आज अचानक..

Submitted by निवडुंग on 21 May, 2011 - 05:08

आज अचानक लक्षात आलं,
वर्तमानाच्या बोचर्‍या थंडीपासून,
स्वत:ला वाचवायच्या प्रयत्नात,
गोठून गेलंय सर्व काही.

नकळत कधीच हरवून गेलो,
भूतकाळातील पहिल्या पावसाचे,
तनमन तृप्त करणारे थेंब,
अन् दरवळणार्‍या मातीचा सुगंध.

भूत वर्तमानाच्या या रगाड्यात,
कुस्करून विलीन झाल्या आठवणी.
भविष्यातील दाहक वैशाखवणवा,
तोच असेल का आता सोबतीला?

आयुष्य खरंच एवढं अतर्क्य असतं?

गुलमोहर: 

Back to top