..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.

छानशा 'दिल' नावाच्या बंगल्यात एक माणूस रहात असतो. एके दिवशी त्याच्या शेजारच्या बंगल्यात राहणारा ब्रुस ली स्वत:च्या बागेत झाडांकरता बरेच खड्डे करतो आणि सगळी माती याच्या आवारात टाकून देतो. तर बंगल्याचा मालक त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?
>>> नोप.

देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया ...... Proud

एका खुशालचेंडु नवर्‍याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन त्यातुन तो बराही झालेला. पण हवी ती काळजी घ्यायला मात्र विसरायचा. त्याची बायको त्याला सतत त्याच्या हृदयविकाराची आठवण करुन द्यायची, की बाबा काळजी घे.
अशा वेळी तो बायकोला उद्देशुन कोणतं गाणं म्हणेल आणि बायकोही त्याला गाण्यातुन कसे उत्तर देईल?

भरत मयेकर, मला तरी नाही येत आहे.

एका हाऊसिंग सोसायटीत ए, बी, सी ... अशा बिल्डिंग्ज असतात. त्यातल्या सातव्या बिल्डिंगमधला पहिला फ्लॅट विकायला काढतात. तो बघायला आलेल्या गिर्‍हाईकाला रियल इस्टेट एजंट त्या फ्लॅटचं वर्णन कसं करून सांगेल.

देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया...!!

~ हे राम !!!
खुद्द न्याय शर्मा आणि जयदेव यानाही ही सिच्युएशन सांगितली असती तरीही हे गाणे सुचले नसते. सलाम !!

(तलतच्या अगणित चाहत्यांच्या यादीत हे गाणे सदैव टॉप टेन मध्ये येते)

एका खुशालचेंडु नवर्‍याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन त्यातुन तो बराही झालेला. पण हवी ती काळजी घ्यायला मात्र विसरायचा. त्याची बायको त्याला सतत त्याच्या हृदयविकाराची आठवण करुन द्यायची, की बाबा काळजी घे.
अशा वेळी तो बायकोला उद्देशुन कोणतं गाणं म्हणेल आणि बायकोही त्याला गाण्यातुन कसे उत्तर देईल?

तो : आपने याद दिलाया तो मुझे याद आया
के मेरे दिल पे पडा था कोई गम का साया
ती : मैंने भी सोच लिया साथ निभाने के लिए
दूर तक आउंगी मैं तुमको मनाने के लिए
दिल ने अहसास दिलाया ति मुझे याद आया

किरण्यके, त्या 'सवेरेवाली गाडी'च्या स्पष्टीकरणासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायचं राहून गेलं होतं.

मामी, २ बिस्किटांचे पुडे नकोत, २ डझन हापूस पाहिजेत Proud

रच्याकने, धोनीच्या त्या सावळ्या बालमैत्रिणीचं काय झालं? का मी उत्तर मिसलं?

>>एका हाऊसिंग सोसायटीत ए, बी, सी ... अशा बिल्डिंग्ज असतात. त्यातल्या सातव्या बिल्डिंगमधला पहिला फ्लॅट विकायला काढतात. तो बघायला आलेल्या गिर्‍हाईकाला रियल इस्टेट एजंट त्या फ्लॅटचं वर्णन कसं करून सांगेल.

मामी, ये जीवन है, इस जीवनका यही है, यही है, यही रंगरूप?

आता माझं एक कोडं - एक राजा आपल्या राजकुमाराचं शिक्षण पूर्ण होताच त्याला शेजारच्या देशांच्या सफरीवर पाठवतो. हेतू हा की राजकुमाराने जग पहावं, नव्या गोष्टी शिकाव्यात, शहाणं व्हावं. काही महिन्यांनी राजकुमार परत येतो. येताना त्याने आपल्यासोबत नवलाईच्या अनेक वस्तू आणलेल्या असतात. राजाही त्या कौतुकाने निरखून पहात असतो. तेव्हढ्यात राजकुमार एक नळकांड्यासारखी दिसणारी वस्तू त्याच्या हातात देतो. राजा म्हणतो "हे काय आहे?". राजकुमार म्हणतो "ह्याला दुर्बिण म्हणतात. डोळ्यांना लावून तर बघा". राजा ती घेऊन दूर नजर लावतो. आश्चर्यचकित होऊन तो कुठलं गाणं म्हणेल?

एका हाऊसिंग सोसायटीत ए, बी, सी ... अशा बिल्डिंग्ज असतात. त्यातल्या सातव्या बिल्डिंगमधला पहिला फ्लॅट विकायला काढतात. तो बघायला आलेल्या गिर्‍हाईकाला रियल इस्टेट एजंट त्या फ्लॅटचं वर्णन कसं करून सांगेल.

>>>>>>> मामी, ये जीवन है, इस जीवनका यही है, यही है, यही रंगरूप?

येस्स स्वप्ना,

ये G1 है, इस G1 का यही है, यही है, यही है रंगरूप.

येस्स! एक गाणं ओळखता आलंच शेवटी....याहू! रच्याकने, सोमवारी सकाळी इथे जनता पाहून बरं वाटलं. Happy

थेन्क्यू मामी. Happy अजून एक, अजून एक. वासूचं सपनावर प्रेम असतं. पण सपना त्याला माझ्यावर प्रेम करू नकोस असं सांगते. कसं?

आत्ताच एफ.एम. वर एक गाणे ऐकत होतो, तेच कोड्यात गुंफतो :

एक मीटिंग चालू आहे. अध्यक्ष मॅडम यांचे भाषण चालू असतानाच त्याना ओळखणारा सभेत येतो आणि त्याना हाक मारतो. अशावेळी मॅडम कोणते गाणे म्हणतील.

[फारच सोप्पे आहे. पण गाणे आहे सुंदर]

दिनेशदा थॅंक्यु.. Proud
प्रतीक.. या सिच्युएशन ला मराठी गाणे चालेल का?? नको मारुस हाक मला घरच्यांचा धाक.. Proud

प्रतीक, ह्याला फिट्ट बसेल अशी एक गझल आहे, ते गाणं आहे की नाही माहित नाही. मुझको रुसवा सरे मेहफिल तो न करवाईया करे.

मामी आणि स्वप्ना G1 - एकदम झकास Happy

धोनीच्या त्या सावळ्या बालमैत्रिणीचं काय झालं? >> मी उत्तर लिहायला विसरून गेलो होतो. मै तो सावरे के रंग रांची

@प्रतिक - मुझे ना बुला, मुझे ना बुला छुप छुप छलिया रे मुझे ना बुला ?

@ राम ~ मराठी गाणे डोक्यात नाही....मी म्हट्ल्याप्रमाणे ते हिंदी [युगलगीत आहे] रेडिओवर ऐकताना त्यातील सुमधुरतेमुळे मनी रेंगाळले अन् म्हटले चला इथे ते कोड्यात गुंफवू. ट्राय...नक्की आठवेल तुम्हाला, फारच प्रसिद्ध आहे ~ कृष्णधवल जमान्यातील.

@ स्वप्ना ~ नोप. पण तुझ्या डोक्याला ताण देणारे हे गाणे नक्कीच नाही. वर सांगितल्याप्रमाणे युगलगीत आहे.

Pages