Submitted by जान्हवी_ढोले on 3 June, 2011 - 05:52
डार्क ऑरेंज शुभ्र सफेद वर जरा उग्रच वाटतो
मात्र तोच लाईट क्रिम वर डोळे थंड करतो
पहा बँकग्राऊंड बदलल्याने किती तो फरक पडतो
मी काहिसं असंच बँकग्राऊंड बदलायचं ठरवलयं,
तुमच्यात राहावसच वाटत नाही
भटक्यांमध्ये जावसं वाटतय
बँकग्राऊंड बदलून उठून दिसेल कदाचित,
मी काहिसं असंच ठरवलयं,
पिवळ्यात जरासं निळ मिसळलं तर हिरवं होतं
हे भकास पिवळं गवत त्या निळ्या आकाशाच्या
बँकग्राऊंडवर किती उसळलं तरी हिरव काहि होईना
इतक्यात कोणी पेटवल कि ते काळं होऊ पाहतय
जख्खं काळं म्हणजे कोणत्याच रंगाचा आता मागमूस नाही
असं कसं काळा हा काही मूळ रंग नाही
सगळे रंग कुस्करून टाकावेत
तेव्हा कुठे हा अंधार बनतो
तशीच ती शुभ्रता तो सफेद हा ही काही मूळ रंग नाही
ना कोणा रंगांना कुस्करून ती बनते
थोडसं अलिप्त राहिलं कि आपोआपच उजाळते
मी ही काहिसं असंच ठरवलयं,
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
०
०
कविता चांगली आहे. शीर्षक
कविता चांगली आहे. शीर्षक गोंधळात टाकतंय.
नक्कि कुठेय शिला यात?
नक्कि कुठेय शिला यात?
ग्रेट .
ग्रेट .
कविता चांगली आहे... पण शीलाचा
कविता चांगली आहे... पण शीलाचा काय संबंध यात?
वाह!
वाह!
मी अगोदर छान रग रग कोणता रग
मी अगोदर छान रग रग कोणता रग ........असं नाव दिलं होत तर कोणी आलचं नाही वाचायला ................
स्वारी .
(No subject)
अरे, ही शीला वाली आयडीया भारी
अरे, ही शीला वाली आयडीया भारी आहे.
मला कविता आवडेश
मी अगोदर छान रग रग कोणता रग
मी अगोदर छान रग रग कोणता रग ........असं नाव दिलं होत तर कोणी आलचं नाही वाचायला ................
>>>
अनुस्वारांचा आणि तुमचा ३६ चा आकडा आहे का कवयित्री ताई??
आवडली...
आवडली...
आभार सर्वाचे ०
आभार सर्वाचे ०
आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल
आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल आभार : http://www.maayboli.com/node/26436
(No subject)
कुणी वाचली नाही तरी चालेल पण
कुणी वाचली नाही तरी चालेल पण असंबद्ध शिर्षक नको. मी तीनदा वाचली त्यासाठी..
कविता आवडली
शिला अजुन अंड्यात
शिला अजुन अंड्यात आहे....'जवान' व्हायला वेळ असेल...
कविता रंगीन आहे...
पण मी माझ्या प्रचिंच्या बाफ 'शेख बोक्याला' 'शिला की जवानी' असं नाव दिले तर अतिरंगीन वाचकांवर किती घोर अन्याय करण्या सारखं होईल..याचा अंदाज आहे का.....?
घ्या 'रेश्मा की जवानी' समजुन हा बाफ पहा.
http://www.maayboli.com/node/26441
मी अगोदर छान रग रग कोणता रग
मी अगोदर छान रग रग कोणता रग असं नाव दिलं होत तर कोणी आलचं नाही वाचायला ................
>>>> गुड वन!!!
काही हरकत नाही. नाहीतरी ते
काही हरकत नाही. नाहीतरी ते गाणं आणि तीस मार खान चा तरी कोठे संबंध होता!
मस्त. शीर्षकात शीला आहे
मस्त.
शीर्षकात शीला आहे म्हणून ती कवितेत ही असायलाच हवी हे बरोबर नाही.
मी अगोदर छान रग रग कोणता रग
मी अगोदर छान रग रग कोणता रग असं नाव दिलं होत तर कोणी आलचं नाही वाचायला ................ >>>
मस्तच. ! २० जण आले आता.
पुढचे शिर्षक - मुन्नी बदनाम हुइ का ?
हम्म..
हम्म..
देवा!!! कविता छानच पण
देवा!!!
कविता छानच पण शिर्षकाच तेवढ काहीतरी करा. प्लीज.
'अंधार' शीर्षक योग्य राहील.
'अंधार' शीर्षक योग्य राहील. मात्र शेवटच्या आणि त्यापूर्वीच्या कडव्यांची अदलाबदल करावी लागेल.अंधार शेवटी यायला हवा.कविता खरच चांगली आहे.
जान्हवी, कविता मस्तच आहे!!
जान्हवी,
कविता मस्तच आहे!!
हे खास करून आवडलं..
पहा बँकग्राऊंड बदलल्याने किती तो फरक पडतो
मी काहिसं असंच बँकग्राऊंड बदलायचं ठरवलयं,
तुमच्यात राहावसच वाटत नाही
भटक्यांमध्ये जावसं वाटतय
बँकग्राऊंड बदलून उठून दिसेल कदाचित,
मी काहिसं असंच ठरवलयं,
शीर्षकाचं तेवढं मनावर घ्या..
"मी काहिसं असंच ठरवलयं.." हे पण चांगलं वाटू शकेल.. जस्ट अ सजेस्शन..