गोरखचिंच (नवीन फोटोसह)

Submitted by शांकली on 7 June, 2011 - 09:56

गोरखचिंच (Adansonia digitata)- पुण्यातील अभिनव कॉलेज चौकातील (टिळक रोड ) मेहेंदळे अँड सन्स यांच्या दारासमोरील ३२५ वर्षे वयाचा हा वृक्षराज -आता बहरला आहे. मेहेंदळे यांच्या घराच्या गच्चीतून या फुलांचे, कळ्यांचे व पानांचे झालेले हे लोभसवाणे दर्शन.
(सर्व फोटो मोबाईलच्या कॅमेर्‍याने काढलेले आहेत.)

Image0459.jpgImage0460.jpgImage0461.jpgImage0462.jpgImage0463.jpgImage0464.jpgImage0465.jpgImage0466.jpg

पुणे विद्यापीठ- मुख्य इमारती समोर -

fule 143.jpg

वाळलेल्या फुलातील पुंकेसराचा लांब दांडा दिसतोय -

fule 144.jpgfule 157.jpg

याच गोरखचिंचेचा मागून पोखरलेला बुंधा

fule 166.jpg

घोले रोडवरील साधारण उलट्या गाजरासारखा दिसणारा

fule 210.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अभिनंदन शांकली, मॅनेज केलेच ना शेवटी. याला मोठ्या शेंगा लागतात आणि त्याचा गर छान लागतो. (चिंचेसारखाच लागतो.) आफ्रिकेतला हा बाओबाब ट्री. पोर्तुगीजांनी भारतात आणला.

छान

छान टिपलंय.<< आफ्रिकेतला हा बाओबाब ट्री. >> मुंबईच्या जिजामाता उद्यानात हा स्वागतकक्षातच उभा आहे !

भाऊ, राणीच्या बागेतली जात थोडी वेगळी आहे. त्यातला पुंकेसर थोडा लांब असतो. इथेही त्याची फूले अशीच असतात. शांकलीच्या फोटोतले फूल जरा वेगळे आहे. बाकी या चिंचेच्या तिखट मीठ लावलेल्या बिया, हा माझा इथला आवडता खाऊ आहे.

शांकली मस्तच.

दिनेशदांनी राणीच्या बागेत आम्हाला ह्या गोरखचिंचेपासुन बनवलेल्या गोळ्या दिलेल्या त्या आठवल्या.

होय,दिनेशदा म्हणतात ते खरंय,कारण डॉ.डहाणूकरांच्या हिरवाई पुस्तकात पुंकेसराचा लांब दांडा असलेला फोटो आहे. आणि पुण्यातच इतर ठिकाणी असणारे गोरखचिंचेचे वृक्ष आणि हा वृक्ष यांच्या आकारात जरा फरक आहे. इतर वृक्ष जरा उलट्या गाजरासारखे साधरणतः दिसतात.पण हा मात्र नॉर्मल वृक्षांसारखा दिसतो. बहुतेक गोरखचिंच बुंध्यात जाड आणि थोड्या अंतरावर एकदम निमुळती होत गेलेली अशी असते,ही मात्र तशी नाहीये.

शांकली.. मस्तच.. मी पाहिले नव्हते कधी हे.. सो धन्यवाद Happy

दिनेशदांनी राणीच्या बागेत आम्हाला ह्या गोरखचिंचेपासुन बनवलेल्या गोळ्या दिलेल्या त्या आठवल्या. >> जागू.. डिट्टो अगदी... Happy

दिनेशदांनी राणीच्या बागेत आम्हाला ह्या गोरखचिंचेपासुन बनवलेल्या गोळ्या दिलेल्या त्या आठवल्या.>>>>>अगदी अगदी Happy

<< भाऊ, राणीच्या बागेतली जात थोडी वेगळी आहे. >> दिनेशदा, निदान एक तरी वृक्ष आपल्याला माहित आहे हे जरा दाखवायला गेलो, तर तिथंही तुमची टपली खाल्लीच ! Wink

छान!

भाऊ, असं काय हो ? गोरखचिंचच ना ती.
शांकली त्या पूर्ण झाडाचा फोटो काढता येईल का ? बघितल्यासारखे वाटतेय हे झाड !

शांकली,
छान माहिती आणि फोटो !
Happy
( पण याच्या या नावात sonia आणि tata अशा मोठ्या माणसांची नावे का बरं घेतली आहेत):हाहा:

सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या प्रतिसादांमुळे मला हुरुप आला आणि फोटो काढण्याबद्दल जरा confidence पण आला.
दिनेशदा,पूर्ण झाडाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करीन.
अनिल, तुमच्या subtle humour sense ला मात्र अगदी मनापासून दाद.माझ्या लक्षात ही गोष्ट आली नाही हं!
खरंतर या वृक्षाबद्दल जेवढं लिहू तेवढं कमीच आहे असं मला वाटतं. श्री.चितमपल्लीसाहेब याला देववृक्ष म्हणतात. डॉ. शरदिनी डहाणूकरांच्या फार तरल आणि हळव्या भावना या वृक्षाशी निगडीत आहेत.
परत एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार.