मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांतीलाल या माणसाचं आडनाव मुथा, जैन वगैरे असलं काहीतरी असेल ना.. गोडबोले काय?
>>>>>>>>> हं मलाही हेच खटकलं होतं.

"मिनीट मेड लिंबु फ्रेश" ची जाहीरात आणी गाणं(ताजा,ताजा रिश्तोंके प्यारे,प्यारे लमहे खट्टे मीठे)दोन्ही मला आवडतं.आणी त्यात ती कुरट्या केसांची छोटी मुलगी तीच नंतर मोठी झाली आहे असं वाटतं.

AIRCEL ची जाहीरात आणि बर्‍याच जाहिरातींमधून लग्न हे ख्रिस्चन का दाखवतात? भारतातले हिंदू मेले किंवा कन्व्हर्ट झाले का सगळे?

कालच एक वैतागवाडी जाहीरात पाहिली. कुठल्या तरी तेलाची आहे. एक भला मोठा ट्रक चिखलात रूतून पडलाय आणि डझनभर हमाल् सर्व शक्तीनिशी तो ट्रक ओढून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ट्रक ढीम्म ! तेवढ्यात ही एक षोडशा 'ते' तेल केसाना लावून येते आणि ट्रकच्या पुढील बाजूस केसाचा लांब शेपटा अडकविते आणि जोराने खेचते. ट्रक झटदिशी चिखलातून बाहेर ! हमालाच्या व बघ्यांच्या टाळ्या.

आता लावा म्हणे सर्वानी तेच तेल आपल्या केसाना....मजबुतीसाठी.

त्या अ‍ॅक्स, वाईल्ड स्टोन आणि झटॅक अशा तत्सम डीओच्या जाहीराती कीती हिडीस आहेत. याविरोधात स्त्रीवादी संघटना काहीच कशा करत नाहीत. च्यायला भिकार्याने तो डिओ लावला तर त्याला कुठलीही स्त्री मिठी मारायला जाते हे किती डीग्रेडींग आहे.

कांतीलाल या माणसाचं आडनाव मुथा, जैन वगैरे असलं काहीतरी असेल ना.. गोडबोले काय?>>>

'हरी साडू' प्रकरण अजून अ‍ॅड वर्ल्ड विसरलेले नाही. त्यामुळे, एकदम दुर्मिळ नाव वापरलेय. Happy

>> त्या अ‍ॅक्स, वाईल्ड स्टोन आणि झटॅक अशा तत्सम डीओच्या जाहीराती कीती हिडीस आहेत. याविरोधात स्त्रीवादी संघटना काहीच कशा करत नाहीत. च्यायला भिकार्याने तो डिओ लावला तर त्याला कुठलीही स्त्री मिठी मारायला जाते हे किती डीग्रेडींग आहे.
>>

खरंच अतिशय हीडिस जाहिराती आहेत. याविरोधात कुठे ऑनलाईन तक्रार नोंदवता येते का?

रच्याकने, मी कुठेतरी वाचलं की, एक माणूस हा डीओ वापरत होता, पण एकाही स्त्रीने त्याला भाव दिला नाही म्हणून त्याने त्या डीओ कंपनी विरुद्ध केस टाकलीय. Happy

.

रच्याकने, मी कुठेतरी वाचलं की, एक माणूस हा डीओ वापरत होता, पण एकाही स्त्रीने त्याला भाव दिला नाही म्हणून त्याने त्या डीओ कंपनी विरुद्ध केस टाकलीय.>>>>

खरंय हे...युनिलिवरच्या विरोधात केस झालीये... अ‍ॅक्स डिओ! Happy

>>त्या अ‍ॅक्स, वाईल्ड स्टोन आणि झटॅक अशा तत्सम डीओच्या जाहीराती कीती हिडीस आहेत.

अनुमोदन.

http://www.ascionline.org/index.php/asci-consumers इथे तक्रार करता येते.

त्या अ‍ॅक्स, वाईल्ड स्टोन आणि झटॅक अशा तत्सम डीओच्या जाहीराती कीती हिडीस आहेत. याविरोधात स्त्रीवादी संघटना काहीच कशा करत नाहीत. च्यायला भिकार्याने तो डिओ लावला तर त्याला कुठलीही स्त्री मिठी मारायला जाते हे किती डीग्रेडींग आहे.
>>> १००% अनुमोदन. आत्ता अगदी हेच लिहायला आले होते. डेन्टिस्टकडे गेलेला पेशन्ट- ती जाहिरात पाहिली. किळसवाण्या आणि ऑब्जेक्शनेबल जाहिराती आहेत अगदी! Angry

पल्लवी सुभाष ही अमृता सुभाषची बहिण आहे ही जोरदार बातमी कम अफवा फिरत होती 'करेला' अ‍ॅडनंतर Happy त्यांची ती 'कितने दिनोंमें तुमने मुझे आय लव्ह यू नही कहा' अ‍ॅडही अगदी गोड!

विषयांतर- पल्लवी सुभाष चार वर्षापूर्वी 'चार दिवस सासूचे' ह्या धुव्वाधार सिरियलीतही होती. रोहिणी हट्टंगडीला एक मुलगी दाखवली होती एकेकाळी, ती ही. नंतर लेखक विसरले बहुधा त्या मुलीला Biggrin

त्या अ‍ॅक्स, वाईल्ड स्टोन आणि झटॅक अशा तत्सम डीओच्या जाहीराती कीती हिडीस आहेत. याविरोधात स्त्रीवादी संघटना काहीच कशा करत नाहीत. च्यायला भिकार्याने तो डिओ लावला तर त्याला कुठलीही स्त्री मिठी मारायला जाते हे किती डीग्रेडींग आहे.>>> अनुमोदन.
एकंदरीतच त्या डिओंच्या जाहिराती हिडीस असतात. Sad

>>खरंच अतिशय हीडिस जाहिराती आहेत. याविरोधात कुठे ऑनलाईन तक्रार नोंदवता येते का?

The Advertising Standards Council of India

Alan Collaco - Secretary General
219, Bombay Market,
78 Tardeo Road,
Mumbai 400 034
Tel: (022) 23521066/23516863
Toll Free Number : 1-800-22-2724
Fax: 23516863
E-mail:
asci@vsnl.com

alan@ascionline.org

"...डेन्टिस्टकडे गेलेला पेशन्ट...."

वर पौर्णिमा यानी सांगितलेली ही जाहिरात (कोलगेटची ~ ३ डेन्टिस्ट्स हातात कोलगेट सेन्सिटिव्ह पॅक आहे तर चौथा डेन्टिस्ट "ऑदर" प्रॉड्क्ट्सची ट्यूब दाखवित आहे), याचा छुपा अर्थ या देशात ७५% लोक कोलगेट टूथपेस्ट वापरतात हे 'डेन्टिस्ट' सुचवितात असा होतो. याविरूध्द फोरमकडे इतर कंपन्यांनी तक्रार केली आणि पुढे हे सिद्ध झाले की इंडियन मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत डॉक्टर्सना अशाप्रकारची एका विशिष्ट अशा ब्रॅण्डची जाहिरात करण्यास परवानगी देतच नाही. कोणताही डॉक्टर सल्ला देत असेलच तर 'चांगल्या कंपनीची टूथपेस्ट वापरा' अशा स्वरूपाचा सल्ला देईल. हे पुढे कोलगेटने मान्य केले आणि ती जाहिरात चॅनेलवरून काढून घेण्यात आली.

"डोव्ह शाम्पू" बद्दलही अशीच Misleading ची तक्रार केल्यावर हिंदुस्थान लीव्हरने ती जाहिरात काढून घेतली.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण होते असे की, बहुतांशी ASCI कडे येणार्‍या तक्रारी या प्रामुख्याने Rival Companies कडूनच येत असतात. त्याला कारणही अंतर्गत स्पर्धा हेच आहे.

हनुमान लक्ष्मणाला बाम लाऊन बरे करतो अशी एक जाहीरात होती. मी त्याविरुद्ध तक्रार केली होती "धार्मिक भावना दुखावणारी जाहीरात". ती तक्रार जरी फेटाळली गेली तरी योगायोग म्हणा किंवा कंपनीवाले घाबरले म्हणा...ती जाहीरात त्यानंतर कधीही दिसलेली नाही.

मागे पेपरात आलं होतं की बर्‍याच जाहिरातीत आजकाल फॉरेनर्स दिसतात कारण म्हणे आपणा भारतीयांना फॉरेनर्सने एखादं प्रॉडक्ट चांगलं आहे असं म्हटलं की पटतं. Uhoh

प्रतीक, मी डिओ संदर्भातली डेन्टिस्टची जाहिरात म्हणत होते. माणूस कोणतातरी डिओ लावून डेन्टिस्टकडे जातो, खुर्चीवर बसतो. ती डेन्टिस्ट त्या डिओमुळे त्याच्याकडे आकर्षित होते आणि दात तपासायचे सोडून... -अत्यंत आक्षेपार्ह जाहिरात! Angry

हो ग पूनम.. त्यात लहान मुलंही बघत असतात या जाहिराती. Sad ती टेलरकडे गेलेल्या बाईची जाहिरात आणि तो चॉकलेट नी मढलेला मुलगा रस्त्याने जाताना मुली त्याला चाटायला येतात वगैरे.... ही कल्पनाशक्ती म्हणायची का काय? Angry

पौर्णिमा....खरंय, तुम्ही 'डेन्टिस्ट' चा उल्लेख केल्यामुळे मला 'डीओ' समवेत 'कोलगेट' ची ती जाहिरातही आठवली, तो संदर्भ वर दिला.

पार्ले सारख्या नामवंत कंपनीलाही कधीकधी हिणकस डोहाळे लागतात. मागे एकदा त्यांच्या जाहिरातीत आफ्रिका खंडातील एक अत्यंत दुष्काळग्रस्त गाव दाखविले होते, ज्यात तिथले ग्रामस्थ त्या तडे गेलेल्या जमिनीत खणून वाडग्याने पाणी काढत आहेत, आणि त्यावेळी एक गांजेकस भारतीय मॉडेल तेथे येते आणि पोपच्या स्वरात म्हणते, If you don't have water, drink LMN juice." ही खरोखरी घृणास्पद आणि आफ्रिकन लोकांच्या स्थितीची थट्टा करणारीच जाहिरात होती. ASCI ने तातडीने पावले उचलल्यामुळे आठवड्याच्या आतच पार्लेने ती जाहिरात बंद केली.

मुद्दा असा की, इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या कंपन्यातून 'आपली जाहिरात जनमानसाच्या भावना दुखावेल' का असा विचार करणारी एकही अधिकारी व्यक्ती नसावी ?

>>मुद्दा असा की, इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या कंपन्यातून 'आपली जाहिरात जनमानसाच्या भावना दुखावेल' का असा विचार करणारी एकही अधिकारी व्यक्ती नसावी ?

अगदी योग्य मुद्दा. प्रतीक, ASCI ला विपत्र लिहून हे सुचवाल का?

"...ASCI ला विपत्र लिहून हे सुचवाल का?...."

जरूर मंदार. माझ्याकडे त्यांचा ई-मेल आहेच. वरील मुद्दा आणि त्याचबरोबर या धाग्याविषयीही लिहिन. असेल एखादा 'महाराष्ट्रीयन' अधिकारी त्यांच्या पॅनेलवर तर इथल्या वाचनाने त्यानाही जनमानसाचा कानोसा या निमित्ताने घेता येईल.

>>आणि त्यावेळी एक गांजेकस भारतीय मॉडेल तेथे येते आणि पोपच्या स्वरात म्हणते, If you don't have water, drink LMN juice."

हरे रामा! हे म्हणजे इतिहासात त्या फ्रेंच राणीबद्दल वाचलं होतं 'भाकरी नको, तर केक खा' म्हणणारी, तिच्यासारखं झालं Sad

होय, स्वप्ना...अगदी अगदी. इतकेच काय पण आपली केस "डीफेन्ड" करतानाही पार्लेच्या वकिलांने आपल्या जाहिरातीचा सूर 'खेळकर' असल्याचे सांगताना हाच फ्रेन्च राणीचा किस्सा कोट केला होता. अर्थात तो दावा फेटाळला गेला, हे सांगणे न लगे. पार्लेनेही वेळीच शहाणपणा दाखवत अ‍ॅड विथड्रॉ केली होती.

पण परत तेच....हाच 'शहाणपणा' त्याना स्क्रीनिंगपूर्वी का सुचत नसेल?

(जाता जाता...खास तुझ्यासाठी एक किस्सा > 'मि.अ‍ॅण्ड मिसेस ५५" मध्ये ऐषआरामात राजकन्येसारखी वाढलेली मधुबाला बेकारीमुळे उपासमार करत असलेल्या गुरुदत्तला भोळेपणाने विचारते, "तुला भाकरीदेखील मिळत नाही असे म्हणतोस तर तू केक का खात नाहीस?" हताशपणे गुरुदत्त तिच्याकडे वळून पाहतो आणि म्हणतो, 'व्वा ! कित्ती कित्ती हुशार आहेस गं तू !". यावर मधुबाला, "बघ, ना. इतकी हुशार असूनही मला तसे कुणी समजतच नाही.")

>>इतकेच काय पण आपली केस "डीफेन्ड" करतानाही पार्लेच्या वकिलांने आपल्या जाहिरातीचा सूर 'खेळकर' असल्याचे सांगताना हाच फ्रेन्च राणीचा किस्सा कोट केला होता.

खेळकर? त्या फ्रेंच राणीला गिलोटीनखाली जावं लागलं होतं हे त्याच्या गावी नसणारच. हे लोक 'साळंत' गेलेच नव्हते का कधी? मधुबालाच्या किश्श्याबद्दल धन्स रे!

तो चॉकलेट नी मढलेला मुलगा रस्त्याने जाताना मुली त्याला चाटायला येतात वगैरे.... ही कल्पनाशक्ती म्हणायची का काय?

तरी तुम्ही बघता ती अ‍ॅड बरीच सेंसॉर आहे मूळ जाहीरात त्याहूनही भयंकर आहे.

अमृता सुभाष च आडनाव बहुदा दांडेकर वगैरे चित्तपावनी आहे.

Pages