..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायटोकॉड्रिआचे त्याच पेशीकेंद्रकातल्या एका जीनवर प्रेम असते त्याचे पण तिच्यावर असते. पण एक दिवशी तो जीन दुसर्‍या पेशीकेंद्रकातल्या मायटोकॉड्रिआबरोबर लग्न करतो तर पहिली मायटोकॉड्रिआ कोणते गाणे म्हणेल?

@ माधव ~ तुम्ही निवडलेले गाणे अप्रतिम आणि अर्थवाहीच आहे. पण माझ्या मनीचे युगलगीत आहे.

कोणाच्या धार्मिक भावना दुखावायचा उद्देश नाही. तरी दुखवल्या गेल्यास आधीच माफी मागून हे कोडं घालते.

कैकयीला दिलेल्या वरापायी भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास मिळतो. राम वनात जायला निघाल्यावर सीता आणि लक्ष्मण त्याला काय म्हणतात?

आणखी एक - सीआयएवाले अल-कायदाच्या एका मोठ्या दहशतवाद्याला अटक करतात. त्याची उलटतपासणी सुरु होते. पण तो काहीच बोलत नाही. त्यामुळे ते खूप वैतागतात. तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल?

धन्स.....

सीआयएवाले अल-कायदाच्या एका मोठ्या दहशतवाद्याला अटक करतात. त्याची उलटतपासणी सुरु होते. पण तो काहीच बोलत नाही. त्यामुळे ते खूप वैतागतात. तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल?
... आणि तपासणीवाले त्या दहशतवाद्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणतील?

एक मीटिंग चालू आहे. अध्यक्ष मॅडम यांचे भाषण चालू असतानाच त्याना ओळखणारा सभेत येतो आणि त्याना हाक मारतो. अशावेळी मॅडम कोणते गाणे म्हणतील.

[फारच सोप्पे आहे. पण गाणे आहे सुंदर] >>>> जहा मै जाती हुं वही चले आते हो.....ये तो बताओ के तुम मेरे कौन हो.......???

आणि तपासणीवाले त्या दहशतवाद्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणतील?
>>> चुप चुप खडे हो जरूर कोई बात है, पेहली मुलाकात है ये पेहली मुलाकात है.

स्निग्धा.....वॉव्व, सुंदरच आहे हे कठपुतळ्यांचे राज-नर्गिस गाणे, पण माझ्या गाण्यात नर्गिसच्याच जमान्यातील दुसरी अभिनेत्री आहे. गाणेही तितकेच सुंदर आहे. ट्राय.

सीआयएवाले अल-कायदाच्या एका मोठ्या दहशतवाद्याला अटक करतात. त्याची उलटतपासणी सुरु होते. पण तो काहीच बोलत नाही. त्यामुळे ते खूप वैतागतात. तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल?
... आणि तपासणीवाले त्या दहशतवाद्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणतील?

गुमसुम हो क्यु पास आओ ना, रुथे हो क्यु मानजाओ ना :o

तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल?

दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे?
हम कौन है खयाल तो हम क्या जवाब दे?

तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल? >> उनको ये शिकायत है के हम कुछ नही केहते ?

... आणि तपासणीवाले त्या दहशतवाद्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणतील?>>>>
दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो... Proud

@ भरत : गाण्यातील दुसरी ओळ "हम कौन है खयाल तो हम क्या जवाब दे?" अशी प्रश्नार्थक असली तरी ती "तुमको न हो खयाल तो हम क्या जवाब दें" अशी असहायतेच्या प्रश्नाची आहे.

(हे गाणे माझ्याकडे दोन्ही स्वरूपात....Audio+Video.. असल्याने शब्द माहीत आहेत.)

जॉन्,जो आणि जील यांचे बालपणापासून त्रिकूट असते. तरुणपणात जॉन आणि जो दोघेही जीलवर प्रेम करु लागतात. जील मात्र जॉनशी लग्न करण्याचा निर्णय घेते. जोला खूप वाईट वाटते. जीलने जॉनलाच का निवडले हे तिला विचारायचे असते पण ती संधीच त्याला मिळत नाही कारण लग्न झाल्यावर लगेचच जॉन आणि जील खूप दूर निघून जातात. फारा वर्षांनी डीनरच्या वेळी जोला जील अचानक भेटते. तो तिला त्याला छळत असलेला प्रश्ण विचारतो. तर जील कुठले गाणे म्हणेल?

>>तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल? >> उनको ये शिकायत है के हम कुछ नही केहते ?

माधव, बरोबर Happy काय यार, माझी सगळी गाणी तुम्ही लोक्स पटापट ओळखताय! आता काहीतरी 'फाडू' गाणं शोधलं पाहिजे! Proud

तर जील कुठले गाणे म्हणेल?

छोडो कल की बातें कल की बात पूरानी.... Happy

Happy

माधव,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है
के जॉन (जहाँ) मिल गया
Proud

कदाचित चुकलेही असेल. खात्री नाही. Happy

सीआयएवाले अल-कायदाच्या एका मोठ्या दहशतवाद्याला अटक करतात. त्याची उलटतपासणी सुरु होते. पण तो काहीच बोलत नाही. त्यामुळे ते खूप वैतागतात. तर तो हे आपल्या सहकारी दहशतवाद्याला कसं सांगेल?
>> उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते

>>तर जील कुठले गाणे म्हणेल?
वक्त करता 'जो' वफा, आप हमारे होते?

....वक्त करता 'जो' वफा, आप हमारे होते?...

~ पण जील ने तर स्वखुशीने जॉनबरोबर लग्न केले आहे ना? मग ती असे गाणे का म्हणेल ?

Pages