. फोटो मस्तच.
छान आहे. दाणकुटाऐवजी/शिवाय
छान आहे. दाणकुटाऐवजी/शिवाय डाळीचं पीठही लावून बघ.
भेंडी उभी चिरून त्यात हा सगळा मसाला भरून (भाजून घेतलेलं डाळीचं पीठ + तिळाचं कूट + तिखट + मीठ + आमचूर + गरम मसाला) तेलावर परतली तरी छान लागते.
वा, मस्त!
वा, मस्त!
तो.पा.सु प्रची टाकल्याचा
तो.पा.सु
प्रची टाकल्याचा निषेध ...
च्यायला, आज मी भेंडीच्या
च्यायला, आज मी भेंडीच्या प्रेमात पडलोय
प्रज्ञा, ही तुझी करामत आहे.
बादवे, कांदा थोडा कमी आहे (ना?)
भेंडी मसाला खायच्ये आता...
डुआय, बरोबर निरीक्षण.
डुआय, बरोबर निरीक्षण.
चिरलेला कांदा बराच होता. मी बरोब्बर भेंडीच्या अर्धाच घातलाय भाजीत. (तो मात्र अर्ध्याहून कमी नाहिये हां! )
बाई, तुम्ही सांगितलिये तशीपण करून बघेन (आणि फोटो टाकेन )
तोंपासु एकदम
तोंपासु एकदम
भेंडी सारखी बुळचट भाजी मला
भेंडी सारखी बुळचट भाजी मला कधीच आवडली नाही पण एके दिवशी देशात सुनहरी भेंडी (अॅस अ स्टार्टर) खाल्ली आणि तेंव्हापासून स्टार्टर म्हणून भेंडी आवडली. मग भेंडी आमचुर वगैरे प्रकार पण आवडले.
न्युयॉर्क मध्ये दरबार नावाचे एक हॉटेल आहे. (लेक्झींग्टन आणि ४५ ), तिथे पण अगदी सुनहरी भेंडी नाही पण एकदम जबराट भेंडी स्टार्टर मिळतं.
ही भाजी दाणे कुट घालून आई करते, कोरडी मसाला भेंडी सारखी. कांदे टाकून पाहावेत. मजा येईल असे दिसते.
अरे मी सेम अशीच करते/करवते
अरे मी सेम अशीच करते/करवते (फक्त आमसुल घालत नाही)
नवर्यावर प्रयोग करुन
नवर्यावर प्रयोग करुन बघेन.
सावनी, भेंडीत कांदा घातला तर जरा सुसह्य होते. भाजी शिजल्यावर लिंबू पिळल्यास तारा निघून जातात.
ह्म्म. मी कुरकुरीत भेंडी,
ह्म्म. मी कुरकुरीत भेंडी, भरली भेंडी आणि दह्यातली भेंडी या तीन प्रकारांनी करते.
छान रेसिपी. (वाट बघत होतो
छान रेसिपी. (वाट बघत होतो )
छान मिळाल्यात कि भेंड्या. नायजेरियात एक इंच व्यासाच्या आणि २ इंच उंचीच्या भेंड्या मिळायच्या (ओक्रा) तिथे ते लोक सूपला तार येण्यासाठी वापरतात. (हो त्यांना आवडते ) त्याची पण अशी परतून भाजी छान व्हायची.
गोव्यात छान लांब भेंड्या मिळायच्या. तिथे त्या नगावर विकतात.
हा ही प्रकार छान आहे. अमसुल
हा ही प्रकार छान आहे. अमसुल घातल्यामुळे तारा पण येत नाहीत.
मी पण कुरकुरीत, भरली आणि कांदा,टॉमेटो,बटाटा, गरममसाला घालुन पण करते. सगळ्या प्रकारे छान लागते.
मस्तच प्रज्ञा, मी पण कांदा
मस्तच प्रज्ञा,
मी पण कांदा नव्हते घालत इतके दिवस, आता करून पाहते. हो लिंबु पिळते मी सुद्धा. शेवटच्या फोटोत रसलिंबु आहे का ग?
नाही गं. मीच केलेल्या
नाही गं. मीच केलेल्या लोणच्याचा खार आहे तो.
ह्म्म्म तोंडाला पाणी सुटलं...
ह्म्म्म तोंडाला पाणी सुटलं... बाय द वे... भेंडिच्या भाजीला तार आली ना तर आमच्याकडे आज तारे बंधुंचं नाटक आहे वाटतं असा टोमणा मारतात
वा, छान आहे रेसिपी आणि फोटोही
वा, छान आहे रेसिपी आणि फोटोही .. नक्की करून बघेन ..
(बाकीच्या टिपण्या पार्ल्यात .. :p)
मस्तच. तोपासु.
मस्तच. तोपासु.
मला भेंडीची भाजी करायलासुद्धा
मला भेंडीची भाजी करायलासुद्धा आवडत नाही. पण आता नक्की करेन. छान रेसिपी.
मी भेन्डीची भाजी फोडणीला
मी भेन्डीची भाजी फोडणीला टाकून परतून मग चिन्चेचा कोळ, गुळ, तिखट आणि गोडा मसाला घालून करते, मस्त होते. अगदी अन्गासरशी रस ठेवायचा. तारही येत नाही. आता ही पण करेन.
मस्त मस्त. मी भेंडी फॅन आहे.
मस्त मस्त. मी भेंडी फॅन आहे. ही चव बदल म्हणून करून बघेन. खरे सांगू ते लोणच्याचा खार अन पोळी पण भाव खाउन जातैत. दोन पोळ्या अन मग साईच्या दहीभाता बरोबर भेंडीची असली भाजी. टोटली वॉव.
मस्त!! माझीहि आवडती भेंडीची
मस्त!! माझीहि आवडती भेंडीची भाजी/ तिचे वेगवेगळे प्रकार.. आम्हीदेखिल अशिच बनवतो पण कुट न घालता किसलेलं खोबरं घालतो अगदि जास्त तेल न वापरता. मस्त होते.. छान रेसिपी हा पण.
मृणमयी ने अशीच कृती पूर्वी
मृणमयी ने अशीच कृती पूर्वी दिली आहे.
http://www.maayboli.com/node/2788
पुढच्या एक-दोन दिवसांत करून
पुढच्या एक-दोन दिवसांत करून बघणेत येईल.
वाह ! क्या बात है ! हा बेत
वाह ! क्या बात है !
हा बेत झक्कास वाटतो,माझी आवडती भाजी !
प्रज्ञा तोंडाला पाणि सुटलं तु
प्रज्ञा तोंडाला पाणि सुटलं तु सजवलेलं ताट पाहून.
भेंडी खूप आवडते मला... तुझी भाजी करण्याची पद्धत ही अगदी सुंदर.
आमचूर पावडर ऐवजी मी चिंच फोडणीच्या तेलातच घालते, त्याने भाजीला तार येत नाही म्हणे.. खूप लोक या भाजीत कांदा घालत नाहीत, पण मला आवडतो.. कूट मी कधीच वापरून पाहिले नाही. नेक्स्ट टाईम करेन तेव्हा घालून पाहिन.
भाजी शिजताना झाकण लावलं की
भाजी शिजताना झाकण लावलं की भेंडीला तार येते शिवाय तिचा रंग बदलतो. त्यामुळे ही भाजी पेशन्स ने उघडी ठेऊनच शिजवावी लागते.
भेंडीत लिंबू/आमचूर्/कोकम असे
भेंडीत लिंबू/आमचूर्/कोकम असे काही घातले की तार येत नाही.. मी लिंबू किंवा कोकम टाकतो (शिजवताना)
भेंडी उभी चिरून तळायची,
भेंडी उभी चिरून तळायची, त्यावर तिखट, मीठ घालायचं...इ त की सुंदर लागते...
Pages