कुणाला कशाचे तर कुणाला कशाचे. मला खाद्यपदार्थांचे, तेही खास करुन स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो काढायची हौस आहे.
नेहमीच्या या कामाला मी छंदाचे रुप दिलेय. प्रत्येक पदार्थ दिसायला कसा सुंदर दिसेल. त्याची रंगसंगती कशी आकर्षक दिसेल, असा विचार करत असतो. माझ्यासाठी ती नवनिर्मितीच असते.
पुर्वी मायबोलीवर लिंक देणे मला जमत नसे. त्यामुळे यातले काही फोटो पुर्वी टाकले असतील, तरी ते छोट्या आकारात होते. आता सावलीने शिकवल्यानंतर मला लिंक देणे जमू लागले आहे.
मी ज्या पाककृति लिहितो, त्यासोबत फोटो द्यायचा प्रयत्न करतोच, पण इथे बाकिची मंडळी ज्या पाककृति लिहितात, त्या पण करुन बघायचा प्रयत्न करत असतो. शिवाय यातल्या काही प्रकाशचित्रांशी, काही मायबोलीकरांच्या आठवणी निगडीत आहेत. त्यापण लिहितोच.
तर पानं मांडलीत, या जेवायला.... सावकाश होऊ द्या.
अश्विनीला एकदा पनीरच्या प्रकाराबद्दल लिहिले होते. तर हे पनीर चिली तिच्यासाठी. तसे अरुंधतीला पण पनीर आवडते, ते माहीत आहे.
उपास आहे का कुणाचा ? हे फक्त बटाट्याचे थालिपिठ.
जांभळा कोबी, केशरी गाजरे, हिरवी मिरची आणि पांढरा पास्ता. एक चित्र !
लेकीसाठी केलेला फ्राय लेमन फिश !
आमच्या कडे मिळणारे खास बीन्स. इथे त्याला कोको बीन्स म्हणतात. दिसायला सुंदर आणि चवीलाही छान
आणि हि त्याची भाजी
मिनोतीच्या पॅनकेक वरुन प्रेरणा घेऊन --
शेपू फॅन क्लबची आठवण काढत.
वर्षूचा रवा डोसा..
केनयाचे मूग, केनयाचेच घट्ट दही आणि केनयाचाच चिवडा (इथे त्याला चेवडो म्हणतात ) वापरुन केलेले चाट
साधा वरणभात आणि दह्यातल्या मिरच्या .
केळ्याच्या पानातली गोडाची पानगी
कांदा बटाटा आणि घेवडा बेक. हा पदार्थ मंगला बर्वेंच्या अन्नपुर्णा पुस्तकातला.
तयार कचोरी वापरुन केलेली कोफ्ता करी.
मायबोलीकर कुल (सुभाष) आणि मी, आम्ही दोघांनी नगरच्या रस्त्यावर हा हुरडा खाल्ला होता. आता मानुषी, चंपक, चंपी सोबत खाईन म्हणतो.
कॉर्न आणि ब्रोकोली बेक
साबुदाण्याचे थालिपीठ
माझी आवडती फणसाची भाजी
गोव्यातील खास अनसाफनसाची भाजी (टीमगोवासाठी )
खास वर्षूसाठी
व्हेजीटेबल स्टर फ्राय
छोट्या छोट्या ईडल्या करायचा कंटाळा आल्यावर, त्यच पिठात भाज्या वगैरे घालून केलेली तवा ईडली
जागू आणि साधनाला ला विसरुन कसे चालेल ? गोव्याच्या बांबोलिम बीचवर मित्रमैत्रिणींना खिलवलेले फ्राय फिश.
गुजराथी हांडवो
खाऊन दमला असाल तर चहा घ्या !!
साबुदाण्याची खिचडी
या फोटोबाबत अगदी खास आठवणी आहेत. गिरिराज उभयताचे केळवण आम्ही केले होते. आरतीच्या घरी (इट्स्मी ) त्यावेळी सई (दक्षिणाची ताई ), क्षिप्रा, रुपाली (त्यावेळची सोनचाफा) आणि जी एस होते. पुरणपोळी, करंजी, गुलाबजाम असा जंगी बेत होता.
माझ्या भटक्या मित्रांना विसरुन कसे चालेल. दोन्ही योगेश, रोहन, रोहीत, इंद्रा, आशू आदी मंडळींसाठी. गोरखगडाच्या पायथ्याशी मिळालेली थाळी. (या लेखातला हा एकमेव फोटो, ज्यातले पदार्थ मी रांधलेले नाहीत.)
हा आहे वांगीभात आणि पपईचे सलाद.
हे मामीचे. आलू चलाके
गोव्याच्या पद्धतीचे आंबाड्याचे रायते
ही अवलची गवार ढोकळी (मजहे व्हर्जन )
जागू आणि बागुलबुवा यांच्यासाठी हा मासा !
मला माहीत आहे, काही मित्रमैत्रिणी राहून गेल्यात. त्यांची आवडनिवड कळवली, तर त्यांनाही ई मेजवानी देईनच.
सावकाश होऊ द्या.
मस्तच!!! ह्या ई-मेजवानीत
मस्तच!!! ह्या ई-मेजवानीत स्वीट डीश मात्र राहुनच गेलेली दिसतीये.
मस्तच आहे ई - मेजवानी. सगळे
मस्तच आहे ई - मेजवानी. सगळे फोटो सुंदर. तुमच्या कल्पकतेला सलाम.
फटाकडी, खरं आहे. सध्या माझे
फटाकडी, खरं आहे. सध्या माझे स्वीट खाणे फक्त फळांपुरतेच मर्यादीत आहे. आता तूम्हा लोकांसाठी काहीतरी पेश करावेच लागेल !!
मस्त
मस्त
फॅण्टॅस्टिक मेजवानी आहे ही
फॅण्टॅस्टिक मेजवानी आहे ही दिनेशदा तुम्हाला________/\_________ .......! बाकी कुठलीच प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही.
वाह!! मस्तच दिनेश. कॉर्न आणि
वाह!! मस्तच दिनेश. कॉर्न आणि ब्रोकोली बेकची रेसीपी पण टाकाच. आणि हो रेसीपी बूक लिहाच आता.
धन्यवाद दिनेशदा! >>हो रेसीपी
धन्यवाद दिनेशदा!
>>हो रेसीपी बूक लिहाच आता
प्रचंड अनुमोदन. मनावर घ्याच.
>>सध्या माझे स्वीट खाणे फक्त फळांपुरतेच मर्यादीत आहे. आता तूम्हा लोकांसाठी काहीतरी पेश करावेच लागेल
सही! पण ह्यात काही 'हटके' हवंय हं
केळवणाच्या आठवणीने पुन्हा लगन
केळवणाच्या आठवणीने पुन्हा लगन करावे की काय असा विचार येतो आहे!
ते गोरखगडाच्या पूर्वसंध्येला रेल्वे स्टेशनावर खाऊ घातलेले काय होते?
आणि एकदा पित्तशामक म्हणून क्रिम आणि कुठल्याश्या भाजीचा गोड पदार्थ.. जो खाऊन माझी डोकेदुखी थाम्बली होती .. तो??
गिर्या, तूला पण बरंच आठवतय
गिर्या, तूला पण बरंच आठवतय कि !!
माझ्या बहुतेक आठवणीत तू असतोच. तूझ्या घरची कांदापातीची भाजी असो, तूझ्या अंगणातल्या शेकोटीवर केलेले वांग्याचे भरीत असो, तूझ्या गच्चीवर जेवलेलो पावभाजी आणि पुलाव असो, माणूस आत जाईल इतक्या मोठ्या फ्रिजमधले दूध असो..
आता लेकीच्या वाढदिवसाला वगैरे परत जमू !
तो स्टेशनवर खाल्ला होता तो उंधियु आणि पुरी. १० मिनिटात फ़स्त झाले होते सगळे आणि मग रात्री १२ किलोमीटर्स चाललो होतो.
आणि डोकेदुखीवर पालक विथ क्रिम केले होते.
प्वाट भरलं. ए भा प्र ते
प्वाट भरलं.
ए भा प्र
ते साबुदाण्याचे थालीपीठ चं रंग केशरी कसा???.
हिरवी मिरची न घालता लाल तिखट
हिरवी मिरची न घालता लाल तिखट घालून केलंय.
म्हमईकर.. काश्मिरी मिरच्यांचे
म्हमईकर.. काश्मिरी मिरच्यांचे तिखट.
त्याची कृती मागत होते सगळेच.
पिठूळ असलेले बटाटे, उकडून घ्या. कुसकरलेला बटाटा जर एक वाटी असेल तर अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घ्या.
मग बटाट्याच्या लगद्यात तिखट मिठ घालून नीट मळा. हवे तर जिरे पुड आणि दाण्याचे कुट टाका. मग हलक्या हाताने साबुदाणा मिसळा. साबुदाणा घातल्यावर मळायचे नाही. प्लॅस्टीकच्या कागदावर थोडे तेल लावून फार दाब न देता थालिपिठ थापून घ्या. आणि मंद आचेवर तूप सोडून भाजून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
हिरवी मिरची न घालता लाल तिखट
हिरवी मिरची न घालता लाल तिखट घालून केलंय.<<< हो मला ही असंच वाटलं, पण नंतर असंही वाटलं कि लाल तिखट घालुन केशरी रंग कसा, केशर घातलं असणार काय, दिनेश्दांचं काही भरवसा नाहिये
धन्स दिनेशदा. कृती उतरवुन घेतली नाहिये, कारण मी फक्स्त खायचं काम करतो.
मी भिजवलेला साबुदाणा, हिरवी
मी भिजवलेला साबुदाणा, हिरवी मिरची, उकडलेला बटाटा, मीठ घालते आणि डायरेक्ट तव्यावर लावते. पण तव्यावर लावणे ही कसरतच असते. थापताना हातालाच चिकटून येतं कधीकधी. पटापट थापायला लागतं. दिनेशदा बटाटा जास्त घालतात असं दिसतंय त्यामुळे प्लॅस्टिकवर थापून ते तव्यावर ट्रान्स्फर करता येतंय.
अश्विनी लोखंडाच्या तव्यावर
अश्विनी लोखंडाच्या तव्यावर असे थालिपिठ थेट लावता येते, पण नॉन स्टीक तव्यावर, तव्याला ते चिकटतच नसल्याने हातालाच चिकटते.
मी पराठे वगैरे पण आधी प्लॅस्टिकच्या कागदावर लाटून मग तव्यावर टाकतो. (पोलपाट धुवायचा त्रास कमी होतो.) आमच्याकडे प्लॅस्टीकच्या पिशव्या भरपूर येतात. सुपरमार्केटमधे सगळ्या भाज्या वेगवेगळ्या पिशव्यात घ्याव्या लागतात. त्या सगळ्या उपयोगात येतात.
असे साबु थालिपीठ मी ही करते
असे साबु थालिपीठ मी ही करते पण ते थापल्यावर तव्यावर घालणे म्हणजे कसरत च असते. थोडे पाणि लावायची का त्याला? बाकी चित्र कसली यम्मिइइइ
दिनेशदा, पालक विथ क्रिम ची
दिनेशदा, पालक विथ क्रिम ची गोड डिश? ती पण डोकेदुखीसाठी?
आशु२९, प्लॅस्टीकला आधी थोडे
आशु२९, प्लॅस्टीकला आधी थोडे तूप लावायचे. मग थापायचे. आणि झपकन तव्यावर उलटे टाकायचे म्हणजे खाली तवा, मधे थालिपिठ आणि वर प्लॅस्टीक. मग प्लॅस्टिक सोडवून घ्यायचे.
स्वप्ना, गिरिशला मायग्रेनचा त्रास व्हायचा. आंबट तिखट चालायचे नाही. मग अगदी थोड्या मिरचीवर कांदा पालक परतून त्यावर क्रीम टाकले होते. (आयत्यावेळी जिलेबी कुठून आणणार ?) त्यात बर्फी पण कुस्करुन टाकली होती. छान चव आली होती.
आणि डोकेदुखीवर पालक विथ क्रिम
आणि डोकेदुखीवर पालक विथ क्रिम केले होते.>>>> नाही नाही
बहुतेक लाल भोपळ्याचे काहीतरी होते! गारेगार होते!
सर्वच डिश अप्रतिम !!!!
सर्वच डिश अप्रतिम !!!!
ओह मग ते भोपळ्याचे भरीत.
ओह मग ते भोपळ्याचे भरीत. त्याचा फोटो माझ्या विठाई सिरिज मधे आहे.
व्वा दिनेशदा ,लाजवाब ...आज
व्वा दिनेशदा ,लाजवाब ...आज मेजवानीच म्हणायची... !
दिनेशदा, सर्व डीश पाहून
दिनेशदा, सर्व डीश पाहून आम्हाला काय वाटतंय ते शब्दात नाही सांगू शकत. पण ही तुमच्यासाठी मी बनवलेली स्वीट डीश.
फटाकडी, चालेल ना ही डीश
दिनेशदा मी फोटो बघत असताना
दिनेशदा मी फोटो बघत असताना माझे ओफ्फिस मधिल मित्र आनि मेत्रिनि लाळ गालतात हा हा हा
माझ्हि आवडति रेशिपि थालिपित
प्लिज माझि ई मेजवानि ?????????????????????//
प्रज्ञा, किती सुबक आणि शुभ्र
प्रज्ञा, किती सुबक आणि शुभ्र झालेत मोदक ! सुंदरच.
दिनेशदा, तुम्ही भारत भेतीवर
दिनेशदा, तुम्ही भारत भेतीवर आलात की एक दिवस पुण्यासाठी राखीव ठेवा. पुण्यातले सर्व मायबोलिकर तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. एक गटग पुण्यात व्हायलाच हवा.
नक्कीच प्रज्ञा. तसाही मी
नक्कीच प्रज्ञा. तसाही मी दरवेळी येतोच पुण्यात, सगळ्या जून्या मंडळीना भेटायला.
दीनेशदा, मजा आलि एकदम. आता हे
दीनेशदा, मजा आलि एकदम. आता हे सगळे पदार्थ करुन पहावेसे वाट्ताहेत, रेसिपी Please....
प्रज्ञा१२३ मस्त झालेत
प्रज्ञा१२३ मस्त झालेत मोदक.... आणि तुला स्पेशल थँक्स तू ती स्वीट डिश दिनेशदांसाठी दिलीस...
कारण काल संकष्टीनिमित्त मी जुन्या बिबीबरची दिनेशदांनीच लिहलेल्या उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहून पहिल्यांदाच कोणाच्या मदतीशिवाय मोदक बनवले होते, मस्त मऊ लुसलुशीत झालेले. फोटो काढून ईथे द्यायचा होता, पण मला काही ते जमल नाही.
प्रचंड सही पदार्थ आणि फोटो
प्रचंड सही पदार्थ आणि फोटो आहेत दिनेशदा. हॅट्स ऑफ!
Pages