आता आपण मोठे झालो, नाही का?
आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!
एकत्र घालवलेल्या जेमतेम दहा-वीस संध्याकाळ , तेवढ्याच चर्चा,
त्यातही कधीतरी मौनातल्या गप्पा,
मोजून पाच-पन्नास भांडणे,
हजारो विनवण्या, कोट्यवधी मिलिसेकंदांचा अबोला
आणि कायमचा पसेसिव्हनेस...
हा आत्तापर्यंतचा ढोबळ हिशेब!
आतली उलथापालथ आपली आपल्यालाच माहित!
अजून काही वर्षांनी
आपल्या मैत्रीला काही जाणती वर्षं पूर्ण होतील...
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..
भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!
विनवण्या, अबोला यांची मला
आतापासूनच भीती वाटायला लागली आहे...
पसेसिव्हनेसचा अर्थ आपण लावलेल्या
झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं
तेव्हा सांगतील आपल्याला...
मैत्रीचं व्यापलेपण कदाचित तेव्हा समजेल दोघांनाही..
आपण आत्ता कुठे मोठे होऊ लागलो आहोत...
- नचिकेत जोशी
>> आज आपल्या मैत्रीला काही
>> आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!
क्या बात है!!
>> भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!
सुंदर कविता!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुरुवर्य खुप आवडली. जिवनात
गुरुवर्य खुप आवडली. जिवनात मैत्रीचे हे आताचे दिवस असेच ठेवता आले तर.
मस्त कविता आहे. कशाची तरी आठवण करुन देनारी. पु.ले.शु.
मस्त रे ...
मस्त रे ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सुंदर..! संध्याकाळी आकाश
सुंदर..!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..>> अप्रतिम...
भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!>> भांडणाशिवाय मजा नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैत्रिचा पुर्वार्ध आणि
मैत्रिचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध ... अप्रतिम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख जमलिये कविता...
“मैत्रीचं व्यापलेपण कदाचित
“मैत्रीचं व्यापलेपण कदाचित तेव्हा समजेल दोघांनाही..
आपण आत्ता कुठे मोठे होऊ लागलो आहोत...”
..... मस्तच
खूप खूप आवडली.
खूप खूप आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..
मस्त..
कविता खूप म्हणजे प्रचंडच
कविता खूप म्हणजे प्रचंडच आवडली.
आपण कितीही मोठे झालो तरी
आपण कितीही मोठे झालो तरी 'झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं' विसरुण कशी चालतील..
खरंतर त्याच्यांच आधारावरती अख्ख झाड उभं असतं..मग ते मैत्रीचं असो की जीवनाचं नाही का?
खूप खूप आवडली!
मस्ताय !!!!
मस्ताय !!!!
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.. !!
मस्तच.. !!
अरे व्वा... नचिकेत... छा गये
अरे व्वा... नचिकेत... छा गये तुस्सी !
नचिकेत, फार फारच
नचिकेत,
फार फारच छान!
"भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!"
असं सार्या "आपल्याला" प्रिय असणार्या नात्यांबद्दल वाटतं! भांडण करून-करून एक तर ते नातं आपल्याला दुषित करायचं नसतं किंवा प्रेम समजतच नाही तर भांडून तरी काय 'उपेग' असं वाटू लागतं...
हे अवांतर..
कवितेचा आशय फार भावला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> पसेसिव्हनेसचा अर्थ आपण
>> पसेसिव्हनेसचा अर्थ आपण लावलेल्या
>> झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं
>> तेव्हा सांगतील आपल्याला...
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झाड, रोमा, अवि, विशाल,
झाड, रोमा, अवि, विशाल, उल्हासकाका, क्रांति, शामली, स्वातीताई, कविता - धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुक्ता, थँक्स! भांडणाशिवाय मजा नाही.. >>> बराच अनुभव दिसतोय वाट्टं!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दक्षिणा, ह्म्म्म..
धन्स!
ज्योती, प्रचंड thanku!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शामकाका, खरंय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दगडसम्राट यो, चेतना, कौतुकभौ - लोभ असावा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरीश, कधीतरी हे भाग्यही!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागेश्री, "भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!" ही ओळ आकाश वेगळं झालेलं असेल, चंद्र वाटून घेऊ वगैरे नंतर आली आहे.. i hope भापो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असं सार्या "आपल्याला" प्रिय असणार्या नात्यांबद्दल वाटतं! भांडण करून-करून एक तर ते नातं आपल्याला दुषित करायचं नसतं किंवा प्रेम समजतच नाही तर भांडून तरी काय 'उपेग' असं वाटू लागतं... >>
दुषित वगैरे नाही होत काही... might be a phase...तसंही आपण आपल्याच दृष्टिकोनातून जग बघत असतो की! the best part is - अशी मैत्री असायलाही भाग्य लागतं आणि आपलं ते आहे, हे कळलं की झालं!!
मस्त कविता
मस्त कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान नचिकेत.
खूप छान नचिकेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर! मैत्रीचा गंध मस्त
सुंदर! मैत्रीचा गंध मस्त पसरवलाय माबोवर.
हर्षल, उमेश, भ्रमर, निवडुंग -
हर्षल, उमेश, भ्रमर, निवडुंग - thanks!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं,
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
व्वा!