माझ्या नणंदेला मूल दत्तक घ्यायचे आहे. नणंद आंध्रप्रदेशमधे राहते.
याविषयी विश्वासू आणि योग्य संस्था अनाथाश्रम यांचे पत्ते फोन नंबर हवे आहेत.
मी, पुण्यातील सोफोश, अमरावतीमधील मिशनरीज ऑफ चॅरीटीचे शिशुगृह नागपुरमधे वरदान,
तसेच आंध्रप्रदेशमधील निझामाबाद शिशुगृह या सर्व ठिकाणी चौकशी केली.
संपुर्ण भारतभर जिल्ह्याबाहेर मुल द्यायचे नाही असा नियम निघाला आहे.
याकरीता अनुभवी मायबोलीकरांची योग्य मार्गदर्शन आणि मदत हवी आहे.
यासंबंधी मला संपर्कातून इमेल केले तरी चालेल.
डॉ. झरीन पटेल ह्या पुण्यातील प्राणीमित्र होत्या. नुकतेच त्यांचे मधुमेहाने निधन झाले. त्यांच्या जीवनकालात त्यांनी कितीतरी बेवारस, आजारी व घर नसलेल्या कुत्र्यांची काळजी घेतली. अखेरीस त्या आपल्यामागे जवळपास १४० कुत्रे ठेवून गेल्या. आता ह्या कुत्र्यांची जबाबदारी आपल्यावर आहे.
सध्या ह्या कुत्र्यांची काळजी RESQ नामक एक NGO घेत आहे. कार्यकर्ते स्वतःचा वेळ देउन कुत्र्यांसाठी घर शोधत आहेत.
आपण ह्या कुत्र्यांपैकी एखादा दत्तक घेउ शकत असल्यास हेही एक प्रकारचे समाजकार्यच ठरेल. ह्या मुक्या प्राण्यांवर केलेल प्रेम ते दामदुप्पटीने परत करतात हा आपला सर्वांचाच अनुभव आहे.