डॉ. झरीन पटेल ह्या पुण्यातील प्राणीमित्र होत्या. नुकतेच त्यांचे मधुमेहाने निधन झाले. त्यांच्या जीवनकालात त्यांनी कितीतरी बेवारस, आजारी व घर नसलेल्या कुत्र्यांची काळजी घेतली. अखेरीस त्या आपल्यामागे जवळपास १४० कुत्रे ठेवून गेल्या. आता ह्या कुत्र्यांची जबाबदारी आपल्यावर आहे.
सध्या ह्या कुत्र्यांची काळजी RESQ नामक एक NGO घेत आहे. कार्यकर्ते स्वतःचा वेळ देउन कुत्र्यांसाठी घर शोधत आहेत.
आपण ह्या कुत्र्यांपैकी एखादा दत्तक घेउ शकत असल्यास हेही एक प्रकारचे समाजकार्यच ठरेल. ह्या मुक्या प्राण्यांवर केलेल प्रेम ते दामदुप्पटीने परत करतात हा आपला सर्वांचाच अनुभव आहे.
ह्यांना घर मिळवून देण्याच्या कामी आपण कसल्या प्रकारची मदत करु शकत असलात तर सम्राट कपूर ह्यांना ९७०२४०१२३४ ह्या क्रमांकावर संपर्क करु शकता.
http://m.facebook.com/photo.php?fbid=10150266902181101&id=72659281100&se...
https://picasaweb.google.com/lh/photo/h_uEotnBMt6KXnnZS5DW5Q?feat=direct...
-बागुलबुवा.
कुत्रे नेमकी कोणत्या जातीची
कुत्रे नेमकी कोणत्या जातीची आहेत. शेजार्याला हवा आहे.
त्यांना जो पाहीजे आहे तो कुत्रा असल्यास नक्की कळवेल.
धन्यवाद
योडी, बाब्या मी हि माहिती
योडी, बाब्या मी हि माहिती माझ्या भारतातल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवली आहे. धन्यवाद. बाब्या ग्रेट वर्क. अजून कोणीच पुढाकार घेतला नव्हता काय रे? हि गोष्ट घडून बरेच्ज दिवस झाले ना?
कोणत्या जातीचे कुत्रे आहेत ?
कोणत्या जातीचे कुत्रे आहेत ?
नाखु, बर्याच कुत्र्यांना घर
नाखु, बर्याच कुत्र्यांना घर शोधून देण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरले आहेत. पण १४० ची धावसंख्या लहान नाही.
मुक्तेश्वर, धन्यवाद. लिंकवर क्लिक केल्यास फोटो दिसतील.
बाब्या, अरे तरीही. जमल्यास तु
बाब्या, अरे तरीही. जमल्यास तु यावर सविस्तर लेख सुद्धा टाक. फोटोंवरून इतका प्रकाश पडेल असं वाटत नाही. थोडीशी माहिती सुद्धा हवीच रे. बर्याच जणांना पेट्स ची आवड असेल पण ते संभाळण्याची भिती वाटते म्हणून कदाचित नाक मुरडत असतील.
बाबु मी येथिल जाणकारांशी
बाबु मी येथिल जाणकारांशी बोलते आहे. बघू काय करता येइल ते.
सर्व कुत्री छान आहेत, पटल्यास
सर्व कुत्री छान आहेत, पटल्यास सांगतो
मामी थॅन्क्स अ टन. नाखु,
मामी थॅन्क्स अ टन.
नाखु, सविस्तर टाकेन नंतर. सध्या थोडीशीच माहिती टाकतो.
कुत्रा पाळणे सर्वांनाच शक्य होउ शकतं असं नाही. कारण त्याकरीता जागा, वेळ आणि पैसा हे तीनही घटक लागतात. फक्त खर्चाचाच विचार केला तर साधारणपणे घरात एक फॅमिली मेंबर वाढण्यासारखच असतं कुत्रा पाळणं. पण शहरातल्यांचे खरे प्रॉब्लेम्स असतात ते जागा आणि वेळ. पैकी जागा अगदीच लहान असेल तर खरच शक्य नाही होत कुत्रा पाळणं पण एखादी गॅलरी असेल तर छोटं ब्रीड पाळणं सहज शक्य आहे. मात्र वेळ देता नसेल तर वरच्या दोन्ही गोष्टी असून काही उपयोग नाही.
अर्थात वरच्या सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची असते ती आवड.
कुत्रा पाळतानाच निव्वळ छान दिसला म्हणून आणू नये. आपल्या गरजांना सूट होणारच ब्रीड निवडावं व ब्रीड स्पेसिफिक रीक्वायरमेन्टस आपण पूर्ण करु शकू ह्याची खात्री करुन घ्यावी. ह्याविषयावर नंतर सविस्तर बोलूच पण सध्या महत्वाचं म्हणजे डॉग अॅडॉप्शन.
आत्तापर्यंत मी १० ते १२ मोठे कुत्रे अॅडॉप्ट केले व करवले आहेत. मोठा कुत्रा अॅडॉप्ट करताना त्याच्याविषयीची शक्य तेव्हढी माहिती जमवावी. त्याची मेडीकल हिस्टरी, खाण्या पिण्याच्या सवयी, विशिष्ट खोडी, घरातील ईतर माणसे, ईतर कुत्रे, ईतर प्राणी व लहान मुले यांच्याबरोबरचे त्याचे वागणे जाणून घ्यावे. त्याला मोकळा फिरवताना तो काय करतो हे जाणून घेणे महत्वाचे.
बर्याच जणांच्या मनात असलेली एक शंका म्हणजे कुत्रा मोठा असताना आणला तर व्यवस्थित रहातो का ? यावरचे माझे स्पष्ट उत्तर म्हणजे "होय" जर लहानपणापासून त्याला व्यवस्थित वाढवले गेले असेल तर ९९% कुत्र्यांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स येत नाहित.
बाकी सविस्तर बोलूच.
असु, खरेच एक सविस्तर लेख
असु, खरेच एक सविस्तर लेख लिही.
मुंबैत काय काय करावे लागते हे कळेल. मी स्वतः मुंबैत कुत्रा पाळावा की नको या गोंधळात आहे.
बागुलबुवा, एक वेगळा
बागुलबुवा,
एक वेगळा लेख्,आवडला !
माझी इच्छा आहे, एक कुत्रा पाळण्याची ,पण साधारण त्याला रोज खायला किती लागेल, भाकरी,चपाती आणि घरचा खाणं चालेल कि मांसाहार ही द्यावा लागेल ? याबाबत गोंधळ आहे.
मांसाहार देत नसलात तर रेडीमेड
मांसाहार देत नसलात तर रेडीमेड डॉग फूड मिळते, ते सप्लिमेंट म्हणून देता येउ शकेल
बागुलबूवा, आमच्या घरी चार
बागुलबूवा, आमच्या घरी चार कुत्रे नांदून गेले. आता घरात त्यांच्याकडे बघायला कुणी नाही, नाहीतर मी नक्कीच घेतला असता. तूझे सविस्तर लेखन मात्र लवकर टाक.
अम्या छान आहेत सगळे कुत्रे
अम्या छान आहेत सगळे कुत्रे आणि त्यांच्या चेहर्यावरचे भाव ही..
माझा पण विचार आहे कुत्रा पाळण्याचा पण तुझ्याकडून पहिल्यांदा संपूर्ण माहीती आणि मार्गदर्शन घेईन मगच विचार करेन...
बाकी तुझ्या अनुभवांविषयी आणि टिप्स वाचायला खूप आवडेल.
नक्की लिही, वाट पाहते.
बागुलबुवा, चांगली
बागुलबुवा, चांगली माहिती.
कुत्रा पाळण्यासाठी सांगितलेले तीनही घटक अत्यंत महत्वाचे.
माझ्या सासरी दोन कुत्रे आहेत. मला कुत्र्यांची आवड आहे, पण त्यांचा वावर मला जिथे-तिथे नाही आवडत. त्यामुळे १/२ बीएचके घर असणार्यांनी खरंच विचार करावा असं वाटतं. तसंच वर सांगितल्याप्रमाणे एक फॅमिली मेंबर म्हणूनच असतो म्हणजे बाहेर जाताना कायमच विचार करायला हवा.
माझ्या पुतण्या आत्ताच त्या कुत्र्याला आमच्यावर सोपवून बाहेर गेल्या होत्या १० दिवसांसाठी. तो कुत्रा आम्हांला दोघांनाही अगदी व्यवस्थित ओळखतो, तरी सुरुवातीचे दोन दिवस व अधेमधे त्याला बाहेर फिरवायला नेताना अंगावर गुरगुरायचा. त्याला बाहेर नेण्यासाठी किती मिनतवार्या कराव्या लागल्या ते आमचं आम्हांलाच माहित.
कुत्रा पाळायची प्रचंड इच्छा
कुत्रा पाळायची प्रचंड इच्छा मला आणि लेकाला आहे. पण देशात स्थिर झाल्याशिवाय ते शक्य नाही.
अजून काही मालकोच्छुक
अजून काही मालकोच्छुक श्वानांचे फोटो. कालपरवाच्या पुणेवारीत एक दोन श्वानांना घर मिळवून देण्यात यशस्वी ठरलो.
सहियेत कुत्र्यांचे फोटोज!
सहियेत कुत्र्यांचे फोटोज! आम्हीपण आतापर्यंत ४-५ पाळले. २००४ मधे आमचा 'गुड्डु' गेल्यापासुन पुन्हा कुत्रं पाळायचा जीव झाला नाही. घरचे सगळे गावाला गेले की पाळीव कुत्र्याला कुठे ठेवायचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम!!
पण तरी परिचितांमधे सांगुन ठेवलय, कोणाला हवा असल्यास सांगा म्हणुन!
(No subject)
अरे हो, काहिंच्या "संशय का
अरे हो, काहिंच्या "संशय का मनी आला" ला उत्तर म्हणून
वरील कुत्र्यांसाठी घरे शोधणे हा समाजकार्याचा भाग म्हणून करण्यात येत आहे. यात कुणाकडूनही पैशांची वा कसलीही अपेक्षा नाही.
अपेक्षित आहे ती थोडीशी भूतदया आणि प्राणीप्रेम