जानेवारी:सर्वोत्तम कविता - हंस उडू पाही...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम काव्यरचना अज्जुका ह्यांची आहे. " हंस उडू पाही" कविता ही वेगवेगळ्या जातिवंत कल्पनांचा आविष्कार व अनेक आविष्कारांचा एक सुंदर व सुसंगत मिलाफ़ याचे जिवंत उदाहरण.
कवितांमधे उत्स्फूर्त सुचलेल्या उपमा वापरताना मुळात काय म्हणायचे आहे याचे भान कवी/ कवयित्रीला असले म्हणजे कविता किती वेगवेगळ्या प्रकारे वाचक/श्रोत्यांपर्यंत पोचते हे पुन्हा एकदा ह्या कलाकृतीने अधोरेखित झाले आहे.
ह्या कवितेचा सर्वोत्तम बिंदू म्हणजे रुपकांच्या वळणांनी जात जात संपूर्ण कविताच एका विचाराचे रूपक म्हणून जेव्हा तुमच्यासमोर उभी राहते तेव्हा प्रतिभेचे ते विराट दर्शन पाहून थक्क व्हायला होते. अशा अनेकानेक कलाकृतींसाठी अज्जुका ह्यांना मायबोलीतर्फे शुभेच्छा .

हंस उडू पाही...

चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे

पूर्ण कविता इथे पहा.

या महिन्यातील सर्व कविता वाचून त्यांचे परिक्षण केल्याबद्दल वैभव जोशी यांना मायबोली तर्फे अनेक धन्यवाद. वरील निवड आणि विवेचन वैभव जोशी यांनी केलं असून त्यासंदर्भात काही प्रश्न असल्यास ते ईथे विचारू शकता.

प्रकार: 

व्वा! मायबोलीवरच्या या उपक्रमात सर्वोत्कृष्ट कवितेचा मान सर्वप्रथम तुझ्या कवितेला मिळाल्याबद्दल अज्जुका, तुझे दुहेरी अभिनंदन!
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

अभिनंदन.
************
जे जे मजसाठी उचित, तेची तू देशिल खचित |
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा ||

अज्जुका, मनापासुन अभिनंदन !!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

अभिनंदन!
शेवटच्या दोन ओळींनी सुंदर कलाटणी देत 'सम' गाठली!
बापू करन्दिकर

क्या बात है रे..... अभिनंदन Happy

अज्जुके,
सॉलीड अभिनंदन.. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

अभिनंदन नी! खरंतर तुझ्या सर्व कविता छान आहेत.

अज्जुका, हार्दिक अभिनंदन.

झक्कास माते .... मी आजच वाचली.

फक्त तुला खास award देणे etc मला पटत नाहि. तू, वैभव, पेशवा, स्वाती, प्रसाद, सामुराई etc लोक ह्याच्या पलीकडे आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.

अज्जुका, मनापासुन अभिनंदन !!

सहीये! अभिनंदन नीरजा.

अज्जुका, अभिनंदन! बहोत खूब! (वैभव आणि इतरांनी तुझ्या कवितेवर केलेली चर्चा... मला जुन्या मायबोलीची आठवण आली होती.)

सगळ्यांचे आभार..
पुत्रा.. त्या 'पलिकडच्या' यादीत माझा समावेश काही पटला नाही. ह्यां लोकांची झेप फार मोठी आहे माझी नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अर्रे..... अभिनंदन अज्जुका. पहिला मान योग्य व्यक्तीलाच मिळाला.. वाचून आनंद वाटला.

अज्जुका अभिनंदन ! !
आत्ताच वाचली कविता.
खुप छान आहे..

.........सुन्या आंबोलकर

अरे वा अज्जुका. अभिनंदन. सुरेख आहे कविता. Happy

ग्रेट!!! अभिनंदन अज्जुका !!! नाव राखलस पोरी...

अज्जुका अभिनंदन..!!
कविता आवडलीच शिवाय त्यावरची विस्तृत चर्चा ही..

अज्जुके, अभिनंदन !!! मला कवितेतलं फारसं कळत नाही पण तेथिल रसग्रहण वाचून समजली आणि आवडली होती Happy

नीरजा, अभिनंदन.
कविता सुरेख आहे.

अज्जुका "पुन्हा एकदा" छानच... वैभवा, तुझी एकपात्री "तज्ञ समिती" आवडली.. Happy

पण पूर्वी जसे प्रत्त्येक मराठी महिन्याला प्रत्त्येक विभागाचे mod choice ठेवले होते तेच आता हवं तर कॅलेंडर महिन्याला का नाही ठेवत...? त्याने इथे नव्याने लिहीणार्‍यांनाही अधिक प्रोत्साहन मिळेल.

ये बात!अज्जुके, अभिनंदन!!

अज्जुका यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या अनेक कविता वाचलेल्या आहेत. प्रत्येक कविता अस्सल वाटली ; दाद द्यावीशी वाटली. हीसुद्धा तशीच दर्जेदार कविता आहे. पुन्हा एकदा , अभिनंदन.

Pages