क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लंड - श्रीलंका दुसरा कसोटी सामना अनिर्णित. काय रटाळ झाला श्रीलंकेचा दुसरा डाव!!
पाच दिवस खेळून काय फायदा झाला?
आता खालीलप्रमाणे नियम करावेत:

प्रत्येक डाव १२० षटकांचा. असे चार डाव. जर पाच मिनिटात एक षटक होत असेल तर ४० तास लागतील. म्हणजे दिवसाला ८ तास. आता एव्हढे पैसे मिळतात तर निदान सामन्यांच्या दिवशी तरी इमानदारीने रोज ८ तास खेळायला काही हरकत नाही. आणि नियम ५०-५० किंवा २०-२० सारखे. (डकवर्थ लुईस का काय ते धरून). दोन्ही डाव मिळून जास्त धावा केल्यात तरच जिंकला नाहीतर हरलात!! म्हणजे सामना अनिर्णित रहाणे क्वचितच.

म्हणजे शेवटच्या दिवशी सुद्धा प्रेक्षक मिळतील हा फायदा आहेच. खेळाडूंना काय, हरले, जिंकले तरी पैसे मिळतातच. आता जिंकण्याबद्दल जास्त मिळत असतील तर जिंकून दाखवा!!

आजकाल अमेरिकेत म्हणे नोकरदारांकडून जास्तीत जास्त काम करून घेतात. साधारण १० लोकांचे काम ६ लोकांना करावे लागते, त्यामुळे जास्त वेळ काम, मधे आराम नाही असे चालले आहे म्हणे. भारतातल्या लोकांनी प्रोग्रॅम लिहून दिले म्हणून जरा कामात मदत होते. तसेहि यातले अनेक लोक क्रिकेट खेळणार्‍यांपेक्षा जास्त हुषार, गुणी व कर्तबगार आहेत. विशेषतः उत्पादन क्षेत्रात काम करणारे अर्थव्यवस्थेला खरी मदत करतात.

चला, दुसराहि सामना जिंकला. पार्थिव परत चांगला खेळला. कोहली एकदाचा चांगला खेळला.
मुनाफ नि मिश्रा ची गोलंदाजी प्रभावी.

<< प्रत्येक डाव १२० षटकांचा. असे चार डाव. जर पाच मिनिटात एक षटक होत असेल तर ४० तास लागतील. म्हणजे दिवसाला ८ तास. >> झक्कीजी, मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या स्पर्धेला तोंड देऊन कसोटी क्रिकेट टीकायचं असेल तर असे कांही नियम येणं अपरिहार्य आहे, हें माझंही मत.

बे एरीया मधे आयपीएल स्टाईल क्रिकेट मॅचेस आहेत. ६ संघ असुन उद्या खेळाडुंवर बोली लागणार आहे. दोन मालक (सानप, मानकामे) मराठी वाटत आहेत.
कोणाला खेळायची इच्छा असेल तर आज रात्रीपर्यंत नावनोंदणी करु शकता
इथे अधिक माहिती मिळेलः http://www.nccat20.com/

श्रीलंका बोर्डाचं डोकं फिरलेलं दिसतंय. या महिन्यात वयाची ४२ वर्षे पूर्ण करणार्‍या जयसूर्याला परत एकदिवसीय व T20 च्या संघात घेतलेलं आहे. कपिलदेवने सुद्धा माळ्यावर टाकलेल्या पॅडवरची धूळ झटकून परत सराव सुरू करायला हरकत नाही.

http://www.espncricinfo.com/england-v-sri-lanka-2011/content/current/sto...

थोडा विचार करता असे वाटते की १२० षटके करण्या ऐवजी चार पाच कमी करावी. कारण दोन डावामधला वेळ, कुणि जखमी जा।ले तर, वगैरेमधे वेळ जाईल. मुद्दा किती षटके हा नसून मर्यादित षटके हा आहे. पण ५० पेक्षा जास्त नि प्रत्येकी दोन डाव.

<<थोडा विचार करता असे वाटते की ..... >> झक्कीजी, मूळ संकल्पना चांगलीच आहे पण नियम मात्र खूपच विचारपूर्वक ठरवावे लागतील; अनेक 'काँटीजन्सीज' विचारात घ्याव्या लागतील, उदा. पाऊस, फॉलोऑन, स्कोअर सारखा झाला तर गमावलेल्या विकेट किंवा अधिक षटकं खेळणं इ.ला 'वेटेज ' द्यायचं का, वगैरे वगैरे .

सुरुवातीला पाऊस, कमी प्रकाशाने खेळ होऊ न शकणे याला 'डकवर्थ, लुईस' का काय ते नियम आहेतच ना? नि फॉलो ऑन हा क्रिकेटचाच भाग आहे. सामने लवकर संपणे हे खेळावर अवलंबून आहे, माझ्या मते ५०-५० चे सामने सुद्धा जर सर्व गडी ४० षटकात बाद झाले तर सामना लवकर संपतोच.

सध्या तरी दोन्ही बाजूच्या धावा सारख्या झाल्या तर, सध्या २०-२० किंवा ५०-५० च्या सामन्यांत काय करतात?

दोन अवांतर मुद्दे:
१. मागे मी विचारले होते की फलंदाजी नि गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षणासाठीहि काही मोजमाप पाहिजे. बेसबॉलमधे 'एरर्स' मोजतात, चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी (सबंध सिझन संपल्यावर) गोल्डन ग्लव्ह देतात, वगैरे. आता 'एरर' ठरवणे इथे कोण ठरवते माहित नाही. तिथे पण तिसरा पंचावर हा निर्णय सोपवता येईल. नाहीतरी त्याच्या मतावर बर्‍याच फलंदाज, गोलंदाजांचे स्टॅटिस्टिक्स अवलंबून असते.
२. रहावले नाही म्हणून लिहितो:
सध्या क्रिकेटमधे भारताची वट आहे. तेंव्हा नवीन नियमांना डकवर्थ लूइस ऐवजी 'शरद पवार' नियम असे नाव द्यावे. बहुधा सगळे ठरल्यावर त्यांना त्याच्यावर सही करावी लागेलच ना?

<< नियमांना डकवर्थ लूइस ऐवजी 'शरद पवार' नियम असे नाव द्यावे. >> नियंमांपेक्षां अपवाद पॉवरबाज असतात; अपवादाना त्यांच नांव दिलं तर ! Wink
<< कपिलदेवने सुद्धा माळ्यावर टाकलेल्या पॅडवरची धूळ झटकून परत सराव सुरू करायला हरकत नाही. >> मास्तुरेजी, आपल्या बोर्डाने कपिल देवलाच क्रिकेटमधून झटकून टाकलंय, 'आयसीएल'च निमित्त साधून !!

श्रीलंका बोर्ड आणि जयसूर्या हे दोघेही मूर्खपणाचा कळस करत आहेत. आपण इंग्लंड दौर्‍यावरची फक्त पहिली वनडे खेळून निवॄत्त होणार आहोत असे जयसूर्याने जाहीर केले आहे. जर एकच वनडे खेळायची तर संघात जायचे कशाला? फक्त एका वनडे करता ह्या ४२ वर्षाच्या आजोबांना घ्यायचेच कशाला?

http://www.espncricinfo.com/srilanka/content/current/story/518500.html

<< फक्त एका वनडे करता ह्या ४२ वर्षाच्या आजोबांना घ्यायचेच कशाला? >> कदाचित बोर्डाने दिली असेल त्याला आतापर्यंतच्या सेवेबद्दल ही निरोपाची म्हणून ट्रीप ! आणि, समजा, या तथाकथित आजोबानी केलीच एक धडाकेबाज खेळी त्यांच्या शेवटच्या सामन्यात तर .. !!! Wink

इंग्लंड बरोबरच्या सामन्यात भारतीयांचा DRS वापरण्यास नकार!

काही दिवसांनी मैदानावर पंच न ठेवता काँप्युटर वापरून निर्णय दिले जातील. मग काही दिवसांनी प्रत्यक्ष मैदानावर खेळण्या ऐवजी Wii क्रिकेटचे सामने होतील! म्हणजे पाऊस, कमी प्रकाश असले काही नाही. आणि झहीर खान जखमी झाला तर दुसरा कुणितरी जलदगति गोलंदाजी करेल! नि सचिन निवृत्त झाला तरी हरकत नाही!

झक्कीजी, Wink
माझी 'एक्सपर्ट ' मतंही एकदा 'फीड' करून ठेवली कीं योग्य वेळीं आवश्यक ते बदल करून प्रकाशित होतील !!

भाऊ मग तुमचे कार्टून त्या पोरी चौकार मारल्यावर जसे नाचतात, तसे मधूनच दाखवावे लागतील, योग्य त्या फिडची सोय करून ठेवा.

झक्की, भाऊ Happy

Wii क्रिकेटचे सामने होतील! >> बरंच आहे ना, कोणालाही रीटायर व्हायची गरज नाही, जयसुर्या, सचिन Wii च रिमोट किंवा गेम-सीडी बाद होऊस्तोवर खेळतील. अगदी १८०० सालातले पण प्लेअर आणु शकता.

बाकी, DRS वापरण्यास नकाराच भारताच नक्की काय कारण आहे? का श्रीमंत बोर्ड असल्याची दादागिरी?

खरं तर DRS चा उपयोग बघता भारताने त्याला मान्यता द्यावी असं वाटतं. Hotspot चा पण वापर व्हावा (म्हणजे चेंडू बॅटला लागला की नाही ते कळतं). मागे एकदा श्रीलंकेमधे DRS वापरली होती भारत - लंका सामन्यांमधे. तेव्हा बहुतेक सगळे Decision भारताविरुध्द गेले होते. त्यामुळे असेल.
पण एकदा कर्णधाराला कधी अपील करायचे कधी नाही कळलं, की खरं तर वापरायला हरकत नाही.
आता world cup मधेही DRS वापरली होती आणि त्यामुळे भारत संघालाही त्याची सवय झालेली आहे.

कुठलेहि सामने चालू नसल्याने 'भाकड' दिवसात काय करायचे? वायफळ गप्पा! म्हणू गेले दोन दिवस उगाच काहीच्या काही लिहित बसलो आहे.

पूर्वी इंग्लंड वि. दक्षिण अफ्रिका व इंग्लंड वि. वेस्ट इंडिज या सामन्यांमधे त्यांना ते नीट जमले नाही.

मैदानात उतरून फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, झेल घेणे यांचा सराव करण्यापेक्षा, पंचांना प्रशिक्षण देण्यापेक्षा, त्यांचे डोळे तपासणी वगैरे करण्यापेक्षा, आरामात एअर कंडिशन खोलीत बसून सगळे काही काँप्युटर मधे करायचे. उगाच उन्हा तान्हात जाऊन शरीराला कष्ट देऊन, जखमी होण्याचा धोका घेण्यापेक्षा, ते सोपे!!

<< जखमी होण्याचा धोका घेण्यापेक्षा, ते सोपे!! >> सरासरी रु. १००० चे तिकीट, सरासरी स्टेडियममधे ३०००० प्रेक्षक, हे पाहिल्यावर सोपे काय, कठीण काय याची व्याख्या बदलते ना ! Wink

<< जखमी होण्याचा धोका घेण्यापेक्षा, ते सोपे!! >> सरासरी रु. १००० चे तिकीट, सरासरी स्टेडियममधे ३०००० प्रेक्षक, हे पाहिल्यावर सोपे काय, कठीण काय याची व्याख्या बदलते ना ! Wink

>>> कदाचित बोर्डाने दिली असेल त्याला आतापर्यंतच्या सेवेबद्दल ही निरोपाची म्हणून ट्रीप !

हेच कारण असावं. जयसूर्याला ऑनरेबल एक्झिट देण्यासाठी त्याला एक सामना देऊन निवृत्तीची घोषणा करण्यास सांगितलेलं असणार. गांगुलीला निवृत्तीपूर्वी अशीच ऑस्ट्रेलियाची मालिका खेळण्याची संधी दिली होती. शोएब अख्तरला मात्र ही संधी पाकड्यांनी दिली नाही.

सरासरी रु. १००० चे तिकीट, सरासरी स्टेडियममधे ३०००० प्रेक्षक, हे पाहिल्यावर सोपे काय, कठीण काय याची व्याख्या बदलते ना !

पण जर मैदानावर खेळायला लोकच आले नाहीत तर?

मग ते आयफोन अ‍ॅप एका आयमॅक्स साइझच्या स्क्रीनवर ३-डी मधे दाखवावे. क्रिकेटबरोबर आयमॅक्स व ३-डी!! विशेषतः प्रत्यक्ष खेळणारे लोक उन्हा तान्हात जाणार नाहीत, तर प्रेक्षकांनी तरी कशाला उन्हा तान्हात जावे, तेहि बघतील एअर कंडिशन थेटरात बसून क्रिकेट!! देतील तेव्हढेच किंवा जास्त पैसे!

किंवा DRS सुद्धा आयफोनवर अ‍ॅप म्हणून टाकावे, म्हणजे उगाच क्रिकेटचे नियम शिकलेल्या पंचाला जास्त पैसे देऊन उन्हात उभे करायचे त्या ऐवजी कुणि साधा बिहारी, खूप कमी पैशात घेतला पंच म्हणून, तरी चालेल!!

वायफळ गप्पा पुरे. आता लवकरच तिसरा एक दिवसीय सामना सुरु होईल!

थोडी गंमत..:)
तुम्हाला जर ई-पत्रातुन आले असे तर दुर्लक्ष करा.
Cricket Lovers… try this for a change
1.) Go to Google Translate http://translate.google.co.in/?hl=en&tab=wT
2.) Translate “Suresh Raina is GOD” into Serbian.
3.) Copy the Serbian translation back into the Box and translate it back to English…
4.) You shall see the truth, and nothing but the ONLY truth.
Cheers,

आज जरा अवघडच दिसतंय. भारत २५ षटकांत ६ बाद १००. विराट कोहलीला सरळसरळ पंचांनी ढापले. बाकी सर्वजण आपल्या चुकीने बाद झाले.

जिंकले रे जिंकले! जय भारत!
अगदी ५ वी फ सारखे रोहित खेळत आहे.

५ वी फ मधील सर्व माजी, आजि नि भावी विद्यार्थ्यांचा प्रश्नः
न्यू यॉर्क ट्रायबेका येथील डी निरो यांच्या भाषेत You talkin' to me? !
इतरत्र अमेरिकेतून, You gottA problem with dat, dude?

पार्थिव ने चांगल्या धावा केल्या. हरभजन, प्रविण कुमार, ब्राव्हो! मिश्रा, मुनाफ जोडगोळीची पुनः चांगली कामगिरी! युसुफ पठाण??

अहो झक्की ते त्या मॅच साठी होते. Happy त्याला ५ वी फ म्हणालो म्हणून त्याने आता नववी पर्यंत मजल मारली आहे. रोहित चांगलाच खेळला. तीन वर्षांपूर्वी मला असे वाटायचे की त्यात खूप पोटँशियल आहे. पण ते त्यानेच सगळे वाया घातले, आता ह्या सिरीज मध्ये तो मस्त खेळत आहे पण विंडीज म्हणजे ए टीम नाही हे ही लक्षात ठेवावे लागेल.

You gottA problem with dat, dude? >>> did aa tell you i am having problems with this gaay? that ain't no bad guy. may gawd bless him. peace Lol

अरेच्या, आज हरले भारतीय तर कुणाची काहीच प्रतिक्रिया नाही? कुणाचे कसे चुकले वगैरे. काहीतरी जबरदस्त बिघडले असणार संघात, नाहीतर त्यांना इतक्या धावा करू दिल्या नि आपले मात्र एकेक रथी महारथी धडाधड कसे कोसळले?
काय बरे झाले?

Pages